✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

[शतशब्दकथा स्पर्धा] वन नाईट इन द ट्रेन - उत्तरार्ध

प
प्राची अश्विनी यांनी
Sat, 08/22/2015 - 20:33  ·  लेख
लेख
पूर्वार्ध ती चमकून वळली. त्याच्या चेहऱ्यावरची काळजी पाहून तिला खुदकन हसू आलं. तिनं खुलासा करताच तोही हसू लागला. त्यानंतरच्या तासाभरात ती दोघं नक्की काय बोलली कोण जाणे पण आयुष्यात प्रथमच ती इतकी मोकळी होत होती. स्टेशनवर उतरून थॅन्क्स म्हणून ती वळणार इतक्यात … " जस्ट इन केस " म्हणत कुठल्याशा कार्डवर त्यानं नंबर लिहून दिला आणि ट्रेन सुटलीच. झालं ते इतकंच. कधीतरी खूप उदास एकटं वाटतं, कधी माणुसकीवरचा विश्वास डळमळतो तेव्हा रेशमी साड्यांच्या बासनात जपून ठेवलेलं एक कार्ड मी काढते. त्यावर हळुवार हात फिरवते . आणि जगायला नव्यानं सिद्ध होते . ट्रुकॉलरवर नाव शोधायचा मोह अनेकदा होतो. पण … नदीच मूळ आणि ऋषीचं कूळ शोधू नये म्हणतात.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
9730 वाचन

💬 प्रतिसाद (48)

प्रतिक्रिया

छान..

यशोधरा
Sat, 08/22/2015 - 20:39 नवीन
छान..
  • Log in or register to post comments

जबरदस्त !!

खटपट्या
Sat, 08/22/2015 - 20:42 नवीन
जबरदस्त !!
  • Log in or register to post comments

+१

पैसा
Sat, 08/22/2015 - 20:49 नवीन
+१ आवडली.
  • Log in or register to post comments

+१ आवडली. कथानायिकेने त्याला

मांत्रिक
Sat, 08/22/2015 - 20:53 नवीन
+१ आवडली. कथानायिकेने त्याला आत्महत्येपासून परावृत्त केलं ही फार मोठी गोष्ट!!!
  • Log in or register to post comments

काय?

अभ्या..
Sat, 08/22/2015 - 20:57 नवीन
काय? मग बहुतेक मला कल्ली नाय कथा. असो +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

त्यांनी जब वी मेट बघितला असेल

प्यारे१
Sat, 08/22/2015 - 21:26 नवीन
त्यांनी जब वी मेट बघितला असेल रे ! -तांत्रिक (तेरा पीछा ना मै छोडूंगा ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अभिभौ अहो त्यांची मूळ कथा तर

मांत्रिक
Sat, 08/22/2015 - 21:42 नवीन
अभिभौ अहो त्यांची मूळ कथा तर वाचा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अहो तुम्ही वाचलीये का? कोण

एस
Sat, 08/22/2015 - 22:12 नवीन
अहो तुम्ही वाचलीये का? कोण कुणाला वाचवतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

वाचलीये ना!!! असं काय बरं

मांत्रिक
Sat, 08/22/2015 - 22:27 नवीन
वाचलीये ना!!! असं काय बरं करता तुम्ही??? हिरवीण वाचवते ना हिरोला!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

असू दे, असू दे.

अभ्या..
Sat, 08/22/2015 - 23:19 नवीन
असू दे, असू दे. प्लस वन दिलात न. मग ठीक आहे. हीरो हिरवीन सध्या तरी इम्पॉर्टेन्ट नाहीत. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

मस्त +१

अजया
Sat, 08/22/2015 - 21:03 नवीन
मस्त +१
  • Log in or register to post comments

+१

नूतन सावंत
Sat, 08/22/2015 - 21:58 नवीन
+१
  • Log in or register to post comments

+१

नूतन सावंत
Sat, 08/22/2015 - 21:58 नवीन
+१
  • Log in or register to post comments

+१

एस
Sat, 08/22/2015 - 22:13 नवीन
+१
  • Log in or register to post comments

मस्त आवडेश

एक एकटा एकटाच
Sat, 08/22/2015 - 22:22 नवीन
मस्त आवडेश
  • Log in or register to post comments

+१

चलत मुसाफिर
Sat, 08/22/2015 - 23:07 नवीन
+१
  • Log in or register to post comments

+१

माहितगार
Sat, 08/22/2015 - 23:13 नवीन
+१
  • Log in or register to post comments

प्रतिक्रीया राहिली खरी, कथा

माहितगार
Sat, 08/22/2015 - 23:15 नवीन
प्रतिक्रीया राहिली खरी, कथा का आवडली ? :माणसांच्या माणूसपणावर विश्वास निर्माण करणारी आत्मविश्वास देणारी कथा म्हणून आवडली. पुलेशु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

+१

बहुगुणी
Sat, 08/22/2015 - 23:28 नवीन
पहिल्या भागातली कलाटणी जितकी आवडली तितकंच या भागाच्या शेवटातलं soft landing आवडलं.
  • Log in or register to post comments

+१

अत्रुप्त आत्मा
Sat, 08/22/2015 - 23:51 नवीन
+१
  • Log in or register to post comments

अर्रे मस्त आवडली + १

तुमचा अभिषेक
Sun, 08/23/2015 - 00:08 नवीन
अर्रे मस्त आवडली + १
  • Log in or register to post comments

+१

dadadarekar
Sun, 08/23/2015 - 06:05 नवीन
.
  • Log in or register to post comments

+१ .

रेवती
Sun, 08/23/2015 - 06:19 नवीन
+१ . कथा आवडली पण अजून वेगळे काहीतरी वाचायला आवडले असते.
  • Log in or register to post comments

+१

अनिरुद्ध.वैद्य
Sun, 08/23/2015 - 07:11 नवीन
+१
  • Log in or register to post comments

+१

नाव आडनाव
Sun, 08/23/2015 - 08:30 नवीन
+१
  • Log in or register to post comments

मला नाही समजली... ती स्टेशनची

पिलीयन रायडर
Sun, 08/23/2015 - 09:23 नवीन
मला नाही समजली... ती स्टेशनची वाट पहात असते न त्याला वाटतं की ती आत्महत्या करणारे.. ह्यात कुणी कुणाचा जीव वाचवला? मुदलात जीव देतंच कोण होतं? मला प्रभावी वाटली नाही. म्हणजे माझ्या समजण्यात जर चुक होत नसेल तर प्रसंग फार साधा आहे आणि त्यामानाने उगाच त्या हिरोला "हिरो" केलं आहे. पण ह्याहुन काही वेगळं ह्या कथेत असेल तर मात्र नक्की सांगा. कदाचित मला नीट समजलंही नसेल.
  • Log in or register to post comments

मी पण वर तेच म्हणतोय. तर बरेच

मांत्रिक
Sun, 08/23/2015 - 10:54 नवीन
मी पण वर तेच म्हणतोय. तर बरेच जणांनी मलाच कथा समजली नाही असा सूर लावला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

मी पण वर तेच म्हणतोय. तर बरेच

संजय पाटिल
Sun, 08/23/2015 - 11:52 नवीन
मगाशी तर स्टेशनवर उतर्नार होति. परत नंतर तास्भर बोलत बसली. उतरयचय का पूढे जायचय? नक्कि कय कळेना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

+1

जेपी
Sun, 08/23/2015 - 09:35 नवीन
+1
  • Log in or register to post comments

+१ आवडली

विवेकपटाईत
Sun, 08/23/2015 - 09:55 नवीन
+१ आवडली
  • Log in or register to post comments

+१

अविनाश पांढरकर
Sun, 08/23/2015 - 09:57 नवीन
+१
  • Log in or register to post comments

ऊत्तरार्धही आवडला!!

लाल टोपी
Sun, 08/23/2015 - 10:52 नवीन
+१
  • Log in or register to post comments

-१०००

संदीप डांगे
Sun, 08/23/2015 - 13:14 नवीन
टोटल फेल... कथा सपशेल नापास . उत्तरार्ध पूर्ण गंडला आहे. (स्पष्ट मतासाठी क्षमस्व) स्पर्धेचं सोडा. अजून चांगला उत्तरार्ध लिहिण्याची तुमची क्षमता आहे. दुसरा प्रयत्न करा.
  • Log in or register to post comments

+१

gogglya
Sun, 08/23/2015 - 15:26 नवीन
+१
  • Log in or register to post comments

उत्तरार्ध समजला नाही. क्षमस्व

मोहन
Sun, 08/23/2015 - 18:25 नवीन
उत्तरार्ध समजला नाही. क्षमस्व पुर्वाध छान जमला होता.
  • Log in or register to post comments

+१

नितिन५८८
Mon, 08/24/2015 - 00:36 नवीन
+१
  • Log in or register to post comments

+1

समीरसूर
Mon, 08/24/2015 - 15:13 नवीन
+1
  • Log in or register to post comments

नाही कळली..

चिगो
Mon, 08/24/2015 - 16:43 नवीन
कधीतरी खूप उदास एकटं वाटतं, कधी माणुसकीवरचा विश्वास डळमळतो तेव्हा रेशमी साड्यांच्या बासनात जपून ठेवलेलं एक कार्ड मी काढते. त्यावर हळुवार हात फिरवते . आणि जगायला नव्यानं सिद्ध होते .
काही कळलं नाही.. मागच्या कथेच्या संदर्भावरुन तरी हा उत्तरार्ध पटत नाही. हा आता त्यांच्या तासाभराच्या गप्पांमध्ये त्यानी काही 'सेल्फ हेल्प' टाईपातल्या टिप्स दिल्या असतील, तर ठाऊक नाही. उगाच 'टची' टायपातला वाटतोय उत्तरार्ध..
  • Log in or register to post comments

+१

जगप्रवासी
Mon, 08/24/2015 - 16:46 नवीन
+१
  • Log in or register to post comments

कथा confusing वाटते . आणि

तुडतुडी
Mon, 08/24/2015 - 16:58 नवीन
कथा confusing वाटते . आणि कोणी सूसाइड करतच नसतं कथानायिकेने त्याला आत्महत्येपासून परावृत्त केलं ही फार मोठी गोष्ट!!!>>> हिरवीण वाचवते ना हिरोला!!!>>> कसं काय ? हिरो मागून येवून तिला म्हणतो ना "आर यु प्लानिंग टू कमिट स्युसाइड?" पूर्वार्धात लिहिलंय , तिने डोळे मिटले. दरवाजावरची पकड घट्ट केली. आणि मागून आवाज आला, .. "एस्क्युज मी , आर यु प्लानिंग टू कमिट स्युसाइड?"
  • Log in or register to post comments

आवडली

मी-सौरभ
Mon, 08/24/2015 - 18:33 नवीन
ऊत्तरार्ध पण आवडला..
  • Log in or register to post comments

बऱ्याच जणांना कथा कळली नाही

प्राची अश्विनी
Mon, 08/24/2015 - 18:43 नवीन
बऱ्याच जणांना कथा कळली नाही म्हणून स्पष्टीकरण . ती किंवा तो कुणीही आत्महत्या करत नसतात . पण आड वेळेला, रात्री एक स्त्री सारखी दरवाजा उघडून बाहेर बघतेय आणि पुन्हा आत येतेय हे पाहून त्याला काळजी वाटते की हिचा आत्महत्या करायचा वगैरे प्लान नाही ना? म्हणून तो देखील पुन्हा पुन्हा अस्वस्थपणे बाहेर येतो आणि शेवटी तिला टोकतो. हा एक साधा माणूस आहे , हिरो वगैरे कोणी नाही . प्रथम घाबरलेल्या आणि नंतर त्याच्या प्रश्नाने गोंधळलेल्या तिला जेव्हा त्यामागची भावना लक्षात येतो तेव्हा तिला हसू येते . पण सध्याच्या स्वार्थी जगात एक अनोळखी माणूस समोरच्या व्यक्तीचा माणूस म्हणून विचार करतो, माणुसकीसाठी आपली झोप विसरून तिला मदत करायला पुढे होतो. यामागचा सच्चेपणा , कळकळ तिला जाणवते . स्त्री पुरुष , ओळख अनोळख ,सामाजिक स्थर, विवाहित अविवाहित वगैरे कसल्याही चौकटीत न बांधून घेता स्टेशन येइपर्यन्तच्या वेळात ते गप्पा मारतात. ( एक तास कसा काय हा संजय पाटील यांचा प्रश्न आवडला . पण गाडी जर मध्ये कुठेतरी लेट झाली असेल तर ते रात्री प्रवाशांना कळेलच असे नाही .:)) त्यांना एकमेकांचे नावही माहित नसते . उतरताना तो फक्त आपला नंबर देतो . जस्ट इन केस म्हणून . ही छोटीशी गोष्ट इथेच संपते पण तिच्या मनात मात्र ही साधी घटना अजूनही तरंग उमटवते . भारतामध्ये एक स्त्री जेव्हा कुणा पुरुषाबरोबर बोलते तेव्हा दोघांच्याही मनात, " मी एक स्त्री/ पुरुष आहे मी जे बोलेन त्याचा भलता अर्थ नाही ना निघणार ?" याच भान कायम ठेवाव लागतं. प्रथमच ती त्याच्याशी एक माणूस म्हणून मोकळेपणानं बोलते . या अनुभवाचं तिला अप्रूप आहे . तो तिचा नंबर किंवा नाव किंवा ओळख विचारत नाही. पण जर तिची इच्छा असेल तर पुढे मागे ओळख ठेऊ शकतो अस नंबर देऊन हलकेच सुचीत करतो . त्यात आग्रह नसतो. त्यातून नकळतपणे तिचा सहवास त्याला आवडल्याची पोच तिला मिळते .ती याच्यात हे एक प्रगल्भ platonic नात पाहते . जेव्हा कधी माणुसकीला काळिमा फासणाऱ्या बलात्काराच्या वगैरे घटना घडतात तेव्हा तर तिला ट्रेन मधील तो प्रसंग अजूनच सुंदर भासतो .या जगात माणुसकी शिल्लक आहे याची तिला खात्री पटते . या नंबरला जर फोन केला असता तर पुढे काय झालं असतं ? हे अनामिक नातं फुललं असतं का ? असं तिला अनेकदा वाटतं . अनेक शक्यता आहेत . कदाचित तो विसरूनही गेला असेल . किंवा तिला जसा तो सज्जन वाटला तसा तो नसेलही तिचा पुढे मागे गैरफायदा घेण्याचा त्याचा विचारही असू शकेल . या साऱ्या शक्यता पडताळून पाहण्यापेक्षा जे आहे ते तिथच राहू देणं जास्त चांगलं म्हणून ती ही आठवण जपून ठेवते . कारण नदीचं मूळ आणि ऋषीच कूळ शोधलं की अनेकदा पवित्रपणा उरत नाही.
  • Log in or register to post comments

तुम्ही जे वर लिहीलय ते कळतं

पिलीयन रायडर
Mon, 08/24/2015 - 20:04 नवीन
तुम्ही जे वर लिहीलय ते कळतं आहेच.. की मनुष्य सज्जन आहे आणि अचानक एखाद्या माणासाशी अगदी छान गप्पा व्हाव्यात आणि त्या आयुष्यभर लक्षात रहाव्यात असं काहीसं झालंय. पण ज्या लेव्हलला तुम्ही हे शेवटी नेलयं ना, की रेशमी बासनात ठेवणे आणि ते पाहुन नव्हाय जगायला सिद्ध होणे, ह्या गोष्टी जनरली आपण ज्याच्या फार प्रेमात आहोत त्या व्यक्तिबाबत घडतात. तासभर भेटलेला माणुस फार तर चांगली आठवण म्हणुन सोबत राहील. अजुन एक असंही झालं असेल की तुम्ही "त्या" ला.. त्यांच्या गप्पांना तिच्यासाठी एवढं महत्वाचं बनवलत खरं, पण २०० ओळींमध्ये त्याबद्दल २ च ओळी आहेत. म्हणुन त्याची परिंणामकारकता तेवढी जाणवत नाही.. नसावी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

संपूर्ण सहमत.

संदीप डांगे
Mon, 08/24/2015 - 20:15 नवीन
संपूर्ण सहमत. एक खरा अनुभव म्हणून, मुक्तक म्हणून चांगलं आहे. कथेसारखी नाही इतकंच. कथेत चरित्रं/घटना उभ्या करणं आवश्यक आहे. नाहीतर कुठेही न जुळणारे अनेक विचित्र आकाराचे सांधे एकत्र बांधल्यासारखे वाटतात. बाकी ज्याचा त्याचा बघण्याचा दृष्टीकोन..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

छान षटकार ठोकला! आता लक्षात

मांत्रिक
Mon, 08/24/2015 - 19:32 नवीन
छान षटकार ठोकला! आता लक्षात आलं! खूप छान स्पष्टीकरण दिलंत. अगोदर माझा गैरसमज झाला की नायिका नायकाला आत्महत्या करण्यापासून रोखते. पण आता एकदम छान विश्लेषण केलेत मानवी मनाच्या शक्यता पडतालण्याच्या शक्तिचे. अर्थात मला वाटते कथा थरारक वळण घेणार असे अनेकांना वाटले होते. पण तसे न झाल्यामुळे कदाचित मंडळी गोंधळली असावीत.
  • Log in or register to post comments

तुमचा कसा काय गैरसमज झाला

अभ्या..
Mon, 08/24/2015 - 19:36 नवीन
तुमचा कसा काय गैरसमज झाला म्हणून आम्ही गोंधळलो होतो ओ. बाकी कै नै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

पूर्वार्धाच्या मानाने

चैतन्यमय
Tue, 08/25/2015 - 10:07 नवीन
पूर्वार्धाच्या मानाने उत्तरार्ध गंडला आहे.
  • Log in or register to post comments

तात्पर्य

नाखु
Tue, 08/25/2015 - 12:43 नवीन
रात्री आडवेळी ट्रेन्च्या दरवाज्यात जाऊ नये/उघ्डू नये (फक्त पोलीसच तुम्हाला बघत नसतात) तर जगही जागे अस्ते. कुर्डुवाडीनजीक चोरट्यांच्या हल्य्याचा प्र्त्यक्षदर्शी प्रवासी नाखु
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा