Skip to main content

लाघवी

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शनिवार, 12/09/2015 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
तूझ्या कपाळावर रेंगाळणार्‍या अल्लड, अवखळ... किंचीत खोडसाळ बटा, थेट आतवर वेध घेणारे उत्कट डोळे, आणि... ओठावरचे मिश्किल हसू...!! अलिकडे मात्र उन्मुक्त बटांनाही, वारंवार सावरायला लागली आहेस तू... डोळ्यातली उत्कटता आर्त होतेय आजकाल तू काही बोलत नाहीस... ओठावर मात्र अजूनही तेच मिश्किल हास्य... त्या बंद ओठाआड मात्र, कधी पोहोचताच येत नाही बघ... सगळं आर्त ... त्या मिश्किल हास्यात बेमालूम लपवतेस तू ! आणि ते म्हणतात... व्वा, केवढी लाघवी पोर आहे ! विशाल...
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3567
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

खूपच छान! ते शीर्षक वाचून आधी जरा गडबडलो होतो. नंतर लक्षात आले. :-)

कविता खरच सुंदर आहे

आवडली कविता !