ढगच दाटतात आकाशात सध्या,
नभाचा सातबारा राहतो कोराच हल्ली...
जगणे सुद्धा कठीण झाले सध्या,
पाऊसही बरसतो फक्त कवितेतच हल्ली...
जरी बाप राबतो शिवारात त्याचा,
शेतकरी असण्याची त्याला लाज वाटते हल्ली...
पाहू कोण पुरुन उरतो सध्या,
मारण्याचीच स्पर्धा सुरु झाली हल्ली...
सारे नेतेच उदंड झाले सध्या,
आश्वासनांचाच पाऊस पडतो हल्ली...
जिप्सी
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2578
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह!
आवडली!
सारे नेतेच उदंड झाले सध्या,
हम्म
कोरा सातबारा हे चांगल्या
हम्म्म्म.
गरीब शेतकर्याला चार्वाक
In reply to हम्म्म्म. by प्यारे१
सोड रे, म्हायत्ये.... काय है
In reply to गरीब शेतकर्याला चार्वाक by अभ्या..