चूक नाही
जरी सुखाची आस असणे चूक नाही
हाव आहे ही आता, ही भूक नाही
ओरडूनी सांग अथवा बस कुढत
तेच आहे सत्य की जे मूक नाही
बुद्धीची तलवार तू चालव स्वतःवर
जातीची तुझियाकडे बंदूक नाही
आमुचे ते वेगळेपण प्रिय आम्हा
एक बिक होणे मुळी ठाऊक नाही
कारणाविण काही येथे होत नाही
अचानक हसणे कुणी हा फ्लूक नाही
वाटते ते हो करूनी मोकळा तू
धाकधूक नाही आणि रुखरुख नाही
शेवटी पैसाच देतो चार घास
भावनांनी भागणारी भूक नाही
आरशाला दोष देणे चूक आहे
आरशावर प्रेम करणे चूक नाही
एक माझे वेगळेपण वर्ज्य त्यांना
यापरी माझी अपूर्व चूक नाही
- अपूर्व ओक
ब्लॉग दुवा हा
वा! सुंदर!
हम्म... न चा पाढा. छान जमलाय
मस्त ..
धन्यवाद
वाह. अप्रतिम.
मस्त..
कविता आवडली
सुरेख ! कविता की गझल ?
शेवटी पैसाच देतो चार घास