[शतशब्दकथा] शिवी- भाग २
लेखनविषय (Tags)
भाग १
आजचा दिवस मह्याचा होता. एका साखळीचोराला त्याने पाठलाग करून पकडले होते! कॉलनीमधले सगळेजण मह्याच्याभोवती गोळा होऊन त्या प्रसंगाचं मसालेदार वर्णन त्याच्याकडून ऐकत होते.
"मस्त काम केलस रे! पण तो बरा सापडला तुला!" गर्दीतला एक जण म्हणाला.
मह्या हसला,"अरे, घाबरून पळत सुटलं होत येड, स्वताच पडलं तोंडावर! वाटेतला दगड दिसलाच नाई आंधळ्याला!" गर्दीत हशा पिकला. मह्यानीपण खुशीत बाजुच्याला टाळी दिली!
गर्दीतला तो मात्र चपापला, गर्दीतून सावकाश थोडा बाजूला आला. त्याला कुठेतरी खोल काहीतरी बोचल्यासारखे वाटले. उगीचच त्याने डोळ्यांवरचा चष्मा जागीच असल्याची हाताने चाचपून खात्री केली आणि आपल्या काठीच्या मदतीने रस्त्याचा अंदाज घेत तो सावकाश तिथून चालू लागला. कुठेही न अडखळता…
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भाग २
त्याच्या आतमध्ये काहीतरी धुमसत होत. हातातली काठी फेकून देऊन जोरात पळत सुटावं असं वाटत होत. पण तो तसे करणार नव्हता, लहानपणी केलेल्या याच चुकीच्या आठवणरूपातला व्रण त्याच्या कपाळावर होता. ती जखम जरी पूर्वीच भरली असली तरी अधून मधून तिच्यावरची खपली निघत होतीच!
"फुटपाथ संपला! रस्ता ओलांडायला लागणार! कोणाची तरी मदत मागावी लागणार…
पण का? मी खरच एवढा अगतिक आहे? मला काही स्वाभिमान नाही?
नाही, तुला कसला आलाय स्वाभिमान? आणि असला तरी कोण विचारणार आहे? तुझ्या नशिबात....."
"काका, मी काही मदत करू?" तेवढ्यात एका लहानग्याचा गोड आवाज आला.
मनावरचे निराशेचे मळभ दूर होऊ लागले, त्यातून येणारा प्रकाशाचा एक किरण त्याला 'दिसला!'
प्रतिक्रिया
सुंदर.
+१
खूप धन्यवाद!
विषय खरच खुप छान होता.
बहोत अच्छे!
वा !
+१
हं!
खूप छान अनुभव, आपले अभिनंदन
आवडली.
+१
छान आहे कथा.
समेवर
हा हा!
छान !
मस्त शेवट
मस्त कथा. दोन्ही भाग आवडले. :
सुरेख!
उत्तम शेवट
+१
छान.आवडला शेवट...
+१
छान..!!
+१