लोकमान्य आम्च्या बाई मस्स कड्डक मारत्यात, अंगठे बी धराया लावत्यात अतल्याने बोरं खाल्ली आनि बिया टाकल्या बाकाखाली. मी बी खाल्ली पन बिया घातल्या खिशात. झाड लावनार. मंग बाई आल्त्या वर्गात इंस्पेक्टर सोबत. कचरा बघुन भडकल्याच. पन बोलाल्या नाहित साहेबासमोर. साहेबाने म्हया इचारले "आज २३ जुलाई म्हंजे काय माहितीये का?" म्या म्हनलो "माहित नसायला काय झालं? आज लोकमान्यांचा वाढदिवस." टिळकांची गोष्ट बी सांगितली. मास्तर खुष. चॉकोलेट देउन गेले निघुन. चॉकोलेट पडले म्हनुन उचलाया गेलो तर बियाच पडल्या खाली. बाई म्हनल्या "तुच केला कचरा उचल समदा आता." म्या म्हनलो "आज टिळकांचा बड्डे. मी कचरा केला नाय मी उचलनार नाय." बाईनी काहून वर्गाबाह्यर काढला?**************लोक्शाई - उत्तरार्ध************** बाई म्हनल्या "कचरा उचलनार नाहिस तर पालकांना बोलावुन आण." पप्पा तर गावाबाहेरच व्हते. मंग मी रोज वर्गाबाहेर. आज पप्पा धा दिसांनी परत येनार म्हनुन म्या एक्दम खुषीत. आता वर्गाबाह्यर नाही थांबायला लागनार. घरी गेलो तर पप्पा भडकलेले. म्हनाले "२५ जनांना संसदेबाहेर नाही काढु शकत. हा तर लोक्शाईचा खून आहे. पुतळा जाळु, मोर्चे काढु, लोक्शाई जिवंत ठेवाया हवी". पप्पांना कावलेलं बघुन मी त्यांना काईच सांगितलं नाही. दुसर्या दिवशी बाईंनी विचारलं "पालक कुठायत? आले नसतील तर हो बाहेर". म्या म्हनलो "तुमी मला बाह्यर नाही काढु शकत." लोक्शाईचा खून, पुतळा, मोर्चा वगैरा बोल्लो. लय सटकवला बाईंनी. गाल लाल झाल्ता. लोक्शाई फकस्त मोठ्यांसाठीच व्हय?
वाचने
16183
प्रतिक्रिया
56
मिसळपाव
प्रतिक्रिया
१+
मस्तच!!
१+
ह्या ह्या ह्या!
+१
+१
+१
मस्त स्टुरी.
(बाई नंतर वाड्यावर जात असल्या
In reply to मस्त स्टुरी. by अभ्या..
+१ हाहा मस्तच :)
+१
+१
+ ११
मस्तच....
+१
+१
आरं द्येवा!
+१
+१
हाहाहा +१
आवडले दोन्ही भाग ! +१
+१. आवडली.
.
+१
+१
+१
+१११११... सर्वात जास्त
+१११ हेच म्हणतो
In reply to +१११११... सर्वात जास्त by विवेकपटाईत
+१ लै ब्येस !
+१
एकदम फक्कड .
व्वा मस्त.
सुप्पर
वा वा!
झक्कास..
+1
+१
+१
+१
उत्तरार्ध एवढा आवडला नै . खरा
सगळा
In reply to उत्तरार्ध एवढा आवडला नै . खरा by तुडतुडी
+१
+१
+1
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+1
+१
+1
सर्व वाचक प्रतिसादकांचे अनेक
मस्त, झ्यकास, खुसखुशीत !