✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दर 18 वर्षांनी येणारे विवाहित स्त्रियांचे कोकीळा व्रत

ह
हेमंत लाटकर यांनी
Mon, 08/24/2015 - 22:31  ·  लेख
लेख

सध्या महिलावर्गाची कोकीळा व्रत करण्याची गडबड चालू आहे. हे व्रत आषाढ शु 15 ते श्रावण शु 15 असे महिनाभर चालते. अधिक आषाढ महिना संपून निज आषाढातील पोर्णिमा येईल तेव्हा सुरू करून श्रावण पौर्णिमे पर्यंत करावे लागते. हे व्रत 18 वर्षानी एकदा येते. ज्या वर्षी अधिक आषाढ मास असतो तेव्हाच करायचे असल्यामुळे आयुष्यात जास्तीत जास्त 3 वेळा करण्याची सॆधी मिळते. यावेळेला हे व्रत 29 जूलै ते 29 आॅगस्ट या महिन्यात आहेे.

हे व्रत विवाहित स्त्रिया करू शकतात. हे व्रत केल्याने स्त्रियांनां दीर्घकाळ सौभाग्य, घनवृद्धि, व सॆतंतीसौख्य व इतर प्रपंचातील सुखे प्राप्त होते. व्रत महिनाभराच्या पुण्यकाळात कुणी महिनाभर, कुणी 3 दिवस, कुणी 1 दिवस करतात. हे व्रत ब्रह्मर्षी वसिष्ठ मुनींनी शत्रुघ्नाची पत्नी कीर्तिमाला हिला सांगितले.

कोकीळा व्रताची कहाणी: ब्रह्मदेवाला दहा पुत्र त्यातील दक्षप्रजापती,, त्याला 101 कन्या होत्या. जेष्ठ कन्या दाक्षायणीचा शंकराशी, 27 कन्या चंद्राला व इतर कन्यांचे विवाह इतर देवांशी करून दिले. दक्षाला पुत्र नव्हता म्हणून कपीलमुनीनूी त्यास पुत्रकामेष्टि यज्ञ करण्यास सुचविले. दक्षाने मग एका विशाल मैदानात यज्ञाची सिद्धता केली. दक्षाने सर्व देवांना, ऋषिनां आमंत्रणे पाठविली, पण शंकराला मात्र वगळले कारण दक्षाला शंकराचे वेदबाह्य वर्तन, स्मशानात राहणे, भुतांचा सहवास, नागांची भुषणे व अघोरी वागणे आवडत नसे.

यज्ञाच्या वेळी सर्व देवांनी दक्षाला शंकराच्या अनुपस्थितीविषयी विचारले तेव्हा त्याने शंकराला बोलावण्यास स्पष्ट नकार दिला. मग यज्ञाला आरंभ झाला, पण नारदमुनी (कळलावे) तिथून थेट कैलासावर आले व दक्षाच्या यज्ञाचे रसभरीत वर्णन सांगितले. ते ऐकून शंकर शांत बसले पण दाक्षायणीला मात्र आपल्या वडिलांनी सर्वांना बोलावले पण शंकराला बोलावले नाही याचा राग आला. (बायकांना आपल्या नवर्याला माहेरी बाेलावले नाही तर फार राग येतो.)

शंकराने गणपती, शिवगणांचे सैन्य, वाहन नंदी यांना दाक्षायणी सोबत माहेरी पाठवले. तेथे यज्ञ धुमधडाक्यात चालला होता, तेथे वडिल व आईने तिच्याकडे दुर्लक्ष केले, हे दाक्षायणिला जिव्हारी लागले. तिने रागाने कुणाला काही कळण्याआधी यज्ञकुंडात उडी घेतली. अग्नीने काही क्षणातच तिची आहुती घेतली. सर्वजण स्तंभीत झाले. काही वेळाने सर्व भानावर आले. सर्वत्र हाहा:कार माजला. नारद गुपचूप निघून कैलासावर गेले व त्यानी शंकराला सर्व सांगितले.

हे ऐकूण शंकर ताडकन उठले व रागारागाने आपल्या जटा एका शिळेवर आपटल्या. त्या क्षणी तिथे एक विराट पुरूष (वीरभद्र) प्रगटला. शंकराने त्याला आज्ञा केली सर्व सैन्यानिशी तेथे जाऊन यज्ञाचा विध्वंस करा तसेच सर्व निमंत्रितांचा संहार करून दक्षाला मृत्युदंड द्या

वीरभद्र त्वरेने मोठ्या सेनेसह यज्ञस्थळी पोहचला. त्याने हल्ला सुरू केला, सर्व देवांनी व ऋषि-मुनींनी वेदमंत्रांनी दर्भ शक्तीयुक्त करून प्रतिकार केला. वीरभद्राने व त्याच्या सैन्याने भयानक संहार केला, वीरभद्राने तलवारीने दक्षाचे मुडंके छाटून यज्ञात फेकले.

बह्मा, विष्णू व नारदाने वीरभद्राने केलेला संहार सांगून वीरभद्राला शांत करण्यास सांगितले. तेव्हा शंकर उठले व यज्ञभूमीवर आले व सर्वांना जिवंत केले. बह्माने आपला पुत्र दक्षाला जिवंत करण्याची पार्थना केली. शंकराने त्याचे मुंडके आणण्यास सांगितले पण ते यज्ञात जळून खाक झाले होते. मग कोणतेही शिर आणा असे शंकर म्हणाले. तेव्हा जवळ पडलेले बोकडाचे मुंडके दक्षाच्या मानेवर ठेवले व त्याला जिवंत केले.

नारदाने दाक्षायणिला (शंकराची पत्नी) जिवंत करण्याची विनंती केली. तेव्हा शंकराने सांगितले की तिचे दर्शन तुम्हाला घडवितो परंतु तिचे शरीर नसल्यामुळे ती पुर्नजीवित होणार नाही. असे म्हणून यज्ञकुंडातील राख हवेत फेकली तेव्हा दाक्षायणी प्रगटली. तिने हात जोडून शंकराची क्षमा मागितली. परंतु शंकर म्हणाले, प्रिये रागाच्या भरात तुझ्याकडून आत्महत्या व यज्ञाचा अपमान हे दोन अपराध घडले. त्याचे फळ अटळ असल्यामुळे पुढील दहा हजार वर्ष तुला काळ्या रंगाची व कुरूप पक्षिणी व्हावे लागेल.

दाक्षायणिने उ:शाप मागितला तेव्हा शंकर म्हणाले तुला पश्चाताप झाला आहे म्हणून तू पक्षिणी जरी झालीस तरी गोड आवाजाची कोकीळा होऊन सदैव नंदवनात विहार करतील. शंकर पुढे म्हणाले दहा हजार वर्ष झाल्यावर तुला हिमालयाची पत्नी मेनका हिच्या पोटी जन्म मिळेल आणि हरितालिका व्रताच्या प्रभावाने पुन्हा आपला विवाह होईल.

वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
33985 वाचन

💬 प्रतिसाद (124)

प्रतिक्रिया

यापूर्वी

श्रीरंग_जोशी
Mon, 08/24/2015 - 22:39 नवीन
यापूर्वी १९९६ साली कोकिळाव्रत झाल्याचे स्मरते. माझ्या आईनेही केले होते. आमच्या शहरातल्या एका आघाडीच्या गणपती मंडळाचा देखावाही तेव्हा यावर आधारीत होता.
  • Log in or register to post comments

नवीन माहिती

विकास
Tue, 08/25/2015 - 01:11 नवीन
नवीनच माहिती आहे ही. कडवा चौथपेक्षा ऐकायला चांगली वाटली! ;) ते ऐकून शंकर शांत बसले पण दाक्षायणीला मात्र आपल्या वडिलांनी सर्वांना बोलावले पण शंकराला बोलावले नाही याचा राग आला. (बायकांना आपल्या नवर्याला माहेरी बाेलावले नाही तर फार राग येतो.) ... शंकराने गणपती, शिवगणांचे सैन्य, वाहन नंदी यांना दाक्षायणी सोबत माहेरी पाठवले. या बाबतीत ऐकलेली/लहानपणी वाचलेली गोष्ट किंचीत वेगळी होती. उमेला वाटते की चुकून बोलावले नसेल. शंकर वास्तवाची शक्यता सांगतो पण उमाला तिचे वडील असे वागतील असे वाटत नाही. म्हणून जाण्याचा हट्ट करते. आणि तिकडे गेल्यावर आपल्या नवर्‍याचा झालेला अपमान लक्षात येतो आणि ती यज्ञात उडी मारते... अजून एक घोटाळा दिसतोय म्हणजे गणपतीस पाठवणे. गणपती हा उमे नंतरच्या पार्वतीचा मुलगा, त्यामुळे तो तेंव्हा तिथे कसा असेल? यावरून जसाच्या तसा नाही पण महादेवशास्त्री जोशी यांनी मानिनी नावाचा चित्रपट काढला होता. फक्त त्यात नवर्‍याचा अपमान झालेली (मला वाटते जयश्री गडकर) अधुनिक मानिनी परत माहेरी जात नाही. त्यावेळेस असलेले वरील पौराणिक कथेवरचे गदीमालिखित खाली दिलेले गाणे खूप छान आहे... मानभंग हाचि झाला मंडपी आहेर उमा म्हणे, यज्ञी माझे जळाले माहेर
  • Log in or register to post comments

दाक्षायणी ही सती म्हणुन ओळखली

स्पंदना
Tue, 08/25/2015 - 09:32 नवीन
दाक्षायणी ही सती म्हणुन ओळखली जायची, उमा ही पार्वती अस निदान माझं ज्ञान सांगत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

राईट स्पदंनाजी

हेमंत लाटकर
Tue, 08/25/2015 - 10:09 नवीन
राईट स्पदंनाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

+१

विकास
Tue, 08/25/2015 - 16:44 नवीन
सहमत. चुकीच्या दुरुस्तीबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

खूप छान लाटकर भाऊ! अतिशय

मांत्रिक
Tue, 08/25/2015 - 07:15 नवीन
खूप छान लाटकर भाऊ! अतिशय उत्तम माहिती दिलीत. पण जरा लवकर द्यायला हवी होतीत. तसेच व्रतविधी दिला असता तरी बरे झाले असते! संमं ला विनंती करून व्रतविधी पुन्हा अॅड करू शकता.
  • Log in or register to post comments

हे व्रत एका दिवसातही करता

हेमंत लाटकर
Tue, 08/25/2015 - 11:53 नवीन
हे व्रत एका दिवसातही करता येते. पुजेचे साहित्य: 2 पाट व त्यावर वस्त्रे, अभिषेकासाठी ताम्हण किंवा पसरट भांडे, दोन तांबे, पळीपंचपात्र, घंटा, शंख, समई तेलवातीसह, निराजंण तूपवात भरून, उदबत्त्या, काड्यापेटी, हात पुसण्यासाठी वस्त्र, पाणी. हळद कुंकू, गुलाल, रांगोळी, 2 नारऴ, 10 सुपार्या, तादुळ-गहू प्रत्येकी अर्धा किलो, गंध, पंचामृत (दूघ, दही, साखर, तूप व मध मोठ्या वाटीत एकत्र करून), शेंदूर, काजळ, 6 हिरव्या काचेच्या बांगड्या, गळेसरी, मणिमंगळसूत्र, नैवेद्याला पेढे, गणेश पूजेच्या नैवेद्यासाठी खोबर्याची अर्धी वाटी तिच्यात गुळ टाकून, अत्तर, बदाम, काळे तीळ, साखर, दर्भ, कापूरवड्या, कुंकू लावून तांबडे केलेल्या अक्षताचे भांडे, कापसाच्या सोळा मण्यांची 2 वस्त्रमाळ, तुळसी, दूर्वा, बेल, फुले, सानचाफ्याची फुले, आंब्याची पाने, विड्याची 25 पाने, चाैरंग, कोकीळेची मूर्ती किंवा फोटो (लॅमिनेशन केलेला), कलसात टाकण्यासाठी नाणे, विड्यावर ठेवण्यासाठी 10 रू ची नाणी, पुरोहितांसाठी दक्षिणा. वरील सर्व साहित्य पूजेच्या अगोदर ताटांमध्ये तयार ठेवावे, म्हणजे पूजेच्या वेळी उठावे लागणार नाही. पूजेची मांडणी: पूजा करायची जागा स्वच्छ करावी मोठा चौरंग भिंतीसमोर ठेवून त्याच्यासमोर पूजकासाठी पाट व उजवीकडे पुरोहितासाठी पाट. चौरंगावर गव्हाची रास करून तिच्यावर तांब्या पाण्याने पाऊण भरून ठेवावा. चौरंगावर विड्याची 2 उताणी पाने त्यावर 1 सुपारी व 1 नाणे असे 7 विडे तयार करावे. चौरंगावरील कलसावर तबक ठेवून त्यावर तांदुळ पसरून कोकीळेची मूर्ती किंवा फोटो ठेवावी व गणपतीपूजनासाठी सुपारी ठेवावी. पूजेला सुरवात करण्यापूर्वी समई व उदबत्ती पेटवून ठेवावी. सर्वप्रथम घरातील देवांना, पतीला, वडिल माणसांना व पुरोहितांना नमस्कार करावा. पूजेसाठी आसनावर बसल्यावर प्रथम स्वत:च्या हाताच्या मधल्या बोटाने कुंकुमतिलक लावावा. व हस्तप्रक्षालन करून पूजेला सुरूवात करावी. बाकी माहितीसाठी कोकीळाव्रताची पोथी घ्यावी व त्याप्रमाणे हे व्रत करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

खूप खूप धन्यवाद! मी परवा

मांत्रिक
Tue, 08/25/2015 - 12:00 नवीन
खूप खूप धन्यवाद! मी परवा नाशिकला आलो होतो तर तिथे या व्रताची अगदी जोरात तयारी पाहिली. गंगाघाटापासचं मार्केट व्रतांशी संबंधित गोष्टींनी फुलून गेलं होतं. त्या मानाने पश्चिम महा. व कोकणात अनभिज्ञता आढळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

छान माहिती दिलात.

नूतन सावंत
Tue, 08/25/2015 - 09:11 नवीन
छान माहिती दिलात.
यावरून जसाच्या तसा नाही पण महादेवशास्त्री जोशी यांनी मानिनी नावाचा चित्रपट काढला होता. फक्त त्यात नवर्‍याचा अपमान झालेली (मला वाटते जयश्री गडकर) अधुनिक मानिनी परत माहेरी जात नाही. त्यावेळेस असलेले वरील पौराणिक कथेवरचे गदीमालिखित खाली दिलेले गाणे खूप छान आहे...
विकास हेच लिहायला आले होते. महादेवशास्त्री जोशी यांची आई-मुलीच्या प्रेमावर आधारित नितांतसुंदर कथा(जरी मूळ कथेचे बीज वरील गोष्ट असली तरी),गदिमांचे काळजाला भिडणारे परिपूर्ण शब्द,सुधीर फडकेंचे सुरेल संगीत आणि जयश्री गडकारांचा अप्रतिम अभिनय याच्यामुळे हे गाणे अजरामर झाले आहे.
  • Log in or register to post comments

व्रत विधी सांगता का?

स्पंदना
Tue, 08/25/2015 - 09:33 नवीन
व्रत विधी सांगता का? या व्रताबद्दल यावर्षीच पहिल्यांदा ऐकलं. अन आता तुमच्याकडून सव्विस्तर माहिती मिळाली.
  • Log in or register to post comments

पुजेचे साहित्य:

हेमंत लाटकर
Tue, 08/25/2015 - 12:01 नवीन
पुजेचे साहित्य: 2 पाट व त्यावर वस्त्रे, अभिषेकासाठी ताम्हण किंवा पसरट भांडे, दोन तांबे, पळीपंचपात्र, घंटा, शंख, समई तेलवातीसह, निराजंण तूपवात भरून, उदबत्त्या, काड्यापेटी, हात पुसण्यासाठी वस्त्र, पाणी. हळद कुंकू, गुलाल, रांगोळी, 2 नारऴ, 10 सुपार्या, तादुळ-गहू प्रत्येकी अर्धा किलो, गंध, पंचामृत (दूघ, दही, साखर, तूप व मध मोठ्या वाटीत एकत्र करून), शेंदूर, काजळ, 6 हिरव्या काचेच्या बांगड्या, गळेसरी, मणिमंगळसूत्र, नैवेद्याला पेढे, गणेश पूजेच्या नैवेद्यासाठी खोबर्याची अर्धी वाटी तिच्यात गुळ टाकून, अत्तर, बदाम, काळे तीळ, साखर, दर्भ, कापूरवड्या, कुंकू लावून तांबडे केलेल्या अक्षताचे भांडे, कापसाच्या सोळा मण्यांची 2 वस्त्रमाळ, तुळसी, दूर्वा, बेल, फुले, सानचाफ्याची फुले, आंब्याची पाने, विड्याची 25 पाने, चाैरंग, कोकीळेची मूर्ती किंवा फोटो (लॅमिनेशन केलेला), कलसात टाकण्यासाठी नाणे, विड्यावर ठेवण्यासाठी 10 रू ची नाणी, पुरोहितांसाठी दक्षिणा. वरील सर्व साहित्य पूजेच्या अगोदर ताटांमध्ये तयार ठेवावे, म्हणजे पूजेच्या वेळी उठावे लागणार नाही. पूजेची मांडणी: पूजा करायची जागा स्वच्छ करावी मोठा चौरंग भिंतीसमोर ठेवून त्याच्यासमोर पूजकासाठी पाट व उजवीकडे पुरोहितासाठी पाट. चौरंगावर गव्हाची रास करून तिच्यावर तांब्या पाण्याने पाऊण भरून ठेवावा. चौरंगावर विड्याची 2 उताणी पाने त्यावर 1 सुपारी व 1 नाणे असे 7 विडे तयार करावे. चौरंगावरील कलसावर तबक ठेवून त्यावर तांदुळ पसरून कोकीळेची मूर्ती किंवा फोटो ठेवावी व गणपतीपूजनासाठी सुपारी ठेवावी. पूजेला सुरवात करण्यापूर्वी समई व उदबत्ती पेटवून ठेवावी. सर्वप्रथम घरातील देवांना, पतीला, वडिल माणसांना व पुरोहितांना नमस्कार करावा. पूजेसाठी आसनावर बसल्यावर प्रथम स्वत:च्या हाताच्या मधल्या बोटाने कुंकुमतिलक लावावा. व हस्तप्रक्षालन करून पूजेला सुरूवात करावी. बाकी माहितीसाठी कोकीळाव्रताची पोथी घ्यावी व त्याप्रमाणे हे व्रत करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

कोकिळेचा स्वर

ऋतुराज चित्रे
Tue, 08/25/2015 - 13:00 नवीन
कोकिळेचा स्वर कानावर पडल्याशिवाय व्रत सुटत नाही असे ऐकलय, हे खरे आहे का?
  • Log in or register to post comments

पण ऑगस्ट्/सप्टेंबरात कोकिळा

आदूबाळ
Tue, 08/25/2015 - 15:08 नवीन
पण ऑगस्ट्/सप्टेंबरात कोकिळा ऐकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जावं लागेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे

कशाला?

खेडूत
Tue, 08/25/2015 - 16:47 नवीन
कशाला? यू ट्युब हाय की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

त्यासाठी पर्यायी व्यवस्था

हेमंत लाटकर
Tue, 08/25/2015 - 16:51 नवीन
त्यासाठी पर्यायी व्यवस्था कोकीळेच्या आवाजाची audio clip ऐकली तरी चालते. नाही तर पोथी मधील एक मंत्र म्हणले तरी चालते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे

प्राचीन तंत्रज्ञान

कपिलमुनी
Tue, 08/25/2015 - 18:37 नवीन
audio clip ? आपल्याकडे असलेल्या प्राचीन तंत्रज्ञानाची झेप एवढी भारी असेल याची कल्पना नव्हती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

खूप छान माहिती. कधी या

पद्मावति
Tue, 08/25/2015 - 13:35 नवीन
खूप छान माहिती. कधी या व्रताबद्दल ऐकलं नव्हतं. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

शंका

पैसा
Tue, 08/25/2015 - 13:51 नवीन
हे व्रत विवाहित स्त्रिया करू शकतात. हे व्रत केल्याने स्त्रियांनां दीर्घकाळ सौभाग्य, घनवृद्धि, व सॆतंतीसौख्य व इतर प्रपंचातील सुखे प्राप्त होते.
असं होय! मला वाटलं, या सगळ्या गोष्टी दुसरंच काहीतरी केल्यामुळे प्राप्त होतात. एक दुय्यम शंका. आषाढात आणि श्रावणात कोणते कोकिळ ओरडतात? @@
कॉल्लिंग अत्रुप्त बुवा! तुमचा बिजनेस वाढायची ऑपॉर्च्युनिटी दिसते आहे इथे!
  • Log in or register to post comments

असं होय! मला वाटलं, या सगळ्या

प्रसाद गोडबोले
Tue, 08/25/2015 - 14:14 नवीन
असं होय! मला वाटलं, या सगळ्या गोष्टी दुसरंच काहीतरी केल्यामुळे प्राप्त होतात.
:O प्रतिसाद वाचुन हा प्रतिसाद नक्की पैतईं नी दिलाय की टवाळ कार्ट्याने असा प्रश्न पडला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

व्रताचा धागा आहे. सभ्य व्हा.

प्यारे१
Tue, 08/25/2015 - 14:16 नवीन
व्रताचा धागा आहे. सभ्य व्हा. शंका घेऊ नका. देवळात पाया पडायला जातोस तेव्हा इकडे तिकडे पाहतोस का रे श्याम???? ;) - श्यामचा मामा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

+१

बॅटमॅन
Tue, 08/25/2015 - 14:42 नवीन
अगदी असेच! बाकी अनेक कथा उत्तम आहेत पण लै व्रतांच्या कथा मात्र तद्दन बिनडोक आहेत. ती श्यामबालावाली कथाही तसलीच. काय तर म्हणे "माझी पूजा का करत नाही" म्हणून लक्ष्मी रागावते. च्यायला, माझी पूजा करा म्हणून जर भक्तांना ओरडायला लागत असेल तर ती कसली देवी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

ते एक आणि

पैसा
Tue, 08/25/2015 - 14:46 नवीन
प्रसाद खाल्ला नाही म्हणून सत्यनारायण बोट बुडवतो म्हणे! मला लहान असताना सत्यनारायणाची भीतीच बसली होती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

धर्माच्या नावाखाली असले

बॅटमॅन
Tue, 08/25/2015 - 14:48 नवीन
धर्माच्या नावाखाली असले बिनडोक बाळकडू पाजत असल्यानेच धर्म म्हणजे बकवास असे वाटू लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मला वाटते

विकास
Tue, 08/25/2015 - 16:43 नवीन
आपण मिपाधर्मासाठी वटवाघूळ व्रत चालू करूयात. म्हणजे मग काही प्रश्न नाही! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

पाय लागू सरजी. _/\_

बॅटमॅन
Tue, 08/25/2015 - 17:01 नवीन
पाय लागू सरजी. _/\_ बाकी मिपासाठी एकच व्रत फर्मावावे: पाव अन मिसळ खाणे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

या व्रतात जीवलग मिपामित्र

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 08/25/2015 - 23:20 नवीन
या व्रतात जीवलग मिपामित्र बोलवून कट्टाजागर करावा. मिसळपावचा प्रसाद खाऊन व तक्रतीर्थ प्राशन करून उद्यापन करावे. नंतर कट्टावर्णन पोथी फोटोसह मिपावर प्रसिद्धा करून कट्ट्याला न येऊ शकणार्‍यांचा मनी जळजळ उत्पन्न करावी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

धर्माच्या नावाखाली असले

प्रसाद गोडबोले
Tue, 08/25/2015 - 17:16 नवीन
धर्माच्या नावाखाली असले बिनडोक बाळकडू पाजत असल्यानेच धर्म म्हणजे बकवास असे वाटू लागते.
म्हणुनच तर आम्ही आर्य सनातन वैदिक धर्मात धर्मांतर केले आहे . नो मुर्तीपुजा . नो भाकडकथा . ओन्ली यज्ञ . तोही नाही केला तरी चालेल फक्त "इदं न मम " म्हणायचे . तेन त्यक्तेन भुञ्जीथा: ! बस्स !! येणार का ? ;) त.टी. : धर्माचे सुधारित नियम (आणि इतिहासही) बनवण्याचा हक्क राखुन ठेवला आहे ह्याची कृप्या नोंद घ्यावी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

धर्माचे सुधारित नियम (आणि

बॅटमॅन
Tue, 08/25/2015 - 17:18 नवीन
धर्माचे सुधारित नियम (आणि इतिहासही) बनवण्याचा हक्क राखुन ठेवला आहे ह्याची कृप्या नोंद घ्यावी !
हे अवडले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

तळटीप

नाखु
Fri, 08/28/2015 - 12:08 नवीन
जास्त भावली. आम्ही एक पोथी सोडून दुसरी पोथी कवटाळली नाही तर कवा (च) टाळली आहे !!! याचे साक्षी साक्षात प्रगो आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

पाश्चामात्यांचे अनुकरण

हेमंत लाटकर
Tue, 08/25/2015 - 17:20 नवीन
पाश्चामात्यांचे अनुकरण करण्यापेक्षा आपल्याकडील परंपरेने चालत आलेली व्रतवैकल्ये करणे चांगले आहे. पीके मध्ये हिन्दु घर्मियामध्येच जास्त अंधश्रंद्धा आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न झालेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

पाश्चामात्यांचे अनुकरण

थॉर माणूस
Tue, 08/25/2015 - 17:31 नवीन
पाश्चामात्यांचे अनुकरण करण्यापेक्षा आपल्याकडील परंपरेने चालत आलेली व्रतवैकल्ये करणे चांगले आहे
उगाच? कैच्याकै... इथे लोकांनी विचारलेल्या चार प्रश्नांची योग्य उत्तरे आहेत का? उगाच कुणी पोटापाण्याच्या सोयीसाठी कुठल्यातरी कथेत पाणी घालून कसलीतरी व्रते तयार करायची आणि पुढच्या पिढ्यांनी "गप्प बसा" संस्कृती पाळत कसलेही प्रश्न न विचारता पुढे चालू ठेवायची? ती सती परंपरा पण असल्याच (की याच?) कसल्याशा कथेतून आलेली नै? मग परंपरेने चालत आलेली म्हणून ती पण सुरू करायची का परत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

सती परंपरा चुकीची आहे.

हेमंत लाटकर
Tue, 08/25/2015 - 18:24 नवीन
सती परंपरा चुकीची आहे. व्रत करणे म्हणजे देवाचे नामस्मरण करणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस

असली बिनडोक व्रतवैकल्ये करून

बॅटमॅन
Tue, 08/25/2015 - 17:32 नवीन
असली बिनडोक व्रतवैकल्ये करून आपणच आपल्या धर्माला कमीपणा आणतो आहोत. जरा उपनिषदे वाचावीत, थोडेथोडके नामस्मरण करावे ते सोडून असल्या मूर्ख गोष्टींना भाव देण्यात कुणाचाच फायदा नाही. (पुरोहितवर्ग सोडला तर - तुम्ही पुरोहितांचे प्रतिनिधी म्हणून बोलत असाल तर तुमचे म्हणणे मान्य कारण इन दॅट केस तुमचा प्रामाणिक स्वार्थ असेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

अगदी सहमत.

प्रचेतस
Tue, 08/25/2015 - 17:39 नवीन
अगदी सहमत. ब्रिटिशकाळात आलेल्या भंपक कथा नुसत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ही कथा ब्रिटिशकाळातली आहे?

बॅटमॅन
Tue, 08/25/2015 - 17:43 नवीन
ही कथा ब्रिटिशकाळातली आहे? काही आहेत हे माहितीये, उदा. सत्यनारायण. (ब्रिटिश काळ म्ह. १८१८ नंतरच असे नेसेसरी नाय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

इणजण्न्रल अशा बहुतेक सर्वच

प्रचेतस
Tue, 08/25/2015 - 17:50 नवीन
इणजण्न्रल अशा बहुतेक सर्वच व्रतांच्या कथा ब्रिटिशकाळात आलेल्या आहेत. साधारण १५० वर्षांच्या कार्यकाळात. अर्थात ह्या कथेबद्दल काळ नक्कीच सांगता येणार नाही पण अशा बहुतेक कथा ह्याच काळातील आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हां हे करेक्टेय!

बॅटमॅन
Tue, 08/25/2015 - 17:51 नवीन
हां हे करेक्टेय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मला खरंच एक प्रांजळ मत हवे

प्रसाद गोडबोले
Tue, 08/25/2015 - 17:54 नवीन
मला खरंच एक प्रांजळ मत हवे आहे ह्या विषयावर : आता आपल्याला हे लक्षात येते आहे की असल्या भाकडकथा अन व्रतवैकल्ये हे हिंदु धर्मातील वैगुण्य आहेत मग आपण हे मुळासकट उपटुन टाकले पाहिजेत की आंजारुन गोंजारुन त्यांना सुधारणावादी रुप देवुन चालु ठेवले पाहिजे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मूळासकट उपटून टाकले पाहिजे.

प्रचेतस
Tue, 08/25/2015 - 17:59 नवीन
मूळासकट उपटून टाकले पाहिजे. प्रश्नच नै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

सवय

विकास
Tue, 08/25/2015 - 19:23 नवीन
सवय लागली की ती जाणे अवघड त्यात देखील जर भिती (पक्षी: अंधश्रध्दा) आली की संपले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

यात सामाजिक भाग जास्त आहे का?

प्यारे१
Tue, 08/25/2015 - 17:55 नवीन
यात सामाजिक भाग जास्त आहे का? पूजेचं मार्केटिंग करून पूजा केल्या नाहीत तर अमुक तमुक नुकसान होतं हे जाणीवपूर्वक पसरवलं जाण्याचा उद्देश पुरोहित वर्गाला वाली न उरल्यानं (पेशवाई संपली त्यामुळे) करावी लागणारी उदरनिर्वाहासाठीची धडपड असा काही भाग होता का??? प्रत्येक धर्मात धर्म मार्तण्डान्नी भीती, लालूच, स्तुति वगैरे मार्ग अवलंबून आपापाली पोटं भरण्याचं काम केलेलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

प्रत्येक धर्मात धर्म

प्रसाद गोडबोले
Tue, 08/25/2015 - 17:58 नवीन
प्रत्येक धर्मात धर्म मार्तण्डान्नी भीती, लालूच, स्तुति वगैरे मार्ग अवलंबून आपापाली पोटं भरण्याचं काम केलेलं आहे.
हेच हेच आमचेही मत आहे , मात्र आम्ही ते मांडले की आम्हाला टनाटनि हिंदु औरंगजेब वगैरे वगैरे ऐकुन घ्यावे लागते :(((( अर्थात आम्हाला त्याने विशेष काही फरक पडत नाही हे ही तितकेच खरे ;) येथे खरे हे सत्य ह्या अर्थाने =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

पश्या माझं पण आधी तेच मत होतं

प्यारे१
Tue, 08/25/2015 - 18:07 नवीन
पश्या माझं पण आधी तेच मत होतं. आता मी माझ्या जाएगी राहून विचार करतो. खरंच एवढ्या घरांची, फैक्ट्री ची, बांधकामांची गरज आहे का? माझ्या मते नाही. तरीही पैसा रोल होण्यासाठी हे आवश्यक आहे. ते होण्यासाठी (काही अंशी) प्रोजेक्ट सुरु होतात, कंपनीला पैसा मिळतो आमच्यासारखे हजार दोन हजार लोक पोट भरतात. मी दांभिक नाही? (काही जणांसाठी दांभिक च आहे तो मुद्दा सोडा) भारतात गाड्यांची एवढी गरज खरंच आहे? ऑटोमोबाइल इंडस्ट्री सुरु राहावी म्हणून सार्वजनिक वाहन व्यवस्था रस्ते नीट न असन्यामागे एखादी लॉबी असावी अशा पद्धतीनं कामं होत आहेत. किमान एखाद्याला माहिती तरी आहे नेमका गोंधळ काय आहे ते. त्या अनुषंगानं थोडं काम करतोय तो. आज समजलं की हे सगळां व्यर्थ आहे म्हणून मी उद्या नोकरी सोडून जाऊ शकत नाही तसंच एखादा गुरूजी सुद्धा नाही करु शकत ना???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

आज समजलं की हे सगळां व्यर्थ

प्रसाद गोडबोले
Tue, 08/25/2015 - 18:16 नवीन
आज समजलं की हे सगळां व्यर्थ आहे म्हणून मी उद्या नोकरी सोडून जाऊ शकत नाही तसंच एखादा गुरूजी सुद्धा नाही करु शकत ना???
मला आज समजले की मी जे काम करतो ते व्यर्थ आहे तर मी ताबडतोब प्रोफाईल बदलेन ! आणि तसेच पुरोहितांनी केले पाहिजे होते : सत्यनारायण हा भाबडे पणा आहे तर तो बदलुन त्याच्या जागी ईशावास्योपनिशदाचे पारायण घ्या , पुरुषसुक्त जातीयवादी वाटते तर त्या जागी नासदीय सुक्त घ्या , अंतिमसंस्कार फालतुपणा वाटतो तर त्याजागी अष्टावक्र गीतेचा पाठ घ्या , नारायण नागबळी अन इतर १७६० शांतींच्या जागी बादरायणाच्या ब्रह्मसुत्रांचा पाठ घ्या !! माझ्या मते प्रत्येक भाकडकथेला चांगला वैदिक तत्वज्ञानावर आधारित पर्याय नक्कीच सुचवता येईल :) - आर्य सनातन वैदिक प्रगो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

पेशवाई संपली हा भाग असावाच.

प्रचेतस
Tue, 08/25/2015 - 18:01 नवीन
पेशवाई संपली हा भाग असावाच. पण ह्या कथा जवळपास आख्ख्या भारतात कमी अधिक प्रमाणात पसरलेल्या दिसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

पेशवाई संपल्यामुळे

बॅटमॅन
Tue, 08/25/2015 - 18:05 नवीन
पेशवाई संपल्यामुळे पुरोहितांचे हाल चालू झाले असे वाटत नाही. त्यामुळे त्याच काळात अशा कथा का प्रचलित झाल्या त्यामागे कारण वेगळे असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

एक कारण

पैसा
Tue, 08/25/2015 - 18:20 नवीन
एक कारण असं वाटतं की गोव्यात बघते त्याप्रमाणे पोर्तुगीजांच्या अत्याचारांचा परिणाम म्हणून हिंदू लोक जास्तच conservative म्हणावे असे झालेत. इंग्रज अंमलात धर्मंतरासाठी तसा छळ वगैरे नसला तरी ख्रिश्चन धर्मापासून स्वतःचे संरक्षण करण्याची प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून असे काही काही शोधले गेले असावे. न जाणो, व्रते वगैरे करून आपण "काहीतरी" धार्मिक करतो आहोत ही भावना लोकांत रुजत असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मेबी, पाहिले पाहिजे जरा.

बॅटमॅन
Tue, 08/25/2015 - 18:40 नवीन
मेबी, पाहिले पाहिजे जरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

यात सामाजिक भाग जास्त आहे का?

प्यारे१
Tue, 08/25/2015 - 17:55 नवीन
यात सामाजिक भाग जास्त आहे का? पूजेचं मार्केटिंग करून पूजा केल्या नाहीत तर अमुक तमुक नुकसान होतं हे जाणीवपूर्वक पसरवलं जाण्याचा उद्देश पुरोहित वर्गाला वाली न उरल्यानं (पेशवाई संपली त्यामुळे) करावी लागणारी उदरनिर्वाहासाठीची धडपड असा काही भाग होता का??? प्रत्येक धर्मात धर्म मार्तण्डान्नी भीती, लालूच, स्तुति वगैरे मार्ग अवलंबून आपापाली पोटं भरण्याचं काम केलेलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

यात माझा काय फायदा माहितीसाठी

हेमंत लाटकर
Tue, 08/25/2015 - 18:30 नवीन
यात माझा काय फायदा माहितीसाठी हा धागा टाकला. मी काही पुरोहित नाही देशपांडे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा