Skip to main content

भारतात वृद्धाश्रम वाढत आहेत.

लेखक हेमंत लाटकर यांनी बुधवार, 02/09/2015 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या भारत देशातील वृद्धांची अवस्था बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या देशात वेगाने वृद्धाश्रमांची संख्या वाढते आहे. भारता सारख्या देशात जिथे आई-वडिलांना देवासारखे समजले जाते, तिथे अशा प्रकारची वागणुक बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का आज आई-वडिल आपल्याला जड होत आहेत. ज्या घरात त्यांनी आपल्या रक्ताचे पाणी केलेले असते त्याच घराच्या एका कोपर्यात त्यांना पडलेले पाहून मन दु:खी होते. आई-वडिल अशी आशा करतात की त्यांची मुले म्हातरपणी त्यांचा आधार होतील. वृद्धांना स्वाभीमानाने फक्त दोन वेळचे जेवण व मुलांचे प्रेम पाहिजे असते. प्रत्येक मुलांनी हा विचार करावा ज्यांनी मुलांच्या सुखाकरता आपले पुर्ण आयुष्य घालवले. त्यांच्यासाठी थोडा वेळ द्यावा. त्यांच्यावर वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येऊ देवू नये.

वाचने 55088
प्रतिक्रिया 159

प्रतिक्रिया

In reply to by पैसा

मग आपल्या सुना मजेत राहतील त्याचं काय?
केवळ ह्याच मुद्द्यामुळे कितीतरी वृध्दाश्रमांचा बिझ्नेस कमी होतो हो.

In reply to by प्रसाद गोडबोले

पार्श्वसंगीत म्हणून आणी खास आजी-भावी सासवांसाठी (आणि सायंकाळचे ६.२० झाले म्हणून ) सांजधारा गीत ऐकूया. "सुन्या सुन्या महफिलीत माझ्या" चित्रप्ट उंबरठा !!! सांजधाराप्रेक्षकश्रोतासंघ

In reply to by पैसा

सुना मजेत म्हणजे आपले मुलगेही आनंदी राहतील ना! शिवाय त्यांचे प्रश्न त्यांच्यापाशी! आपल्या संसारात आयुष्यभर भाज्या निवडल्यावर पुन्हा शेवटच्या श्वासापर्यंत कोथिंबीरीची जुडी पूर्ण निवडून मरण्याची माझी इच्छा नाही. ;) मी सासू म्हणून वृद्धाश्रमात आले तर तुला चालेल का? अनाहितांनी आपापली मते द्यावीत. आपला रोल काय असणारे ते आधीच स्प्ष्ट असलेले बरे! आश्रमात अडीनडीला उपयोगी म्हणून निदान एक अ‍ॅम्ब्यूलन्स तरी असतेच. आपल्याला एकवेळ ती नसली तरी चालेल पण शॉपिंगला जाण्यासाठी गाडी लागेल. त्याचा विचारही करावा लागेल. नुसते अनाहिता कट्ट्याचे फोटू बघून आता गप्प बसवत नाही. मलाही तुळशीबाग शॉपिंग कट्टा निदान म्हातारी झाल्यावर तरी करायचाय. हीच शेवटची इच्छा! ;)

In reply to by रेवती

पै तै आणि रेवाक्का ला अणुमोदन! (दिव्यश्री इफेक्ट) रेवाकका सासु होणार असेल तर मी पण तीशीतच वृद्धाश्रमात यायला तयार आहे!

In reply to by रेवती

एवढे सगळे पाह्यजे म्हणती रेवाक्का? राहा बै आपापल्या घरातच. घरचे थोडे चिडचिड करतील पण आपलेच ना ते. उगी बाहेरच्या लोकांना त्रास कशाला? ;)

In reply to by अभ्या..

वृद्धाश्रमात राहण्यात मजा वाटायला हवी ना! प्रत्येकाच्या कोणत्या ना कोणत्या गोष्ती करायच्या राहून गेलेल्या असतात त्यातील काही तरी करून बघता यायला हव्यात म्हणून सगळी खटपट चाललिये. तर तुम्ही मला भगवी कफनी आणि कमंडलूच देताय की! ;)

मी काय म्हणतो, आपण मिपाकरांचाच एक वृद्धाश्रम काढायचा का? तिथे डुआयडींना प्रवेश नसेल. प्रत्येक वृद्ध मिपाकर हातात एक टॅब घेऊन मिपामिपा खेळत बसेल. तिथे सरळसरळ एकमेकांशी बोलायला बंदी असेल. जे काही बोलायचेय ते व्यनि/खवमधून. झालेच तर जो कॉमन हॉल असेल त्याला खरडफळा असे नाव देऊ. अगदीच कुणाला बोलायची हुक्की आली तर बसने बाहेर कुठेतरी नेऊन कट्टाबिट्टा करू. काय म्हणता? फक्त मिपा जरी मिपाकरांना फुकट असले (मालकांच्या कृपेने) तरी मिपाश्रम मात्र टीटीएमएम. काय?

In reply to by एस

ही देखील भारी आयडीया आहे .... फक्त त्यांच्या मिसळीत जास्त तिखट मीठ मसाला तर्री नको ... बीपी वाढलं तर कोण पहाणार भाऊ !

In reply to by एस

थांबा, आधी एक सांगा की स्कोअर सेटल कसे करायचे? समोर बसलेला मनुष्य माझ्याशी तिरके प्रतिसाद देऊन भांडतोय असे दिसताच, हातातील काठी नाही तरी तोंडातील कवळी फेकून मारली तर जबाबदारी कोण घेणार? अजया एकवेळ कवळी बसवण्याची जबाबदारी घेईल, फेकून मारणार्‍यांची नाही! ;)

हापशेंच्युरी निमीत्त श्री.लाटकर यांचा सत्कार मिपाआश्रमात 50 % डिस्कांऊट देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक- जेपी आणी तमाम तरणेताठे कार्यकर्ते

भारतातल्या एका मोठ्या समस्येला वाचा फोडल्याबद्दल तुमचे किती आभार मानावे तितके कमीच!!

अनाहिता वृध्दाश्रमाची आयड्या लै भारी आहे.कट्ट्यासाठी बस असली की बास.वाती वळायला कापूस ,सुनांच्या चहाडया.मज्जानु लाइफ! मी फुकट दात पाडून हातात देणे हा रोल घ्यायला तयार आहे.

In reply to by अजया

ओक्के, मग मी सासूचा रोल करीन. आपल्या भटारखान्यातील मेन्यू प्ल्यानिंगला ताज्या दमाच्या कार्यकर्त्या म्हणून सानिकाताईंना घेण्यात यावे. तो त्यांचा अर्धवेळ जॉब असेल. ;) स्पँडीताई या सणवार येताच सर्व आज्ज्यांचे मेक अप करून देतील.

In reply to by अजया

एवढ्या स्त्रिया एकत्र रहाणार. ह्म्म. म्हणजे सलोखा, शांती, गुण्यागोविंदा वगैरे शब्दांचा वापर थांबणार तर. ;) (सोमणांच्या मिलिंदाबरोबर ट्रायाथलॉन एवढं पळुन जातो आहे. कृपया इकडचे वातावर शांत झाले की व्यनि करणे) :P

मी जांभूळपाड्याला( पाली जवळ) एक वृद्धाश्रम पाहिला. जेथे सर्व टूणटुणीत सुखवस्तू वरिष्ठ नागरिक राहताना दिसले प्रत्येक जोडप्यासाठी दोन खोल्या (एक बेडरूम आणि एक बाहेरची खोली) होत्या (४०० चौ फूट).बाहेरच्या खोलीत एक सोफा दोन खुर्च्या एक टी व्ही. आतल्या खोलीत दोन पलंग एक ड्रेसिंग टेबल त्याला जोडून बाथरूम ज्यात सौरबंबाच्या पाण्याची जोड इ. ते म्हणजे एक स्वयम्पाकघर नसलेले घर होते. सकाळी सहा वाजता चहा येतो. तो घेऊन प्रातर्विधी आटोपून सर्व जण नदीकाठी फिरायला जातात. आठ ते साडे नउ पर्यंत न्याहारी दुपारी साडेबारा ते दोन जेवण आणि सायंकाळी साडे सात ते नौ जेवण हे सर्व मोठ्या डायनिंग हॉल मध्ये. मधल्या काळात वरिष्ठ लोक आपापसात गप्पा मारताना पत्ते कॅरम वगैरे खेळताना दिसले. कोणीही तेथे गलितगात्र नव्हता किंवा अगतिक नव्हता. सर्व जण खाऊन पिउन सुखी अशा कुटुंबातील होते. तेथील खर्च माणशी १० हजार होता आणि जोड्प्याला १७ हजार होता.(२०११ -१२ मध्ये). पण त्यात जेवण खाण पासून सर्व गोष्टींची काळजी घेतलेली होती. सकाळी उठून दुध वाला पेपर वाला पासून मोलकरीण कपडे धुणे इ गोष्टींची कोणतीही कटकट त्यात नव्हती. प्रदूषण विरहित हवा पाणी, ताज्या भाज्या कोणताही ताण तणाव नाही.घराची डागडुजी करा. प्लंबर इलेक्त्रिशियन ची दाढी धरा काहीच नाही. एकदा पैसे भरले कि मोकळे. (तेथे जाण्यासाठी मोठी प्रतीक्षा यादी आहे असे ऐकतो.) कुटुंबाच्या कटकटी नाही कि गृह कलह नाही.एकमेकांच्या फार जवळ राहण्यामुळे पायात पाय अडकण्याची शक्यता असते तीही नाही. परत मुंबईहून फार लांबही नाही. ते पाहून मला ती कल्पना फारच आवडली. माझ्या सारख्या माणसाला तर जवळ एखादा धर्मार्थ दवाखानाही चालवता येईल. परंतु बायकोला हि कल्पना फारशी आवडलेली नाही. ( पन्नाशी नंतर कदाचित आवडेल अशी आशा). असा वृद्धाश्रम मला फारच भावला. अगदीच गलितगात्र होईपर्यंत अशा ठिकाणी राहायचे असे मी मनाशी ठरवलेले आहे पुढचे पुढे पाहू. मुलांनी हाकलल्यावर वृद्धाश्रमात जाण्यापेक्षा अगोदरच जाऊन सेकंड इनिंग चालू करण्याची कल्पना मला भावते. जाता जाता --विदारक सत्य अनाथाश्रमात गरिबांची मुलं असतात आणि वृद्धाश्रमात श्रीमंतांचे आईबाप असतात.

In reply to by सुबोध खरे

हे आताचे असेल , पुर्वी आमच्या गावात एक मंदिर आहे. त्या मंदिराच्या मुख्यप्रवेश्द्वारा समोर एक मोठी घंटा आहे , त्या खाली चारचाक्यांमधुण व्रुद्ध आइबापांणा सोड्त असत. हे डोळ्याणी(कुणाच्या असा प्रश्ण विचारु ण्ये) पाहिले आहे.

डॉ. खरे यांच्याशी सहमत. मी पाहिलेल्या आश्रमात एकच मोठी खोली दोन जणांमध्ये दिली गेली होती. बाथरुम जोडलेले होते. माझ्या आजेसाबा मात्र दोन जणांचे पैसे भरून एकट्याच रहात होत्या. त्यासाठी त्यांनी दिलेली कारणे मला पटली. आयुष्यभर त्यांनी बर्‍याच तडजोडी केल्या (हे सगळे माझे लग्न होण्याआधी झाले होते ;) ). आता या वयात कोणा दुसर्‍या सदस्येशी जमवून घेणे व आपले वेळापत्रक पाळणे त्यांना अवघड वाटले. हातात पैसे असताना ही तडजोड नको वाटत होती. शिवाय त्या त्यांच्या (दिवंगत) पतींच्या स्वभावामुळे का होईना वेळापत्रक, प्लेनिंग यांच्या पक्क्या आहेत. त्यात गडबड झालेली अजिबात चालत नाही. त्यांनी तोही उल्लेख केला. त्यांचा मुलगा, मुलगी यांचे सगळे आयटीवाले संसार, त्याप्रमाणे असलेली धावाधाव आहे. ती त्यांना मानवत नाही. मग आपले आपण राहिलेले बरे. शिवाय सगळे नातेवाईक विचारपूस करून आहेत याचेही सूख मनात असते. त्यांना सांगितले की मीही तिथेच येऊन राहणार आहे.

आज्जे चक्क तुळशी बागेतुन नीट चुझ करुन घेतलेली तुळशी माळ जपत... काळे वाटाणे वाफेवर सहज शिजत नसल्यास त्यावर काय करावे ? या शंकेवर सगळ्या भक्तांना { सुनांना } प्रवचन कम टिप्स देत आहे असे चित्रच डोळ्या समोर आले ! ;) . .. ... चल पळा आता... ;) जाता जाता :- मध्यंतरी मात्र एक बातमी वाचुन माझ्या डोळ्यात पाणी आले होते... जन्मदात्या आईला भर पावसात टाकून कृतघ्न मुलाचा पोबारा भर पावसात वयोवृद्ध आईला गाडीतून फेकून देऊन 'तो' पळून गेला... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Halke Gaadi Haako... { Folk Fusion by Neeraj Arya's Kabir Cafe - Official Video }

In reply to by रेवती

हा.हा.हा... ते माहित आहे हो. पण ते माझं असचं... कॄपया राग मानु नये ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Halke Gaadi Haako... { Folk Fusion by Neeraj Arya's Kabir Cafe - Official Video }

हे वृद्धाश्रम श्रीमंत आई-वडिलांसाठी आहेत. पण जे गरीब वृद्ध लोक आहेत, त्यांची परिस्थिती मात्र फार वाईट आहे.

In reply to by हेमंत लाटकर

खरंच काका!! पण मी काय म्हणतो, इथे लेख लिहीण्यापेक्षा तुम्हीच एखादा उपक्रम अशा वृद्धांसाठी का सुरु करत नाही?

इथे पत्ते टाका हो वृद्धाश्रमाचे. वाचनखू ण साठवून ठेवेन. ;-)

In reply to by सूड

हाहाहाहा! यावरून आठवलं, मिपाची वाटचाल पत्त्यांच्या खेळांच्या रूपाने मांडायची झाल्यास सर्वात आधी होतं पोकर. मग झालं ब्रिज. मग झालं रमी. नंतर पाचतीनदोन, मेंढीकोट वगैरे. आणि सध्या आहे जोड्या-जोड्या. ;-)

मुलांनी आई-वडिलांवर वृद्धाश्रमात जाण्याची वेळच का येऊ द्यावी. मुले शाळेत असताना सकाळी पाच वाजता उठून पोळी भाजीचा डब्बा आई करून देते. मुले आजारी पडले की रात्रभर आई जागरण करते. मुले काॅलेजात गेली की मुलांना त्रास होवू नये म्हणून लोन काढून वडिल गाडी घेऊन देतात, मग ते लोन फेडण्यासाठी आेव्हरटाईम करतात. मुलांसाठी एवढे करूनही मुलांसाठी वेळ न देणार्याची गती अशीच होते म्हणणे म्हणजे कृतग्घपणा आहे. मुले परदेशात असली तर वृद्धाश्रमात जाणे बरोबर आहे. पण एकाच गावात राहुन मोठे घर असुनही वृद्धाश्रमात जावे लागणे वाईट आहे.

In reply to by हेमंत लाटकर

मुलांनी आई-वडिलांवर वृद्धाश्रमात जाण्याची वेळच का येऊ द्यावी.
हे तर मान्य आहे. पण आता ज्यांच्यावर ही वेळ आली आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला अतोनात कणव वाटत्ये तर काहीतरी करा की राव, नुसते लेख पाडून काय होणारे?

In reply to by हेमंत लाटकर

मुले काॅलेजात गेली की मुलांना त्रास होवू नये म्हणून लोन काढून वडिल गाडी घेऊन देतात, मग ते लोन फेडण्यासाठी आेव्हरटाईम करतात. मुलांसाठी एवढे करूनही मुलांसाठी वेळ न देणार्याची गती अशीच होते म्हणणे म्हणजे कृतग्घपणा आहे. >>>अहो मला एक सांगा की काॅलेजात जाणार्या मुलांणा वडिलांणी का गाडी घेउण द्यावी??? त्यांच्यात धमक असेल तर ते घेतिल कि पुढे... कशाला णसते लाड हवेत...जोपर्यन्त ते स्वता कष्ट करुण मिळवणार णाहीत तोपर्यंत त्यांना कष्टाची आणी पैशाची किंमत कशी समजणार? दुसर म्हन्जे मुले जन्माला घालताना आपली म्हातार्पनीची काठी होइल हा विचार्च का?? अपेक्षाच का ठेवायची अशी?

In reply to by हेमंत लाटकर

इतक्या पहाटेपासून शाळेत जाऊन जर बेसिक मूल्यशिक्षण मुलांना मिळत नसेल, आणि उच्चशिक्षणासाठी गाड़ी आवश्यक होत असेल तर तो दोष शिक्षणपद्धतीचा आणि समाजातूनच रुजल्या जाणाऱ्या मूल्यांचा आहे, .. मुलांचा नाही!

In reply to by कवितानागेश

हा प्रतिसाद सीरियसली सीरियस वाटता वाटता सीरियसली कॉमिक वाटायला लागलाय. पहाटे आई उठते, डब्बा बनवते (मधली कामं संदीपसांदने यांच्या निलाक्षीच्या धाग्यावर) पोरं शाळेला आरामात जातेत. बाकी पोरांचा दोष नाही हे सांगितल्यावर टेंशन गेलं ना भो!

लाटकर साहेब, विषय फार मोठा आहे. कृपया राग मानू नका. असे एका धाग्यात काय बोलणार? मिपावर याआधी वृद्धाश्रमांचा विषय चर्चिला गेलाय अनेकदा. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. आजकाल सारखे सारखे ऐकू येते की दुसर्‍यांचा विचार करा, दुसर्‍यांचा विचार करा. पण खरंतर स्वत:चाच विचार करायला कोणाकडे वेळ नाहीये. माझ्याकडे सध्या आहे म्हणून मी फक्त माझाच विचार करतिये ही गोष्ट वेगळी. वृद्ध व त्यात आर्थिक परिस्थिती वाईट असलेल्यांचे खरंच हाल आहेत. अमान्य नाहीच. मनुष्यबळ हा मोठा प्रश्न ठरतोय. शिवाय दरपिढी जे बदल समाजात घडायचे ते थांबणार नाहीत. तसे ते थांबत असते तर आज तुमच्या/माझ्या घरातील महिला नऊवारी साडी नेसून वावरत असत्या. तर, बदल हे असेच आहेत. आपापले संसार पूर्वीच्या पद्धतिनं करून झाल्यावर आजकालचे शिनियर्स अबलंबित्व असेल असे रहायलाच तयार नाहीत. हा वर्गही मोठा आहे. ते जिथे राहतात ती गल्ली सोडूनही त्यांना कोणी ओळखत नाहीत पण त्यांना तेच बरे वाटते. ही परिस्थिती माझी आहे तरी मी त्या परिस्थितीचाच विचार करणार. जगातील प्रत्येक अनाथ, दीन दुबळ्याचा विचार कोणीही करू शकत नाही. त्याने आज हातात असलेला दिवसही वैट जातो हा स्वानुभव आहे. ते म्हातारे आहेत म्हणून त्यांनी दु:खात जगायचं व जे तरणे आहेत त्यांनी काहीही कन्स्ट्रक्टीव न करता नुसतं अरेरे म्हणायचं आणि उसासे सोडायचे. ना म्हातारे सुखी, ना तरणे! तुम्हाला काळजी वाटतिये तर एक काम होऊ शकेल. वृद्धाश्रमात तेथील सिनियर सिटिझन्सच्या मनोरंजनासाठी काही उपक्रम राबवू शकता. त्याबद्दल काही म्हणायचे असेल तर चांगले आहे.

जेपी दादा जर्रा मदत करा बर्र... हा फाष्टेश्ट शेण्च्युरी धागा हाये का ? हे साण्गा बरे.

" ....... अन कालचा गोंधळ बरा होता." काय म्हण आहे बरं ही ?

यावेळी मी बरीच मदत केलीये शेंचुरीसाठी. आमचाही सत्कार झाला पायचे. फ्लेक्ष लागले पायजेत. त्यावर समर्थक म्हणूनही चित्र व नाव लावावे.

भूतकालातल्या आणि सद्याच्या जीवनात असलेल्या फरकाचा अंदाज जमेस न धरल्यानेच केवळ वृद्धाश्रमांबद्दल अनेक गैरसमज होत आहेत. जुन्या काळासंबंधिची काही भ्रामक गृहीतके... १. पूर्वी कसे सगळे पुत्र/पुत्री अगदी श्रावणबाळासारखी आईवडिलांची सेवा करत असत ! २. आईवडिलांची सेवा करण्यापुढे मुलांनी आपल्या भवितव्याचा बळी दिला पाहिजे !! ३. ... आणि मुख्य म्हणजे एवढे सर्व (आणि इतर काही) त्याग आईवडिलांसाठी करून वर आपल्या मुलांनी आपल्या शेजार्‍यांच्या मुलांच्यापेक्षा चार पावले पुढे राहून आईबापांचे आयुष्य कृतकृत्य केले पाहिजे ही अपेक्षा असतेच !!! पूर्वीच्या आणि सद्याच्या वस्तूस्थितीतील फरक लक्षात घेतला तर असे दिसून येईल की... १. जुन्या काळी जेव्हा आईबाप... बहुदा बापच... आपल्या जीवनाचा व्यवसाय मुलाच्या हाती सोपवत असत आणि मुलगाही बापाच्या गावात आणि घरात राहून पुढचे आयुष्य घालवत असे तेव्हा आईवडिलांनी मुलांवर अवलंबून असणे हे 'एका अर्थाने' ठीक होते. २. आजच्या काळात बापाचा व्यवसाय-धंदा मुलगा चालवतोच असे नाही... बहुदा नाहीच. कारण पीढी-दरपीढी नवनवीन संधी निर्माण होत आहेत. या सर्व संधी मूळ गावी मिळतील असेच नाही... बहुदा नाहीच. मग असे असताना चांगल्या आईबापांनी आपल्या मुलामुलींना उत्तम शिक्षण देवून त्यामूले मिळणार्‍या जगभरच्या संधी काबीज करण्यासाठी पूर्ण मोकळीक द्यावी की त्यांच्यावरचा भार बनून त्यांचे पंख छाटावेत ? ३. जर नीट नियोजन केले तर सद्याच्या काळातल्या बहुसंख्य आईवडीलांची आर्थिक परिस्थिती इतकी वाईट नाही की त्यांनी आपल्या मुलांवर सरसकट अवलंबून रहायला लागावे. आणि विशेषतः, ज्या काही आईवडीलांना मुलांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून रहावे लागते त्यांनी जर मुलांवर बंधने न टाकता त्यांना त्यांच्या विकासाला मोकळीक दिली तर मुलांची आणि पर्यायाने आईवडिलांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासच मदत होईल नाही का ? अजून महत्वाचे मुद्दे असे की... १. भावनिक भरात अंध झाल्याने आपण आपल्या मुलांच्या विकासावर बंधने घालत आहोत हे बर्‍याच लोकांच्या ध्यानात येत नाही. २. याच भावनिक अंधत्वामुळे "वृद्धाश्रम म्हणजे काहीतरी लाजिरवाणे आहे" हा गैरसमज आणि "आईवडिलांनी वृद्धाश्रमांत राहणे हे मानहानीकारक आहे" अश्या खुळ्या कल्पना उगम पावतात. या कल्पनाच भारतात उत्तम सोईसुविधांचे वृद्धाश्रम निर्माण होण्याला असलेले मोठे अडथळे आहेत. त्यामुळे, एकीकडे आर्थिक सुस्थिती असलेल्या कित्येक घरांत वृद्धांची मानसिक व शारिरीक अनावस्था होत असते. तर दुसरीकडे आर्थिक दृष्ट्या सबळ असलेल्या वृद्धांनाही उत्तम व्यवस्था असलेले (किंवा इतर कोणतेही) वृद्धाश्रम उपलब्ध नाहीत. हा विरोधाभास केवळ मानसिक दंभामुळे निर्माण झालेला असून, तो दंभ झुगारून दिल्याशिवाय त्याचे निराकरण होणार नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सहमत आहे. वृद्धाश्रम गुणवत्तापूर्ण कसे होतील हे पहाण्याची आता गरज आहे. तुला जन्म दिला. खस्ता खाऊन लहानाचा मोठा केला. ..... वगैरे वगैरे जे मुलांना ऐकवले जाते त्याला जन्म देण्यापुर्वी आमची परमिशन घेतली होती काय? असा प्रश्न विचारु लागले आहेत.

In reply to by प्रकाश घाटपांडे

वृद्धाश्रम गुणवत्तापूर्ण कसे होतील हे पहाण्याची आता गरज आहे. आपल्या मुलांचे पालनपोषण करताना कोणतेही आई-वडिल म्हातारपणी मुलांनी सांभाळावे म्हणून करत नाहीत तर प्रेमापोटी करतात. आजकाल आई-वडिलच एकत्र फॅमिलीत राहत नसल्यामुळे मुलांनी जवळच राहावे असा आग्रह आई-वडिल करत नाहीत. खर तर आपणही अमेरिकनांसारखे वागले पाहिजे, जसे तिथे लहानपणापासून मुलांना स्वावलंबी बनवले जाते. मुलेही सज्ञान झाल्यावर आई-वडिलांवर अवलंबून न राहता पेट्रोल पंप, रेस्टाॅरंट मध्ये कामे करून स्वत:चे शिक्षण करतात. तसे भारतीय मुलांना आई-वडिलांनी करायला लावायला पाहिजे.

In reply to by हेमंत लाटकर

खर तर आपणही अमेरिकनांसारखे वागले पाहिजे, जसे तिथे लहानपणापासून मुलांना स्वावलंबी बनवले जाते. मुलेही सज्ञान झाल्यावर आई-वडिलांवर अवलंबून न राहता पेट्रोल पंप, रेस्टाॅरंट मध्ये कामे करून स्वत:चे शिक्षण करतात. तसे भारतीय मुलांना आई-वडिलांनी करायला लावायला पाहिजे. हे सरसकटीकरण झाले ! अमेरिकन जीवन पद्धतीत जसे काही फायदे आहेत तसे तोटेही आहेत. १. अमेरिकेतही ज्या आईवडिलांना परवडते ते मुलाची पोस्ट्ग्रॅजुएट (ज्याला ते कॉलेज/ग्रॅज्युएशन म्हणतात) शिक्षणाच्या खर्चाची एजुकेशन फंड, बचत, इ तून तरतूद करतात. अमेरिकेत शैक्षणिक कर्ज जास्त सुलभपणे मिळते आणि ते निवडणूकीतला महत्वाचा मुद्दाही असते. पेट्रोल पंप, रेस्टाॅरंट, इ त काम करून मिळणारे उत्पन्न शिक्षणाच्या खर्चाला पुरेसे नसते... त्याच्याकडे एक अतिरिक्त (सप्लिमेंटरी) आवक इतकेच पहाता येईल. २. ज्यांच्या पालकांना उच्च शिक्षणाचा खर्च परवडत नाही असे अनेकजण ग्रॅज्युएट (ज्याला ते हायस्कूल म्हाणतात) शिक्षणानंतर नोकरी करून पैसे साठवून अथवा स्वतःच्या नोकरीच्या बळावर शिक्षणकर्ज काढून पोस्टग्रॅजुएशन करतात. ३. शिक्षण चालू असतानाही स्वावलंनाची सवय असली तर ते नक्कीच चांगले आहे. पण, ज्या पाल्याच्या पालकांमध्ये शिक्षणाचा खर्च उचलण्याची ताकद आहे त्या पाल्यांना शिक्षणात अधिक वेळ खर्च करता आला तर ते पाल्याच्या भवितव्यासाठी जास्त फायदेशीर ठरेल. ३. एखादी परदेशी पद्धत अंगिकृत करताना तिच्यातले सर्वच आपल्या देशातल्या वस्तूस्थितीत आणि तेही सर्वच माणसांना लागू पडेलच असे नाही... त्यामुळे त्यातले फक्त आपल्यासाठी चांगले तेवढेच उचलावे, अंधानुकरण टाळावे. मुख्य म्हणजे चांगल्या गोष्टी केवळ पश्चिमेकडूनच येतात असे नाही... पूर्व, उत्तर, दक्षिणेकडूनही येऊ शकतात किंबहुना आपण डोके लढवले तर आपल्या इथेही त्या जन्मू शकतात... आपण डोळे उघडे ठेवून निष्पक्षपातीपणे त्यांचे विष्लेशण करून योग त्याचा आणि योग्य तेवढ्याचा स्विकार करणे जास्त फायद्याचे ठरेल.

कि भारतात वृद्धाश्रम काढत आहेत. मोठ्या अपेक्षेने, अभिनंदन वगैरे करायला धागा उघडला. तर च्यामारी..केटली तो गरम है और चाय बिलकुलच नय. आमचा ( नो वृद्ध ) आश्रम काढण्याचा बेत आहे (आदर्शः अनेक बापु, बुवा वगैरे). तिथले उद्योग बघता तिथे वृद्धावस्थेला थाराच नसतो. प्रश्नच इल्ले :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

असा प्रश्न विचारल्याने एक जागरूक मिपा वाचक म्हणून शरम /लाज्/खंत जी उप्लब्ध आहे ती वाटली. अ.राव.आगे बढो हम तुम्हारे साथ है!!!

In reply to by हेमंत लाटकर

बर्‍याच गंभीर धाग्यांनंतर जरा गंमत केली ती तुम्ही मजेत घेतली त्याबद्दल धन्यवाद! इथे बर्‍याच लोकांनी गंभीर प्रतिसाद दिले आहेत आणि ते खरंच चांगले आणि व्यवहार्य आहेत. आता निव्वळ भावनेवर आधारित राहून चालणार नाही. काही लोक म्हणतात तसे खरंच घरी ठेवलेल्या नोकराने काही अघटित प्रकार केला तर? किंवा घरात एकट्या असलेल्या वृद्धाला अचानक काही मेडिकल इमर्जन्सी आली आणि मदत उपलब्ध नाही झाली तर? असे बरेच प्रश्न आहेत. त्यातही कोणतीही दोन माणसे आणि त्यांची परिस्थिती एकसारखी नसते. त्यामुळे एकच एक उत्तर सगळीकडे लागू होणार नाही. त्या त्या परिस्थितीत सापडल्याशिवाय कोणीही माणूस असा का वागला हे सांगता येणार नाही. त्यामुळे सगळ्याला सरसकट लेबल लावू नये. आता जगच बदलत चालले आहे तर माणूस बदलणारच ना! जागतिकीकरणात अनेक गोष्टीचे संदर्भ बदलतात. त्या रेट्यात नवीन पिढी स्वार्थी झाल्यासारखी वाटली तरी त्याला इलाज नाही. पूर्वी ५/८ मुलं असायची. आईबापाची जबाबदारी सगळ्यांवर वाटून जायची. आता एकेकच मूल असेल तर एका नवरा बायकोच्या जोडीवर ४ वृद्धांची, (आजी आजोबा असतील तर त्याहूनही जास्त) जबाबदारी येईल. ते हे कसे निभावून नेऊ शकतील? स्वतंत्रपणे आयुष्य घालवलेल्या माणसाला सुनेच्या किंवा जावयाच्या मर्जीनुसार वागणे कितपत शक्य होईल? या सगळ्याला इलाज नाही. बदल हे होणारच. ते जास्तीत जास्त सकारात्मक कसे घेता येतील हे बघणे गरजेचे आहे. त्याबदली पूर्वी कसं होतं आता कसं आहे हा विचार करून काय फायदा आहे?

In reply to by हेमंत लाटकर

माझ्या धाग्याला 100 च्यावर नेल्याबद्दल सर्व मिपाकरांचे शतश अभिनंदन.
मग आता ह्या धाग्याला घरीच ठेवून त्याची मायेनी काळजी घेणार तुम्ही कि वृद्धाश्रमात टाकणार? ;-)

आई-वडिलांंनी मुलांना जन्म दिल्यावर मुलांना लहानाचे मोठे करून त्यांना उच्चशिक्षण देणे हे जसे आई-वडिलांचे कर्तव्य आहे. तसे आई-वडिल खुप म्हातारे व आजारी (धडधाकट असताना ते आपली कामे आपणच करतात) पडल्यावर त्यांची सेवा करणे हे मुलांचे कर्तव्य नाही का? वृद्धाश्रमात पाठवून आपली जबाबदारी झटकणे कितपत योग्य आहे.

In reply to by हेमंत लाटकर

सेवा करणे म्हणजे नेमके काय? त्या मुलांनी आपापले कामधंदे सोडून आईबापाची शारीरिक सेवा करावी का? ते तुम्हाला स्वतःला शक्य आहे का? जरा विचार करून बघा. मग म्हातार्‍या आईबापांना नोकरांच्या हातात सोपवून नोकरांनी हेळसांड केली, खून वगैरे केले तर? ती रिस्क घेण्यापेक्षा वृद्धाश्रमात ते राहिले तर काय वाईट आहे?