✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भिंगार्‍या

ज
जव्हेरगंज यांनी
गुरुवार, 08/27/2015 - 22:57  ·  लेख
लेख
अंधारायला आलं होतं. लंगडा भिंगार्‍या वैरण घेउन आला. आण्णा नांगरटीला गेला होता . मंजु भाकर्‍या थापत होती . लंगडा भिंगार्‍यानं वैरण कापून गुरांना टाकली . पोरं पडवीत शाळेतला गृहपाठ करत होती . वैरण टाकून भिंगार्‍या दिवसभराचा थकवा काढायला अड्यावर गेला . दोन गलास रिकामे करुन पुन्हा झोकांड्या खातच घरी आला. मंजुनं त्याला भाकर कालवण दिलं. त्यानं ते पडवीत बसून खाल्लं. भिंगार्‍या एका पायान लंगडा असला तरी रेड्यासारखं काम करायचा. चार गुरांचा चारा एका खेपेत आणायचा. माजघरातील सतरंजी उचलून तो व्हरांड्यात येऊन पसरला. त्याची नेहमीची गौळत म्हणत तसाच पडून राहिला. तो गौळणी कुठे शिकला देवजाणे. एकदा किक बसल्यावर त्याच्या गौळणी रात्र रात्र चालायच्या. " लय माज आलाय का भिंगार " गोठ्यात बैलं बांधताना मालकाचा आवाज आला. मालक कधी आलं त्याला कळलंच नाही . " न्हाय आण्णा, जरा पडलू हुतु" म्हणत तो आणखी सावरून झोपला. मालकापुढं त्याची चांगलीच टरकायची. मालक त्याला गुरासारख कामाला लावायचा. तो निमुटपणे करायचा. शेवटी भाकर तुकडूयाचा सवाल होता. गारगारं वार्‍यात त्याचा डोळा लागला. राती कधीतरी त्याला जाग आली. आतल्या खोलीतनं खाटेची खडखड कानावर आली. मंजु रत होतं होती. मालक पण लयबद्ध होता. भिंगार्‍याला हे नेहमीचं होतं. एकदा तर मंजुच पाय त्यानं मालकाच्या गळ्यात बघितले होते. तेव्हा डोक्यात कितीतरी वेळ भुंगा भुणभुणत होता. आज जरा कमीच. मागल्या पावसाळ्याची रात्र त्याला कधीचं विसरायची नव्हती . बैलाचं शिंग बरगडीत घुसलं, म्हणून मालक हप्ताभर दवाखान्यात होता. पाऊसाच्या पिरपिरीमुळं तो घरातचं झोपला होता. त्या रात्री मंजु तरटावली होती. तिचं सुचनचं बंद झालं होतं. भिंगार्‍यासंग ती रत झाली होती. भिंगार्‍याचं आभाळचं फाटलं होतं. तो धो धो कोसळत होता. त्याच्या डोक्यातले अनंत भुंगे आसमंतभर उडत होते. काळोख्या रातीत त्याला शरीराचा नवा अर्थ गवसला होता. मंजुन त्याला परत कधीच जवळ केलं नाही. तशी वेळचं आली नाही. तो हि कधी संधीच्या शोधात नव्हताच. किती निरक्त राती त्यानं अशाच भळभळत घालवल्या होत्या. पण अश्या रातींचे तिचे हुकार त्याच्या डोक्यातल्या भुंग्याना जागवायचे. आणि त्यांना पुन्हा आसमंतभर उडवायची स्वप्ने रंगवत तो तसाच झोपी जायचा.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
4231 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

कथा आवडली! त्या रात्री पाऊस

उगा काहितरीच
Fri, 08/28/2015 - 00:59 नवीन
कथा आवडली! त्या रात्री पाऊस होता या चित्रपटातला संभाजी आठवला एकदम !
  • Log in or register to post comments

+१

अविनाश पांढरकर
Fri, 08/28/2015 - 02:18 नवीन
मस्त कथा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

छान आहे. अगदी दमदार लेखन आहे.

मांत्रिक
Fri, 08/28/2015 - 07:25 नवीन
छान आहे. अगदी दमदार लेखन आहे. कुठेही बिभत्सपणा येऊ न देता लिहिलंय.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद महत्वाचा वाटला.

जव्हेरगंज
Fri, 08/28/2015 - 21:13 नवीन
प्रतिसाद महत्वाचा वाटला. खुप धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

खूप छान लिहिलेय. शुद्धलेखन

एस
Fri, 08/28/2015 - 14:20 नवीन
खूप छान लिहिलेय. शुद्धलेखन अजून सुधारण्यास वाव आहे असे वाटले. 'भिंगर्‍या' मधील 'र्‍या' हे जोडाक्षर Ryaa असे टंकायचे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद स्वॅप्स.

जव्हेरगंज
Fri, 08/28/2015 - 21:11 नवीन
धन्यवाद स्वॅप्स. मोबल्यावरुन टंकल्यान चुक लक्षात आली नाही. google input hindi आत्ताच घेतले. ऱ्या लिहिता येतय . पण लेखात सुधारणा कशी करायची माहीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

कथेतील पात्रांची आगतिकता

मनीषा
Fri, 08/28/2015 - 15:37 नवीन
कथेतील पात्रांची आगतिकता खुपणारी पण तितकीच वास्तविक वाटते.
  • Log in or register to post comments

चांगल लिहीलय.

जेपी
Fri, 08/28/2015 - 15:40 नवीन
चांगल लिहीलय.
  • Log in or register to post comments

पुढच्या रातीच्या ???

पगला गजोधर
Fri, 08/28/2015 - 16:04 नवीन
क्रमशः लिहायचे राहिले कांय ?
  • Log in or register to post comments

आनंद यादवांचं "गोतावळा" आठवलं

अस्वस्थामा
Fri, 08/28/2015 - 16:19 नवीन
आनंद यादवांचं "गोतावळा" आठवलं.. फार पूर्वी वाचलं होतं. आता औट ऑफ प्रिंट आहे बहुतेक. चरका काही बसायचा रहात नाही.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

जव्हेरगंज
Fri, 08/28/2015 - 18:18 नवीन
धन्यवाद. थोडी धाकधुक वाटत होती कशी घ्याल म्हणून. क्रमश टाकायचा विचार आहे, बघू कसं जमतयं ते.
  • Log in or register to post comments

छान लिहिले आहे. जरूर लिहा

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 08/28/2015 - 22:25 नवीन
छान लिहिले आहे. जरूर लिहा पुढचा भाग.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा