एक सतत छळणारा प्रश्न आज तुम्हाला विचारू इच्छितो…. आपल्या ह्या देशात सगळ्या प्रकारचे कर भरून माणूस श्रीमंत होणं राहिलाच पण सुखी तरी राहू शकतो का?
उत्पन्नाचा कर ,विक्रीकर,सेवाकर,मूल्यवर्धित कर आणखी इतर हजारो प्रकारचे कर भरून भारतीय माणसाच्या खिशात उरतं तरी काय ? बरं, इतकं करून, कर भरून आणि त्याच्या ओझ्याखाली मरून त्याचे सरकारकडून काही लाभ मिळावेत असं म्हणावं तर तेही नाही….
निकृष्ट आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थ… रस्त्यावरचे हजारो खड्डे , लोकलची गर्दी , एक न दोन हजार कारणं !! ह्यातच पुढची पिढी आपला एक नवीन अडथळ्यांचा प्रवास सुरु करते आहे …. सशक्त आणि सुजाण नागरिक घडणार कसे आणि कुठून ?
ज्यांना शक्य आहे ते सरळ परदेशाचा रस्ता धरतात …. भले त्यांच्या नावाने आणि ब्रेन ड्रेन म्हणून कोणी कितीही कोकलो पण ते एका अर्थाने शहाणेच म्हणायचे !! ज्यांना काहीच जमत नाही ते राहतात असेच कुढत वर्षानुवर्षे…आयुष्यभर नोकरी करून त्या पैशात मुंबई पुण्यात जर एक साधे घर येत नसेल तर माणसाने करायचे तरी काय …. आणि कसली अपेक्षा मनात धरून उमेदीने काम करत राहायचे?
ह्या सगळ्याचा सर्वोच्च त्रास मध्यमवर्गीय पांढरपेशांना जे सहज पकडले जाऊ शकतात …. गुंड, लुटारू, राजकारणी, बुवा-बाबा आणि त्या कात्रीत न सापडणारे व्यापारी आणि इतर लोक अलाहिदाच राहणार नेहमीच ….
जगावं तरी कोणत्या उत्साहाने ह्या ठिकाणी माणसाने ? की मेंढरांच्या कळपासारखं नाशिबात असेपर्यंत जगात राहावं आपल्याच नशिबाला दोष देत ? मानवी आयुष्याला काहीच किंमत नाही का ह्या देशात?
पुनर्जन्माचे माहित नाही पण तो असलाच तर पुन्हा हेच रहाट गाडगं नको रे देवा !!
वाचने
21013
प्रतिक्रिया
96
मिसळपाव
प्रतिक्रिया
हेच ते......
In reply to प्रामाणिक कष्टाची किंमत by सुबोध खरे
ह्याचं भिकारचोट वृत्तीचा
In reply to प्रामाणिक कष्टाची किंमत by सुबोध खरे
असे प्रकार अनेक ठिकाणी बघायला
In reply to प्रामाणिक कष्टाची किंमत by सुबोध खरे
मी एकट्यानेच विचारलंय तसं.
In reply to असे प्रकार अनेक ठिकाणी बघायला by गॅरी ट्रुमन
डॉ साहेब,
In reply to प्रामाणिक कष्टाची किंमत by सुबोध खरे
प ग साहेब
In reply to डॉ साहेब, by पगला गजोधर
डॉ आपली मते योग्यच आहेत
In reply to प ग साहेब by सुबोध खरे
ज्या देशात प्रत्येक धरमासाठी
प्रश्णचिन्ह राहिलयं
In reply to ज्या देशात प्रत्येक धरमासाठी by NiluMP
अवांतर
In reply to प्रश्णचिन्ह राहिलयं by कॅप्टन जॅक स्पॅरो
दोन्ही हातात दांडपट्टा घेऊन
कितीही नाही ठरवलं तरी हा एक
+१
भ्रष्टाचार, खून, चोर्या,
थोडं पटतंय थोडं नाही पटत
In reply to भ्रष्टाचार, खून, चोर्या, by असंका
काय समस्या आहेत! दुकाने! अहो
In reply to थोडं पटतंय थोडं नाही पटत by चैतन्य ईन्या
हम्म
In reply to काय समस्या आहेत! दुकाने! अहो by असंका
तुम्ही मला सांगत असाल कि मी
In reply to हम्म by चैतन्य ईन्या
+१००
In reply to भ्रष्टाचार, खून, चोर्या, by असंका
जनताच राजा! हे आवडलं. पटलं.
In reply to +१०० by अर्धवटराव
आपल्या ह्या देशात सगळ्या
मला वाटत प्रत्येक गोष्टीची
चांगले आहे पण मी का सोडायची
In reply to मला वाटत प्रत्येक गोष्टीची by माझीही शॅम्पेन
असो
हेच ते.....
In reply to असो by प्रसाद गोडबोले
एका मित्राने LGP सबसीडी