सागरमंथन
काळे गोरे पिवळे
गोळा झाले सगळे
दाढ़ीवाले इकडे
गाडीवाले तिकडे
घुसळ घुसळ घुसळ
दम लगा के हइया
मंथन झाले सुरु
मजा बघाया आला
काठावर बसला
बनला जगद्गुरु
एक दोन तीन चार
एजेंट ऑरेंज रत्नहार
पाच सहा सात आठ
मुजाहिदीन कंठात
घुसळ घुसळ घुसळ
दम लगा के हइया
वाजू लागली थंडी
लोकशाही ज़िंदाबाद
विळाहातोडा मुर्दाबाद
दुनिया सब्जीमंडी
नऊ दहा अकरा बारा
खाड़ीत शिरला वारा
तेरा चौदा पंधरा सोळा
स्मशानी भूते गोळा
घुसळ घुसळ घुसळ
दम लगा के हइया
कंठात झाला गळू
दिवाळीत होळी
होळीत दिवाळी
मोकाट सुटला वळू
सतरा अठरा एकोणवीस
मेंदूचा पाडला कीस
वीस एकवीस बावीस
खाड़ी आली भरतीस
घुसळ घुसळ घुसळ
जोर लगा के हइया
पुन्हा घुसळण सुरु
चिघळे जखम
जुनेच मलम
चल गुरु हो जा शुरू
पाढे पाठ करा मुलांनो
पाढे पाठ करा
त्रेपन्न चोपन्न पंचावन्न
अनुभवाने संपन्न
झालाय कोण?
पाढे पाठ करा मुलांनो
पाढे पाठ करा
पहिले पाढे पंचावन्न
पाढे पाठ करा
जबरीच!
मस्त
मस्तय!