Skip to main content

भ्रष्टाचाराचा भस्मासूर

लेखक नांदेडीअन यांनी शुक्रवार, 22/05/2015 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या बरेच लोक सांगत सुटले आहेत की गेल्या वर्षभरात एकही भ्रष्टाचार झाला नाही. त्या सगळ्यांसाठी काही प्रश्न आहेत. कृपया उत्तरं देऊन माझ्या माहितीत भर घालावी ही नम्र विनंती. सुब्रमनिअन स्वामी राफेल विमान खरेदी प्रकरणामध्ये सरकारच्या विरोधात कोर्टात जातो म्हणाले होते. असे का बरे ? सामनामध्ये LED Scam बद्दल लिहून आले होते. असे का बरे ? राम जेठमलानी म्हणाले, "भ्रष्ट सरकार भ्रष्ट जजों की ही नियुक्ति करेगी ।" असे का बरे ? Chief Information Commissioner, Central Vigilance Commision , Lokayukta या जागांवर गेल्या वर्षभरात कुणाचीही नियुक्ती झाली नाही. असे का बरे ? माहिती अधिकारा अंतर्गत मागवलेली माहिती नाकारण्यात PMO ऑफिस सगळ्यात पुढे आहे. असे का बरे ? आजच एक नोटिफिकेशन काढले आहे केंद्र सरकारने. त्यात लिहिले आहे की ’दिल्ली ऍंटी करप्शन ब्युरोने केंद्र सरकारमधल्या ऑफिसर किंवा कर्मचार्‍याच्या कोणत्याही गुन्ह्याचा तपास करू नये. असे का बरे ? भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार्‍या अशोक खेमकांना पुरातत्व खात्यात म्युझिअम सांभाळायला पाठवले. असे का बरे ? AIIMS मधल्या भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढणार्‍या संजीव चतुर्वेदींचे ट्रान्सफर केल्या गेले. असे का बरे ? निवडणुकीपूर्वी लाखो-करोडो अब्ज असलेल्या काळ्या पैशातून एकही पैसा भारतात आला नाही. असे का बरे ? व्यापम घोटाळ्यातल्या सलग आठव्या साक्षिदाराचा संशयास्पद मृत्यू झाला. असे का बरे ?

वाचने 45276
प्रतिक्रिया 146

प्रतिक्रिया

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

ट्रुमना शब्द लैच भारी आहे :) नांदेडियन साहेबांना सोडा, "ह्यांचं" मत काय आहे ते सांगा? माई, ईतक्या वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात दोनंच घरात होत असणार - १) जळून जाती रेशीम गाठी मधले नाना - माई. २) मिसळपाव वरच्या माई आणि माईंचे "हे". "ह्यांचं" मत नाही असा विषयंच नाही मिसळपाव वर काथ्याकूट साठी :)

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

नांदेडियन काय म्हणतो बघुया.
अहो माई, काही म्हणणार नाही तो. आतापर्यंत अनेकांनी स्पेसिफिक प्रश्न विचारले असूनही एका तरी प्रश्नाचे उत्तर दिले आहे का आतापर्यंत? अनेक दिवस गायब होऊन अचानक एखाद्या दिवशी उगवून एखादी नवीन लिंक टाकून गायब होणे ही परंपरा यावेळीही चालू राहणार असेच दिसते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माफ करा, उशीरा पाहिला हा कमेंट. http://www.misalpav.com/comment/737254#comment-737254 ^^ या धाग्यावर कमेंट केलाय. वेळ भेटल्यास वाचून घ्या.

In reply to by नांदेडीअन

माफ करा, उशीरा पाहिला हा कमेंट. http://www.misalpav.com/comment/737254#comment-737254 ^^ या धाग्यावर कमेंट केलाय. वेळ भेटल्यास वाचून घ्या.
माईसाहेब कुरसूंदीकर, तुमच्यासाठी आहे हा प्रतिसाद.

In reply to by गॅरी ट्रुमन

शीला दिक्षित यांच्यावर एफ.आय.आर दाखल केल्यानंतर
एफआयआर दाखल करावा अशी शिफारस कपिल मिश्रांनी केली आहे. परंतु शीला दिक्षितांवर अजून एफआयआर दाखल केलेला नाही.

In reply to by श्रीगुरुजी

एफआयआर दाखल करावा अशी शिफारस कपिल मिश्रांनी केली आहे. परंतु शीला दिक्षितांवर अजून एफआयआर दाखल केलेला नाही.
हो बरोबर. एफ.आय.आर दाखल करावा अशी शिफारस कपिल मिश्रांनी केली होती पण अजून एफ.आय.आर दाखल झालेला नाही.