एक भरलेली 'शव'वाहिका
एका भरधाव 'रुग्ण'वाहिकेला म्हणते
.........अजुन तुझी कोणती ग़ ओढ़ बाकी??
पानसरेंच्या छातीतली गोळी
दाभोळकरांच्या डोक्यातल्या गोळीला म्हणते,
..........यापेक्षा आपली 'आत्महत्या' बरी असती.
नेमाडेंच्या दौतीतली शाई
कसबेंच्या दौतीतल्या शाईला म्हणते
.........एवढं 'रुत्तुन' लिहिलंस, तरी तू अजुन फिक्कट कशी???
कलामांची मुठमाती
याकूबच्या मुठमातीला म्हणते
.........मला कालच 'पालवी' फुटली,
तू अजुन कोरडीच कशी??
गझलेची कैफियत
कवितेच्या दुःखाला म्हणते
.........तुला 'एवढ्याss' शब्दांची गरज कशी???
माझी अ-स्वस्थता
या जगाच्या स्वस्थतेला म्हणते
.........असमाधानाची
-तुझी ग 'व्याख्या' कोणती?
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2648
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा! आवडली कविता!
१ नंबर . कसं काय सुचतं हो ?
सुंदर
एकदम क्लास
छान
भोत खूब लिखेला है
मस्त!
खासच
षिंपली ग्रेट...
क्लाकिस वन..
झाक लिवता हो तुम्ही.लई भारी
क्लासिक......
छान