वांझ
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
ही कथा मी " श श क " स्पर्धेसाठी लिहायला घेतली होती . शब्दसंख्या अंदाज न आल्यानी अंमळ गंडली होती.
पण आता कुठले शब्द उडवू तेच समजेनासं झालंय.
वांझ
सूर्य झाडाच्या पायाशी पेटायचा आणि कमरेशी विझायचा ;रोज ;रोज ;गेली कित्येक वर्ष . त्याचं झाडाला कसलं अप्रूप असणार ?
स्वतःचा अपूर्ण ;शुष्क ; जमिनीत खोलवर रुजलेला संसार घेऊन झाड जगत होतं . जगण्यात कुठला सोहळा नाही ;मरणही येत नाही .अगदी एकटं .
पानं ;फुलं ;फळं एवढंच काय पावसाळ्यातलं शेवाळ पण झाडावर बहिष्कार टाकून होतं .
गर्भारिणी ; पहिलट करणी झाडाची वाट शक्यतो टाळायच्या . पार लांबून जड पावलांनी जायच्या ; पण तीठा चुकवायच्या .
नाही म्हणायला एक झाडापेक्षा म्हातारी कातकरीण बऱ्याचदा खुरडत खुरडत झाडाशी यायची .
झिजलेल्या अशक्त नखांनी बुंधा खरडायची . कधी कधी काही माही बोलायची . क्वचित जनावरासारखी भेसूर रडायची .
एकदा अशीच रडता रडता झाडापाशीच मेली . झाडावरचे ओरखडे तसेच ठेऊन ,स्वतः च्या नखा बरोबर झाडाचा अंश घेऊन गेली .तेंव्हा पासून झाडाच्या जागेला "वांझेचा तीठा "म्हणतायेत .
जाता जाता एक वांझ तशाच दुसऱ्याला स्वतःच नाव देऊन गेली .
पुढच्या कैक पिढ्या हे नाव पुसू शकणार नाहीत .
कित्येक अष्टपूत्रा ;सौभाग्यवतींना जमणार नाही इतकं चिरंतन .
झाड अजूनही उभं आहे . म्हातारीच्या चितेला सुद्धा आपला उपयोग झाला नाही ह्याची खंत बाळगत .
एखादा हळवा मुसाफीर ; कधीतरी तेल पणती ठेवेल ह्याची वाट बघत .
प्रतिक्रिया
बापरे अंगावर काटा आला वाचताना
विरामचिह्नं तेवढी सुधारा. फार
+१
सुंदर म्हणवत नाही, पण कथा
मस्त.,,
+११११
+११११
खरच वाचताना अंगावर काटा आला..
मस्त जमलीय. जी. एं च्या
येस टिपिकल जि.ए. टच.
अगदी नेमके. एकदम जीए च! :(
+१ मस्त कथा
कथा
आठवली. यादगार नाखुमस्त
आवडली.
म्हातारीच्या चितेला सुद्धा आपला उपयोग झाला नाही - जीवाला चटका
+१
आवडली
मनाला चटका लावणारी कथा. अतिशय
सुन्न करणारी कथा!
बोजड वृक्षाची व्यथा पोहोचली.
छान लेखन
आई गं...खरच अंगावर काटा आला.
काळजाला भिडली कथा
शंभर शब्दात वगैरे बसवण्याचा
शतशब्दकथेचा सोस नकाच धरु. आहे
परिणामकारक लेखन ! उत्कृष्ट
उत्सवी अंक असल्यामुळे दु:खी,
अर्थातच .........!
बापरे!! शब्द संपले माझे तर
परिणामकारक!
जबरदस्त लिहिलीय
अप्रतिम लेखन
छान
धन्यवाद मिपाकर्स …