Skip to main content

असमाधानाची

लेखक अर्थहीन यांनी गुरुवार, 13/08/2015 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
एक भरलेली 'शव'वाहिका एका भरधाव 'रुग्ण'वाहिकेला म्हणते .........अजुन तुझी कोणती ग़ ओढ़ बाकी?? पानसरेंच्या छातीतली गोळी दाभोळकरांच्या डोक्यातल्या गोळीला म्हणते, ..........यापेक्षा आपली 'आत्महत्या' बरी असती. नेमाडेंच्या दौतीतली शाई कसबेंच्या दौतीतल्या शाईला म्हणते .........एवढं 'रुत्तुन' लिहिलंस, तरी तू अजुन फिक्कट कशी??? कलामांची मुठमाती याकूबच्या मुठमातीला म्हणते .........मला कालच 'पालवी' फुटली, तू अजुन कोरडीच कशी?? गझलेची कैफियत कवितेच्या दुःखाला म्हणते .........तुला 'एवढ्याss' शब्दांची गरज कशी??? माझी अ-स्वस्थता या जगाच्या स्वस्थतेला म्हणते .........असमाधानाची -तुझी ग 'व्याख्या' कोणती?
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2648
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

सुंदर..

एकदम क्लास सहीच..... वाह ! वाह क्या बात है

आवडली कविता

अपुन का तुमको सलाम..... माझी हतप्रभ प्रतिभा... तुमच्या लेकुरवाळ्या प्रतिभेला विचारतेय... प्रतिभेची उर्मी आणायची तरी कशी?

खासच

आवदली