✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

(इच्छामटण)

प
प्रसाद गोडबोले यांनी
Tue, 09/08/2015 - 16:45  ·  लेख
लेख
इच्छामटण ह्याचा अर्थ मनात इच्छा आली की "चांगले मटण" खायला मिळणे असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात आणि शेवट तांबड्या पांढर्‍या रस्स्याने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते , बायकोच्या हातात असते. ’इच्छामटण हवे’ असे तोंड खवळलेल्या व्यक्तीने सांगितले तरी श्रावणात घरातल्यांना ते पटत नाही. चातुर्मासात घरी गुपचुप मटण बनवुन खाणे अवघड असते. बायको समजुतदार असली तर त्यातल्या त्यात चांगले. परंतु बायको श्रध्दाळु असली आणि नातेवाई़क आसपास रहाणारे असतील तर मात्र अशा चवीने मटण खाणार्‍यांची अवस्था खुप दयनीय होते. अगदी गावाबाहेरच्या हॉटेलात जाऊन मटण खायचे म्हणले तरी कोणी ना कोणी नातेवाईक भेटायची भीती वाटते . शेवटी प्रत्येक गावाबाहेर असे हॉटेल असावे कि जिथे इच्छामटण मिळावे आणि निर्भयपणे खाता यावे असा विचार येतो. हा विषय सर्वांना माहित असला तरी मिपावरील चर्चेतून प्रत्येकाच्या गावाबाहेरील असे मस्त मटण मिळणारे ढाबे हॉटेल्स कळतील.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विडंबन
विनोद
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
66141 वाचन

💬 प्रतिसाद (264)

प्रतिक्रिया

ट्रोजनकालीन ग्रीक मटण तसे

बॅटमॅन
Tue, 09/08/2015 - 21:57 नवीन
ट्रोजनकालीन ग्रीक मटण तसे शिंपलच दिसतेय असे होमरबाबांच्या वर्णनातून जाणवते. मटणापेक्षाही ते लोक्स बीफ जास्त खात. बैल मारायचा, मोठ्या शेकोटीवर सळया त्याच्या पीसेसमधून आरपार घालून सरकवायच्या , विस्तवावर ते चहूबाजूंनी शेकून घ्यायचे आणि ते बीफ कबाब वाईन व ब्रेडसोबत हाणायचे अशी वर्णने आहेत. नेस्टॉरच्या पायलॉसमधील राजवाड्याच्या मेन रूममध्ये अशी एक शेकोटी होती जिथे मेजवानीच्या वेळी तरणे राजपुत्र जसे लागेल तसे पीसेस भाजून घ्यायचे असे उल्लेख सापडतात. बाकी नंतरच्या काळाचा अभ्यास अजून नसल्यामुळे रेशिपी देऊ शकत नाही तरी क्षमस्व!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

इच्छामटण ह्याचा ग्रीक अर्थ काय?

नया है वह
Tue, 09/08/2015 - 19:00 नवीन
?
  • Log in or register to post comments

हा हा हा.........

एक एकटा एकटाच
Tue, 09/08/2015 - 19:43 नवीन
लै भारी विडंबन
  • Log in or register to post comments

पुण्यातील मी मटाण हाणलेली ठिकाणे

सत्याचे प्रयोग
Tue, 09/08/2015 - 20:30 नवीन
१) ज्ञानप्रबोधिनी गल्लीत '' मराठा दरबार " तांबडा - पांढरा रस्सा कीती पण हाना. मी तर तिथं गेल्यावर पाणी पितच नाही. मटाण पण १दम झ्याक. २)" कावेरी हाॅटेल" ह्यांच्या बर्‍याच शाखा आहेत पण अलिकडे चव आणि किंमत बिघडलीय. 3)" आवारे खानावळ" कुमठेकर रोड जेवणाचे आधी तास अर्धा तास जावा प्रतिक्षेत ठेवतात ते. मटाण १दम झटका. पण बसायची जागा जेमतेम असते. ४) "पुरेपूर कोल्हापूर" हे सांगवीत होते आता बंद झालेय. इथले मटणाचे प्रकार १दम हाटके. पुण्यात ह्यांची शाखा सुरू असल्यास कळवा. कळविणाऱ्यास माझेतर्फे वझडी प्लेट फ्री. बायदवे मी आधी फक्त बोलाईच खायचो पण आता १० वर्षे झाले बोकडाचं पण मटाण खायला लागलोय कायच फरक नाय पडला.
  • Log in or register to post comments

कावेरी आणि पुरेपूर कोल्हापूर

सुहास झेले
Wed, 09/09/2015 - 08:50 नवीन
कावेरी आणि पुरेपूर कोल्हापूर अगदी बकवास झाले आहे !! कोल्हापुरात फौजी म्हणून एका हॉटेलात आजवर खाल्लेले सगळ्यात उत्तम मटण होते... त्याला आता ५ वर्ष झाली. मुंबईत हॉटेल चैतन्य (सिद्धिविनायक मंदिर रोड), मालवण कट्टा (शिवसेना भवनाजवळ) उत्तम ऑप्शन आहेत. मुरुडची पाटील खानावळ पण मटणासाठी फेमस हाय.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्याचे प्रयोग

पुण्यातील सांगा ना हाॅटेलं

सत्याचे प्रयोग
Wed, 09/09/2015 - 14:06 नवीन
पुण्यातील सांगा ना हाॅटेलं १ तर तोंड खवळलय आता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले

मुरुडची पाटील खानावळ

कपिलमुनी
Wed, 09/09/2015 - 15:09 नवीन
ही ऐकीव माहीती दिसतेय . मी मे महिन्यात पाटील खानावळीमध्ये गेलो होतो. अतिशय वाइट चवीचे (मटण / मासे दोन्ही) जेवण होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले

पाटील खानावळीत मटणाचे माहिती

सौंदाळा
Wed, 09/09/2015 - 18:39 नवीन
पाटील खानावळीत मटणाचे माहिती नाही पण मासे अप्रतिम मिळाले होते. १९९८ साली जेव्हा ती खरच खानावळ होती तेव्हा नारळी पोफळीच्या बागेत लाकडी बाक आणि टेबल लावलेले होते नंतर २००५ (का २००६ आठवत नाही) पाटील खानावळीचे हॉटेल झाले होते थोडी धाकधुक वाटत होती पण चांगले मासे मिळाले. नंतर अलिबाक मुरुडला पर्यटकांची गर्दीच इतकी वाढली की परत जावे वाटलेच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

ऐकीव नक्कीच नाही... स्वत:

सुहास झेले
गुरुवार, 09/10/2015 - 00:05 नवीन
ऐकीव नक्कीच नाही... स्वत: जाऊन आलोय. तिथे मासे निर्विवाद मस्त मिळतात, यात शंका नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

चैतन्य

बोका-ए-आझम
Wed, 09/09/2015 - 15:18 नवीन
बंद झालं काका. अप्रतिम होतं यात शंकाच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले

आजोबा, चैतन्य सुरु आहे हो ;-)

सुहास झेले
गुरुवार, 09/10/2015 - 00:09 नवीन
आजोबा, चैतन्य सुरु आहे हो ;-) सिद्धिविनायक रोडला शिफ्ट झाले आहे ते. सेनाभवनासमोर असलेले बंद झाले. मी दोन महिन्यांपूर्वी गेलेलो. ह्या आठवड्यात जाऊन येतो परत आणि कन्फर्म सांगतो :) Zomato वर अगदी १०-१५ दिवसांपूर्वीचे रिव्हू आहेत - https://www.zomato.com/mumbai/chaitanya-dadar-west
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

झेलेकाका is right!

बोका-ए-आझम
Sat, 09/19/2015 - 02:25 नवीन
चैतन्य तिथे आहे अाणि दणक्यात चालू आहे असा खात्रीलायक रिपोर्ट आहे. बोला, कधी जायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले

+१

मालोजीराव
गुरुवार, 09/10/2015 - 15:06 नवीन
चव ढेपाळलीये ! काही नवीन (तशी जुनीच ) ठिकाणं चागंली वाटलेली - १. खेड शिवापूर ला जगन्नाथ भेळ शेजारचं जगदंबा … झक्कास थाळी आहे एकदम, सुक्क मटण,रस्सा,भाकरी आणि इंद्रायणी भात …तूप वाटी सह २. कोंढवा सासवड रोड वरच शिवम हॉटेल ३. पाचगणी च्या रुस्तम्स मधली मटण सल्ली बोटी दोराबजी पेक्षा भारी ४. खडकवासला पानशेत रोड वरचं 'समाधान' हॉटेल आपलं फेवरेट …मटण,चिकन नेउन द्यायचं हॉटेलवर ते बनवून देतात (आपल्याला पाहिजे तसं ) आणि किलोप्रमाणे चार्जेस लावतात ५. भोर -महाड रोड वरचं आपटी गावाजवळच मटन तर एकदम झकास, बाउलभर सुक्क आणि रस्सा ६. वेल्ह्याच्या 'स्वप्नील' मधली मटन थाळी पण ट्रेक चा सगळा शीण घालवणारी ७. जुन्नर च्या बेल्हे गावातलं बाजाराच्या दिवशी मिळणारं पालातल मटन अफलातूनच, तो पालात बसून खायचाच एकंदर अनुभव मस्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले

१. खेड शिवापूर ला जगन्नाथ भेळ

प्रसाद गोडबोले
Fri, 06/03/2016 - 12:07 नवीन
१. खेड शिवापूर ला जगन्नाथ भेळ शेजारचं जगदंबा … झक्कास थाळी आहे एकदम, सुक्क मटण,रस्सा,भाकरी आणि इंद्रायणी भात …तूप वाटी सह
नुकतेच काही दिवसांपुर्वी जगदंबा ला जेवलो ! तुफ्फान मटन आहे :) इतका तुडुंब जेवलो होतो कि सीटबेल्ट लावायला पोट नको म्हणत होते =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

सिंहगड रोडवर 'शेतकरी' पण बरे

विशाल कुलकर्णी
Wed, 09/09/2015 - 12:23 नवीन
सिंहगड रोडवर 'शेतकरी' पण बरे आहे तसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्याचे प्रयोग

परवाच दादरला सिध्दीविनायक

खटपट्या
Wed, 09/09/2015 - 13:30 नवीन
परवाच दादरला सिध्दीविनायक देवळाच्या आजुबाजुला पुरेपुर कोल्हापूरची पाटी पाहीली. पार्कींगची जागा नसल्यामुळे बेत रहीत केला. परत रेल्वेने जाउन ताव मारायचा विचार आहे. कोणी बरोबर येणार असल्यास स्पॉन्सर बनण्यास मी तयार हाये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्याचे प्रयोग

पार्टी असेल तर का नाही? ;-)

सुहास झेले
गुरुवार, 09/10/2015 - 00:10 नवीन
पार्टी असेल तर का नाही? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

काही दम नाही त्यात

बोका-ए-आझम
गुरुवार, 09/10/2015 - 00:11 नवीन
पुरेपूर कोल्हापूर म्हणजे फसवाफसवी आहे असं माझं ठाम मत झालं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

म्हणजे? इस्कटून सांगा. बेत

खटपट्या
गुरुवार, 09/10/2015 - 07:21 नवीन
म्हणजे? इस्कटून सांगा. बेत बदलता येइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

फक्त मसाला आणि गळ्याशी येणारं तेल.

बोका-ए-आझम
Fri, 09/11/2015 - 00:23 नवीन
म्हणजे पुरेपूर कोल्हापूर. पांढरा आणि तांबडा पण काही खास नाहीत. त्यापेक्षा दादर सयानी रोडवरचं स्वराज्य आणि बांद्रा पूर्वचं सदिच्छा मस्त आहे. चेंबूरचं मालवण कट्टा पण वगलं आहे. बोला. कुठे भेटायचं? एक छोटेखानी मुंबई कट्टापण होऊन जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

पुरेपूर कोल्हापूर नाही आवडल.

अनिरुद्ध.वैद्य
गुरुवार, 09/10/2015 - 12:17 नवीन
पुरेपूर कोल्हापूर नाही आवडल. तसं तर कोल्हापूरातलं ओपलचपण नाही आवडल. मटणाच्या नावाखाली काहीही उकडलेलं खपवलं तिथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

कोल्हापुरतलं ओपल बिघडलय पाक.

संजय पाटिल
Fri, 09/11/2015 - 11:12 नवीन
कोल्हापुरतलं ओपल बिघडलय पाक. त्यापेक्शा रुइकर कॉलनीतलं परख मस्त आहे. एकट्याला संपनार नाही एवढ जेवन असते ताटात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

कोल्हापुरातनं गगनबावड्याला

सौंदाळा
Fri, 09/11/2015 - 11:18 नवीन
कोल्हापुरातनं गगनबावड्याला जायच्या रस्त्यावर चिकन / मटण खायला चांगले हॉटेल कोणते? अधुन मधुन तिकडन जाणे होते पण चांगले हॉटेल अजुन मिळाले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

धन्यवाद :)

अनिरुद्ध.वैद्य
Fri, 09/11/2015 - 12:56 नवीन
धन्यवाद :) नेक्स्ट मंथ वारी आहेच! तेव्हा ट्राय करून बघतो. बाकी NH4 वरच देहाती आणि २ ४ अजून हॉटेले दिसली. ती कशी काय? आणि पद्माबद्दल काय अभिप्राय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

परख ची वाढती गर्दी बघता परख

असंका
Fri, 09/11/2015 - 13:10 नवीन
परख ची वाढती गर्दी बघता परख खरंच चांगलं असावं. सामिष वर्ज्य आहे त्यामुले फर्श्ट हँड सांगू शकत नाही.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

पद्मा पण ओपलच्या वाटेने जात

संजय पाटिल
Sat, 09/12/2015 - 10:46 नवीन
पद्मा पण ओपलच्या वाटेने जात आहे. देहाती बद्दल ऐकून आहे पण अनुभव नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

dehati ठीक ठाक आहे .

अद्द्या
Sat, 09/12/2015 - 10:56 नवीन
dehati ठीक ठाक आहे . bhavani मंडपात "गावरान" किंवा त्या ओळीत असलेले फक्त संध्याकाळी चालू असणारी थाळी सिस्टीम असलेली हॉटेल लई भारी मटण करून देतात . पद्मा पण तेवढं आवडलं नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

इच्छामटण की दयामटण ??

चित्रगुप्त
Tue, 09/08/2015 - 21:26 नवीन
भीष्म शरपंजरी पडलेले असताना त्यांना मटणाची चोपायची इच्छा झाली होती, ती युथिष्ठिराने पुरवली असे काही वाचल्याचे आठवते. याला इच्छामटण म्हणायचे की की दयामटण ?? Image removed.
  • Log in or register to post comments

.

चांदणे संदीप
गुरुवार, 01/17/2019 - 11:57 नवीन
चित्रगुप्त काकांनी मला विवश केले. ;=) फक्त, युधिष्ठिर काय मीटरात बसेना म्हणून अर्जुनाला घेतले.
इच्छामटण बोले भीष्म अर्जुनासी शरपंजरी निजल्या निजल्या पार्था, आण सत्वरें मटण वाटीभर, शिजल्या शिजल्या गरमागरम अळणी सूप पितोच कसे फुर्र करून तर्रीदार मस्त रश्श्यात भाकर खातो कुस्करून ना कुठली आस ना ध्यास तरी शरांचा टोच साही मटण खाल्ल्याशिवाय मात्र इच्छामरण मी घेणार नाही कावराबावरा अर्जुन दावी खिसा रिकामा प्यान्टीचा वदे, भक्षितो भाजीपाला कठीण काळ मासांताचा कृष्ण धावला शिष्टाईस करून तिरका डोळा सांगे पाच पांडवांसी करा लेको कॉन्ट्री गोळा!
Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

खाश्या सदाशिव पेठेत "नागपुर

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 09/09/2015 - 09:06 नवीन
खाश्या सदाशिव पेठेत "नागपुर हॉटेल" भिंतीकड़े तोंड करून बसायला लागते पण रस्सा असला का दिल खुश हो जायेगा
  • Log in or register to post comments

हा हा !

खेडूत
Wed, 09/09/2015 - 10:24 नवीन
हा हा ! भिंतीकडे तोंड करून जेवणारे लोक दिसायचे आणि फार मज्जा वाटायची. मी खात नसल्याने कधी आत गेलो नाही पण दाराला लावलेल्या हिरव्या पडद्यातून हे विहंगम दृश्य दिसत असे, जे जगात कुठेही परत पहायला मिळाले नाही ! बाकी जगातल्या एकमेवाद्वितीय गोष्टी पुण्याच्या सदशिव पेठेतच पहायला मिळाल्या. (जाऊ दे- नकोच त्या आठवणी !)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

एकमेवाद्वितीय गोष्टी

अनिरुद्ध.वैद्य
Wed, 09/09/2015 - 13:35 नवीन
एकमेवाद्वितीय गोष्टी पुण्याच्या सदशिव पेठेतच पहायला मिळाल्या. >> आख्या त्रिलोकात एकमेव सदाशिव पेठ असल्याने तिथे अद्वितीय गोष्टी घडणारच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

जाव म्हणतो!

अनिरुद्ध.वैद्य
Wed, 09/09/2015 - 13:15 नवीन
पत्ता द्या जरा … खूप नाव ऐकलंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

नागपूर हॉटेल ला दुपारी १२.४५

मालोजीराव
गुरुवार, 09/10/2015 - 14:44 नवीन
नागपूर हॉटेल ला दुपारी १२.४५ नंतर आणि संध्याकाळी ८-८.३० नंतरच जेवण संपलेलं असतं राव, २ वेळा अनुभव आलाय. बाकी नुसत्या वासावरून तरी जेवण फक्कड असावं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

बाबानो बाह्मणांनी नाॅनव्हेज

हेमंत लाटकर
Wed, 09/09/2015 - 12:12 नवीन
बाबानो बाह्मणांनी नाॅनव्हेज खायच नसत. मासे व अंडी चालतील.
  • Log in or register to post comments

अस्स का हो भाऊ ?

पगला गजोधर
Wed, 09/09/2015 - 12:23 नवीन
बाह्मणांनी नाॅनव्हेज खायच नसत.
अस्स का हो भाऊ ? रेफेरंस द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

हेमंता, तुला आपल्या हिंदू

बॅटमॅन
Wed, 09/09/2015 - 12:41 नवीन
हेमंता, तुला आपल्या हिंदू धर्माचे काडीमात्र ज्ञान नाहीये तरी उगा कशाला हसे कसून घेतोयस स्वतःचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

हेमंता, तुला आपल्या हिंदू

हेमंत लाटकर
Wed, 09/09/2015 - 12:59 नवीन
हेमंता, तुला आपल्या हिंदू धर्माचे काडीमात्र ज्ञान नाहीये. येथे ज्ञानाची काय गरज आहे. पुरातन काऴी भाज्याचे, अन्नधान्यांचे जास्त प्रकार नव्हते. म्हणून भात आणि मांसाहार चालायचा. आता शाकाहारी अन्नधान्ये मुबलक प्रमाणात मिळते. तसेही माणसाचे दात व अातडे मांसाहार करण्यास अनुकूल नसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

जुन्या काळी सगळे असूनही लोक

बॅटमॅन
Wed, 09/09/2015 - 13:36 नवीन
जुन्या काळी सगळे असूनही लोक सर्रास मांसाहार करायचे. ब्राह्मण काय आभाळातून पडलेत काय? (ब्राह्मण) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

याज्ञवल्क्य ऋषींचा काहीतरी एक

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 09/09/2015 - 13:17 नवीन
याज्ञवल्क्य ऋषींचा काहीतरी एक रेफेरेंस आहे न हो गोथम सिटी नरेश? की बा "कोवळे लुसलुशीत गोमांस खाणे मी अजिबात सोडणार नाही" वगैरे??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

तसे भरपूर

अनिरुद्ध.वैद्य
Wed, 09/09/2015 - 13:33 नवीन
तसे भरपूर रेफ़रन्स काढता येईल … कोणास कोणते मास द्यावे … बैल कधी कापावा गाय कोणती अन कधी कापावी … बकरी कोणती खावी वगैरे वगैरे … भीष्मांनी ८४ प्रकारचे प्राणी खाण्यायोग्य सांगितले आहेत! सो बिनधास्त खावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

हो आय थिंक.

बॅटमॅन
Wed, 09/09/2015 - 13:43 नवीन
येस सरजी, याज्ञवल्क्यांचा आहे बहुधा, नीट आठवत नाही. जरा बघून सांगतो. नक्की आठवणारे रेफरन्सेस म्ह. १. वसिष्ठ ऋषी जनक राजाकडे आले असता त्यांच्यासाठी गोमांस शिजवण्यात आले. संदर्भ: उत्तररामचरित. २. कुठल्या प्रकारचा नैवेद्य पितरांना दिला तर ते किती दिवस संतुष्ट राहतात याचे एक कोष्टक महाभारतात दिलेले आहे, त्यातच बीफचाही उल्लेख आहे. नक्की पर्व आणि अध्याय क्रमांकासाठी प्रचेतस ऊर्फ वल्ली यांना संपर्क करावा लागेल. हे झाले बीफबद्दल. त्याबद्दल अजूनही बरेच उल्लेख आहेत. नुस्त्या मांसाहाराबद्दल बघायचे तर ढिगाने उल्लेख आहेत. श्राद्धानिमित्त शिजवलेल्या मांसाला नाकारणारा ब्राह्मण हा खरा ब्राह्मणच नव्हे असेही उल्लेख आहेत, बहुधा गृह्यसूत्रांमध्ये. इतके असून सध्या ब्राह्मण हा वारसा नाकारतात आणि नाके मुरडतात हे अतिरोचक आहे. मांस खाऊन आपल्या धर्माची परंपराच आपण पुढे चालवतो आहोत हे त्या मूर्खांच्या गावीच नसते. अगदी कलियुगातले उदाहरण बघायचे झाले तर बंगालमधील ब्राह्मण परंपरेने चिकन-मटन-मासे सगळेच खातात. ते या अडाण्यांना माहिती तरी असते की नाही कुणास ठाऊक? (शाकाहारी दहशतवादाचा कट्टर मांसाहारी शत्रू) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

(किमान महाराष्ट्रात)

प्यारे१
Wed, 09/09/2015 - 14:06 नवीन
(किमान महाराष्ट्रात) ब्राह्मणांनी मांस खाऊ नये असं बंधन कधीपासून सुरु झालं? बहुतेक संपूर्ण भारतात काही विशिष्ट जातींनी मांसाहार करु नये असं कधीपासून सुरु झालं? बाकी लोकांना मूर्ख म्हणण्यापेक्षा अडाणी म्हणणं काही अंशी योग्य. माहिती नसते. घरात परंपरागत हे खायचं नाही ते खायचं नाही असंच सांगितलं जात असतं. कारण? आपल्यात खात नाहीत. यापलिकडं उत्तर नसतं. आजूबाजूचा गोतावळा अशाच मानसिकतेमधला, मित्रांची आडनावं विचारुन मैत्री करायला परवानगी या सगळ्यात एका मर्यादित वर्तुळापलिकडं जाणं होत नाही, वाचायला मिळत नाही, मिळालं तरी स्वीकारण्याची मानसिकता आणि त्याहून जास्त गरज वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

महाराष्ट्राचं माहिती नाही.

बॅटमॅन
Wed, 09/09/2015 - 14:13 नवीन
महाराष्ट्राचं माहिती नाही. बघावं लागेल. बाकी महाराष्ट्रातही सारस्वत ब्राह्मण हे पारंपरिकरीत्या मांसाहार करतात. बाकीचे त्यांना 'आपल्यातले' मानत नसले म्हणून काय झाले. पूर्ण भारताचं बघायचं तर जैन-बौद्ध धर्मप्रसारानंतर हे जरा जास्त सुरू झाले असे दिसते. त्याआधी तितके दिसत नाही. त्यानंतरही हा प्रकार हळू हळूच वाढत गेला. इ.स. १ ते १००० पर्यंतचे उल्लेख चाळून पाहिले पाहिजेत नेमकेपणासाठी. तरी मजा म्हणजे सारस्वत, कान्यकुब्ज वगैरे काही मांसाहारी ब्राह्मण पोटजाती अजूनही टिकून राहिल्या हे विशेष.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

बॅटमॅन भाऊ!!!

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 09/09/2015 - 14:26 नवीन
बॅटमॅन भाऊ!!! कान्यकुब्ज अन शरयुपारीन ब्राह्मण म्हणजे यूपी मधले ब्राह्मण कट्टर शाकाहारी असतात, माझ्या माहिती प्रमाणे मांसाहार करणारे ब्राह्मण म्हणजे शाक्त परंपरेतले कश्मीरी, मैथिल अन बंगाली ब्राह्मण हे होत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

कान्यकुब्जांबद्दल वाचनात आले

बॅटमॅन
Wed, 09/09/2015 - 14:31 नवीन
कान्यकुब्जांबद्दल वाचनात आले होते खरे. सोर्स चेक करावा लागेल. बाकी मैथिली अन बंगाली तर आहेतच, काश्मिरीही त्यांतच आले. मैथिली ब्राह्मण पारंपरिकरीत्या कासव खातात हेही एका मैथिली गृहस्थाकडूनच ऐकले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

"जो दिन मछली मिले खा लो

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 09/09/2015 - 14:48 नवीन
"जो दिन मछली मिले खा लो एकादशी बारबार आती रहेगी" ही म्हण आहे मैथिल समाजात! घ्या समजून काय ते!! कान्यकुब्ज कन्फर्म नाहीत खात, महा कट्टर ब्राह्मण असतात इतकेच काय तर ते शरयुपारीन ब्राह्मणवृंदास हलके समजतात त्याचे एक्सप्लेनेशन असे की "रामजी जब अयोध्या वापस आये तो उन्होंने एक भोज रखा था जिसमे शरयुपारीन गधे चले गये जबकी रामजी ने एक ब्राह्मण (रावण) का वध किया था, और कान्यकुब्ज कभी भी ब्रह्महत्यारे का भोज नहीं खाते है" इतके कट्टर मिळाले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आमच्या इथे एक झा म्हणून आहेत.

प्यारे१
Wed, 09/09/2015 - 14:52 नवीन
आमच्या इथे एक झा म्हणून आहेत. मैथिली ब्राह्मण. नुकतंच बोलणं झालं. म्हणे आमच्यात बघत पण नाहीत मांसाहाराकडं. काही लोक मासे खातात बंगाल कडचे, चिकन नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

बंगाल्यांत

बॅटमॅन
Wed, 09/09/2015 - 14:54 नवीन
चिकनही खातात. प्युअर व्हेजिटेर्यन जेवणाला काहीजण तुच्छतेने "ब्राह्मनेर बिधोबा" अर्थात ब्राह्मण विधवेचे जेवण असेही म्हणत असल्याचे ऐकले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

बंगाली ब्राह्मणांमध्ये खातात

प्यारे१
Wed, 09/09/2015 - 14:56 नवीन
बंगाली ब्राह्मणांमध्ये खातात पण अल्लोवेद ;) नाही. मासे अल्लोवेद आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा