आयलान कुर्दी !
त्या वीर मुलास प्रेम.पूर्वक श्रद्धांजली , ज्याचे मृत.देह इस्तांबुल च्या समुद्र काठी मिळाले.
इस्लामिक स्टेट (कवितेत त्यांसाठी कावळा अशी उपमा वापरली आहे) च्या आतंका पासून स्वतःच्या परिवाराची सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात अत्यान्त् सध्या होडीतून आपल्या परिवारास घेऊन अथांग सागराचा प्रवास करणाऱ्या ११ लोकांना घेऊन जाणारी होडी सागरात विलीन झाली.
ह्या लहान ३ वर्षाचे मृत देह मात्र सागराने परतावले , जगास त्यांचे कर्म त्यांना दाखवून देण्या साठी. एवढीच आशा कि हे हृदय विदारक चित्र पाहून तरी आतंकी मन बदलतील.
….त्या लहान आयलान कुर्दी साठी..
सुटले साथ सारे
सुटले हात सारे
निसटलो पदरातून आईच्या
हरवलो अनंत सागरात!
जिंकतील का ते कावळे आसमंत
करून उध्वस्त घरटे चिमुकल्या पाखरांचे?
हिसकावले लहानपण
हरवले मित्र
खेळणी माझी
सुटली मागेच
.
.
कडे वर आइनं
घेतले मला
घट्ट धरून काळजा जवळ
कुरवाळले मला
होडीत कागदाच्या बसतांना
असावी कल्पना
असेल ती शेवटची मिठी मला
जगण्याच्या
त्या आशेंनं
बाबा माझे
झाले असतील व्याकूळ
मागे आड अन पुढे विहीर
असेच काहीसे निर्णय
जीव मुठीत धरून
घ्यावे लागले असावेत त्यांना !
उंच लाटांनी वेढताच
असावी आईस जाणीव
असंख्य मुके घेत तिनं
शेवटचे भरून पहिले मला !
बाबांचे नेहमी खंबीर हात मला मात्र आज
गुलाबाच्या पाकळी सारखे जाणवत होते
बाबा माझे घाबरलेले मला पाहवत नव्हते
हे सर्व काहीच उलगडत नव्हते मला
सुरक्षित नाही आम्ही मात्र एवढेच जाणवत होते
.
.
होडी उलटली
अन आईचे हात सुटले
अन मग तेथे.. सारेच संपले
आई बाबांची आर्त हाक
ऐकू येत होती मला
माझे रडणे माझे अश्रू
होते सारे सागरी जमा
.
.
असंख्य प्रश्न मनात माझ्या
सोबत होती बुडत
आलोच का आम्ही ह्या होडी वर
का आइनं घेतले असावे इतके मुके
का होते बाबा माझे घाबरले
का नाही थांबलो आम्ही घरी
होते मला मित्रांसोबत
अजून खुप खेळायचे
घरी माझ्या माऊ च्या पिलांना
होत मोठे बघायचे
. . .
.
मी काय करावे आता
कुठे असेल आई
बरी असेल का ती
बाबा कुठे असतील
भेटतील का ते मला
आई… तुझी आठवण येती ग मला
मी घाबरोलोय ह्या खोल पाण्यास
घेऊन चल इथून मज
मला नाही यायचेय इथे पुन्हा
.
.
इतक्यात कुशीत घेतले कुणी मज
घरी नवीन जायचे आहे सांगीतले मला
असेल नवीन आई असतील नवे बाबा
करतील तेवढेच लाड
घेतील मुके मला
.
.
वळून मग
पाहिले मी काठावर मज
त्याच छान कपड्यात
तयार केले होतेस न आई
किती मयेनं तु मला !
त्या शेवटच्या क्षणात...
.
:(
:(
किती छान कपडे बूट घालून तयार केलं होतं छोटुला
:(
WHAT THE F**K...
आताच फ़ोटो पाहिला.... सुन्न
लिटरली... कुठे जातंय हे सगळं
अमेरिका अणि इस्त्राईल्चे पाप
जिनियस हि राजकारण मो़जण्याची
दुखःद !! ते छायाचित्र वृत्त
गेल्या तीन दिवसांपासून तो फोटो सतत डोळ्यांसमोर येतोय
श्रद्धांजली
.
नाही सहन होत!
निशब्द
Aasha!
तो फोटो बघुन अजूनही अस्वस्थ
अमेरिका अणि इस्त्राईल्चे पाप
हॉन्टींग आहे तो फोटो!