दूध पोळलं
लेखनप्रकार (Writing Type)
दूध पोळलं
श्रीकृष्णाने फार पूर्वीच गोकुळ सोडले होते. तो आता द्वारकानाथ झाला होता. त्या अवधीत तो एकदाही गोकुळात फिरकला नव्हता.
राधेला मात्र त्याचा विसर पडला नव्हता. बऱ्याच वर्षांनी ती मनाचा हिय्या करून कृष्णाला भेटण्यासाठी द्वारकेस निघाली. तिने एकटीने प्रवास केला. किती केला, कसा केला! तिचा तिलाच माहित...... केवळ कृष्णाला पाहण्यासाठी, त्याला एकवार भेटण्यासाठी!
साधीभोळी राधा, कृष्णाच्या श्रीमंत महालात पोहचली. तिथले वैभव पाहून, बिचारी भांबावली. जराशी गोंधळली. तिने निरोप पाठवला, तशी कृष्णाच्या राणीवशात ‘हीच का ती !’ च्या अनेक भिवया वर झाल्या. रुक्मिणी, सत्यभामेसह सगळ्या राण्यांचा जथा तिला पहायला आला. उत्सुकता आणि असूयेचे अजब मिश्रण सगळ्या राण्यांच्या डोळ्यात! राधा आणखी बिचकली.
राधेचे साधेसरळ अनलंकृत रूप पाहून काही काही राण्यांनी तर, ‘काय हि राधा!’ असं म्हणत स्वतःच्या नेटक्या रुपाला, भरजरी वस्त्रांना, लखलखीत दागिन्यांना परत परत आरशात चाचपून पाहिले.
राधेने ‘कृष्णाला भेटायचेय’ असे सरळ सांगितल्यावर, सगळ्या राण्यांनी आपापसात नेत्रपल्लवी केली आणि म्हणाल्या, ‘श्रीकृष्ण बाहेर गेलाय.इतक्यात येणार नाही!’
‘मी वाट पाहीन’, राधेने सांगितले. प्रवासाने थकलेले डोके खांबाला टेकून ती एका कोपऱ्यात अंग चोरून बसली. बराच वेळ झाला, तो येत नाहीसं पाहून, ती जड अंतःकरणाने उठली. इतकी वर्षे वाट पाहणाऱ्या राधेला, त्या महालातल्या चार घटका जड वाटू लागल्या. ती अस्वस्थ मनाने, ‘मी निघते. मी येऊन गेल्याचे श्रीकृष्णाला सांगा,’ असं म्हणून निघणार, इतक्यात, रुक्मिणी चांदीचा पेला घेऊन पुढे आली आणि लटक्या आग्रहाने म्हणाली, ‘अगं! इतक्या दुरून आलीस, दूध तरी घेऊन जा!’
राधेला क्षणभर काही कळेचना. दूध घ्यावं तरी कसं..... आपल्याला राजवाड्यातील रितीरिवाज माहित नाहीत.आणि न घ्यावे तर राण्यांना वाटेल आपण शिष्ठ आहोत!
शेवटी तिने तबकातला पेला हातात घेतला अन तिची बोटे चर्रर्र झाली. तरीही निग्रहाने तिने तो प्याला हातात धरला.
इतकं कढत दूध ती कशी घेईल आणि तिची फजिती कशी होईल, हे पाहण्यासाठी सारा राणीवसा गालातल्या गालात हसत उभा होता.
मग, राधेने कृष्णाचे मनोमन स्मरण केले आणि एका दमात कढत दुधाचा प्याला रिता केला. रिकामा प्याला तबकात ठेवला आणि राण्यांकडे एक नजर टाकून, शांतपणे महाला बाहेर पडली.
........... .......... ...........
ती निघून गेल्यावर बऱ्याच वेळाने श्रीकृष्ण आला. सगळ्या राण्या त्याच्या स्वागतासाठी पुढे सरसावल्या. रुक्मिणीने कोमट सुगंधी जलाचे घंगाळ पुढे केले. श्रीकृष्णाने स्मित करून त्यात पाय बुडविले. जराशाने पाय बाहेर काढताच, रुक्मिणी रेशमी वस्त्राने त्याचे चरण पुसू लागली. पण, पाहता पाहता, त्याच्या पायांवर पुरूळ उठू लागले. रुक्मिणी घाबरून श्रीकृष्णाकडे पहात म्हणाली, ‘घंगाळातले पाणी तर कोमट होते... इतके कसे पोळले?!’
श्रीकृष्ण दुखावल्या स्वरात म्हणाला, ‘दूध पोळलं! पाणी नाही.’
( ऐकलेली पारंपारिक कथा)
प्रतिक्रिया
खुप सुंदर कथा आहे.
मस्त कथा
कथा माहित आहे. परंतु पुन्हा
खूप छान कथा.
छान कथा
छान आहे कथा .
विषय संशोधनाचा!
फारच भावस्पर्शी!
हेच म्हणते.
धन्यवाद. तुमचीही तरलता पोहचली
ज्या कोणाला ही किंचीतही भावली
सुंदर!!
गोष्ट म्हणून ठीक
मलाही रुक्मिणीची या कथेतली
=))
हे बाकी पटलं
राधेचा मोठेपणा ठसवण्यासाठी
मला वाटते पुरुषांना मोक्ष
श्रीकृष्णाला अनुरूप ती राधेला
जरा समजून घ्या
पैसा ताई, हि खूप वर्षांपूर्वी
डावी वागणूक नव्हे
कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी ही
ताकदीने लिहिलंय
कथा आवडली. आधी माहित नव्हती.
भाव तेथे देव!
खूप छान लिहिलीये कथा.
ही नव्हती ऐकली अगोदर, धन्यवाद
छान कथा..
कथा लेखन आवडले
कथा आधीपासून माहित नव्हती.
कथा समजून घेऊन वाचलीत,
या अगोदर वाचली
सुंदर कथा..
अद्वैत ही कल्पनाच विलक्षण आहे
खूप आवडली कथा!
खूप सुंदर लिहिली आहे
सुरेख
अजया, रातराणी,ज्योती, सविता,
खुप सुन्दर