✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आयटीची गोष्ट

य — यमन, Mon, 09/14/2015 - 14:22
आयटीची गोष्ट I ऐका मायबाप II पुण्ण्याची गणना III येथे नाही IIII पैश्यांचे डोंगर I सोनियाच्या राशी II वाढता डॉलर III दिसो लागे IIII गळ्यामध्ये कार्ड I बडविती बोर्ड II जीवनाची आस III विझवुनी IIII मेल देती घेती I रिलीज भोवती II सुष्ट आणि दुष्ट III एक झाले IIII नाही जात पात I सगळेच एक II ढाळती पदर III युरो साठी IIII लाल लाल ओठ I रंगविती सर्व II गोऱ्या साहेबाचे III चाटू पाय IIII मिळूनिया सर्व I सोडुनिया सत्व II चराचर जणू III रांड वाडा IIII लेकुरवाळी माय I गेली परदेशा II पान्ह्या वीना पोर III सुकलेले IIII कशासाठी सर्व I उर फाटी धाव II खोल गेले डोळे III जिवलगा IIII पुरुषार्थ व्यर्थ I विझे बाईपण II कित्येक प्रतिभा III वांझ झाल्या IIII मागणेची एक I जोडूनिया हात II असा जन्म देवा III पुन्हा नको IIII

प्रतिक्रिया द्या
7009 वाचन

💬 प्रतिसाद (29)

छान..!

एस
Mon, 09/14/2015 - 16:33 नवीन
अभंग छान आहेत!
  • Log in or register to post comments

मालक.

अनिरुद्ध.वैद्य
Mon, 09/14/2015 - 16:59 नवीन
नमस्कार स्विकारां … आपण पोट भरण्यासाठी साठी काय करता? नै म्हणजे आयटीवाल्यांवर उगाळून झालंय आपलं बी सांगा …
  • Log in or register to post comments

आँ..?

द-बाहुबली
Mon, 09/14/2015 - 17:01 नवीन
काहीही हं य...
  • Log in or register to post comments

अभंग छान

मित्रहो
Mon, 09/14/2015 - 17:23 नवीन
पण आयटीवर राग का?
  • Log in or register to post comments

बापरे बाप! खरच इतकी भयाण

अत्रुप्त आत्मा
Mon, 09/14/2015 - 17:25 नवीन
बापरे बाप! खरच इतकी भयाण परीस्थिती असते का हो आयटित?
  • Log in or register to post comments

पुणेकर, लक्ष असू द्या

दमामि
Mon, 09/14/2015 - 17:42 नवीन
ते "पुण्ण्याची" आहे की। पुण्याची?
  • Log in or register to post comments

प्रॉब्लेम आहेत, पण इतके नाहीत

नाव आडनाव
Mon, 09/14/2015 - 17:56 नवीन
प्रॉब्लेम आहेत, पण इतके नाहीत राव.
  • Log in or register to post comments

मी आयटीत

नाखु
Mon, 09/14/2015 - 18:07 नवीन
नाही पण ऐटीत राहतो म्हून आप्ला पास.
  • Log in or register to post comments

आयटीतल्या लोकांना फसवून

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 09/14/2015 - 18:21 नवीन
आयटीतल्या लोकांना फसवून "कोलोनियल बाँडेड लेबरर" बनविले जात आहे असे चित्र यक्दम डॉळ्ञास्मोर उभे र्‍हाय्ले ना राव ! =)) जाग्तिक कोर्टास केस कर्राय्ला पाय्जे भाऊ ;) :)
  • Log in or register to post comments

आमी हौ बा तयार लेबर बनाय्ले.

उगा काहितरीच
Tue, 09/15/2015 - 00:52 नवीन
आमी हौ बा तयार लेबर बनाय्ले. पण कुणी बन्वुनच नाय रायले . ;-) :'(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

काही ही तारे तोडलेत. तुमचा

स्रुजा
Tue, 09/15/2015 - 02:28 नवीन
काही ही तारे तोडलेत. तुमचा पेशा काय आहे?
  • Log in or register to post comments

आज आपल्याच भावा मैत्रीणींची

द-बाहुबली
Tue, 09/15/2015 - 14:12 नवीन
आज आपल्याच भावा मैत्रीणींची लाज या कवीतेत काढली असुनही एक सजग मराठीमन त्यावेरुध्द पेटुन उठले नाही हे बघुन एक मिपाकर म्हणून मला कमालीची शरम वाटली.... धिक्कार. धिक्कार. धिक्कार. त्रिवार धिक्कार कलेच्या या दुरुपयोगाचा.
  • Log in or register to post comments

सेम ओल्ड षिट.

बॅटमॅन
Tue, 09/15/2015 - 15:09 नवीन
सेम ओल्ड षिट.
  • Log in or register to post comments

+१

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 09/16/2015 - 13:50 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

षिट

फारएन्ड
गुरुवार, 09/17/2015 - 09:17 नवीन
षिट श चे पोट फोडून बाहेर आले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ऑफिस...

मम्बाजी सर्वज्ञ
Tue, 09/15/2015 - 15:15 नवीन
माझा एक बँकेत म्यानेजर असलेला मित्र आहे. असलीच कविता तो त्याच्या ऑफिस बद्दल गात असतो.
  • Log in or register to post comments

आयटीची गोष्ट

सत्याचे प्रयोग
Wed, 09/16/2015 - 12:34 नवीन
आयटीची गोष्ट पॅकेज पॅकेज रात्रभर झोपेची तळमळ तळमळ
  • Log in or register to post comments

तद्दन थर्डक्लास वायफळ बडबड

प्रसाद गोडबोले
Wed, 09/16/2015 - 13:59 नवीन
तद्दन थर्डक्लास वायफळ बडबड
  • Log in or register to post comments

सगळे आयटीप्रेमी नवलेखकाच्या

जव्हेरगंज
Wed, 09/16/2015 - 18:53 नवीन
सगळे आयटीप्रेमी नवलेखकाच्या मागे दगडचं घेऊन लागली की काय...? असो काव्याचा अर्थ तसाही भयावह आहे. येऊद्या एखादा फक्कड फर्मास...!
  • Log in or register to post comments

खरी परिस्थिती ठाऊक नाही, पण

किसन शिंदे
Wed, 09/16/2015 - 18:59 नवीन
खरी परिस्थिती ठाऊक नाही, पण काव्य मस्त जमलंय!
  • Log in or register to post comments

च्यामारी किसना. तुला चक्क

अभ्या..
गुरुवार, 09/17/2015 - 13:54 नवीन
च्यामारी किसना. तुला चक्क कविता आवडली? कस्काय म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

सर्व चांगल्या वाईट प्रतीकीयांचे स्वागतच आहे ….

यमन
गुरुवार, 09/17/2015 - 09:18 नवीन
सर्व चांगल्या वाईट प्रतीकीयांचे स्वागतच आहे …. धन्यवाद मंडळी . "same old shit " "तद्दन थर्डक्लास वायफळ बडबड" पासून " पण काव्य मस्त जमलंय!" पर्यंत मिळालेल्या सर्व जाणकार ,दर्दी प्रतीकीयां बद्दल आभार . मी स्वतः IT मध्ये १५ वर्ष काम करतोय. खरं तर हे अभंग जेंव्हा एक आई तीन महिन्यांच्या पोराला भारतात ठेवून "on site " गेलेली पाहिलं तेंव्हा सुचले . "वेदना चेतना विश्व जागवते " ची अनुभूती आली . अर्थात बाकी व्यवसायात ह्याच्या हून प्रचंड खडतर परिस्थिती असेलच . प्रतिकूल परिस्थितीत लढणारे सैनीक ;एखाद्या नकाशा वर अस्तित्व नसलेल्या खेड्यात आयुष्य झिजवणारे शिक्षक ह्यांच्या पुढे जीवन सुखासीन आहेच. पण इथेही परिस्थिती चिघळतेय. त्यामुळे हे अनुभव "तद्दन थर्डक्लास वायफळ बडबड" कसे ? ह्याच्या विचारात मी सध्या आहे . असो. धन्यवाद पुन्हा एकदा .
  • Log in or register to post comments

जर १५ वर्षे इथ काढली आहेत तर

द-बाहुबली
गुरुवार, 09/17/2015 - 13:19 नवीन
जर १५ वर्षे इथ काढली आहेत तर दोष आयटीचा नसुन भारतियांच्या हावरट वृत्तीचा आहे. कुठे थांबावे हे न समजणार्‍या व्यक्तींचा आहे हे लक्षात आले नाही का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यमन

आई...

मम्बाजी सर्वज्ञ
गुरुवार, 09/17/2015 - 14:21 नवीन
आई पोराला सोडून बाहेर देशी गेली त्यामागे काय हेतू आहे याला महत्व आहे. जर फक्त ऑन साईट जायचे म्हणून असेल तर नक्कीच वाईट आहे पण जर घराला हात भार लावण्याच्या उद्देशाने गेली तर मग हिरकणीचे पोवाडे कशाला गायचे? हि गोष्ट खरी आहे कि आय टी कंपन्यांमध्ये हावरटपणा अगदी उठून दिसतो. या क्षेत्रात येण्या अगोदर इलेक्ट्रोनिक्स आणि मान्युफाकचरिंग मधल्या नोकर्या अगदी जवळून बघितल्या आहेत. कामात एक प्रकारचे समाधान असायचे आणि आजू बाजूच्या लोकांशी एक 'संवाद' असायचा. आय टी मध्ये त्या गोष्टीचा अभाव जाणवतो. आहे टी फक्त स्पर्धा. आणि मग ससेहोलपट होणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यमन

तुमच्या लिखाणाचा....

चांदणे संदीप
गुरुवार, 09/17/2015 - 14:49 नवीन
तुमच्या लिखाणाचा आशय समजला. तुमच्या प्रकटनाने त्यामागची तळमळही लक्षात आली. लिहिण्याचा प्रयत्नही चांगला होता. फक्त वृत्त, छंद, लय यांकडे जरा लक्ष दिलंत तर रचना आधिक प्रभावी होईल असे वाटते. प्रतिभा तर आहेच तुमच्याकडे! (IT चा नसणारा पण का कोण जाणे IT चा समजला जाणारा) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यमन

आपल्या पेशा ला कधीच नाव ठेवु

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 09/17/2015 - 14:01 नवीन
आपल्या पेशा ला कधीच नाव ठेवु नये, लोकांस नोकऱ्या मिळत नाहीत आपल्याला आहे तर आपण त्रासु नये असे मनापासून वाटते (रेजिमेंटेड) बाप्या
  • Log in or register to post comments

अभंग आवडले.

प्रियाजी
गुरुवार, 09/17/2015 - 15:33 नवीन
मला तर हे आयटी च्या कोणा एकाचे आरश्यात स्वतःला पाहणे वाटलं. सोन्याबापू, मला माफ करा पण जर आपल्या पेशातील वाईट गोष्टी जर आपणच लक्षात घेतल्या नाहीत तर चांगले बदल कसे होतील? ( मी सध्या कोण्त्याही पेशा वा नोकरीत नाही.)
  • Log in or register to post comments

मान्य आहेच !!

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 09/17/2015 - 15:49 नवीन
मान्य आहेच !! फ़क्त आपण आपल्या वैयक्तिक करियर मधे घेतलेले पाहिलेले अनुभव हे generalize करुन सुद्धा उपयोग नाही न ताई?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाजी

Hmm

निनाव
गुरुवार, 09/17/2015 - 21:01 नवीन
Vishay gambhir aahe. Arthaat, bhaavna vyakt zhalya aahet hya kavitetoon. Pu le shu.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा