नमस्कार मंडळी,
नेहमीच्या काथ्याकूटांच्या लढायांतून वेळ काढूया (हे मी स्वतःला बजावतोय, गैरसमज नको ;-) ). आणि काहीतरी धमाल आणि डोकेबाज करण्याचा प्रयत्न करूया.
मॅगीवरील बंदी माननीय न्यायालयाने उठवली आहे. खटला अजून संपला नाही पण आतापर्यंत उपलब्ध बातमी नुसार मॅगी परत विक्रीस येणार आहे असं खात्रीलायक वाटत आहे. ह्या सगळ्या परिस्थितीत जाहिरात जगतात एक कुतूहल लागून राहलंय की मॅगीचं पुनरागमन नक्की कसं असेल? काय करतील नेस्ले आणि त्यांचे ब्रँड मॅनेजर? नुसता जाहिरातींचा मारा करून प्रश्न सुटणार नाही. त्यांना काहीतरी ठोस आणि मौल्यवान असा संदेश द्यायला लागेल.
"वी आर सेफ - आमचं उत्पादन सुरक्षित आहे" असं म्हणून चालणार नाही. कारण फक्त 'भूक भागवणे' ह्या अतिशय बेसिक विचारापासून आजची अन्नपदार्थ-उत्पादने पार पुढे जाऊन 'हेल्दी' म्हणजे 'आरोग्यदायी' आहोत असा (तद्दन खोटा) प्रचार करत आहेत. या परिस्थितीत 'खायला सुरक्षित' अशी प्रतिमा जास्त नुकसान करणारी आणि शंभर युगं मागं ढकलणारी ठरेल. सेलीब्रीटी वापरून उपयोग नाही कारण आधीच त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह आहे. मॅगीचे पुनरागमन कोक आणि कॅडबरीइतके सोपे कधीच नसणार कारण हे उत्पादन समाजाच्या सर्व स्तरांमधे, वर्गांमधे सारखेच लोकप्रिय होते. त्याचा एक लाइफस्टाइल प्रॉडक्ट पेक्षा जीवनावश्यक वस्तू म्हणून वापर होता. त्यामुळे आता फारच जपून पावलं टाकावी लागणार आहेत.
मॅगीने काहीही कॅम्पेन केलं तरी प्रतिस्पर्धी -सन्फिस्ट, चिंग्स, आयटीसी, इत्यादी- त्याची हवा काढायला टपलेलेच असणार. आपल्या जाहिरातींमधून त्यांच्या टिकाटिप्पणीला खाद्य मिळू नये अशीही काळजी घ्यायला लागणार.
मित्रांनो, एका जाहिराततज्ञासाठी ही एक खरंच आव्हानात्मक परिस्थिती आहे. तसंच कल्पक डोक्याच्या लोकांसाठी पुरेपूर खाद्य आहे. मॅगी अनेकांच्या जीवाभावाची आहे. तर अशा मॅगीसाठी जाहिरात मोहिम काय असावी यावर आपल्याला काथ्याकूट करायचा आहे. ब्रँडबद्दल तुम्हाला माहिती आहे, त्याच्या समस्येबद्दलही माहिती झालेच आहे. जाहिरात कंपन्या ज्याप्रकारे काम करतात त्यातला ५०% टक्के भाग तुमच्या हातात आलेला आहे. आता हा प्रश्न सोडवायचा आहे. तर येऊद्या एकएक भन्नाट कल्पना. वेळोवेळी जाहिरात एजंसी व नेस्ले तुमच्या कल्पनेवर कशी प्रतिक्रिया देऊ शकतात याचे मार्गदर्शन मी करेन. त्यासोबतच काही कल्पना राबवतांना येणारे अडथळे आणि समस्याही मांडेन. म्हणजे जाहिरात एजंसीचे कार्य कसे चालते हेही आपल्याला लक्षात येइल. मनोरंजन + माहिती असा दुहेरी उद्देश आहे या धाग्याचा.
तुम्हाला काय करायचंयः
१. ग्राहक दृष्टिकोणासंबंधी टिप्प्णी देऊ शकता.
उदा. मुलांना मॅगी देण्याची आयांची वेळ साधारण दुपारनंतरची असते. भारतीयांना गोर्या रंगाबद्दल अवास्तव आकर्षण आहे. खेळतांना अचानक थकवा जाणवायला लागल्यावर काहीतरी पेय प्यावेसे वाटते.
२. सिंगल लाइन नॅरेटीव - एका वाक्यात स्पष्ट होणारे धोरण, विचार - देऊ शकता.
उदा. फेअरअँडलवलीने उजळपणा येतो, बूस्ट प्यायल्याने मरगळ झटकून अचानक शक्ती येते,
३. प्रत्यक्ष जाहिरात - टीवी कमर्शीयल किंवा इतर कोणतेही पारंपरिक माध्यम - कशी असेल त्याची स्क्रिप्ट - पटकथा लिहू शकता.
उदा.: मेलोडी इतनी चॉकलेटी क्युं है असं विचारणारे वेगवेगळे प्रसंग लिहिणे, कोकच्या थंडा मतलब कोकाकोला हे दाखवणारे प्रसंग लिहिणे,
४. पारंपरिक माध्यमांशिवाय लोकांमधे जनजागृती करण्याचे नवीन फंडे सांगू शकता.
उदा. महिन्द्रा त्यांच्या स्कॉर्पीओ आणि तत्सम एसयुव्ही चा दमदारपण व उपयुक्तता पटवून देण्यासाठी मोटरशोजमधे कृत्रीम ऑफरोड ट्रॅक तयार करून लोकांना प्रत्यक्ष टेस्ट ड्राइव देतात.
५. एखाद्या सदस्याने सादर केलेली कल्पना प्रतिस्पर्धी कंपनी कशा पद्धतीने हाताळेल याचीही कल्पन देऊ शकता.
उदा.: जॅग्वारने मर्सिडीजच्या कोंबडीची काढलेली पिसं. त्यावर मर्सीडीजचे उत्तर.
मग करताय ना मदत मॅगीला परतायला...?
(हो. दिस्क्लेमर राहिलेच. : ही कुठल्याही पद्धतीने मॅगीची जाहिरात नाहीये. मिपा किंवा संदीप डांगे ही व्यक्ती कुठल्याही प्रकारे मॅगीशी संबंधीत नाही. हा फक्त मनोरंजनासाठी (ब्रेनस्टॉर्मींग-रोलप्ले) साठी काढलेला धागा आहे. मार्केटींग नाही. इच्छुक या धाग्यावर बिन्दास्त मॅगीची पिसंही काढू शकतात.)
वाचने
16379
प्रतिक्रिया
70
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त धागा संदीपराव.
खूप छान धागा.
आयड्या सांगायला हरकत नै, पण
घंटा
In reply to आयड्या सांगायला हरकत नै, पण by अत्रुप्त आत्मा
>>> मग मारलं फाट्यावर...
In reply to घंटा by कपिलमुनी
उपासाची मॅगी.
बॉलीवूड स्टाईल . सगळे लोक
उपयुक्तता
बापरे तुमचा प्रतिसाद वाचूनच
In reply to उपयुक्तता by राही
१+
In reply to उपयुक्तता by राही
भुकेला मॅगी आणि निजेला स्लीपिंग बॅग अशी नवी म्हण बनू शकते.हा हा हा. येक लम्बर......चपखल प्रतिसाद
In reply to उपयुक्तता by राही
जाहीरात
मस्त हो मुनिवर..
In reply to जाहीरात by कपिलमुनी
जाहिरात
हे छानच आहे. धन्यवाद! :-)
In reply to जाहिरात by समीरसूर
मस्तं.
In reply to जाहिरात by समीरसूर
रोचक धागा आणि प्रतिसाद.
जाहिरातीतील गृहिणीची जागा
In reply to रोचक धागा आणि प्रतिसाद. by मधुरा देशपांडे
हाहाहा. :) मानधन ठरलंय हो
In reply to जाहिरातीतील गृहिणीची जागा by डॉ सुहास म्हात्रे
संदीपराव इकडे कान करा ….
जब्बर
In reply to संदीपराव इकडे कान करा …. by पगला गजोधर
वरवर हे ठीक वाटले तरी
In reply to संदीपराव इकडे कान करा …. by पगला गजोधर
ऐला एवढी मेहेनत घेतली होती पुढे काय करायचं त्याची,
In reply to वरवर हे ठीक वाटले तरी by डॉ सुहास म्हात्रे
कधी येणार त्याची वाट पहातोय.
:)
ब्रँडच्या प्रतिमेचा प्रश्न
In reply to :) by मी-सौरभ
पुनरागमन जोरदार होणार यात
श्रीरंगजी,
In reply to पुनरागमन जोरदार होणार यात by श्रीरंग
चांगले प्रतिसाद..
अय्या कोमल जी !
In reply to चांगले प्रतिसाद.. by कोमल
अहो काय हे?
In reply to अय्या कोमल जी ! by इरसाल
जोशी वाडा, सदशिव पेठ, पुणे-३०
In reply to अय्या कोमल जी ! by इरसाल
मस्त धागा आणि अभ्या,समीरसूर
निर्यात
सनीला करतील ब्रॅण्ड अॅम्बेसिडर बहुतेक
ओ हो देओल काय?
In reply to सनीला करतील ब्रॅण्ड अॅम्बेसिडर बहुतेक by सत्याचे प्रयोग
सनी काय बॉबी काय कूपनलिका काय
In reply to ओ हो देओल काय? by संदीप डांगे
ओ हो देओल काय?
In reply to ओ हो देओल काय? by संदीप डांगे
ये दुनिया ये दुनिया पित्तल दी
In reply to ओ हो देओल काय? by तुषार काळभोर
मॅगीची नवीन टॅगलाईन अशी असेल....
हा हा हा. धमाल... मस्तच! मा.
In reply to मॅगीची नवीन टॅगलाईन अशी असेल.... by माम्लेदारचा पन्खा
मस्त आहेत सर्वांच्या कल्पना.
रातराणीताई,
In reply to मस्त आहेत सर्वांच्या कल्पना. by रातराणी
सगळे मुद्दे पटले, पण मग मलीन
In reply to रातराणीताई, by संदीप डांगे
मेगी लम्हे...आपके अपने, आपके अपनों के
समीरजी,
In reply to मेगी लम्हे...आपके अपने, आपके अपनों के by समीरसूर
जाहिरातीची जरूरच नाही.
एक गंमत ठाऊकेय का?
In reply to जाहिरातीची जरूरच नाही. by राही
तूप ...????
In reply to एक गंमत ठाऊकेय का? by आनंदी गोपाळ
उत्तम धागा.
कंटेंट वर निर्बंध तर आहेतच पण
In reply to उत्तम धागा. by वेल्लाभट
ठाण्याच्या भैयाची पाणीपुरी..
ढुशक्लेमरःजेव ढया लोकांनी वर
what if this could have been
In reply to ढुशक्लेमरःजेव ढया लोकांनी वर by प्रमोद देर्देकर
चौकाचौकात फ्लेक्ष लावावेत.
एक ७-८ वर्षांचा मुलगा खेळून
रोचक विषय अन धमाल प्रतिसाद
मै बहोत उदास रहती थी. मेरी जिंदगी मे कुछ नही हो रहा था....
In reply to रोचक विषय अन धमाल प्रतिसाद by श्रीरंग_जोशी
सुनील पाल
In reply to मै बहोत उदास रहती थी. मेरी जिंदगी मे कुछ नही हो रहा था.... by पगला गजोधर
search for
In reply to सुनील पाल by श्रीरंग_जोशी
माझ्यामते नेस्ले कंपनीला
चित्रे साहेब,
In reply to माझ्यामते नेस्ले कंपनीला by ऋतुराज चित्रे
मान्य.
मॅगी बाजारातलं पुनरागमन
सनफिस्ट यीप्पी......
मी यीप्पी आणि नॉरवाल्यांची
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nancy Ajram - Ah We Noss / نانسى عجرم - آه ونصहोय रे बाणा.
In reply to मी यीप्पी आणि नॉरवाल्यांची by मदनबाण
नवी जाहिरात
आता फक्त जनरल पब्लिकच्या
In reply to नवी जाहिरात by संदीप डांगे
हाव ना भाऊ... बोले तो सो टका
In reply to आता फक्त जनरल पब्लिकच्या by अभ्या..