मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मॅगी नूडल्सः कसं असेल कमबॅक..? डोकं लढवा

संदीप डांगे · · काथ्याकूट
नमस्कार मंडळी, नेहमीच्या काथ्याकूटांच्या लढायांतून वेळ काढूया (हे मी स्वतःला बजावतोय, गैरसमज नको ;-) ). आणि काहीतरी धमाल आणि डोकेबाज करण्याचा प्रयत्न करूया. मॅगीवरील बंदी माननीय न्यायालयाने उठवली आहे. खटला अजून संपला नाही पण आतापर्यंत उपलब्ध बातमी नुसार मॅगी परत विक्रीस येणार आहे असं खात्रीलायक वाटत आहे. ह्या सगळ्या परिस्थितीत जाहिरात जगतात एक कुतूहल लागून राहलंय की मॅगीचं पुनरागमन नक्की कसं असेल? काय करतील नेस्ले आणि त्यांचे ब्रँड मॅनेजर? नुसता जाहिरातींचा मारा करून प्रश्न सुटणार नाही. त्यांना काहीतरी ठोस आणि मौल्यवान असा संदेश द्यायला लागेल. "वी आर सेफ - आमचं उत्पादन सुरक्षित आहे" असं म्हणून चालणार नाही. कारण फक्त 'भूक भागवणे' ह्या अतिशय बेसिक विचारापासून आजची अन्नपदार्थ-उत्पादने पार पुढे जाऊन 'हेल्दी' म्हणजे 'आरोग्यदायी' आहोत असा (तद्दन खोटा) प्रचार करत आहेत. या परिस्थितीत 'खायला सुरक्षित' अशी प्रतिमा जास्त नुकसान करणारी आणि शंभर युगं मागं ढकलणारी ठरेल. सेलीब्रीटी वापरून उपयोग नाही कारण आधीच त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह आहे. मॅगीचे पुनरागमन कोक आणि कॅडबरीइतके सोपे कधीच नसणार कारण हे उत्पादन समाजाच्या सर्व स्तरांमधे, वर्गांमधे सारखेच लोकप्रिय होते. त्याचा एक लाइफस्टाइल प्रॉडक्ट पेक्षा जीवनावश्यक वस्तू म्हणून वापर होता. त्यामुळे आता फारच जपून पावलं टाकावी लागणार आहेत. मॅगीने काहीही कॅम्पेन केलं तरी प्रतिस्पर्धी -सन्फिस्ट, चिंग्स, आयटीसी, इत्यादी- त्याची हवा काढायला टपलेलेच असणार. आपल्या जाहिरातींमधून त्यांच्या टिकाटिप्पणीला खाद्य मिळू नये अशीही काळजी घ्यायला लागणार. मित्रांनो, एका जाहिराततज्ञासाठी ही एक खरंच आव्हानात्मक परिस्थिती आहे. तसंच कल्पक डोक्याच्या लोकांसाठी पुरेपूर खाद्य आहे. मॅगी अनेकांच्या जीवाभावाची आहे. तर अशा मॅगीसाठी जाहिरात मोहिम काय असावी यावर आपल्याला काथ्याकूट करायचा आहे. ब्रँडबद्दल तुम्हाला माहिती आहे, त्याच्या समस्येबद्दलही माहिती झालेच आहे. जाहिरात कंपन्या ज्याप्रकारे काम करतात त्यातला ५०% टक्के भाग तुमच्या हातात आलेला आहे. आता हा प्रश्न सोडवायचा आहे. तर येऊद्या एकएक भन्नाट कल्पना. वेळोवेळी जाहिरात एजंसी व नेस्ले तुमच्या कल्पनेवर कशी प्रतिक्रिया देऊ शकतात याचे मार्गदर्शन मी करेन. त्यासोबतच काही कल्पना राबवतांना येणारे अडथळे आणि समस्याही मांडेन. म्हणजे जाहिरात एजंसीचे कार्य कसे चालते हेही आपल्याला लक्षात येइल. मनोरंजन + माहिती असा दुहेरी उद्देश आहे या धाग्याचा. तुम्हाला काय करायचंयः १. ग्राहक दृष्टिकोणासंबंधी टिप्प्णी देऊ शकता. उदा. मुलांना मॅगी देण्याची आयांची वेळ साधारण दुपारनंतरची असते. भारतीयांना गोर्‍या रंगाबद्दल अवास्तव आकर्षण आहे. खेळतांना अचानक थकवा जाणवायला लागल्यावर काहीतरी पेय प्यावेसे वाटते. २. सिंगल लाइन नॅरेटीव - एका वाक्यात स्पष्ट होणारे धोरण, विचार - देऊ शकता. उदा. फेअरअँडलवलीने उजळपणा येतो, बूस्ट प्यायल्याने मरगळ झटकून अचानक शक्ती येते, ३. प्रत्यक्ष जाहिरात - टीवी कमर्शीयल किंवा इतर कोणतेही पारंपरिक माध्यम - कशी असेल त्याची स्क्रिप्ट - पटकथा लिहू शकता. उदा.: मेलोडी इतनी चॉकलेटी क्युं है असं विचारणारे वेगवेगळे प्रसंग लिहिणे, कोकच्या थंडा मतलब कोकाकोला हे दाखवणारे प्रसंग लिहिणे, ४. पारंपरिक माध्यमांशिवाय लोकांमधे जनजागृती करण्याचे नवीन फंडे सांगू शकता. उदा. महिन्द्रा त्यांच्या स्कॉर्पीओ आणि तत्सम एसयुव्ही चा दमदारपण व उपयुक्तता पटवून देण्यासाठी मोटरशोजमधे कृत्रीम ऑफरोड ट्रॅक तयार करून लोकांना प्रत्यक्ष टेस्ट ड्राइव देतात. ५. एखाद्या सदस्याने सादर केलेली कल्पना प्रतिस्पर्धी कंपनी कशा पद्धतीने हाताळेल याचीही कल्पन देऊ शकता. उदा.: जॅग्वारने मर्सिडीजच्या कोंबडीची काढलेली पिसं. त्यावर मर्सीडीजचे उत्तर. मग करताय ना मदत मॅगीला परतायला...? (हो. दिस्क्लेमर राहिलेच. : ही कुठल्याही पद्धतीने मॅगीची जाहिरात नाहीये. मिपा किंवा संदीप डांगे ही व्यक्ती कुठल्याही प्रकारे मॅगीशी संबंधीत नाही. हा फक्त मनोरंजनासाठी (ब्रेनस्टॉर्मींग-रोलप्ले) साठी काढलेला धागा आहे. मार्केटींग नाही. इच्छुक या धाग्यावर बिन्दास्त मॅगीची पिसंही काढू शकतात.)

वाचने 16377 वाचनखूण प्रतिक्रिया 70

अभ्या.. 19/08/2015 - 12:30
मस्त धागा संदीपराव. आवडली आयड्या. पाहू या नेस्लेला काही मिळते का येथून ;) एनीवे मला वाटते आता मॅगी नो सेलेब्रिटी नो हेल्थ फंडे आणि नो कॅची लाईन करेल. आता फक्त जनरल पब्लिकच्या मॅगीशी अ‍ॅटॅचमेंटवर अ‍ॅड येतील. त्यांनी हा फंडा पॅकींगवर वापरला होता आता तो सगळीकडे वापरतील. मॅगी आयुष्यातल्या कुठल्या रिकाम्या जागा भरत होते ते जास्त डॉमिनेट केले जाईल. आगे आगे देखेंगे होता है क्या. ;)

पद्मावति 19/08/2015 - 12:54
प्रतिसाद वाचायलाही उत्सुक.
आता फक्त जनरल पब्लिकच्या मॅगीशी अ‍ॅटॅचमेंटवर अ‍ॅड येतील. त्यांनी हा फंडा पॅकींगवर वापरला होता आता तो सगळीकडे वापरतील. मॅगी आयुष्यातल्या कुठल्या रिकाम्या जागा भरत होते ते जास्त डॉमिनेट केले जाईल.
..सहमत.

उगा काहितरीच 19/08/2015 - 14:02
बॉलीवूड स्टाईल . सगळे लोक हिरोला (म्यागी) मारत असतात, शिव्या देत असतात ( आठवा साऊथचे चित्रपट इसे मारो. इसे मारो) पण नंतर लोकांना समजते की ते चूक होते पण सगळे हिरोला डोक्यावर वगैरे घेतात.

राही 19/08/2015 - 16:46
नेस्ले कशी जाहिरात करेल ते सांगता येत नाही, पण मॅगीची लोकप्रियता आणि उपयुक्तता ही तिच्या 'फास्ट' आणि 'फुड' असण्यामुळे आहे. गिर्यारोहक, ट्रेकर्स, भटके यांना मॅगी म्हणजे वरदान आहे. उंच प्रदेशातील हॉटेल्समध्ये कित्येकदा मॅगीशिवाय काहीच खाण्याजोगे आणि झटपट बनवण्याजोगे नसते. मॅगी साठवून ठेवायला सोपी. पोहे-रव्यासारख्या त्यात अळ्या पडत नाहीत. फ्रिजमध्ये ठेवावी लागत नाही. लहान धडपडी मुले स्वतः प्रयोग करू शकतात. बॅचलर रूममेट्सना मॅगीचा खूपच आधार असतो. भुकेला मॅगी आणि निजेला स्लीपिंग बॅग अशी नवी म्हण बनू शकते. मातांना तर मॅगीने खूप मोठी सोय मिळवून दिली आहे. थकून भागून घरी आल्यावर दोन मिनिटात मॅगी तयार होउ शकते, स्वस्त आणि मस्त. आपल्या पद्धतीच्या घरगुती न्याहार्‍यांसाठी वेळ आणि खटपट खूप लागते. खूप भांडी पडतात. गॅस, वीज, जळण जास्त लागते. यामुळे वर्किंग वुइमेनना मॅगी खूप सोयीची ठरते. शिवाय मुलांनाही आवडते. मार्केटिंग मुळे चव जिभेवर उतरवली गेलीय असेही नाही. नव्याने खाणार्‍यालाही वाफाळती मॅगी आवडते. वाजवी किंमत हे देखील मॅगी लोकप्रिय होण्याचे प्रमुख कारण आहे. नाही तर बाजारात भात, पुलाव, कढी, पिठले, शिरा, खीर, आमटी, अश्या अनेक पदार्थांची झटपट पाकिटे मिळतात. पण त्यांचा खप मॅगीपुढे अगदी किरकोळ आहे. शिश्याबिश्याचा मुद्दा भारतीय ग्राहकांच्या संदर्भात किरकोळच नव्हे तर हास्यास्पद आहे. दुधात युरिया मिसळण्याचा प्रकार जिथे राजरोस होतो, हळद, तिखट, मसाले, गूळ, साखर, तेल, भाजीपाला, फळे, मासे, पाणी कशाच्याच शुद्धतेची हमी नाही, तांदळात, गव्हात, साबूदाण्यात त्या त्या रंगरूपाचे दगड जिथे बेमालूम मिसळले जातात, तिथे मॅगीतल्या शिश्याची काय दखल घेतली असती लोकांनी?

In reply to by राही

बापरे तुमचा प्रतिसाद वाचूनच आता मॅगीचं पुनरागमन किती धडाकेबाज होणार आहे, याची कल्पना येते. मला तर वाटतं पहिल्या आठवड्यातच या २-३ महिन्याचं नुकसान भरून काढणार कंपनी.

In reply to by राही

बाबा योगिराज 19/08/2015 - 18:35
भुकेला मॅगी आणि निजेला स्लीपिंग बॅग अशी नवी म्हण बनू शकते. हा हा हा. येक लम्बर......

कपिलमुनी 19/08/2015 - 17:08
१. अमेरीका आणि इतर प्रगत देशात मॅ गीला परवानगी आहे. तिथल्या लॅबमध्ये कडक टेस्टींग चालू आहे अशी लॅबची दृष्ये , AIFA , USAFII, GTBTA अशा अगम्या नावाच्या संस्थांनी मॅगी कित्ती छान आहे हे सांगितले आहे अशा जाहीराती. आणि मग पॉश घरामधल्या चिकन्याचुपड्या आया आपली पोरा मॅगी खाउन सुद्धा हुश्शार आणि हेल्दी आहेत हे सांगणार . ट्रेकर, क्रिकेटपटू , कब्बड्डी पटू , हीरो ईई पब्लिक आम्ही मॅगी लहानपणाप्स्सोन खातोय पण आम्ही बघा कित्ती हुश्शार अशा जाहीराती करता येतील.

In reply to by कपिलमुनी

संदीप डांगे 19/08/2015 - 17:18
मस्त हो मुनिवर.. परदेशी हात पाहिजेच डोक्यावर कारण बहुसंख्य ग्राहक भारतीय सरकारी संस्था व अधिकार्‍यांवर विश्वास नाही असं म्हणतात. अशी अ‍ॅड इथे 'मॅगी तर आधीपासूनच हेल्दी आहे आणि आता हे जगानेही मान्य केलंय' हे सिंगल लाइन नॅरेटीव घेण्याची शक्यता आहे. कारण 'मॅगी इज सेफ' असं सरळ सरळ नाही म्हणून शकत म्हणून त्याच्याऐवजी असं. जाहिरात जगतात एकेका शब्दाला लाखो रुपयांचं मोल असतं. 'आधीपासून' आणि 'आता' या दोन शब्दात फार मोठा परिणाम करण्याची ताकत आहे. त्याच बरोबर 'आधीपासून' हा शब्द वापरला तर 'सरकारने उगाच खोटा आळ घेतला' असाही अर्थ निघू शकतो म्हणून हा शब्द टाळतील.

समीरसूर 19/08/2015 - 17:14
जाहिरात: मेगीची एखादी ४०-५० च्या वयोगटातली ज्येष्ठ अधिकारी टीव्हीच्या पडद्यावर येते: "मैं शारदा कपूर. मेगी की चीफ स्ट्रेटेजी ऑफिसर. और एक मां जो अपने परिवार का हमेशा खयाल रखती हैं. आपको तो सब पता हैं. वो कहते है ना, जो सही होता हैं, उसके रास्तोंपर ज्यादा काटे होते हैं. लेकिन जीत हमेशा उसी की होती हैं. मेगी नुडल्स एक कठिन परिक्षा से गुजरा और सही साबित हुआ. आपका फ़ेवरेट मेगी अब बस दो मिनट की दुरी पर! आपकी नजदिकी दूकान में फिर से उपलब्ध हैं. आपकी और आपके परिवार की भूख हेल्दी तरीके से मिटाने के लिये. मेगी - खुशियोंभरी सेहतमंद जिंदगी!" ही जाहिरात सुरु असतांना त्या महिला अधिकाऱ्याचे नाव आणि मेगीमधला हुद्दा लिहून येईल. नंतर मेगी पाकिट फोडतांनाची, शिजवतांनाची मोहक दृश्ये झळकतील. आणि नंतर अख्खे कुटुंब (हसणारे, एकदम फिट) आनंदाने मेगी खातील. जाहिरात संपेल. अशीच जाहिरात इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांमध्ये झळकेल. यंग जनरेशन साठी खाली दिलेली थीम: ओन्ली स्ट्रोंग फोक्स बाऊन्स बेक - मेगी इस बेक...विथ द सेम फन...एंड द सेम ट्रस्ट. ग्रेब अ मेगी, हेव फन माझा आपला बारीकसा प्रयत्न! गोड मानून घ्यावा. :-)

मधुरा देशपांडे 19/08/2015 - 17:48
रोचक धागा आणि प्रतिसाद. नेस्ले कंपनीचे माहेरघर असलेल्या वेवे या स्वित्झर्लंडमधील गावाला नुकतीच भेट दिली. बरे त्याची मिपावर झैरात करुन ती जागा अजुन किमान दहा मिपाकरांना आवडली. स्वित्झर्लंडच्या पर्यटनखात्याची बरीच जाहीरात करुन झाली आहे त्यातही नेस्लेच्या गावाची. याची जाणीव ठेवुन नेस्ले मला काही देतील काय? जिनेव्हा लेकच्या नितळ निळ्या स्वच्छ पाण्याच्या सान्निध्यात, एकीकडे सुंदर आल्प्सने नटलेल्या सुंदर जागेत जन्म झालेल्या ठिकाणच्या एखाद्या उत्पादनात काही खोट असुच कशी शकते? हे कदापि शक्य नाही. स्वित्झर्लंडमधील चीज फॅक्टरी जर कुणी बघितल्या असतील तर तिथे स्वच्छता आणि गुणवत्तेसाठी घेतली जाणारी काळजी देखील पाहिली असेलच. आता याचे उत्पादन जगात कुठेही होत असेल, तरीही सगळे नियम स्वित्झर्लंडमधील संस्थांकडुन कसोशीने पाळले जातात आणि त्यामुळेच भारतात मॅगीवर घातलेली बंदी हा निव्वळ राजकारण्यांचा डाव होता. सगळ्या चाचण्या पुनश्च यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत आणि परिपुर्ण मॅगी लवकरच आपल्या भेटीला येते आहे. आता मला मॅगीबद्दल विशेष प्रेम नसले तरीही जर त्यांनी मला या वेवेत एक घर वगैरे देतो असे काही सांगितले, तर मी आनंदाने मॅगी हेच कसे उत्तम खाद्य आहे वगैरे अशी जाहिरात करेन. ;)

In reply to by मधुरा देशपांडे

डॉ सुहास म्हात्रे 20/08/2015 - 00:38
जाहिरातीतील गृहिणीची जागा कोणाला द्यायची ते नक्की झाले... लवकरच मानधनासंबंधी बोलणी करण्यासाठी बोलावणे येईल !  ;) :) =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मधुरा देशपांडे 20/08/2015 - 13:57
हाहाहा. :) मानधन ठरलंय हो आधीच. वेवेत फक्त एक घर. ;) तिथेच मॅगी बनवुन खाताना चित्रीकरण. :)))

पगला गजोधर 19/08/2015 - 18:00
(कृपया इथे कुजबुजणारी स्मायली कल्पावी ) लाख मोलाचा सल्ला तुम्हाला फुकट देतोय … काहीच महागड्या कॅम्पिंगची गरज नाही नेस्ले ला …। सरळ सरळ "मॅगी" नूडल्सचं री-ब्रांडीन्ग "नमो" नूडल्स अस करा, आणि पहा विक्री कशी गगनभेदी होतीय ते.

In reply to by पगला गजोधर

डॉ सुहास म्हात्रे 20/08/2015 - 00:44
वरवर हे ठीक वाटले तरी याबाबतीत एक फार मोठा धोका आहे... आजकाल नमो हा शब्द नुसता ऐकला तरी काही लोकांचे पित्त खवळते आणि त्यांत मेडियाधुरीण व बुध्दिवादींचा बराच भरणा आहे ! त्यामुळे "मॅगीमध्ये दाखविले त्यापेक्षा जास्त शिसे होते आणि भांडवलवादी सरकार आता ते प्रकरण दाबून टाकून कॉर्पोरेट लोकांना मदत करत आहे" असा गदारोळ होण्याची जोरदार शक्यता आहे. ;) :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ती सगळी दोन मिनिटात पाण्यात गेली, मी तर स्लोगन वैगरे तयार करून ठेवले होते ! हर घर नमो नमो (नूडल्स) हर जुबान नम नम (रुचकर खातानाचा होणारा आवाज) नये नमो नूडल्स खाव, खुदका अच्छा दिन पाओ

मी-सौरभ 19/08/2015 - 19:07
काहीही जाहीरात न करता केवळ न्यूज चॅनेल्स वरुन पेड न्युज वापरून मॅगी परत आल्याचा गवगवा करावा. एक्दा धंदा सुरु झाला की जुन्याच अ‍ॅड परत दाखवायच्या... हा का ना का

In reply to by मी-सौरभ

संदीप डांगे 19/08/2015 - 19:25
ब्रँडच्या प्रतिमेचा प्रश्न आहे. पेडन्यूज म्हणजे मागल्या दाराने चोरीछुपे प्रवेश असं मानल्या जातं. व त्याला सर्वत्र पोचण्याला मर्यादाही आहेत. त्याचबरोबर पेडन्यूज वापरूनच लोकांच्या प्रतिक्रिया दाखवता येतील मला पेडन्यूज प्लान करायची असेल तर मी देशात असंख्य (अर्थातच फेक:खोटे) फॅन क्लब तयार करेल आणि त्यांनी मॅगीच्या परत येण्याचे कसे जल्लोषात स्वागत केले याच्या बातम्या पसरवेल. अगदी अ‍ॅपलच्या धरतीवर लोक (परत विक्रीस येणार्‍या) मॅगीच्या पहिल्या पाकिटासाठी रांगा लावून उभे आहेत असं दाखवेल मग तिथे मोठे मोठे मॅगीचे ट्रक येतील अनलोड व्हायला. ते ट्रक बघितल्यावर लोक जोशपूर्ण आरडाओरडा करतील. ह्यातून प्रत्येक शहरात आपसूक बातमी होइल व इलेक्ट्रॉनिक तर्फे ही पसरेल. हे ट्रक आपलेच, लोकही आपलीच, न्यूजही आपल्याच. त्यात अनेक खरे फॅनही असतील जे घरी जाऊन बंदीनंतर खात असलेलं पहिलं पाकिट बनवून प्लेटसह सेल्फी काढून फोटो शेअर करतील. माझ्या मते जसं अभ्या... नी म्हटलंय तेच मॅगीचं धोरण असलं पाहिजे. लोकांनी उस्फूर्तपणे मॅगीला स्विकारलंय असंच जनतेत पसरलं पाहिजे. तरी या अँगलसोबतच आपली मलिन झालेली प्रतिमा नीट करण्यासाठी ब्रँडने स्वतःहून काय विशेष केलं हेही लोकांसमोर यायला हवं अन्यथा 'काच चिकटवली पण तडा कायम' हा भाव उत्पन्न होइल. केवळ उपभोक्त्यांनी उत्पादन वाचवलं असं होणं योग्य नाही. तुर्तास मॅगीसाठी तात्काळ एक चांगलं पीआर कॅम्पेन (जनसंपर्क मोहिम) राबवणं गरजेचं आहे. ते कसं हे पुढ्च्या प्रतिसादांमधे लिहिन. (बोर्ड-रुम मीटींग चालू असल्याचा फील येतोय.)

श्रीरंग 19/08/2015 - 20:14
पुनरागमन जोरदार होणार यात शंकाच नाही. मॅगीइतकी लोकप्रीयता क्वचितच एखाद्या ब्रँडला भारतात मिळाली असेल. मी स्वत: ८ वर्षं एका FMCG कंपनीत (ज्यांचे एक उत्पादन नूडल्सदेखील आहे) काम केले असल्यामुळे हे जवळून पाहिले आहे. ७०-७५% च्या मध्ये मार्केट शेअर असलेल्या मॅगीचे बाजारातून उच्चाटन होऊनही इतर कोणताच ब्रँड ती पोकळी भरून काढू शकला नाहिये. वास्तवीक, ITC, HUL, इत्यादी कंपन्यांसाठी ही सुवर्णसंधी होती. असे असूनही कोणत्याच ब्रँडची विक्री या काळात ८-१०% पेक्षा जास्त वाढू शकली नाही. थोडक्यात, मॅगी नसल्यामुळे हिरमुसलेल्या ग्राहकांनी नूडल्स या उत्पादनाकडेच पाठ फिरवलेली दिसत आहे. सोशल मीडीयावरील प्रतिक्रीया वाचल्या तर हेच स्पष्ट दिसतं. थोडक्यात, मॅगी पुनरागमनानंतर अजूनच धडाकेबाज पद्ध्तीने बाजारपेठ काबीज करणार यात शंकाच नाही.

In reply to by श्रीरंग

संदीप डांगे 20/08/2015 - 14:01
श्रीरंगजी, ही पोकळी भरून काढायला इतर असमर्थ ठरले असं म्हणू शकत नाही. एफएमसीजी मधे एवढ्या वेगाने मार्केट काबीज करणे कितीही मोठी कंपनी असली तरी तिला शक्य होणार नाही. एवढ्या अल्पकाळात ८ ते १० टक्के हे माझ्यामते तरी सकारात्मक आहे. जर 'मॅगी नाहीच' अशी परिस्थिती कायमस्वरूपी झाली तरच लोक हळूहळू इतर नूडल्स कडे वळतीलच. इतरांना हे 'मॅगीविरहीत' मार्केट काबीज करायला किमान तीन ते चार वर्षे लागतील. (उत्पादनवाढीसाठी कारखान्यांची निर्मीती, वितरण व्यवस्था, डीलर-नेटवर्क, नोकर-भरती, वित्तव्यवस्था, सर्वेक्षण, इत्यादी बाबी ध्यानात घ्याव्या). इथे तर फक्त काही महिन्यांचा प्रश्न होता. तसेच भारतात मॅगी हे नूडल्सचं समानार्थी समजलं जातं. त्यामुळे मॅगी नाही म्हणजे नूडल्सवरच बंदी आली असंही जनतेला वाटलेलं असू शकतं.

कोमल 19/08/2015 - 20:39
चांगले प्रतिसाद.. मला तर अजून काही सुचलं नाहिये. एक अ‍ॅडव्हर्टाइजींगवाला आहे माहितीतला, त्याच्याकडुन आयडिया ढापायचा प्रयत्न करते ;) मॅगी पुन्हा आरामात मार्केट काबिज करेल यांत शंकाच नाही.. मॅगीचं नाव काढलं आणि तोंपासु झालं रावं. कधी येणार गडे परत..

In reply to by इरसाल

जोशी वाडा, सदशिव पेठ, पुणे-३० का ओ? काही शंका असतील तर स्वतंत्र का कु मध्ये करुया. उगी इतक्या चांगल्या धाग्याचा काश्मिर करायचं नाही मला.

नमकिन 19/08/2015 - 21:26
जर अमेरिकेच्या मानकात मॅगी (बांग्लादेश) बसते तर मॅगी खुशाल निर्यात करावी (आहे तशी जसे अमेरिकी /पाश्चात्य देश औषधि करतात आपल्याला) व भारताला बहुमूल्य परकीय चलन प्राप्त करुन द्यावे. जाहिरातही अशीच असावी- "आम्ही खातो मॅगीशी, तुम्ही रहा/बसा उपाशी" व्यक्तिश: मॅगीवाचून काहीच न अडणारा अडाणी.

सत्याचे प्रयोग 19/08/2015 - 21:45
सनीला करतील ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर बहुतेक. मग सांगितले जाईल मॅगी खाणे शरीरास कसे चांगले आहे. माझ्या आणि बाॅबीच्या पण नास्त्यात रोज मॅगीच असते आणि हो पाकिस्तानातील कूपनलिका उघडण्यात मॅगीचीच शक्ती होती.

In reply to by सत्याचे प्रयोग

संदीप डांगे 19/08/2015 - 22:00
ओ हो देओल काय? आधी काय कनेक्शनच लागलं नाय बोवा, सनी काय बॉबी काय कूपनलिका काय. मग ड्वोक्यात ढाई किलोचा हाथ पडला.

In reply to by संदीप डांगे

अस्वस्थामा 20/08/2015 - 14:56
सनी काय बॉबी काय कूपनलिका काय. मग ड्वोक्यात ढाई किलोचा हाथ पडला
ठ्ठो...!! तुमच्यामुळे कॉफी टेबलावर सांडली आहे राव... (खरंच.!!)

In reply to by तुषार काळभोर

प्यारे१ 21/08/2015 - 11:55
ये दुनिया ये दुनिया पित्तल दी..... लेकिन मॅगी है असली सोना! जो इल्जामो की आग से निकलने के बाद और ज्यादा निखरा आया है मेरी तरह - सुश्री १००८ सनी लियोनी कहे- मॅगी लियोनी

In reply to by माम्लेदारचा पन्खा

संदीप डांगे 19/08/2015 - 21:56
हा हा हा. धमाल... मस्तच! मा. पं., प्रतिस्पर्धी चाल 'येस. बीकॉज यु फ्लश द सिस्टीम विथ कॅश.'

रातराणी 19/08/2015 - 22:49
मस्त आहेत सर्वांच्या कल्पना. माझे दोन पैसे : (यात assumption आहे की मॅगी पुन्हा त्याच रुपात [packaging] मध्ये येणार नाही, नवीन पाकीट + फूड administration चा verified असा शिक्का असेल, हे नसेल तर थोडी refine करावी लागेल आयडीया) सुरुवात मॅगीच्या जुन्या जाहिरातीनेच करायची. मुले खेळून आली आहेत आणि मम्मी भूक लगी है ओरडत येतात. ममी बस दो मिनट म्हणते आणि tvवर मुंग्या (व्यत्यय) दाखवायच्या. १ -२ सेक नंतर चित्र परत येत तेव्हा "रुकावट के लिये खेद है" अस म्हणून पुन्हा जाहिरात सुरु ( आता काही बदल) जस की मुलगा/मुलगी ममीला म्हणतो "नया मॅगीही बनाना. It has passed all tests" ममी कौतुकाने नवीन मॅगीच पाकीट उघडून ते बनवून देते आणि मुल "हम्म नया मॅगी. ये healthy भी है और मजेदार भी" म्हणत खातात. त्यांना कौतुकाने बघत ममा पुन्हा योग्य कलरच पाकीट/शिक्का बघूनच मॅगी घ्या आणि "enjoy" म्हणते.

In reply to by रातराणी

संदीप डांगे 20/08/2015 - 14:24
रातराणीताई, प्रयत्न चांगला आहे. तुम्हाला क्रीयेटीव रायटींगमधे काम करायचंय तर हे ही करता येईल. (मागे तुमच्या धाग्यावर चांगला मोठा प्रतिसाद दिला होता, पण पोस्ट करतांना मिपा गंडलं आणि मग सगळंच बारगळलं, जमलं तर परत लिहिन.) थोडं तांत्रिक बाजूबद्दलः नवीन पॅकींग सादर करणे हे पुर्वीच्या पॅकिंग व उत्पादनात समस्या होती असे मान्य करण्यासारखे आहे. या प्रसंगात 'योग्य कलर, पाकिट/शिक्का' वालं वाक्य आहे ते साधारण आपल्या उत्पादनाचं चोरून निर्मिती करत असेल तर (ड्युप्लिकेट प्रॉडक्ट्स) आवश्यक ठरेल. 'नया मॅगी पास्ड ऑल टेस्ट' हेही गोंधळ निर्माण करणारं वाक्य आहे. म्हणजे जुनं मॅगी हानीकारक होतं असा त्याचा अर्थ निघतो व नवीन तरी सुरक्षित आहे की नाही असा संभ्रम होऊन विक्रीवर परिणाम होऊ शकतो. परत 'कॅम्पेन ब्रीफ'चा विचार करून बघा आणि आणखी एक नवीन कमर्शीयल लिहा. वाचकांना वाटत असेल की 'का इतका काथ्याकूट करताय एका एका शब्दावर, आम्हाला तर हे कधीच जाणवत नाही. जाहिरात जाहिरात असते, सगळे छान छान सांगत असतात उत्पादनाबद्दल.' तर असं नाहीये. ग्राहकाच्या मानसशास्त्रानुसार फार सूक्ष्म विचार करून शब्द, प्रतिमा वापराव्या लागतात. कारण हे होणारे परिणाम अंतर्मनामधे संग्रहीत होतात व ग्राहकाच्या वागणुकीवर प्रभाव टाकतात. सूक्ष्म प्रवाहांचे ग्राहक-मानसिकतेवर परिणामाचे अ‍ॅपल उत्पादने हे सर्वोत्तम उदाहरण आहे. अ‍ॅपल कीतीही प्रसिद्ध आणि लोकप्रिय उत्पादन असले तरी पर्यावरणविरोधी, मानवाधिकारविरोधी वा तत्सम कृती अ‍ॅपलकडून घडतेय असं लक्षात आलं तर विक्रीवर परिणाम होतो. मोठ्या कंपन्यांच्या एक, दोन टक्के घसरणीनेही मोठा फरक पडतो, त्यामुळे त्या या बाबतीत फार जागरूक असतात.

In reply to by संदीप डांगे

रातराणी 20/08/2015 - 21:42
सगळे मुद्दे पटले, पण मग मलीन झालेली प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी मॅगीने नक्की काय केले हे स्पष्ट नाही होत आहे. प्रतिस्पर्धी याचा फायदा घेतील का? अजून काही सुचतं का वेगळ बघते.
आणखी एक आयडिया: "मेगी लम्हे" एक तरुण मुलगी मेगीची चाहती. खरी ग्राहक. "जब रिमझिम बारिश होती है...दिल भीग सा जाता है. जी चाहता है बिस्तर मी बैठ के आराम से भीगे दिल को सुखाऊं, उसे थोडा प्यार दू, उसे सहलाऊं...उसे चंद फुरसत के लम्हे दू.......बरसों से मेगी ने ये लम्हे खूबसूरत बनायें है...ये है मेरे खास मेगी लम्हे..." सुरुवातीला ती हे म्हणायला सुरुवात करते तेव्हा ती पडद्यावर दिसते आणि मग ती बोलत असतांना खिडकी, बाहेरचा पाऊस, खिडकीच्या काचांवर ओघळणारे थेंब दिसतात. ती गरमागरम वाफाळाणारी मेगी घेउन पलंगावर येऊन बसते. पाऊस बघत बघत खाते. पाऊस बघत बघत, खात खात बालपणीचा अल्बम बघते...आणि मग शेवटचे वाक्य निवेदक म्हणतो: मेगी लम्हे...आपके अपने, आपके अपनों के... मुलगी तरुण, एकदम फिट, सडपातळ, आकर्षक, सुंदर हसणारी असावयास हवी. अशा जाहिराती घेऊन तरुण मुलगा, लहान मुलं, एखाद्या आज्जी (आज्जी - नात रिलेशन), एखादे आजोबा (आजोबा - सून किंवा आजोबा - मुलगी - मुलीची मुलगी) (सो-कोल्ड खरे ग्राहक) अशा वेरिएशन्सची केम्पेंस करता येतील.

In reply to by समीरसूर

संदीप डांगे 20/08/2015 - 14:38
समीरजी, आधीच्या कल्पनेपेक्षा ही उत्तम बरं का! 'बरसोंसे' हा शब्द फार महत्त्वाचा. इमोशनल टचही झकास. मागे पारले-जी ने असं कॅम्पेन केलं होतं पण ते जरा अतीच झालं होतं. पारले-जीची जुनी प्रतिमा नव्या जाहिरातींतून काही भलतीच मांडली गेली. त्या जाहिरातींनी पारले-जीला अप्पर सर्किटमधे उचलण्याचा प्रयत्न केला, पण प्रॉडकट लोअर-मिडलक्लास टार्गेटेड दर्जाचं असल्याने फायदा झाला नाही. तुमच्या कल्पनेत राहीताईंनी मांडलेला मुद्दा चांगला आला आहे. लोक वाट पाहत आहेत, वर्षानुवर्षे खात आहेत. अनेक आठवणी आहेत. हे सगळं छान मांडलंय. पार्श्वनिवेदकाच्या ओळी साधारण अशा असाव्यात, 'मॅगी लम्हे, हमेशा से आपके है, हमेशा रहेंगे'

राही 20/08/2015 - 13:55
धाग्याची कल्पना आणि प्रतिसाद छानच आहेत. पण खरं तर मॅगीला जाहिरात करण्याची जरूरच नाही. लोक मॅगीची वाट पाहात आहेत. त्याऐवजी किराणादुकानदारांना जरा जास्तीचं कमिशन द्यावं मॅगी शेल्फवर आकर्षरीत्या लावण्यासाठी. जून महिन्यात जेव्हा मॅगी शेल्फवरून अदृश्य झाली तेव्हा चुकार उरल्यासुरल्या पाकिटांचा शोध घेताना आसपासच्या तीनचार दुकानदारांकडून कळले की मॅगीच्या वेष्टनावर घटकांची खरी माहिती नसते असा त्यांचा आक्षेप आहे. भारतात विकल्या जाणार्‍या बहुतेक परदेशी खाद्यप्रकारांत प्राणिज मेद असतो आणि तो ठळक लाल वर्तुळ न छापल्याने आपल्या लक्षात येत नाही असे त्यांचे म्हणणे होते. हे खरे नसेल, प्रातिनिधिक तर नाहीच नाही, पण एक साधारण कल वाटला तो लिहिला.

In reply to by राही

आनंदी गोपाळ 24/08/2015 - 20:42
भारतात विकल्या जाणार्‍या बहुतेक परदेशी खाद्यप्रकारांत प्राणिज मेद असतो आणि तो ठळक लाल वर्तुळ न छापल्याने आपल्या लक्षात येत नाही असे त्यांचे म्हणणे होते.
आपल्या रोजच्या "शाकाहारी" खाण्यातल्या "भयंकर हेल्दी" व "पॉप्युलर" प्राणीज मेदाचे नांव काय, ते सांगता येईल का?

वेल्लाभट 20/08/2015 - 15:22
उत्तम धागा. भारतात जाहिरातींच्या कंटेंट वर बरेच निर्बंध आहेत असं जाणून आहे. डांगे साहेब जास्त सांगू शकतील. उदाहरणार्थ, कोक च्या कॅन वर चढून लहान मुलगा वेंडिंग मशीन मधून पेप्सी काढतो, ही जाहिरात कंपनी आपल्याकडे दाखवू शकणार नाही. असो. बाकी विचार करायला रंजक धागा.

In reply to by वेल्लाभट

अभ्या.. 20/08/2015 - 15:32
कंटेंट वर निर्बंध तर आहेतच पण दिमाग लावून केलेल्या जाहीरातीपेक्षा बाळबोध जाहीरातींचा प्रभाव जास्त होतो भारतीय समाजमनावर. तसे प्रेक्षकाचे सरासरी वय कमीच ग्रुहीत धरलेले असते जाहीरातदारांनी ;) मुख्य म्हणजे जाहीरात किती सुंदर केलीय हा वेगळा विषय असतो अन त्या जाहीरातीचा ईंपॅक्ट काय होतोय हा वेगळा विषय. एखादी आर्टिस्टिकली अप्रतिम अ‍ॅड जर ग्राहक वळवण्यात अयशस्वी ठरत असेल तर तिचा त्या कंपनीला काही उपयोग नाही. म्हणूनच फाईनआर्ट अन कमर्शिअल आर्ट वेगळ्या शाखा आहेत.

बबन ताम्बे 20/08/2015 - 19:05
मध्यंतरी ठाण्यातील एका पाणीपुरीवाल्या भैयाला मनसेच्या लोकांनी चोप दिल्यानंतर सगळे पाणीपुरीचे ठेले ओस पडले होते. आता पुन्हा पाणीपुरी खायला गर्दी होते. काय फंडा वापरला असेल पाणीपुरी वाल्यांनी ? नेसलेने स्टडी करायला हरकत नाही :-)

प्रमोद देर्देकर 20/08/2015 - 19:31
ढुशक्लेमरःजेव ढया लोकांनी वर जाहिरत सांगितल्या आहेत त्यांना धन्यवाद. आता ह्या कल्पना मी मॅगी कंपनीला विकणार. हॅहॅहॅ २ मिनीटात मी लखपती होणार. ये धतड ततड , धतड ततड

आदूबाळ 20/08/2015 - 21:01
चौकाचौकात फ्लेक्ष लावावेत. ..एकच फाईट, बंदी घालणारे टाईट ..बघतोस काय रागानं, बंदी उठवलीय वाघानं ..जमीन विकली बागेची, गाडी घेतली मॅगीची .. वगैरे
एक ७-८ वर्षांचा मुलगा खेळून घरी येतो.. त्याचे आजोबा निघाले आहेत...(जे मोदीजींसारखे दिसतात!) आई खुणेनेच मुलाला नमस्कार करायला सांगते.. मुलगाही लगेच..न कुरकुरता नमस्कार करतो. आजोबा त्याच्या डोक्यावर प्रेमळ हात फिरवत त्याला मॅगीचा 4's pack देतात.. Tagline: दो मिनिट के संस्कार, बरसोंका आधार..

श्रीरंग_जोशी 21/08/2015 - 10:05
रोचक विषय अन धमाल प्रतिसाद. बहुधा नेटवर्क मार्केटिंगवाल्यांचा एक हिंदीत डब केलेला व्हिडिओ पाहिला होता. एक विदेशी जे महिला सांगत असते त्यावरून सुचंलेलं काही... मै बहोत उदास रहती थी. मेरी जिंदगी मे कुछ नही हो रहा था. मेरे पती और बच्चे भी मुझसे ठीकसे बात नही करते थे. एक दीन मैने बाजार ने मैगी लायी. मैगी खातेही मेरा परिवार खुशियों से झूम उठा. मेरे पतीने बिझनेस मे तरक्की की, मेरे बच्चो ने पढाई और खेलकुदमें तरक्की की. आज हम सब बहोत खुश है और रोज मैगी खाते है. इ लोवे योउ मैगी :-) .

In reply to by श्रीरंग_जोशी

सुनील पाल नामक कॉमेडीयनने सेम असाच प्रसंग वर्णन केला होता ना ओ ? ६-७ वर्षांपूर्वी ….

In reply to by पगला गजोधर

श्रीरंग_जोशी 21/08/2015 - 19:01
सुनील पाल यांचा मी खूप मोठा पंखा आहे. तुम्ही म्हणताय तो व्हिडिओ पूर्वी पाहिला नाही. आता शोधून पाहतो. नाम है हमरा रतन नुरा, औ काम करता हूं खतम पुरा.

ऋतुराज चित्रे 21/08/2015 - 14:27
माझ्यामते नेस्ले कंपनीला मॅगीचे पुनरागमन करताना नवीन जाहिरात करावी लागणार नाही. अशाच प्रकारच्या आरोपांतून मुक्त झाल्यावर संबंधीत कंपन्यानी जाहीरातीत कसे व का बदल केले ते पाहु. १) कॅडबरी कंपनीच्या चॉकलेटमध्ये अळ्या आढळल्यावर कंपनीने चॉकलेटच्या वेष्ठणात बदल करुन अमिताभला जाहिरातीत घेऊन आपल्या उत्पादनाप्रती ग्राहकांमध्ये विश्वास संपादन करण्यात यश मिळवले. २) मागे जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरमध्ये कर्करोग निर्माण करणारे घटक (ईथिलीन ऑक्साईड) आढळले होते. कंपनी पावडर निर्जंतुकिकरणासाठी ईथिलीन ऑक्साईडचा वापर करत असे. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने कंपनिचा बेबी पावडर बनविण्याचा परवाना रद्द केला होता. मुम्बई उच्च न्यायालयाने कंपनिच्या बाजुने निर्णय दिल्यावरही फारसा गाजावाजा न करता मुम्बईतील इंग्रजी वृत्तपत्रांत जाहीरात देताना मागील घटनेचा उल्लेख न करता फक्त वृतपत्राच्या कागदाला बेबी पावडरचा गंध फवारला, ह्या वासामुळे नकळत ग्राहकाच्या बेबी पावडरविषयीच्या स्मृती जागरुक झाल्या. बस्स इतकेच केले. वर उल्लेख केलेल्या दोन्ही नामांकीत कपन्या आहेत. त्यांचे उत्पादनही लोकप्रिय आहे. ग्राहकाच्या आरोग्यास धोका पोहोचेल असे दोन्हीही उत्पादनात आढळले होते. मेहनतीने बनवलेल्या ब्रँडची नाचक्की तर होणारच होती. परंतु पुनरागामन करताना दोन्ही कंपनींनी आपला ब्रँड जपत ग्राहकांशी संवाद वेगवेगळ्या पद्धतीने साधला. कॅडबरी कंपनीने आपली चुक मान्य करुन पॅकेजींगमध्ये सुधारणा केल्याचे जहिरातीत स्पष्ट केले. जॉन्सन अ‍ॅड जॉन्सन कंपनीने आपल्या उत्पादनातील 'तो' घटक नसल्याची जाहीरात न करता ग्राहकाच्या स्मृती जागृत केल्या. दोन्ही कंपन्यांनी अशा पद्धतीने जाहिरात करण्यामागे येथील ग्राहकाची आपल्या आरोग्याबाबतीत असलेली अर्धवट जागरुकता. जर चॉकलेटातील अळी पोटात गेली तर त्रास होणार हे ग्राहकाला माहीत असल्यामुळे कंपनीला चुक मान्य करावी लागली. आतापर्यंत पावडरमध्ये असा घातक घटक आहे हे ग्राहकाला माहित नसल्यामुळे उत्पादन कंपनी ग्राहकाच्या जीवाशी खेळु शकली. अन्न आणि औषध प्रशासनाने दाखविलेल्या जागरुकतेमुळे कंपनीने पावडरच्या निर्जंतुकिकरणात बदल करुन तो आरोग्यास अपायकारक घटक काढुन टाकला. परंतु हा केलेला बदल ग्राहकाला सांगण्याची गरज कंपनीला वाटली नाही. अदृश्य असे घातक घटक असलेल्या उत्पादनांमुळे शरिरावर दुरगामी घातक परिणाम होतात हे माहीत असुनही भारतातील ग्राहक अशी उत्पादने खरेदी करतो. उदा सिगारेट व दारू. ह्याउलट शुद्ध पाण्याविषयी आपल्याकडे जागरुकता कमी व गैरसमजच जास्त आहेत. सर्वसाधारणपणे आपल्याकडे नितळ पाणी शुद्ध समजले जाते, भले त्यात डोळ्याने न दिसणारे शरिराला घातक असे जिवाणु असले तरी. RO च्या पाण्याला नाके मुरडणारे लोकं येथे आहेत. आम्ही कोणत्याही फिल्टरने शुद्ध केलेले पाणी पीत नाही, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी शरिराला सवय झाली पाहीजे साध्या पाण्याची, असा ह्यांचा हट्ट. कदाचीत रोगजंतूप्रती प्रतिकारशक्ती वाढेलही, परंतू शरिराला अपायकारक असे पाण्यात विरघळलेल्या विषारी घटकांप्रती शरीर कशी प्रतिकारशक्ती निर्माण करू शकेल? असे विषारी घटक शरीराबाहेर फेकण्याचे काम किडनी करते. अशा विषारी घटकांमुळे किडनी निकामी होऊन शरिराचे अनेक अवयव निकामी होउ शकतात. अशी अडाणी लोकं ह्या देशात असल्यामुळे ह्या कंपन्यांचे फावते. पेस्टीसाइड्स असलेल्या शीतपेयांचे सेवन करण्यात आपल्याला कोणताही धोका वाटत नाही, परंतु घातक घटक असलेले उत्पादन आपल्याला विकणार्‍या कंपनीच्या भविष्याची मात्र काळजी करत बसतो.

In reply to by ऋतुराज चित्रे

संदीप डांगे 21/08/2015 - 17:03
चित्रे साहेब, प्रतिसादाबद्दल धन्यवाद! आपल्याला धाग्याचा उद्देश लक्षात आला नाही असं आपल्या प्रतिसादावर जाणवतंय. हा धागा एक कल्पनारंजन आहे. मिसळपाव ही एक मोठ्ठी अ‍ॅडएजंसी आहे असे कल्पून नेस्ले त्यांचे मॅगी हे उत्पादन व ती समस्या घेऊन आपल्याकडे आले तर आपण त्यांना काय कल्पना, उपाय देऊ असा टैमपासा धागा आहे. इथे फार गंभीर आणि तत्त्वज्ञानीय विचारांची आवश्यकता नाहीये. मॅगी चांगलं का वाईट, कंपन्या कशा फसवणूक करतात हे विचार एक जाहिरात एजंसी म्हणून कॅम्पसच्या बाहेरच ठेवावे लागतात. त्याबाबतीत विचार करणार्‍या एनजीओज असतात आणि त्या त्यांचं काम इमानेइतबारे करत असतात. ज्या क्लायंटवर माझं पोट अवलंबून आहे त्याच्याच मीटींगमधे मी ते लोक कसे चुकीचं काम करतायत असं सांगणं व्यावसायिकपणाला धरून नाही. असो. आता उर्वरित प्रतिसादावर उत्तरः
माझ्यामते नेस्ले कंपनीला मॅगीचे पुनरागमन करताना नवीन जाहिरात करावी लागणार नाही.
करावीच लागेल. काहीतरी नोंद घेतलीये हे त्यांच्या कृतीतून दाखवावं लागेल. ब्रँड रेपुटेशन मॅनेजमेंट वा प्रतिमा संवर्धन बद्दल अधिक माहिती व आवश्यकता विषद करणारा हा एक लेख. वित्तिय जगातही ह्याबद्दल काय चर्चा सुरू आहे ते वाचा इथे.
१) कॅडबरी कंपनीच्या चॉकलेटमध्ये अळ्या आढळल्यावर कंपनीने चॉकलेटच्या वेष्ठणात बदल करुन अमिताभला जाहिरातीत घेऊन आपल्या उत्पादनाप्रती ग्राहकांमध्ये विश्वास संपादन करण्यात यश मिळवले.
एखादं कोडं सोडवल्यावर ते किती सोपं होतं हे लक्षात येतं त्याआधी नाही. तस्मात कॅडबरीने काढलेला मार्ग हा दिवसरात्र डोकं लढवून काळजीपूर्वक नीती आखून योग्य पद्धतीने अंमलबजावणी केलेला प्रकल्प आहे. प्रसिद्ध झाल्यावर तो कीत्त्ती सोपा आहे असं आपल्याला वाटत असतं. त्या अ‍ॅड-कॅम्पेन आधी कॅडबरीतही बरेचसे वातावरण असेच होते जसे आज मॅगीत आहे. याबद्दल सविस्तर इथे वाचायला मिळेल.
२) मागे जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरमध्ये कर्करोग निर्माण करणारे घटक (ईथिलीन ऑक्साईड) आढळले होते. कंपनी पावडर निर्जंतचित्रकिकरणासाठी ईथिलीन ऑक्साईडचा वापर करत असे. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने कंपनिचा बेबी पावडर बनविण्याचा परवाना रद्द केला होता. मुम्बई उच्च न्यायालयाने कंपनिच्या बाजुने निर्णय दिल्यावरही फारसा गाजावाजा न करता मुम्बईतील इंग्रजी वृत्तपत्रांत जाहीरात देताना मागील घटनेचा उल्लेख न करता फक्त वृतपत्राच्या कागदाला बेबी पावडरचा गंध फवारला, ह्या वासामुळे नकळत ग्राहकाच्या बेबी पावडरविषयीच्या स्मृती जागरुक झाल्या. बस्स इतकेच केले.
मुळात जे अँड जे च्या उत्पादनांच्या समस्यांबद्दल मॅगी किंवा कॅडबरी इतकी प्रसिद्धी झाली नाही. एकतर त्याचं टार्गेट ग्राहक हे सतत बदलते आहेत. कायमस्वरूपी नाहीत. साधारण वय वर्षे ० ते ४ पर्यंतच्या मुलांसाठी ही उत्पादने वापरली जातात. त्याआधी किंवा नंतर नाही. त्यामुळे ग्राहक वर्ग मॅगी किंवा कॅडबरीसारखा सर्वसमावेशक नाही (युनिवर्सल रीच). त्यामुळे जॉन्सन्स विरूद्धचा मामला एवढा गाजलाच नाही तर त्याविरूद्ध जाहिराती करून कमी झालेलं नुकसान अजून वाढवून घ्यायचं नसेल. याबद्दल वाचनीय असा एक रीपोर्ट
वर उल्लेख केलेल्या दोन्ही नामांकीत कपन्या आहेत. त्यांचे उत्पादनही लोकप्रिय आहे. ग्राहकाच्या आरोग्यास धोका पोहोचेल असे दोन्हीही उत्पादनात आढळले होते. मेहनतीने बनवलेल्या ब्रँडची नाचक्की तर होणारच होती. परंतु पुनरागामन करताना दोन्ही कंपनींनी आपला ब्रँड जपत ग्राहकांशी संवाद वेगवेगळ्या पद्धतीने साधला. कॅडबरी कंपनीने आपली चुक मान्य करुन पॅकेजींगमध्ये सुधारणा केल्याचे जहिरातीत स्पष्ट केले. जॉन्सन अ‍ॅड जॉन्सन कंपनीने आपल्या उत्पादनातील 'तो' घटक नसल्याची जाहीरात न करता ग्राहकाच्या स्मृती जागृत केल्या.
तुमची विधानं अंतर्विरोधी आहेत असं वाटत नाहीये का? जाहिरात करायची आवश्यकता नाही असं विधान आणि केली आहे याची उदाहरणे देत आहात.
दोन्ही कंपन्यांनी अशा पद्धतीने जाहिरात करण्यामागे येथील ग्राहकाची आपल्या आरोग्याबाबतीत असलेली अर्धवट जागरुकता. जर चॉकलेटातील अळी पोटात गेली तर त्रास होणार हे ग्राहकाला माहीत असल्यामुळे कंपनीला चुक मान्य करावी लागली.
चूक मान्य करावी लागली यामागे दोन कारणे होती आणि ती भयंकर प्रबळ होती. एक म्हणजे कॅडबरीच्या पॅकींगमधे स्पष्ट दोष होतेच. तो मुद्दा वादातीतच होता. दुसरा आणि प्रचंड महत्त्वाचा मुद्दा की विक्री झपाट्याने घटली.
आतापर्यंत पावडरमध्ये असा घातक घटक आहे हे ग्राहकाला माहित नसल्यामुळे उत्पादन कंपनी ग्राहकाच्या जीवाशी खेळु शकली. अन्न आणि औषध प्रशासनाने दाखविलेल्या जागरुकतेमुळे कंपनीने पावडरच्या निर्जंतुकिकरणात बदल करुन तो आरोग्यास अपायकारक घटक काढुन टाकला. परंतु हा केलेला बदल ग्राहकाला सांगण्याची गरज कंपनीला वाटली नाही.
याबद्दल वरच लिहिले आहे. जर घातक घटकांबद्दल पुरेशी प्रसिद्धीच झाली नसेल तर त्याबद्दल जाहिरात करुन आ बैल मुझे मार करण्यात काही हशील नाही.
अदृश्य असे घातक घटक असलेल्या उत्पादनांमुळे शरिरावर दुरगामी घातक परिणाम होतात हे माहीत असुनही भारतातील ग्राहक अशी उत्पादने खरेदी करतो. उदा सिगारेट व दारू.
भारतातीलच ग्राहक का? जगात सगळेच असली उत्पादनं घेत आहेत आणि वापरत आहेत. अमेरिकेत मॅक्डी विरूद्ध ओबेसिटी लॉ-सूट्स ची लाइन लागली आहे. तरीही मॅक्डीची दुकाने चालूच आहेत की नाही? सिलेक्टीवली भारतीय ग्राहकांनाच मूर्ख संबोधण्याचा प्रयत्न कशासाठी?
ह्याउलट शुद्ध पाण्याविषयी आपल्याकडे जागरुकता कमी व गैरसमजच जास्त आहेत. सर्वसाधारणपणे आपल्याकडे नितळ पाणी शुद्ध समजले जाते, भले त्यात डोळ्याने न दिसणारे शरिराला घातक असे जिवाणु असले तरी. RO च्या पाण्याला नाके मुरडणारे लोकं येथे आहेत. आम्ही कोणत्याही फिल्टरने शुद्ध केलेले पाणी पीत नाही, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी शरिराला सवय झाली पाहीजे साध्या पाण्याची, असा ह्यांचा हट्ट. कदाचीत रोगजंतूप्रती प्रतिकारशक्ती वाढेलही, परंतू शरिराला अपायकारक असे पाण्यात विरघळलेल्या विषारी घटकांप्रती शरीर कशी प्रतिकारशक्ती निर्माण करू शकेल? असे विषारी घटक शरीराबाहेर फेकण्याचे काम किडनी करते. अशा विषारी घटकांमुळे किडनी निकामी होऊन शरिराचे अनेक अवयव निकामी होउ शकतात. अशी अडाणी लोकं ह्या देशात असल्यामुळे ह्या कंपन्यांचे फावते.
उपरोक्त परिच्छेद माझ्या दुसर्‍या एका धाग्यावरील प्रतिसादाच्या संदर्भाने मांडला नाहीये अशी अपेक्षा करतो. कारण पाण्याविषयी ही माझी मते आहेत. व त्याविरूद्ध तुम्ही व्यक्तिगत काही मांडत नाही आहात अशी ही आशा धरतो. कारण काहीतरी अर्धवट वाचून काहीही अर्थ काढून काहीही विधानं करायची सद्यस्थितीत टूम निघाली आहे. जागरूकता कमी व गैरसमज जास्त हे फारच सरसकट विधान आहे. आरओ वापरणार्‍यांबद्दल मीही म्हणून शकतो की ज्ञान कमी आणि भीतीच जास्त. विषारी घटकांमुळे किडनी निकामी होऊन शरिराचे अनेक अवयव निकामी होउ शकतात. या वाक्यातल्या शकतात ह्या शब्दातून ही भीतीच प्रसारित करण्याचे काम सुरू आहे असे वाटत नाहीये का? भारतात आर ओ वापरणार्‍यांपेक्षा न वापरणारांची संख्या प्रचंड आहे, त्यांचे नेमके आरओ न वापरल्याने काय बिघडले याचा काही विदा आहे का? असे होऊ शकते, तसे होऊ शकते अशी विधाने वापरून वैज्ञानिक सत्यांना तोडून मोडून मांडून आपण फार वैज्ञानिक आणि मॉडर्न आहोत असा आव आणू शकतो पण अभ्यास आणि कॉमनसेन्सचं काय? आर ओ न वापाणार्‍यांना सरसकट अडाणी म्हणून तुम्ही स्वतःही तसाच आव आणत आहात असे नाहीये का? शुद्ध पाणी याविषयावर त्याच धाग्यावर योग्य ते स्पष्टीकरण दिले आहे ते तिथेच वाचावे अशी विनंती. पेस्टीसाइड्स असलेल्या शीतपेयांचे सेवन करण्यात आपल्याला कोणताही धोका वाटत नाही, परंतु घातक घटक असलेले उत्पादन आपल्याला विकणार्‍या कंपनीच्या भविष्याची मात्र काळजी करत बसतो. हे ही एक अंतर्विरोधी विधान. याचा जरा विस्तार विश्लेषण करता काय? ज्यांना पेस्टीसाईड पिण्यात धोका वाटत नाही त्यांना घातक घटक असलेल्या उत्पादनांची काळजी करण्यात काय नेमकं वाटलं पाहिजे असं तुमचं मत आहे? तुमच्या प्रतिसादाने अगदी असं वाटलं जणू ब्रीटीश पेट्रोलियमच्या ब्रँड रीकवरी मीटींगमधे अचानक ग्रीनपीसचा कार्यकर्ता येऊन घोषणा द्यायला लागलाय. ;-) अ‍ॅड एजन्सीचे काम क्लायंटच्या ब्रीफनुसार जाहिरात तयार करणे आहे. क्लायंटच कसा फ्रॉड आहे हे उगाळत बसणे नाही. भारतातल्या वा जगातल्या सगळ्या अ‍ॅड एजन्सीजने फक्त एक आठवड्यासाठी 'केवळ सत्य' अशी एखादी मोहीम करून ज्या ज्या ब्रँडच्या जाहिराती ते करतायत त्यांचे बुरखे फाडण्याचा कार्यक्रम आखला तर. एक आठवड्यानंतर सगळ्या एजन्सीजना दुकान बंद करून घरी बसावे लागेल. जगातल्या सगळ्याच दुकानदारांसकट. त्यामुळे एनजीओ, मानवाधिकार आणि सरकारला त्यांचे काम करू द्या. आपण आपले. (जाहिरात बनवण्याचे काम करूया) तुम्हाला इथली कार्यपद्धती पसंत नसेल तर नोकरी सोडून जाऊ शकता. (मिपाभाषेत: आम्ही इथे मनोरंजनासाठी जमलोय तर उगाच धाग्याचे काश्मीर करू नका)

ऋतुराज चित्रे 21/08/2015 - 20:59
आपल्याला धाग्याचा उद्देश लक्षात आला नाही असं आपल्या प्रतिसादावर जाणवतंय. मान्य. माझ्यामते नेस्ले कंपनीला मॅगीचे पुनरागमन करताना नवीन जाहिरात करावी लागणार नाही. कारण अतिशय लोकप्रिय उत्पादन आणि अनेक वर्ष बाजारात असुनही ग्राहकांची तक्रार नसल्याने कंपनी ग्राहकांच्या ह्या मानसिकतेचा फायदा घेइल. उद्या हे उत्पादन बाजारात आल्यास खरेदिसाठी लोकांच्या उड्या पडतील. तुमची विधानं अंतर्विरोधी आहेत असं वाटत नाहीये का? जाहिरात करायची आवश्यकता नाही असं विधान आणि केली आहे याची उदाहरणे देत आहात. नाही. मी ते नेस्लेच्या बाबतीत म्ह्टले होते. कॅडबरीने फक्त बदल केला. जॉन्सन अँड जॉन्सनने छापील जाहिरातीत काहीही बदल केला नाही. का ते प्रतिसादात सांगितले आहे भारतातीलच ग्राहक का? जगात सगळेच असली उत्पादनं घेत आहेत आणि वापरत आहेत. मी भारतातील ग्राहकांच्या मानसिकतेबद्दल लिहित असल्यामुळे ती चुक झाली. उपरोक्त परिच्छेद माझ्या दुसर्‍या एका धाग्यावरील प्रतिसादाच्या संदर्भाने मांडला नाहीये अशी अपेक्षा करतो. कारण पाण्याविषयी ही माझी मते आहेत. व त्याविरूद्ध तुम्ही व्यक्तिगत काही मांडत नाही आहात अशी ही आशा धरतो व्यक्तिगत अजिबात नाही. गैरसमज करुन घेऊ नका. विषारी घटकांमुळे किडनी निकामी होऊन शरिराचे अनेक अवयव निकामी होउ शकतात. या वाक्यातल्या शकतात ह्या शब्दातून ही भीतीच प्रसारित करण्याचे काम सुरू आहे असे वाटत नाहीये का? जाऊ द्या ह्याविषयी खुप काही सांगता येईल. पण येथे नको. (मिपाभाषेत: आम्ही इथे मनोरंजनासाठी जमलोय तर उगाच धाग्याचे काश्मीर करू नका) ठिक आहे. माझे ह्या धाग्यावरील प्रतिसाद काढुन टाकले तरी चालेल.

काळा पहाड 22/08/2015 - 17:32
मॅगी बाजारातलं पुनरागमन अत्यंत धडाक्यानं आणि आक्रमक पणे करेल. त्यासाठी नवा ब्रँड अम्बॅसॅडर असेल. (बहुधा सलमान किंवा दीपिका? कारण मला दुसरा चेहरा दिसत नाहीये. कदाचित सचिन सुद्धा!) जुन्या अ‍ॅडव्हर्टाईजेस आणि जुन्या पॅकिंग ला तिलांजली दिली जाईल आणि बहुधा अ‍ॅडव्हर्टाईजेस चा मारा केला जाईल. टीव्हीवर चर्चा घडवल्या जातील. (नवीन मॅगी किती विश्वासकारक, इत्यादी). नवीन टॅग लाईन असेल. "तुमची नवीन मॅगी आता सर्व चाचण्या पास करून जुन्याच चवीसह" अशा प्रकारची. चवीत बदल केला जाणार नाही.

बाबा योगिराज 22/08/2015 - 17:46
कालच सनफिस्ट यीप्पीची जहिरात बघितली. केवळ आमचेच नुड्लस कसे चांगले आहेत या विषया भोवती जाहिरात फिरते. उत्पादन प्रक्रिया दाखवत आहेत, एफ. डी. ए. च्या प्रमाणपत्राचा उल्लेख केला जातोय. एकंदरीत बाजारातील रिक्त जागेवर कब्ज़ा करण्या साठी इतर कंपन्या सर्सावल्यात.

मदनबाण 23/08/2015 - 10:04
मी यीप्पी आणि नॉरवाल्यांची नुडल्स हादडुन पाहिलीत, त्यात नॉरची चव आवडली, तर यीप्पीची चव रद्दड वाटली... बाकी मॅगीसाठी नेस्टलेवाले काय जाहिरात करतील ते पहावयास हवे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Nancy Ajram - Ah We Noss / نانسى عجرم - آه ونص

In reply to by मदनबाण

अभ्या.. 23/08/2015 - 11:42
होय रे बाणा. यीप्पी भंगार आहे. आयटीसीवाले फक्त पॅकेजिंग,मार्केटिंग अन डंपिंगला शाणे आहेत. नॉरचे सुप्पी टेस्टी आहेत पण मिळत नाहीत सर्वत्र. :(

In reply to by संदीप डांगे

अभ्या.. 24/08/2015 - 19:28
आता फक्त जनरल पब्लिकच्या मॅगीशी अ‍ॅटॅचमेंटवर अ‍ॅड येतील. त्यांनी हा फंडा पॅकींगवर वापरला होता आता तो सगळीकडे वापरतील. मॅगी आयुष्यातल्या कुठल्या रिकाम्या जागा भरत होते ते जास्त डॉमिनेट केले जाईल.
. . का बोले थे हम? यही ना?