Skip to main content

बहर

लेखक चाणक्य यांनी गुरुवार, 30/07/2015 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस गारवा संध्याकाळ निवांतपणा गुलजार-बिलजार सगळं आहे . . . . कागद मात्र....कधीचा कोरा काही शब्द एखाद् दुसरी ओळ फार तर फार....बास्स तडफड थोडीशी भिती जमणार आहे की नाही? पेन टेकवायचं कागदाला नुसतंच...अनेकवेळा छ्या... तुला नाही तर त्या पारिजातकाला, विचारलंच पाहीजे एकदा कसं जमतं रोज बहरून येणं?
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 5134
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

क ड क अवांतरः
कागद मात्र....कधीचा कोरा
अगदी खरयं..

तुला नाही तर त्या पारिजातकाला, विचारलंच पाहीजे एकदा कसं जमतं रोज बहरून येणं?
....सुरेख.

सुंदर!

'रायटर्स ब्लॉक' छान रंगवलाय.

मनातलं योग्य शब्दात लिहिणं ही फार मोठी कला आहे

मस्त आहे!

आह! खास.... तिचं किंवा पारिजातकाचं उत्तर असं असू नये कधीच- वाटतो/ते ना तुला बहरल्याप्रमाणे? वा-ट-तो/ते ना तुला बहरल्याप्रमाणे... जमते अताशा मलाही तोल सांभाळणे, का दाखवावे जगा घाव माझ्या उरीचे उगा देखले फुंकारणे अन मागून हासणे

In reply to by प्यारे१

मस्त प्यारेभाउ प्रगती आहे ;)

वा!