✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चला चर्चेद्वारे महाभारताचे ज्ञान वाढवू......

ह
हेमंत लाटकर यांनी
गुरुवार, 08/27/2015 - 14:59  ·  लेख
लेख
पुर्वार्ध महाराजा प्रतीपने गंगेला दिलेल्या वचनानुसार आपला पुत्र शान्तनुला गंगेशी विवाह करण्याचा आदेश दिला व स्वत: स्वर्गाकडे प्रस्थान केले. वडिलांच्या आदेशानुसार महाराज शान्तनु ने गंगेशी विवाह केला. पण गंगेने महाराज शांन्तनु कडून एक वचन घेतले., कोणत्याही कामात हस्तक्षेप करायचा नाही. महाराज शान्तनु ला आठ पुत्रे झाली. त्यातील सात पुत्रांना गंगेने गंगेत सोडुन दिले. (हे सात पुत्र म्हणजे मानव लोकात राहण्याचा शाप मिळालेले अश्विनी कुमार, त्यांना गंगेने गंगेत सोडून शापमुक्त केले) पण आठव्या पुत्राच्या वेळेस महाराज शान्तनुने हस्तक्षेप केल्यामुळे गंगा आठव्या पुत्रासोबत गुप्त झाली. महाराजा शान्तनु काही काळ ब्रह्मचारी राहिले. एक दिवस आठव्या पुत्राची आठवण झाल्यावर गंगेकडे आपल्या पुत्राची मागणी केली. तेव्हा गंगेने देवव्रताला महाराज शान्तनुच्या हवाली केले. हा पुत्र परशुरामासारखा पराक्रमी होता. महाराज शान्तनुने त्याला हस्तिनापुरचा युवराज घोषित केले. एक दिवस महाराज शान्तनु यमुनेच्या किनार्यावर फिरत असताना सत्यवती नजरेस पडली. तिचे सौंदर्य पाहुन महाराज शान्तनु तिच्यावर मोहित झाले. महाराज शान्तनु ने तिच्या पित्याकडे सत्यवतीशी विवाह करण्याचे विचारले. सत्यवतीच्या पित्याने विवाहाला मान्यता दिली. पण एक अट घातली. सत्यवतीला होणार्या पुत्राला हस्तिनापुरचा उत्तराघिकारी केले पाहिजे. देवव्रताने महाराज शान्तनुसाठी आजन्म बह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली. तेव्हापासून देवव्रताचे नाव भीष्म पडले. महाराज शान्तनुचा सत्यवतीशी विवाह झाला.महाराज शान्तनुला सत्यवतीपासून चित्रानंद व विचित्रवीर्य हे दोन पुत्र झाले. महाराज शान्तनुचे काही दिवसानी निधन झाले. भीष्माने चित्रानंदाला राजगादीवर बसवले. गंधर्वा बरोबर झालेल्या युद्धात चित्रानंद मारला गेला. भीष्माने विचित्रवीर्याला राजगादीवर बसवले. विचित्रवीर्याचा विवाह अंबिका व अंबालिका बरोबर झाला. विचित्रवीर्याचा क्षयाने मृत्यु झाला. वंशविस्तारासाठी सत्यवतीने व्यास ऋषिनां पाचारण केले. ( व्यास म्हणजे सत्यवतीचा लग्नाआधी पराशर मुंनी पासून झालेला पुत्र) व्यासापासून अंबिकेला धृतराष्ट्र, अंबालिकेला पान्डु व दासीला विदुर असे पुत्र झाले. उत्तरार्धातील माहिती चर्चेव्दारे प्रतिसादातून प्रत्येकाने थोडी थोडी सांगावी.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
25202 वाचन

💬 प्रतिसाद (65)

प्रतिक्रिया

तसे बघितलतर धृतराष्ट्र, पंडू,

कूल बाळ
Fri, 08/28/2015 - 21:18 नवीन
तसे बघितलतर धृतराष्ट्र, पंडू, कौरव किंवा पांडवकुणीच खरे कुरूवंशी नव्हते, आणि हाच मुद्दा मांडून विदुरनी दुर्योधनाला निरुत्तरकेले होते.
  • Log in or register to post comments

तसे बघितलतर धृतराष्ट्र, पंडू,

हेमंत लाटकर
Sat, 08/29/2015 - 08:07 नवीन
तसे बघितलतर धृतराष्ट्र, पंडू, कौरव किंवा पांडवकुणीच खरे कुरूवंशी नव्हते,??? धृतराष्ट, पन्डु हे सत्यवती पुत्र व्यासापासून जन्मले म्हणून त्यांचा कुरू वंशाची थोडा संबध येतो. पण पाच पांडव हे कोणापासून झाले अज्ञात आहे. (देवापासून झाले हा तर्क)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कूल बाळ

"त्या काळातील" प्रचलीत पद्धतीनुसार

कानडा
Sat, 08/29/2015 - 10:51 नवीन
१. धृतराष्ट, पन्डु हे सत्यवती पुत्र व्यासापासून जन्मले म्हणून त्यांचा कुरू वंशाची थोडा संबध येतो. >> सत्यवती पुत्र व्यासापासून जन्मले म्हणून नाही, राजमातेच्या संमतीने नियोग पद्धतीने जन्मले म्हणुन ते कुरू वंशीय आहेत. २. "त्या काळातील" प्रचलीत पद्धतीनुसार आई ने जर सांगितले की हा माझा माझ्या नवर्याच्या संमतीने झालेला मुलगा आहे तर ते "त्या वेळच्या" धर्मानुसार (==कायद्यानुसार) न्यायसंमत होते आणि आईने सांगितलेला बापच अधिकृत बाप मानला जात होता. त्यामुळे पांडव हे पांडुपुत्रच होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

आनंद साधले

बोका-ए-आझम
Fri, 08/28/2015 - 23:14 नवीन
यांनी लिहिलेल्या ' हा जय नावाचा इतिहास आहे ' बद्दल काय मत आहे? युधिष्ठिर जर आजच्या काळात असता तर त्याने साधल्यांवर अब्रूनुकसानीचा दावा नक्कीच केला असता. वाईट झोडलाय त्यात युधिष्ठिराला. मुंबईच्या भाषेत सांगायचं तर राशनपानी देकर मारेला है!
  • Log in or register to post comments

भागवत बाईंचे 'व्यासपर्व',

जेपी
Sat, 08/29/2015 - 10:07 नवीन
भागवत बाईंचे 'व्यासपर्व', इरावती कर्वेंच 'युगांत', कुरुदंकरांच 'व्यासशिल्प', भैरप्पा यांच 'पर्व', मुत्युजंय यांचे लेख, चित्रगुप्त यांचे" कोणी घडवल महाभारत" एवढ वाचल्यावर आता काय डोक्यात जागा नाय
  • Log in or register to post comments

हा जय नावाचा इतिहास आहे

चित्रगुप्त
Sun, 06/24/2018 - 08:14 नवीन
एवढ वाचल्यावर आता काय डोक्यात जागा नाय
जेपी साहेब, आनंद साधले यांचे 'हा जय नावाचा इतिहास आहे' वाचले नसेल तर अवश्य वाचावे असे सुचवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

वरील यादीत पीटर ब्रुक यांचे महाभारत

मारवा
Sat, 08/29/2015 - 10:38 नवीन
पीटर ब्रुक यांचे महाभारत जोडावे.
  • Log in or register to post comments

व्यास आणि कर्ण

कानडा
Sat, 08/29/2015 - 10:57 नवीन
महाभारतावर सुरूवातीपासुन नजर टाकली तर एक गोष्ट लक्षात येते की स्त्रीयांच्या शब्दावरचा विश्वास कमी होत गेलेला आहे. ऊदा. सत्यवती तिच्या लग्नाआधीच्या मुलाबद्दल (व्यास) लपवत नाही. पण दोन पिढ्यांनंतर कुंतीला अगदी तश्याच परिस्थीतीत जन्मलेल्या कर्णाबद्दल कुणालाही न सांगता लपवावे लागते.
  • Log in or register to post comments

त्याचा संबंध

बोका-ए-आझम
Sat, 08/29/2015 - 20:24 नवीन
हा सरळसरळ जात आणि वंश यांच्याशी आहे. सत्यवती ही कोळीण होती. मत्स्यगंधा हे नाव तिलाच उद्देशून आहे. कुंती ही राजकन्या होती. मानसन्मानाच्या कल्पना वेगवेगळ्या होत्या. पुढे द्रौपदीने कर्णाला सूतपुत्र म्हणून आपल्या स्वयंवरात भाग घेऊ दिला नव्हता. त्यामुळे स्त्रियांच्या शब्दांपेक्षा सामाजिक बंधनांचा मुद्दा हा जास्त महत्वाचा असावा असं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडा

मला वाटते सत्यवतीने महाराज

हेमंत लाटकर
Sat, 08/29/2015 - 14:14 नवीन
मला वाटते सत्यवतीने महाराज शान्तनुला सांगितले नसावे. महाराज शान्तनुला चित्रानंद व विचित्रवीर्य ही दोन मुले झाली आणि मुले लहान असतानाच महाराज शांन्तनुचे निधन झाले. भीष्माने या मुलांचे पालनपोषण केले. चित्रानंदाला राजगादीवर बसवले. पण गंधर्वा बरोबर झालेल्या युद्धात तो मारला गेला. त्यानंतर भीष्माने विचित्रवीर्याला राजगादीवर बसवले व त्याचा विवाह अबिका, अंबालिका बरोबर लावून दिला. परंतु विचित्रवीर्याचा क्षयाने मृत्यु झाला. विचित्रवीर्याला मुले न झाल्यामुळे त्याकाळातील नियोग पद्धतीप्रमाणे माता सत्यवतीने आधी भीष्माला विचारले त्याने नकार दिल्यामुळे नंतर व्यासाला विचारले . व्यासापासून अंबिकेला धृतराष्ट्र, अंबालिकेला पन्डु न अंबालिका दासीला विदुर असे तीन पुत्र झाले.
  • Log in or register to post comments

चित्रानंद नव्हे चित्रांगद

कानडा
Sat, 08/29/2015 - 14:53 नवीन
>> महाराज शान्तनुला चित्रानंद व विचित्रवीर्य ही दोन मुले झाली >> चित्रानंद नव्हे चित्रांगद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

चित्रानंद नव्हे चित्रांगद???

हेमंत लाटकर
Sat, 08/29/2015 - 15:47 नवीन
चित्रानंद नव्हे चित्रांगद??? बरोबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडा

चला चर्चेद्वारे महाभारताची

द-बाहुबली
Sat, 08/29/2015 - 14:42 नवीन
चला चर्चेद्वारे महाभारताची खिल्ली वाढवू......
  • Log in or register to post comments

महाभारत

चित्रगुप्त
Mon, 08/31/2015 - 19:34 नवीन
वरील अगदी पहिल्या प्रतिसादात महाभारतावरील माझ्या लिखाणाचा उल्लेख आलाय, म्हणून माझ्या त्या सर्व लिखाणाचे दुवे एका नवीन धाग्यात दिले आहेतः अजब महाभारत http://www.misalpav.com/node/32588
  • Log in or register to post comments

अश्विनीकुमार नव्हे तर अष्टवसू

शिवोऽहम्
Mon, 08/31/2015 - 23:46 नवीन
आप, ध्रुव, सोम, धर्म, अनल, अनील, प्रत्युष आणि प्रभास. देवव्रत भीष्म हा प्रभास वसूचा अंश म्हणावा..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा