Skip to main content

सांगून जा ...

लेखक मनीषा यांनी मंगळवार, 09/12/2008 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
सखी सांगूनी जा काय तुझ्या मनी हसू लाजरे का फुले ओठांवरी | खळी नाजूक गं खुले गोर्‍या गाली बट लाडीक ही कशी रुळे भाळी | क्षणी तुज गाली उमटे का लाली तुझी पापणी का झुकली ही खाली | धरेवर नाही तुझी पाउले ही नजरेस नाही | विश्वाचे भान ही | अशी चालता तु वळूनी पाहसी उगा थांबूनी का पुढेच तु जासी | रती होउनी तु विहरसी वनी सखी सांगूनी जा काय तुझ्या मनी |
लेखनविषय:

वाचने 2634
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

मनिषाताई, जातो बरं का! *आम्हाला काव्यातलं काहीही कळत नाही..शक्यतो आम्ही कवितांमध्ये चोच घालत नाही, पण हे शिर्षक वाचुन अगदी म्हणजे अगदी रहावलंच नाही :) सॉरी मनिषाताई!!!

In reply to by धमाल मुलगा

पण मी तर सखीला सांगीतलं होतं ... पण असो ............सांगीतल्या बद्दल धन्यवाद!! (आणि सॉरी ची खरच गरज नव्हती)

In reply to by मनीषा

पण मी तर सखीला सांगीतलं होतं ... सख्याला सांगीतलं नाही हे बरं केलंत... बाकी कविता आवडली... पु ले शु कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

छान जमली आहे. पहिली तीन कडवी सुरेखच. नंतरच्या कडव्यांमध्ये वाचताना थोडेसे खटकते आहे. नक्की काय आहे नाही सांगता येत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

पाचव्या कडव्यात "तू पुढे जा.." असं आपल्या सगळ्यांना सांगितलं आहे.... "ए, आगे जाव भाई...." ते खटकलं का? (ह. घे.) :)

खळी नाजूक गं खुले गोर्‍या गाली बट लाडीक ही कशी रुळे भाळी | क्या केहेने..! तात्या.