Skip to main content

विहीर - कथा

लेखक सिरुसेरि यांनी रविवार, 16/08/2015 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
गावाबाहेरच्या माळाजवळ सदूची चहाची टपरी होती . शेजारच्या रस्त्यावरून जाणारे वाहनचालक , प्रवासी हेच त्याचे गिरहाईक. एरवी मोकळ्या वेळात सदू त्या माळावर चालणारे मुलांचे खेळ , दंगा पाहात बसे . त्या माळावरच एक जुनाट पडकी विहीर होती . एखादी खोडसाळ पोरे जर खेळताना त्या विहीरीच्या फार जवळ जात असेल ,तर , सदू त्या पोरांवर जोरात ओरडत असे " ए पोरांनो , त्या ईहिरीच्या जवळ जाउ नका . आरं , त्या ईहिरीमध्ये सात आसरा हाईती . त्या माणसाला भूलवून पार पाताळात घेऊन जातात . पळा तिथनं " . सदूच्या ओरड्यामूळे आणी त्या विहीरीच्या भीतीमूळे पोरं तिथून लांब पळून जात . आज सदू खूप अस्वस्थ होता . त्या माळावर एका कारखान्याचे गोडाउन बांधले जाणार होते . कारखान्याच्या मालकाच्या भाडोत्री गुंडांनी आज दुपारी सदूला धमकी दिली होती " दोन दिवसात हि टपरी इथून हलव . नाहितर उभा गाडीन " . यामुळे सदू पार हादरून गेला होता . संध्याकाळी सगळी सामसुम झाल्यावर सदूने टपरी बंद केली . आणी तो चालू लागला .....त्या विहीरीच्या दिशेने .
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5596
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

छान आहे...कथाबिज चांगल होत.. शतशब्दांची लिमीट नसल्याने कथा अजुन थोडी फ़ुलवली असती तर वाचायला अजुन मजा आली असती. पुढिल लिखाणास शुभेच्छा

धन्यवाद . आसरा = अप्सरा या शब्दाचा ग्रामिण भागात तसा उल्लेख केला जातो . = पाताळ लोकातील यक्षिणी .

In reply to by सिरुसेरि

पण मला वाटतं एका मराठी चित्रपटात त्यांना देवी स्वरूपात चित्रीत केलेलं आहे. ते कसं काय? अनेक ठिकाणी सा.आ. या उपद्रवकारक निम्न श्रेणीच्या देवता मानल्या जातात. त्यांची पिडा टाळायचे शाबर मंत्रही सापडतात.

आसारा ह्या पाण्यात राहणाऱ्या १ प्रकारच्या देवता (? कारण त्या झपाटतात . )असतात म्हणे . त्यावर एक सत्यकथा वाचली होती