Skip to main content

"कर" आहे त्यालाच "डर" आहे…

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी सोमवार, 24/08/2015 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
एक सतत छळणारा प्रश्न आज तुम्हाला विचारू इच्छितो…. आपल्या ह्या देशात सगळ्या प्रकारचे कर भरून माणूस श्रीमंत होणं राहिलाच पण सुखी तरी राहू शकतो का? उत्पन्नाचा कर ,विक्रीकर,सेवाकर,मूल्यवर्धित कर आणखी इतर हजारो प्रकारचे कर भरून भारतीय माणसाच्या खिशात उरतं तरी काय ? बरं, इतकं करून, कर भरून आणि त्याच्या ओझ्याखाली मरून त्याचे सरकारकडून काही लाभ मिळावेत असं म्हणावं तर तेही नाही…. निकृष्ट आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थ… रस्त्यावरचे हजारो खड्डे , लोकलची गर्दी , एक न दोन हजार कारणं !! ह्यातच पुढची पिढी आपला एक नवीन अडथळ्यांचा प्रवास सुरु करते आहे …. सशक्त आणि सुजाण नागरिक घडणार कसे आणि कुठून ? ज्यांना शक्य आहे ते सरळ परदेशाचा रस्ता धरतात …. भले त्यांच्या नावाने आणि ब्रेन ड्रेन म्हणून कोणी कितीही कोकलो पण ते एका अर्थाने शहाणेच म्हणायचे !! ज्यांना काहीच जमत नाही ते राहतात असेच कुढत वर्षानुवर्षे…आयुष्यभर नोकरी करून त्या पैशात मुंबई पुण्यात जर एक साधे घर येत नसेल तर माणसाने करायचे तरी काय …. आणि कसली अपेक्षा मनात धरून उमेदीने काम करत राहायचे? ह्या सगळ्याचा सर्वोच्च त्रास मध्यमवर्गीय पांढरपेशांना जे सहज पकडले जाऊ शकतात …. गुंड, लुटारू, राजकारणी, बुवा-बाबा आणि त्या कात्रीत न सापडणारे व्यापारी आणि इतर लोक अलाहिदाच राहणार नेहमीच …. जगावं तरी कोणत्या उत्साहाने ह्या ठिकाणी माणसाने ? की मेंढरांच्या कळपासारखं नाशिबात असेपर्यंत जगात राहावं आपल्याच नशिबाला दोष देत ? मानवी आयुष्याला काहीच किंमत नाही का ह्या देशात? पुनर्जन्माचे माहित नाही पण तो असलाच तर पुन्हा हेच रहाट गाडगं नको रे देवा !!

वाचने 21013
प्रतिक्रिया 96

प्रतिक्रिया

In reply to by सुबोध खरे

ह्याचं भिकारचोट वृत्तीचा कंटाळा आलाय मला. साला कष्ट करायचे मरमर करायची आपण. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष करांच्या नावाखाली दबुन जायचं. महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासुन फक्त पगाराची वाट पहायची एवढचं कनिष्ठ मध्यमवर्गियांचं आयुष्य झालेलं आहे. ह्या महिन्यात आजारी आई-बापाला दवाखान्यात न्यायचं का दुधाचं बिल द्यायचं अशीहि वेळ येते. झोपडपट्टीवाल्यांना ना टॅक्स ना वीजबील ना पाणीपट्टी ना घरपट्टी. वरनं फुकटं घरं. व्वा!!! बरं ह्यांना गरिब म्हणावं तर झोपड्या झोपड्यांवर डिशटीव्हीच्या डिश दिसतात. हातामधे स्मार्टफोन दिसतात. हातात गळ्यात गावगुंडगोफ दिसतात. दारु नशापाण्यावर उडवायला पैसा असतो. काही श्रीमंत लोकांकडे एवढा पैसा आहे की रोज दोन हातांनी उधळला तरी कमी पडणार नाही. कर मात्र किती भरतात? अगदी ते रोजगार निर्मिती करत असले तरी हे चुकीचचं नाही का?

In reply to by सुबोध खरे

असे प्रकार अनेक ठिकाणी बघायला मिळतात. तरीही काही लोक विचारतात की "कोण हातपाय न हलवता तुमच्या कष्टांवर मजा करतोय". असो.

In reply to by गॅरी ट्रुमन

मी एकट्यानेच विचारलंय तसं. अजून कुणी विचारल्याचं दिसत नैये. नै तुम्ही बहुवच्न वापरलंय ते आदरार्थी असेल तरी लोक हा शब्द एकवचनी असू शकत नाही. जरा दाखवता का अजून कुणी विचारलंय? नै तर सरळ कबूल करून मो़कळे व्हा की मला सरळ उत्तर द्यायचं नव्हतं म्हणून भलतीकडेच माझी वाक्य डकवून लोकांच्या नावावर खपवून मजा बघायचा प्लान होता. आणि तुम्ही जसं भासवताय तसं त्या प्रश्नाचं उत्तर वरच्या प्रतिसादात मिळत नैये. तुम्हाला अजून स्पष्ट करायला आवडेल का? अर्थात आपण काय बोलतो याचे भान न ठेवणार्‍या़ंकडून काय अपेक्षा ठेवायच्या म्हणा. बोलायची एक गोष्ट आणि विसंगती दाखवली कुणी की लाख वेळा सहमत व्हायचं! हाकानाका!

In reply to by सुबोध खरे

खरं आहे आपण म्हणता ते, तुमच्या-आमच्या सारख्या कायदेपालन करणाऱ्या लोकांना, अशी अनधिकृत बांधकामे व त्याला मिळणारा राजाश्रय, पाहून, व्यथित व्हायला होते. तुमच्या या मुद्देसूद प्रतिक्रियेच्या ताजमहालाला, माझ्या सारख्याकडून विटा लावणे म्हणा हव तर, पण तुमच्या प्रतिक्रियेत अनधिकृत बांधकामाचे जे योग्य उदाहर आलेले आहे, तो फक्त ऐक प्रकार आहे डी-ग्लाम अनधिकृत बांधकामाचा. त्याला पुरवणी म्हणून मी खाली ग्लामराइस्ज्ड अनधिकृत बांधकामाच्या उदाहरणाचे फोटो दाकावीत आहे. . . . . cc1 . . . . cc2

In reply to by पगला गजोधर

प ग साहेब आपण दाखविलेल्या दोन गोष्टीत गुणात्मक दृष्ट्या फरक आहे तो असा कि अशी पंच तारांकित अनधिकृत बांधकामे सरकारी जमिनीवर नसून स्वतःच्या जमिनीवर असतात पण सरकारी नियमाच्या बाहेर असतात. झोपडपट्टीतील लोक सरकारी जमिनीवर घर बांधतात आणि त्याच्या जागी त्यांना सरकारकडून फुकट अधिक जागा हवी असते. मूळ मुद्दा गरिबांसाठी घरे देण्याचा नाही तर कोणतीही गोष्ट "आयुष्यभर" फुकट मिळवण्याबद्दल आहे.घराच्या बांधणीचा खर्च तरी त्यांच्याकडून वसूल केला गेला पाहिजे. मुंबईत कोणीही गरीब नाही.( मुंबईत बिगारी रुपये ५०० रोज घेतो). झोपु योजनेत फुकट मिळालेली घरे विकून परत झोपडीत राहायला जाणारे शेकड्यांनी आहेत. हे म्हणजे मूळ हेतूलाच हरताळ फासला गेल्यासारखे आहे. मिळेल ती सोय सरकारकडून लाटत राहायचे आणि वर सरकारने आमच्यासाठी काहीच केले नाही म्हणून माज दाखवायचा गरिबीमुळे माणूस लाचार तरी होतो नाहीतर माजोरी तरी होतो हे श्री व्यंकटेश माडगुळकरानी १९४६ साली लिहून ठेवले आहे त्याची आठवण होते.

In reply to by सुबोध खरे

त्यामुळे माजोरीत गुणात्मक दृष्ट्या फरक आहेच, साजूक माजोरीपण माजोरीच झुंडशाही दाखवून कायदा मोडणारे , त्यासाठी राजकीय दबाव टाकणारे , कानाडोळा करणारे अधिकारी, सर्वच हातात हात घालून या गोष्टी मागे नांदताहेत

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

हि एकच ओळ टाईप करण्यासाठी मला 5 मिनिटे लागली त्यातही धर्म हा शब्द नीट टाईप करता आला नाही आणि म्हणुनच मी कोणत्याही लेखावर प्रतिक्रिया देत नाही. सविस्तर प्रतिक्रिया हया weekend ला देतो.

कितीही नाही ठरवलं तरी हा एक धागा वाचला गेलाच! वाईट वाटलं. अगदी वैतागाचा कडेलोट होतो. पुण्यात तर वाहतुकीची पंचाईत बघितलीच आहे. मुंबैतील ऐकून आहे. असह्य प्रकार आहेत हे खरे. करणारा करत जातो आणि फायदा घेणारे सोकावतात. एनारायज आणि भारतातील बांगलादेशी वगैरेंची तुलना पटली नाही. कायदेशीर मार्गानं स्थलांतरीत होणं आणि बेकायदेशीर मार्ग वापरणं हा साधा फरक आहे. त्यांचे त्यांच्या देशात काय नि किती हाल होत असतील याची कल्पनाही नको! भार मात्र करदात्यांवर पडतोच! आणि नुसता पैशांचा प्रश्न आहे का? आयुष्य जगायलाच मिळत नाहीये हा वैतागही आहेच! आता मी या धाग्यावर काही वाचणारच नाही.

काही धागे वाचून नैराश्य येतं.कधी कोण कसं बदलणार या देशाला.आरक्षण,भ्रष्टाचार तर कधीच संपणार नाही बहुतेक:( न वाचता डोळेझाक केली की बरं पडतं.

भ्रष्टाचार, खून, चोर्‍या, भांडणं, मारामार्‍या, वादावादी, गप्पा गोष्टी, उखाळ्यापाखाळ्या काढणं, शिवीगाळ करणं, ...., जेवण करणं...., प्रेम करणं, अडचणीतल्याला मदत करणं.... यातलं काय पूर्वी नव्हतं? यातलं काय उद्या नसेल? वैतागाने, त्रागा करून सुटलेला एक प्रश्न दाखवा.... कर भरता म्हणजे काही फार भारी गोष्ट करत असल्यासारखं कसं बोलतात लोक इथले? तुम्ही ज्या सुरक्षित वातावरणात- 'समाजा'च्या कोशात- राहून उत्पन्न मिळवू शकता त्याची ती किंमत आहे.तुम्ही उत्पन्न मिळवता ते तुमचं एकट्याचं नाही. समाजाच्या जिगसॉ पझलमध्ये एका जागी तुम्ही फिट्ट बसू शकलात म्हणून ती किंमत तुम्ही वसूल करत आहात. त्या जागेवरून निघालात की तुमची किंमत किती? ... ज्या लोकांना तुमच्यासारखी मोक्याची जागा मिळू शकलेली नाही, त्यांच्यासाठी काही करणं दूर, सहानुभूती पण वाटेना का? तुम्ही तुमच्या समाजापेक्षा जास्त चांगले असू शकत नाही. पक्की खूणगाठ बांधा. तुम्हाला समाजातल्या ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या एक तर बदलण्यासाठी प्रयत्न करा, किंवा मग दोष स्वतःकडेच असल्याची जाणीव ठेवा. काही लोक वेडीवाकडी गाडी चालवतात...याचा दोष तुमच्याकडे एक समाज म्हणून येतो. तुम्ही समाजापेक्षा चांगले असू शकत नाही याचं उदाहरण म्हणजे रस्त्यावर वेडीवाकडी गाडी चालवणार्‍याकडून होणार्‍या अपघातात तुमचा जीव जाऊ शकतो, याची जाणीव असूनही "अनेक लोक पुण्यात वेडीवाकडी गाडी चालवतात" यावर चर्चा करणे आणि इतर काहीच न करणे. ते चूक करतात आणि तुम्ही त्यांच्या चुकीकडे दुर्लक्ष करता. एक समाज म्हणून तुम्ही या समस्येचा भाग आहात आता. (यात मीही आलोच अर्थात...पण कुरकुर मी करत नैये. मी त्याबाबतीत नशिबावर सोडलंय स्वतःला.) समाज रात्रीतनं बदलत नाही. कुणीच काहीच न करता तर अजिबातच बदलत नाही. बदल होत असेल तर कुणीतरी त्यासाठी काहीतरी केलेलं आहे, याची जाणीव ठेवायला हवी- हे मी राजकारण्यांना घातल्या जाणार्‍या शिव्यांच्या संदर्भात बोलत आहे. ते तुमच्या शिव्यांचे धनी होत आहेत फक्त. त्यांचे कष्ट एवढे मातीमोल करू नका.

In reply to by असंका

प्रश्न असा आहे कि करायचे कोणी आणि कुठून सुरवात करायची. सगळ्या चर्चेत एकाच मुद्द्याला धरून कीस पडला जातो आणि मग त्याला प्रत्त्युतर म्हणून तुम्ही कसे असे होतंय. म्हणजे गरीब झोपडट्टी विषय आला कि सुशिक्षित कसे करतात असे होतंय. खरी गोची आहे कि आहेत ते कायदे लोकांनी पाळावेत किंवा त्याची अमलबजावणी कशी करायची. इथेच खरी गोम आहे. कारण कायदे पाळायला लागले तर राजकारणी आणि बाबू लोकांची वरकमाई बंद होईल. बर ह्यांच्या जीवावर चालणारी अनेक दुकाने आहेत. म्हणजे बघा आरटीओ. तुम्हाला पटो अथवा न पटो एजंट गाठला कि काम होते. मग एजंट वाले लोक मारणार त्यांचा ह्याला विरोध. सुशिक्षित काय कमी आहेत का.एकेकाळी धनकवडी म्हणजे सुशीक्तींची झोपडपट्टी ह्या नावाने प्रसिद्ध होती. कारण तिथे सगळे नियम धाब्यावर बसवूनच बांधकामे झाली आहेत. त्यामुळे तुम्ही म्हणता आहात त्यात तथ्य आहे पण लगाम कोण घालणार? सुरवात कुठून करायची. आता सगळेच सोकावले आहेत. जॉ उठतो त्याला आरक्षण पाहिजेल अथवा फुकटात काहीतरी मिळाले पाहिजेल. कारण बाकीच्यांना मिळते आहे. हे सगळे विचित्र आहे आणि जॉ त्यातल्यात्यात नियम पाळतो त्यालाच तुम्ही बोल लावायला लागलात कि तुम्हाला लोक असेच बोलणार.

In reply to by चैतन्य ईन्या

काय समस्या आहेत! दुकाने! अहो दुकाने चालतात कारण लोकांना सगळं ताबडतोब हवं असतं. हे सांगायला दुसरं कुणी कशाला हवं? आपण लाच दिली नाही तर आपलं न्याय्य काम होत नाही असं काही नसतं. फक्त वेळ लागतो. थोडे कष्ट घ्यावे लागतात. थोडा संबंधित व्यवस्थेचा अभ्यास करावा लागतो. आणि ऑफ कोर्स चकरा माराव्या लागतात न कंटाळता. लाच न देणारा समाज तयार केला की लाच न घेणारे सरकारी अधिकारी आणि राजकारणी आपल्याला मिळालेच असं समजा! बाकी नका इतका त्रास करून घेत जाऊ या गोष्टींचा. पैसे ज्या मार्गाने येतात त्याच मार्गाने ते वाहत जातात. थोडी श्रद्धा आहे माझी इथे, की बिनकष्टाचा पैसा तुम्हाला सुख शांती देउ शकत नाही. तुम्ही पण असला एखादा फंडा शोधून काढा ज्याने तुमची या बाबतीतली घालमेल जरा कमी होइल. कसं?
हे सगळे विचित्र आहे आणि जॉ त्यातल्यात्यात नियम पाळतो त्यालाच तुम्ही बोल लावायला लागलात कि तुम्हाला लोक असेच बोलणार
हे खरं तर मला कळलं नाही वाक्य...तुम्ही मला म्हणत आहात का, की मी नियम पाळणार्‍यांना काहीतरी बोललो म्हणून मग मला लोक "असंच" (- म्हणजे कसं ) बोलणार? मी कुणालाच काहीच बोललेलो नाइये...आणि खरंतर मलाही कुणी काही बोललेलं आहे असं मला वाटत नैये... तर मग तुम्ही नक्की कशाबद्दल बोलत आहात?

In reply to by असंका

इतकी सरळ आहे का भौ? मला मामलेदार कचेरी मध्ये वडिलांचे नाव काढून आईचे नाव लावायचे होते. ७ वेळा चक्कर मारली. भाड्याने वर १००० रुपये होतील सांगितले. ते पण दिले वैतागून. मग पुन्हा ३ वेळा चक्कर मारली. टोटल १ वर्ष लागले आणि मी पुण्याबाहेर काम करत होतो. शेवटी वकील गाठला आणि त्याच्याकरावी त्याला दम दिला तेंव्हा काम झाले. माझ्यासारखे अनेक नाडलेले होते. त्यांचे पण काम झाले इतकेच पुण्य पदरात पडले. पोलीस भिक घालत नव्हते. इतके सरळ असते तर हि वेळ आली नसती. म्हणून म्हटले कि तुम्ही मला सांगत असाल कि मी नियम पळून पुन्हा शांतचित्त राहावे तर कसे काय जमायचे. कोणी जास्त वैतागून तुम्हाला वैयक्तिक पातळीवर येवून बोलले म्हणून वरील वाक्य होते. जावू द्या. आपला आपला नजरिया. कोणाकडे जास्त पेशन्स असतो कोणाकडे कमी असतो.

In reply to by चैतन्य ईन्या

तुम्ही मला सांगत असाल कि मी नियम पळून पुन्हा शांतचित्त राहावे तर कसे काय जमायचे. कोणी जास्त वैतागून तुम्हाला वैयक्तिक पातळीवर येवून बोलले म्हणून वरील वाक्य होते. जावू द्या. आपला आपला नजरिया. कोणाकडे जास्त पेशन्स असतो कोणाकडे कमी असतो.
हं. बरोबर आहे. नाही जमू शकत. तुम्ही ती सगळी विशेषणं इथे सगळ्यांच्या समोर माझ्यावर वापरा जी तुम्ही शांतपणा सोडून त्या सरकारी अधिकार्‍याच्या तोंडावर त्याच्याबद्दल वापरलीत.

In reply to by असंका

हा राजधर्म न पाळण्याचा परिणाम आहे. राजा कालस्य कारणम्. आणि लोकशाहीत जनताच राजा आहे. राज्याच्या समस्येच्या गंभीरतेच्या प्रमाणात राजाची जबाबदारी वाढते. आपल्या लोकशाहीत जनतेला मालकीहक्कांबाबत तोडीफार (बरिचशी चुकीची) कल्पना आली आहे, पण राजधर्माच्या बाबतीत बोंब आहे. राजकारण्यांचा भ्रष्टाचार, गुंडागर्दी, मनगटशाही, बेदरकारपणा वगैरे समस्या म्हणजे शक्तीचं एक प्रकारचं प्रकटन आहे. त्यात न्युसेन्स व्हॅल्यु भरपूर आहे कारण त्यामागे सामर्थ्य आहे. त्याला उतारा म्हणुन त्याहुन मोठं सामर्थ्य प्रकट झालं तरच हा प्रकार थांबेल. अन्यथा हात चोळत बसण्यापलिकडे काहि करता येत नाहि.

आपल्या ह्या देशात सगळ्या प्रकारचे कर भरून माणूस श्रीमंत होणं राहिलाच पण सुखी तरी राहू शकतो का?>>> नाही ज्यांना काहीच जमत नाही ते राहतात असेच कुढत वर्षानुवर्षे>>> जमवायचं म्हनलं तर सगळं जमू शकतं . पण भारतीयांची शून्य इच्छाशक्ती , धाडसाचा अभाव ,केवळ आपण आणि आपलं कुटुंब ह्यांच्यासाठी पैसे कमावणं त्या बाहेर अजिबात डोकवून सुधा न बघणं ह्या गोष्टी कुढत जगण्यास भाग पाडतात. आरक्षणासाठी , पुरंदरेंना विरोध करण्यासाठी , संथारा व्रताच्या समर्थनासाठी समाज उत्स्फुर्तपणे आंदोलनं करतो तसा भ्रष्टाचारी नेत्याला धडा शिकवण्यासाठी , गुंडगिरी बंद होण्यासाठी पुढे येतो का ? नाही कर भरणं म्हणजे की भारी करत नाही हे मान्य आहे हो . पण त्याचं आउटपूट लोकांना मिळत नाही ना . हे कराचे पैसे नेते भ्रष्टाचार करून लुबाडतात . नको त्या गोष्टीत हे पैसे खर्च होतात .

मला वाटत प्रत्येक गोष्टीची कटकट करत बसण्यापेक्षा आपण स्वताहा ही परिस्थिती बदल्यासाठी काय करू शकतो ह्याचा विचार करा उदा - एका मित्राने LGP सबसीडी सोडल्याची वॉट'सआप वर एका ग्रूप वर संगितल , तर एका नेही त्याच कौतुक केल नाही हेच मित्र अनेक फालतू धकल-पत्रावर सतत कळफलक बडवत असतात.. एक तर स्वताहा: बदला - आणि आजूबाजूला बदलायासाठी प्रयत्न करा नाही तर देश सोडून द्या (शक्य असेल तर) सोप्पाय :)

In reply to by माझीही शॅम्पेन

चांगले आहे पण मी का सोडायची? जेंव्हा आपले नेते आणि त्यांची कुटुंबे फुकटात सरकारी खर्चाने राहणार. ह्यांना सगळे द्यायचे आणि आपण मात्र सोडायचे हे काही पटत नाही. तसे असेल तर सगळ्या यच्चयावत पुढारी लोकांची हि नको ती सबसीडी बंद करा. इतकेच आहे तर मोदी ह्यांनी आधी आपल्या सरकारातील मंत्र्यांना सांगावे आणि नुसते सांगू नये तर ते अमलात आणावे. शेवटी लोक लीडरला फॉलो करतात. थोडाकाळ लोक सोडतील पण बाकीचे फुकटात रहात असतील तर ह्याचा काहीही फायदा नाही.

कोणतीही सबसीडी न घेता ... कोणत्याही प्रकारचे रिझर्वेशन न घेता ... जातिच्या नावावर सरकारी स्कॉलरशिपा न घेता ... समान नागरी अधिकार नसला तरीही ... देशाकडुन कोणत्याही ट्रिपला फंडींग मिळत नसले तरीही ... सर्व समाजाकडुन बामण बामण म्हणुन हिणावले जात असतानाही... कोणत्याही प्रकारचा जातिभेद न मानताही जातियवादी म्हणवुन घावे लागले तरीही ... आडव्या आलेल्या आर्टीओला कारण नसताना १०० रुपये सारावे लागले तरीही ... टोलनाक्यावर निमुटपणे लूट भरुनही... रोडटॅक्सने बांधलेल्या सुधारित खड्ड्यातुन गाडी चालवुनही... पासपोर्ट्च्या वेरीफीकेशनला पोलिसांन्नी सौजन्य दाखवले नाही तरीही ... सरकारी कार्यालयाबाहेरील दलालांची अडवणुक सहन करुनही... अन कोणीच कोणतीच अकाउंटेबीलीटी घेत नसले तरीही ... . . . . . आज मी रीतसर ट्यॅक्स भरला ... . . . अन का ? का ? म्हणुन मनात त्रागा करणार्‍या मित्राला सांगितले : 'त्रागा करण्या पेक्षा अभ्यास कर लेका , पुढल्या वर्षी एच १ बी मिळवायचाय ना ? इथे २५% ट्यॅक्स भरण्यापेक्षा तिथे भर , ते किमान सोशल सिक्युरिटी तरी देतात ' एक सर्वसामान्य क्युतिया नागरिक ह्या पेक्षा वेगळे काय करु शकतो ? असो , चला आता रेन्ट रीसीप्टची प्रिन्ट काढुन सही करुन करुन बॅन्गलोर ला पाठवायची आहे :)

In reply to by प्रसाद गोडबोले

तुम्हाला कळलंय सामान्य नागरिकांना काय म्हणायचंय...

एका मित्राने LGP सबसीडी सोडल्याची वॉट'सआप वर एका ग्रूप वर संगितल , तर एका नेही त्याच कौतुक केल नाही >> आधी सबसिडी द्यायची आणि मग सोडायला लावायची . 'काय नाटक आहे ? ' असा प्रश्न विचारण्याची हिम्मत एकाने तरी दाखवली का . एक सर्वसामान्य क्युतिया नागरिक ह्या पेक्षा वेगळे काय करु शकतो ?>>> खि:क ITR १ भरल्यावर ते e verification साठी विचारतंय . काय प्रकार आहे हो तो ?