Skip to main content

बंधन बँक

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 04/09/2015 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
परवा एक फार रंजक बातमी वाचली. एकीकडे बँकांच्या विलिनीकरणाच्या गोष्टी कानावर येत असताना एक नवीन बँक म्हणे चालू होते आहे. नाव वाचून अडखळलोच. 'बंधन बँक'. बंधन?? पुन्हा नीट वाचलं. हो, बंधन बँक असंच नाव आहे त्या बँकेचं. अनेक प्रश्न मनात उपस्थित झाले. मी अनेक तर्क करू लागलो. - बहुदा या बँकेत एकता कपूर, करण जोहर किंवा अशा हस्तींचा स्टेक असावा. कारण बंधन वगैरे असं नाव बँकेसाठी यांनाच सुचू शकतं. - इतर बँकेत केवायसी म्हणजेच नो युअर कस्टमर असतं. इथे एलवायसी - लव्ह युअर कस्टमर किंवा बीवायसी - ब्लेस युअर कस्टमर किंवा टीवायसी - ट्रस्ट युअर कस्टमर वगैरे असेल का? - बँक कर्मचा-यांना महिला असल्यास भरजरी साड्या, पुरुष असल्यास सुरवार-झब्बा असा गणवेश असेल का? - बँकेत चपला काढून, पाय धुवून जावं लागेल का? - बँकेत येणा-या प्रत्येकाचं गंध, कुंकू लावून स्वागत होईल का? - ठेवी कशा असतील?... बंधन ठेव (आजन्म), संस्कार ठेव (बालके व किशोरवयीन मुलांकरिता), विश्वास ठेव (ज्येष्ठ नागरिकांसाठी), सिंदूर ठेव (स्त्रीयांसाठी), मोहब्बत ठेव (जोडप्यांसाठी) - नवीन खाते उघडल्यावर खातेदाराचं औक्षण वगैरे केलं जाईल का? की बंधन तावीज वगैरे बांधलं जाईल? - कर्जांवर व्याज आकारलं जाईल का? की 'अपनोंसे थोडी ना ब्याज लेंगे'...' असं बँकेचं भावनिक धोरण असेल? का परतफेडीचीही अट नसेल? - इथल्या ब्रँच मॅनेजर ला ब्रँच बाबुजी किंवा ब्रँच माताजी किंवा असं काही म्हणतील का? - 'ये बँक नही, ये एक परिवार है' असं यांचं मिशन स्टेटमेंट / स्लोगन असेल का? काहीही म्हणा, हे नाव वाचल्यापासून माझं खूप कल्पनारंजन चालू आहे. बंधन बँक.... मस्त आहे. भविष्यात, संस्कृती पतपेढी, परंपरा विमा कंपनी अशा संस्था निर्माण होताना बघण्याच्या तयारीत आहे. ब्लॉग दुवा हा
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7951
प्रतिक्रिया 49

प्रतिक्रिया

In reply to by खटपट्या

आणि पार्श्वसंगीत वाजेल "ये बंधन तोssss, बँक का बंधन हैsss, जन्मों का ये संगम है..." बंधन बँकची चंदन योजना : अंत्येष्टीसाठी ब्रिज लोन्स

In reply to by आदूबाळ

"ये बंधन तोssss, बँक का बंधन हैsss, जन्मों का ये संगम है..." मस्तं. मलापण वाटलं होतं हेच गाणं असणार 'बंधन' बँकेसाठी. मॅग्जिमम तुपट चेहरे करून बँकेचे कष्टंबर एकमेकाकडे बघून हे गाणं गात आहेत अशी बँकेची जाहिरात एकदम पर्फेक्ट होइल. शेवटी वाक्य - एकशे पंचवीस वर्षांची परंपरा. कोण जातंय खरं-खोटं करायला. सगळे लिहितात आपण पण लिहा :)

In reply to by आदूबाळ

"ये बंधन तोssss, बँक का बंधन हैsss, जन्मों का ये संगम है..." बहुत खुब

काढल्यावर कस्टमरची आरती आणि दर करवा चौथला सगळा स्टाफ उपास करणार. दिवसभर. आणि संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर कस्टमरचा चेहरा त्या चाळणीत बघणार - असे काहीच्या काही दिसायला लागले.

रिजर्व बँकेनी बंधन व अजुन एका समुहाला बँकिंग परवाना बहाल केला. बंधन हे नाव मायक्रो फायनांसिंगमधे सर्वशृत आहे. बाकी नाव म्हणाल तर खरच मनोरंजक आहे. तटी. - शामराव विठ्हल,रत्नाकर,शिवाजी भोसले इ. इ.बँकांची नावं तुमच्या वाचण्यात आलीत काय? :-)

In reply to by अमृत

रत्नाकर बँक ही भारतातली पहिली प्राइवेट बँक असावी (हे कन्फर्म नाही) स्थापना १९४३ कोल्हापुरात, तसेच मिडसाइज़ सेक्शन मधली भारतातली बेस्ट बँक म्हणुन पारितोषिक प्राप्त बँक आहे तसेच दीड २ वर्षापुर्वी त्यांनी रॉयल बँक ऑफ़ स्कॉटलैंड उर्फ़ आरबीएस ह्या नावाजलेल्या परदेशी बँक चा बिज़नस बँकिंग, क्रेडिट कार्ड्स अन अजुन कुठल्यातरी एका हेड अंडर चा 'इंडिया बिज़नस ऑपरेशन्स' विकत घेतला आहे

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

तुमची शेवटची माहिती अगदी कमालीच्या बाहेर स्पेसिफिक असल्याने सुरुवातीचं स्टेटमेंट फारच कॉन्ट्रास्टींग झालंय... सुरुवातीला सगळ्याच बँका प्रायवेट होत्या हो बापूसाहेब. सरकारीकरण झालं स्वातंत्र्यानंतर - मोठ्या बँका त्यात सरकारने आपल्या उद्दीष्टपूर्तीसाठी आपल्याकडे घेतल्या. अगदी स्टेट बँक जी अगोदर इंपिरीयल बँक ऑफ इंडिया होती तीसुद्धा १९५५ मध्ये सरकारने घेतली. फक्त छोट्या बँका सुटल्या. युनायटेड वेस्टर्न बँक, गणेश बँक ऑफ कुरुंदवाड, आणि रत्नाकर वगैरे म्हणूनच खाजगी राहिल्या.

In reply to by असंका

आमची दि गणेश ब्यान्क ऑफ कुरुंदवाड ही फेड्रल ब्यान्केने खाल्ली. जुन्या शेअर होल्डरना काहीही मिळाले नाही.

In reply to by dadadarekar

काय सांगता? अहो फक्त आर बी आय ने केलेल्या नियमानुसार कमीत कमी आवश्यक तेवढे स्वतःचे भांडवल नसल्यामुळे (माझ्या आठवणीनुसार १०० कोटी) त्या बँकेला विलीन व्हावे लागले असं मला वाटत होतं...ती काय बुडीत जात नव्हती!! तुमचे पैसे बुडाले होय? नक्की का?

In reply to by असंका

आत्ता एक आर्टीकल वाचलं..त्यात मर्जर च्या वेळी असलेल्या निगेटीव नेट वर्थ चा उल्लेख केला आहे. (याचा अर्थ शेअरची किंमत काढायला गेल्यास उणे किंमत आली असती. )

In reply to by dadadarekar

बोर्डाने खूप घोटाळे केले होते कर्ज देतांना. त्या बँकेची मुंबईतली मोक्याची प्रॉपर्टी विकली असती तर सगळा तोटा निघाला असता भरुन. पण रिझर्व्ह बॅंकेने परवानगी नाकारली.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

युनायटेड वेस्टर्न बँक आणि गणेश बॅंक ऑफ कुरुंदवाड या दोन्ही बँका बुडीत निघाल्या नाहीत तर चक्क विकावयास भाग पाडल्या गेल्या. पैकी युनायटेड वेस्टर्नवर मागे लोकसत्तात एक चांगला लेखही आला होता. एका हत्येचा माफीनामा

In reply to by अन्या दातार

गणेश बँकेची आयडिया नाही. बाबा युनायटेडमध्ये असल्याने बरीच माहिती होती … आणि सहानुभूती पण :) त्या मखारीयाला कर्ज तर दिलेच आणि स्वतात शेअर्ससुद्धा :( हा लेख खूपच चांगला आहे. परत एकदा वाचून छान वाटले. सरकारी पातळीवर पहिल्या खाजगी बँकेस वाचवण्यासाठी काही झाले नाही याचेही वाईट वाटते. आता तीच आयडीबीआय PNBच्या घशात जाणारे ऐकिवात आहे.

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

आयडीबीआय पीएनबी घेणार आहे? मला वाटते तुम्ही बँक कन्सोलिडेशनबद्दल गैरसमज करुन घेत आहात.

In reply to by अन्या दातार

काय तरी गफलत झाली म्हणायची त्येच ते … कन्सोलीडेशन. दुरुस्तीसाठी धन्यवाद :)

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

+१
बाबा युनायटेडमध्ये असल्याने बरीच माहिती होती … आणि सहानुभूती पण :)
अगदी. "आपुलकीने वागणारी माणस" ह्या टॅग लाईन ला मी गमतीत "आपुलकीने वागणारी आळशी माणस" अस म्हणायचे. पण uwb च्या विलिनिकरणाला भावनिकतेची जोड मिळालेली हे १०० टक्के सत्य. आज पण बाबा आणि सगळी जुनी मंडळी भेटली की तासंतास गप्पा रंगलेल्या असतात त्यांच्या..

In reply to by कोमल

आम्हा पोरांना खूप बोर व्हायचं मग! टीव्ही वगैरे काही नी ... शांत बसून ऐकत राहायचं :D

In reply to by अन्या दातार

अतिशय चांगली बँक होती. रीझर्व बँकेच्या चुकीच्या धोरणाचा फटका बसल्यामुळे विलीन करावी लागली.

- बहुदा या बँकेत एकता कपूर, करण जोहर किंवा अशा हस्तींचा स्टेक असावा. कारण बंधन वगैरे असं नाव बँकेसाठी यांनाच सुचू शकतं.
बाकी कोणी असो नसो पण एकता कपूर ची जर ब्यांक नसली पाहिजे. कारण एकता कपूर ची जर ब्यांक असती, तर नाव 'बंधन' नव्हे, तर 'कुंथन' असले असते. (कारण तिला क लकी आहे म्हणून )

In reply to by पगला गजोधर

आमचे अन सकल मिपा चे नशीब थोर 'कुंटण' नाही म्हणालात!!!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आमचे अन सकल मिपा चे नशीब थोर 'कुंटण' नाही म्हणालात!!! मस्त जोक सोन्याबापू

इतर बँकेत केवायसी म्हणजेच नो युअर कस्टमर असतं. इथे एलवायसी - लव्ह युअर कस्टमर किंवा बीवायसी - ब्लेस युअर कस्टमर किंवा टीवायसी - ट्रस्ट युअर कस्टमर वगैरे असेल का? ह्या लिस्ट मदी 'केडीवायसी' अर्थात 'कन्यादान योर कस्टमर' असेही एक प्रकरण जोड़ता आले तर बँक ला साक्षात बाबुजी आलोकनाथ ह्यांचे आशीर्वाद हे आपले अशिर्वादाच्या फिक्स्ड डिपॉज़िट मिळतील, कसे??

वेल्लाभट यू टू!!!! अहो कधी नव्हे ते एक अस्स्ल भारतीय नावाची बँक येतीये तर त्याची काय चेष्टा करायची? "युनियन" बँकेची कधी अशी चेष्टा केली असतीत का? बाकी कल्पनाशक्तीचं वारू मात्र अगदी चौखूर उधळलंयत...फारच जोरदार!!! काही पोझिशन तर नाही ना घेतलीत या बँकेत? जाहीरात चांगली झाली कारण नवीन बँकेची इथे....

जर ही बँक "काका-पुतण्यांची असती तर === "कुरण" आर्म्स्ट्रोग रावांची असती तर "भरण" थोरली पाती "शिव-वंदन" आणि फुला-फुलांचा शर्टवाले दाढीधारी हटके शीग्रकवी यांची "झोळण" (सतत काही तरी मागत असल्याने आपसूक नाव सुचले आणि ही कवीता. दर इलेक्शन्ला कर्तात माझी बोळवण लग्नच होइना जरी झाले केळवण तरी मी बांधीन नव्याने मोळी ! फिरवूद्या तुमच्यापण दारी झोळी !! अदमास पाठवले

In reply to by नाखु

येक दुरुस्ती, पुतण्याची असती तर "धरण" ब्या़ंक आणि केजरिवालची असती तर "धरणा" ब्यांक.

In reply to by बबन ताम्बे

नाय, व्यापम ची असती तर सरण हे नाव अधिक योग्य झाले असते. इंद्राणीची ब्यांक असती तर "जॉइंट अकाउंट" हेच नाव असते. =))

In reply to by बबन ताम्बे

चौकशी सुरु आहे. सध्याच्या 'बदल्यां'मुळं काम मंदावण्याची शक्यता आहे. - प्यारे पीटर

In reply to by प्यारे१

त्यादरम्यान एखादे जॉइंट अकाऊंट बंद नाही झाले म्हणजे मिळवली.

In reply to by बबन ताम्बे

वेगळा एच यु एफ असा मिळाला असता. माजी पतींच्या सक्रीय सहभागाने वरील संज्ञेचा अर्थ पुढे दिला आहे. Husbands United Forever

In reply to by बॅटमॅन

येक दुरुस्ती, पुतण्याची असती तर "धरण" ब्या़ंक आणि केजरिवालची असती तर "धरणा" ब्यांक. हाहाहा

पैसे काढल्यावर कैशियर्च्या पाया पडाव्या लागतील. आशिर्वाद आणि सोबत "संभालकर ले जा ना गुडीया/बिटिया/बेहेंजी/माताजी. आजकल जमाना बड़ा खराब है" अशी प्रेमळ सूचना मिळेल. काही कारणाने परत पैसे काढायला लागले तर, "इतनी जल्दी खत्म हुए ? चलिये आपके पिताजिसे बात करते है" म्हणून आपल्या समोर घरी फोन लावून आपले काम तमाम करतील.

नॉर्मल जिलबी. बापू आणि बोकेशाचे माहीतीपूर्ण तूप व आदूबाळाच्या केशराने मज्जा आली. नाखुकाकांचा आंबूसपणा एक नंबर.

बंधन बँक हा हा हा.. मी सगळ्यात आधी गुगलून पाहिल.. खरच अशी बँक आहे का ते? आडवा झालो.... बाकी, कल्पना भारी आवडली.... "ये बंधन तोssss, बँक का बंधन हैsss, जन्मों का ये संगम है..." बँकेची खरी टॅज लाईन..."बंधन बँक: आपका भला, सबकी भलाई.."

ICICI ची tag line माहित आहे का ? खयाल आप का !! मोठ्ठा जोक !! आणि बंधन ने खरेच खूप चांगले काम केले आहे. तुमचे ज्ञान तोकडे आहे त्याला ते काय करणार ?

एका आमच्याकडच्या बँकेचे नाव वाचण्याच्या अगोदर दीर्घ श्वास घ्यावा लागतो.चेकचे नाव लिहायचे तर शाई संपेल.

In reply to by हेमंत लाटकर

दीव्यश्री तायने काढलाय. त्यावर जाउन या. (कट्ट्याचा नाय हां.(तसा तोही धागा हास्य धागा होउ लागलाय))