मागील एक दोन दिवसांत "ई-सकाळ' वाचत असताना जगातील काही भागातील काही वाचकांच्या पाहण्यात आक्षेपार्ह जाहिराती आल्या. मूळच्या "गुगल ऍडसेन्स'मार्फत प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या या जाहिराती आमच्या वाचकांच्या सूचनेनंतर काढून टाकण्याचा निर्णय "ई सकाळ' व्यवस्थापनाने घेतला असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे.
मुळात आक्षेपार्ह जाहिराती प्रसिद्ध करणे ही गोष्ट सकाळ किंवा "ई-सकाळ'च्या जाहितरातविषयक धोरणात नाही असे आम्ही नम्रपणे सांगू इच्छितो. म्हणूनच या सारख्या जाहिराती भविष्यात "ई-सकाळ'वर झळकणार नाहीत या बाबत अधिक काळजी घेण्याचा ई-सकाळचा प्रयत्न राहिल.
संबंधित जाहिरातींसाठी मध्यंतरी"ई-सकाळ'ने "गुगल ऍडसेन्स'बरोबर करार केला होता. त्यानुसार या जाहिराती वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आल्या. मुळात गुगलने कोणत्या प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध कराव्या याची यादी ई-सकाळतर्फे देण्यात आलेली होती. त्यात ई-सकाळच्या धोरणात न बसणाऱ्या, आक्षेपार्ह अशा जाहिराती वगळण्यात आल्या होत्या. मात्र कोणत्या भागात कोणत्या, कोणत्या वेळेला, कोणत्या जाहिराती दिसाव्यात याचे गुगलचे काही निकष आहेत. त्या नुसार अलीकडच्या दोन दिवसांत अशा आक्षेपार्ह जाहिराती काही ठिकाणी प्रसिद्ध झाल्या.
तथापि पुणे आणि आसपासच्या शहरात या जाहिराती अद्यापही पाहण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळेच आम्हालाही त्या "ई-सकाळ' कार्यालयात दिसू शकल्या नाहीत. असे असले तरीही "ई-सकाळ'वर मनापासून प्रेम करणाऱ्या काही वाचकांनी त्याबद्दल आम्हाला ई-मेलद्वारे सूचना केल्या. त्यामुळे आम्हाला याबद्दल समजू शकले. त्यानंतर लगेचच "ई-सकाळ' परिवारातर्फे या जाहिरातीच काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
आपण "ई-सकाळ'च्या प्रेमापोटी नियमितपणे "ई-सकाळ'ला भेट देतात आणि आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया आम्हाला वेळोवेळी कळवत असता त्याबद्दल ई-सकाळ परिवार आपला आभारी आहे. आपल्या आवडत्या ई-सकाळबद्दल यापुढेही काही सूचना, तक्रारी किंवा प्रतिक्रिया असतील तर जरूर कळवा. आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत.
आमचा ई-मेल - webeditor@esakal.com
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
3153
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचकाभिमुख असलेले वर्तमानपत्र.
धन्यवाद !!!
अभिनंदन आणि आभार ...
योग्य
दाद्या बदलला रे
हो
In reply to दाद्या बदलला रे by वेताळ
एटूझेड
In reply to हो by विनायक पाचलग
वाचकाभिमुख - सुखद धक्का
उत्तम निर्णय! अभिनंदन!!
आपल्या
तात्यांशी सहमत. ही बाब मलाही जाणवली आणि खटकली सुद्धा!
In reply to आपल्या by विसोबा खेचर
सहमत ---- सखा
In reply to आपल्या by विसोबा खेचर
आपले
मिपा ईफेक्ट