लागणारे जिन्नसः
कच्चा पण थोडासा जून असा कापा फणस,
२-३ ओल्या मिरच्या,
१ वाटी खोबरे,
१ लहान चमचा हळद,
७-८ काळी मिरी,
फोडणीसाठी हिंग, मोहरी,
चवीला साखर, मीठ
कृती:
फणस सोलून व आतील गरे साफ करुन घ्यावेत.
गर्यांमधील बिया (आठळ्या) काढून त्यांची वरची साले काढून त्यांचे लांबट तुकडे करावेत.
फणासाच्या बाहेरील सालीचा आतील भाग काढून त्याचेही लांबट तुकडे करावेत. जरासे चेचावे.
गरे लांबट चिरावेत.
तेलात हिंग मोहरीची फोडणी करुन त्यात आठळ्यांचे तुकडे व सालीच्या आतल्या भागांचे तुकडे शिजायला घालावे. सोबत थोडे पाणी व हळद घालावी.
हे शिजले की त्यात गर्यांचे तुकडेही घालावे.
चवीला मीठ व साखर घालावी.
मिरच्या व मिरी ठेचावी व खोबर्यासकट मिक्सरमधून एकदोनदा फिरवून घ्यावी.
वाटण फणसाच्या भाजीत घालून भाजी ढवळून घ्यावी व चांगली वाफ आणावी.
वरुन खोबरे - कोथिंबीर पेरावी.
कारवारी मसाला:
१ टेस्पू धणे, १ टीस्पू जिरे व हळद प्रत्येकी, ४-५ लाल सुक्या मिरच्या.
१ छोटा कांदा कापून, ६-७ लसूण पाकळ्या, किंचितसे आले, १ वाटी खोबरे
चिंचेचा कोळ.
मिरची सोडून सर्व मसाला कच्चा वाटायचा. मिरचीची फोडणी व बाकी वर दिल्याप्रमाणेच. हिरवी मिरची, मिरी ऐवजी हे वाटण वापरायचे.
टीपा:
गरे साफ करताना व फणस सोलताना हातांना व विळीला तेल लावून घ्यावे.
फोडणीसाठी हिरव्या मिरच्यांऐवजी लाल मिरच्या वापरता येतील. तेह्वा सोबत उडीद डाळही घालता येईल.
साखरेऐवजी गूळ घालता येईल.
ह्या भाजीत काही जण ओले शेंगदाणे / पावटे/ भिजवलेले हरभरे/ मटार वगैरेही टाकतात. आपापली आवड.
टीपा:
गरे साफ करताना व फणस सोलताना हातांना व विळीला तेल लावून घ्यावे.
फोडणीसाठी हिरव्या मिरच्यांऐवजी लाल मिरच्या वापरता येतील. तेह्वा सोबत उडीद डाळही घालता येईल.
साखरेऐवजी गूळ घालता येईल.
ह्या भाजीत काही जण ओले शेंगदाणे / पावटे/ भिजवलेले हरभरे/ मटार वगैरेही टाकतात. आपापली आवड.
वाचने
28405
प्रतिक्रिया
74
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम!
चक्क यशोची पाकॄ वाचावयास मिळत
ए शहाण्या, मागे पण टाकल्यात
In reply to चक्क यशोची पाकॄ वाचावयास मिळत by मदनबाण
मस्त ग यशो,फणसाची भाजी जीव कि
मलापण खूप आवडते ताई. :) ही
In reply to मस्त ग यशो,फणसाची भाजी जीव कि by नूतन सावंत
मस्त दिसतेय भाजी :)
In reply to मलापण खूप आवडते ताई. :) ही by यशोधरा
मस्तच.
तुम्ही वेळेवर चहा नं
In reply to मस्तच. by प्रचेतस
खी खी खी
In reply to तुम्ही वेळेवर चहा नं by कॅप्टन जॅक स्पॅरो
मला चहा नाही पाजलात तरी खाऊ
In reply to खी खी खी by प्रचेतस
अता वाट बघणे आले.
In reply to मला चहा नाही पाजलात तरी खाऊ by यशोधरा
बघा वाटचं बघा प्रचेतस सर
In reply to अता वाट बघणे आले. by प्रचेतस
अरे वा!
In reply to खी खी खी by प्रचेतस
@मुकलेला अहात >>
In reply to तुम्ही वेळेवर चहा नं by कॅप्टन जॅक स्पॅरो
मी पण:(
वॉव..मस्तं!
खुप छान दिसतेय भाजी :-)
ये की. कधी येतेस? ;)
In reply to खुप छान दिसतेय भाजी :-) by सई कोडोलीकर
काय एकसे एक रेसेपी देताय....
मस्त भाजी !
भाजी चवीला कशीही असली तरी
आमच्यात भाजी चवीलाही चांगली
In reply to भाजी चवीला कशीही असली तरी by चैतन्यमय
आवडती भाजी!! यावर्षी फणस
फणसाच्या भाजीची चव एकदोन
कधी येउ खायला?
फणसाच्या मोसमात :)
In reply to कधी येउ खायला? by मृत्युन्जय
वाह! मस्त फोटू व सोपी कृती.
आदल्या रात्री वाटाणे भिजत
In reply to वाह! मस्त फोटू व सोपी कृती. by रेवती
बरं.
In reply to आदल्या रात्री वाटाणे भिजत by यशोधरा
क्या बात यशो. मी हौसेने कॅन्ड
फणसाची भाजी म्हणजे...येता-जाता खायची भाजी...
फणसाची भाजी माझी फार आवडती
एकदम हटके पाकृ ! माझ्या
फणसाला मटण म्हणणे हा फणसाचा
In reply to एकदम हटके पाकृ ! माझ्या by सस्नेह
आम्ही म्हणतो बाॅ ! करा आमचा
In reply to फणसाला मटण म्हणणे हा फणसाचा by यशोधरा
आमाला फणस दिलात तरच निषेध
In reply to आम्ही म्हणतो बाॅ ! करा आमचा by सस्नेह
कल्लापूर कट्याला
In reply to आमाला फणस दिलात तरच निषेध by यशोधरा
घरी केली की भेटुन देइन
In reply to कल्लापूर कट्याला by नाखु
घ्या क्यापटनकडून :D
In reply to कल्लापूर कट्याला by नाखु
तरी सुद्धा
In reply to घ्या क्यापटनकडून :D by यशोधरा
स्नेहा.मी यशोला पाठिंबा देत
आठवणी येतात
वशाड मेली!
खासच!
आता नोव्हेंबरात फणसाला फळेधरू
छान दिसतेय ग भाजी.कधी खाल्ली
आठवणीतली आवडती भाजी
कालच पाहिला बाजारात.
इतके दिवस लोक फणस घेऊन जाता
पिकलेला फणस चालत नाही. त्याची
In reply to इतके दिवस लोक फणस घेऊन जाता by प्यारे१
फणसाची मस्त भाजी.. ह्यात
कोलीम म्हणजे? करंदी का?
In reply to फणसाची मस्त भाजी.. ह्यात by विशाखा राऊत
करंदी बहुदा एकदम बारीक पांढरी
In reply to कोलीम म्हणजे? करंदी का? by यशोधरा
अच्छा! जवळा. ओके. काड म्हणजे
In reply to करंदी बहुदा एकदम बारीक पांढरी by विशाखा राऊत
नाही थोडेसे मोठे असतात पण
In reply to अच्छा! जवळा. ओके. काड म्हणजे by यशोधरा
सोडे आणि कार्ल्याची भाजी मस्त
In reply to नाही थोडेसे मोठे असतात पण by विशाखा राऊत
नाही नाही..
In reply to करंदी बहुदा एकदम बारीक पांढरी by विशाखा राऊत
आणि
In reply to नाही नाही.. by अदि
ओल्या कोलंबीला सोडे नाही
In reply to आणि by अदि
साफ करून सुकवलेली
In reply to ओल्या कोलंबीला सोडे नाही by यशोधरा
सोडे उपमा.
In reply to साफ करून सुकवलेली by पैसा
हे सर्व प्रकार नेहमी खाते
In reply to नाही नाही.. by अदि
वाह!!
यशो,सोडे-कार्ल्यची क्रुति दे
देते.
In reply to यशो,सोडे-कार्ल्यची क्रुति दे by नूतन सावंत
मस्तच
मग ही गर्या गोट्याचीच आहे की
In reply to मस्तच by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
वा..
यशो
हो.उकडूनही घेतल्यास तरी चालेल
In reply to यशो by सविता००१