परवा माझा बाप गेला. आणि मग माझ्या बापाचा मुलगा खुप खुप रडला. डोळे फुटे पर्यंत रडला. अजूनही रडतोय. आयुष्यभर रडेल. रडतच राहील अगदी त्याच्यासाठी कुणीतरी रडे पर्यंत रडेल. बाहेर पाऊस पण रडतोय. कूणीतरी म्हणाल आषाढ लागलाय. मग माझ्या बापाच्या मुलाला आठवल कालीदासाने 'आषाढस्य प्रथम दिवसे' अस काहीस काव्य लिहीलय. त्यात आषाढातल्या मेघा बद्दल काहीस लिहीलय अस ऐकलय माझ्या बापाच्या मुलाने. तो मेघ आता माझ्या बापाच्या मुलाच्या डोळ्यात राहतो. आषाढ महिना फार वाईटय. आषाढ लागताना तो माझ्या बापाला घेऊन गेला आणिक संपताना माझ्या आईला. नंतर कधीतरी माझ्या बापाच्या मुलालाही घेऊन जाईल अलगद.
मागे कधीशी पितृ-दिन येऊन गेला. माझ्या मायबोलीने त्या बद्दल लेखनाचा एक सुंदर उपक्रम सुरू केलेला. मला लिहायच होत पण माझ्या बापाचा मुलगा फारच व्यस्त होता. इतका व्यस्त की त्याला स्वत: च्या बापाकडे बघायला सुद्धा वेळ नव्हता. लिहायच तर सोडाच त्याला बापाशी बोलायला सुद्धा वेळ नव्हता. सदा कदा बापावर डाफरत असायचा. बाप आतून दुखायचा पण बोलून दाखवायचा नाही फक्त गप पडून रहायचा. आणि मग असाच तो आषाढातला पहिला ढग आला आणिक बापाला घेऊन गेला. बापाचा मुलगा बघतच राहीला त्या ढगाकडे हताश निशब्द.
बापाचा मुलगा बेवारश्या सारखा भटकत राहीला. बापाचे मित्र सांगत राहीले बाप किती मोठ्या मनाचा होता तो. बापाचा मुलगा ऐकत राहीला. बाप म्हणे डायलीसीसच्या आजारपणात पार्ल्यावरून मिरा रोडला एकटा जायचा ट्रेनने. का तर मित्राला पुस्तके वाचायला मिळावीत म्हणून. आणि मग ती पुस्तके परत आणायला, नवीन पुस्तके द्यायला. माझ्या बापाचा मुलगा तर एका खोलीतल वर्तमानपत्र सुद्धा बापाला दुसर्या खोलीत बापाला आणून द्यायचा नाय. फक्त ओरडायचा त्याच्यावर. बापाला खाण्या-पिण्याची फार आवड होती. पण एकटा कधी खायचा नाही. सर्वांसाठी खायला आणायचा. बापाचा मुलगा मग त्याच्यावर चिडायचा वायफळ खर्च करतो म्हणून पण स्वतः कधी बापासाठी खायला आणायचा नाही. बापाला नाटक-सिनेमाची भारी आवड पण बापसाठी कधी चुकून कधी तिकीट घेऊन आला नाही. बाप तिकीट काढून आणायचा एक कधीच नाही दोन आकडी. सर्व नातेवाईकांना बोलावयचा फोन करुन बोलावायचा नाटकाला. घरी जाऊन तिकीट पोचती करायचा. नातेवाईक आपापसात हसायचे 'नाटकाचे वेड' म्हणून. मग माझ्या बापाचा मुलगा चिडायचा नातेवाईक हसतात म्हणून. पण माझा बाप ऐकून न ऐकल्यासारख करायचा आणि पुढच चांगल नाटक लागल की पहाटे उठून तिकीट काढायला जायचा रांगेत उभ रहायला म्हणून.
माझा बाप एकदा बापाचा मुलगा परीक्षेला जाताना घड्याळ घालायला विसरला म्हणून आंघोळ अर्धवट टाकून फक्त टोवेल गुंडाळून सोसायटीच्या गेटपर्यंत धावत आला फक्त घड्याळ द्यालला म्हणून. लोक बापाला हसले. बापाच्या मुलाला माझ्या बापाची खुप लाज वाटली. स्वतः ची वाटायला हवी होती खर तर.
माझा बाप स्वतः फारसा शिकला नाही पण त्याने माझ्या बापाच्या मुलाला खुप शिकवल. म्हणायचा माझी नौकरी आहे तो पर्यंत वाटेल तेवढा शिक घरी बसून. घरची काळजी करू नकोस. लोक बापाला सांगायचे बापाच्या मुलाला नोकरी करायला सांग म्हणून पण बाप काही बधायचा नाही. मग बापाचा मुलगा खुप शिकला, बापाला एकटा टाकून परदेशी गेला. बापालाच शिकवून गेला. बाप आतून खुप हादरला पण व्यक्त झाला नाही.
मग आता आषाढात बाप एकदम गेला. बापाचा मुलगा बापाला जाऊन अग्नी देऊन आला. अग्नी संस्काराला अगदी मोजकी माणस होती फार तर ८-१० असतील. माझ्या बापाच्या मुलालाही मग माझ्या बरोबरीने खुप वाईट वाटल. अरे रस्त्यावरचा कुणी फाटका माणूस अगदी मार्केटातला भाजीवाला जरी गेला तरी ह्यापेक्षा अधिक माणस जमतील आणि माझ्या बापाचा लोकसंग्रह तर खुप मोठा होता. मग माझ्या बापाचा मुलगा खुप खुप रडला. पश्चातापाने कदाचित पितृ हत्येच्या पापाच्या भितीने. तिकडे माझा बाप लाकड आणिक आगीत जळून गेला. इकडे माझ्या बापाच्या मुलाची शरीराची लाकड आणिक मनाची आग झाली पण तरीही तो जळून गेला नाही. होरपळत राहिलाय. माझ्या बापाच्या मुलाने आजकाल आयुष्य 'आंगातला शर्ट काढून जमीनीवर भिरकावा' तस भिरकावून दिलय. तो ही असाच कधीतरी मरुन जाईल पटकन.
मला कधी कालीदास भेटला तर मी त्याला सांगणारै 'आषाढस्य प्रथम दिवसे ' चा अर्थ माझ्या कडून समजून घे म्हणून.
मी (दिनांक १२/०७/२०१३)
वाचने
16016
प्रतिक्रिया
72
मिसळपाव
प्रतिक्रिया
निःशब्द!
+१
In reply to निःशब्द! by इनिगोय
+१
In reply to निःशब्द! by इनिगोय
+१
In reply to निःशब्द! by इनिगोय
+१
In reply to निःशब्द! by इनिगोय
काय बोलू?
निःशब्द !
निःशब्द !
..........
डोळे पाणावले....
पितॄ देवो भव
जबरदस्त
......
*****
बापाच्या मुलाला जवळ घेऊन आधार द्यावासा वाटला...
+१
In reply to बापाच्या मुलाला जवळ घेऊन आधार द्यावासा वाटला... by बहुगुणी
काय बोलु....
हं! अवघड आहे खरं!
काय लिहावं कळत नाही.
असा
!
हेच्च मंतो जी मी.
In reply to ! by धमाल मुलगा
*****
हे वाचल आणि बाबा ना फोन केला
अप्रतिम म्हणू का?
तेच ना राव
In reply to अप्रतिम म्हणू का? by अभ्या..
अरे बाप रे.
आवडले कथन.
अगदी खरयं
In reply to आवडले कथन. by सस्नेह
डोळ्यात पाणी आलं.
आमच्याच भावना आमचेच न उमटणारे शब्द !!
छान लिहिलंय, बाप कळण्यासाठी
असेच अनेक आषाढ गेलेत.........!
छान लिहिले आहे..
बापाचा मुलगा आणि मुलाचा बाप
डोळ्यात टचकन पाणी आल
देण्यासाठी प्रतिक्रिया नाही.
...........................
बापाच्या मुलाने बाकिच्या
काय बोलू? नि शब्द …
आई
डोळे पाणावले....
काळजाला हात घालणारे लेखन,
या लेखावर काय प्रतिसाद द्यावा
+१
In reply to या लेखावर काय प्रतिसाद द्यावा by गणपा
ऑफिस मध्ये बसून इथले लेख
बाप रे!
+१
In reply to बाप रे! by उपास
हाच मुलाचा बाप
नि:शब्द
अंतर्मुख झालो खरा, पण...असो.
फारच सुंदर!
वेळ गेल्यावर रडून काय उपयोग
निशब्द...
नोकरी सोडुन परत बापाच्या
कहर
कहर
_/\_
नि:शब्द...
वाचून मन गलबलून आले. माणूस
माझ्या वयाच्या
वाचतांना डोळ्यांत पाणी न
देण्यासाठी प्रतिक्रिया नाही.
झणझणीत अंजन घातलात डोळ्यात
नाव वाचल आणि म्हंटल नेमक काय
निशब्द.
निशब्द.
लेख हापिसात वाचला. घरी
पुन्हा प्रतिसाद देणार नव्हतो
आई का बाप?
खुप आवडले.
अश्रूभरा दंडवत