माझे काही मल्लू सहकारी खुप दिवसांपासुन सांगत होते की द्रिश्यम म्हणुन एक खुप सुंदर मल्याळम सिनेमा आहे, त्याने यंव बिझेनेस केला,त्यंव रेकॉर्ड केले व तु नक्की बघ.मी त्यांचे बोलणे हसण्यावारी नेले. माझ्या मनात आले की २०० पौंडाचा नायक आणि त्याची नात शोभेल अशी नायिका, त्यांचा डबलडेकर रोमांस कोण बघेल म्हणुन मी त्यांना सपशेल नाही सांगितले..आणि असेही दक्षिण भारतिय सिनेमे जास्त करुन मसाला मुवी म्हणुन विख्यात असतात म्हणुन डोक्याला उगाच शॉट नको असे वाटले.
पण एकाने मात्र जबरदस्ती द्रिश्यम आणून दिला आणि म्ह्टला की बघुन सांग कसा आहे ते.मी आपला थोड्या अनिच्छेने बघायला सुरुवात केली पण चित्रपट जसा सुरु झाला तेव्हा मात्र अगदी मंत्रमुघ्ध झाल्याप्रमाणे पुर्ण बघुनच संपवला.चित्रपट मल्ल्याळी भाषेत जरी होता तरी भाषेचा अडसर जाणवला नाही.
चित्रपटात जरी रुढार्थाने मोहनलाल नायक असला तरी माझ्यामते नायक आहे तो म्हणजे द्रिश्यम म्हणजेच दृश्य आणि जसा चित्रपट पुढे सरकतो तसे दृश्य हाच महत्वाचा नायक असणे अधोरेखित होते.
कथा म्हणायला गेलो तर सस्पेंस थ्रिलर आहे, यात रहस्य आहे पण ते प्रे़क्षकांसाठी नाहीच मुळी कारण या रहस्याचे साक्षीदार आपणच असतो. रहस्य आहे ते चित्रपटातल्या पात्रांसाठी.. आपण फक्त उत्कंठापुर्वक हाच विचार करत बसतो की जे काहि रहस्य आहे ते नेमके कधि उलगडणार आणि हेच नेमके दिग्दर्शकाचे यश आहे.
कथा सुरु होते केरळातल्या एका सुंदरश्या शांत अशा गावात, जॉर्जकुट्टी (मोहनलाल) एक केबल ऑपरेटर आहे. सर्वांशी मनमिळाऊ असा स्वभाव असणारा.आपल्या बायको राणी (मीना) आणि २ मुलींबरोबर रहात असतो.आपला परीवार आणि सिनेमे हेच जॉर्जचे विश्व असते.सिनेमाचे प्रचंड वेड असल्यामुळे जॉर्ज आपल्या घरी सुद्धा रात्री उशीरा जातो किंवा जातही नाही पण त्याच्या बायकोला याबद्दल काहि तक्रार नाही. पण याबरोबरच जर काहि श्रुंगारिक सिनेमे पाहिल्यावर जॉर्ज घरी लवकर येइल याची तिला खात्रि आहे.
जॉर्ज आनंदी आहे. आवश्यक तेवढाच खर्च करावा याबद्दल आग्रही आहे. त्याची कशाबद्दलही काही तक्रार नाही.
अशा या सुखि संसारात मात्र वरुणच्या रुपाने एक संकट येते. जॉर्जची मोठी मुलगी अन्जु एका कँपला गेलेली असताना वरुण मोबाइलवर तीची आंघोळ करताना चित्रिकरण करतो. ती घरी आल्यावर तिला शरीरसुखाची मागणी करतो व तसे न केल्यास हे चित्रिकरण उघड करेन अशी धमकी देतो. अन्जु हादरते पण आईला याची कल्पना देते. दोघे मिळुन वरुणची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात पण वरूण मात्र तिच्या आईलाच आता शरीरसुखाची मागणी करतो. त्यामुळे चिडलेल्या अन्जुकडून वरूणचा खुन होतो. दोघी मिळुन त्याचे मृत शरीर एका खड्यात दफन करतात.
जॉर्ज रात्री घरी आल्यावर त्याला ते कळते.तो हादरतो पण मात्र त्याचे डोके झपाट्याने विचार करायला लागते.ईथे त्याचे सिनेमाचे वेड अर्थात दृश्य कामात येते.त्याच्यापुढे आता एकच लक्ष्य असते ते म्हणजे आपल्या परिवाराला यातून सहीसलामत बाहेर काढणे.त्यासाठी तो ज्या काही युक्त्या योजतो त्या फक्त आणि फक्त चित्रपटात बघणेच योग्य.
मोहनलाल ने अगदी जीव ओतुन काम केले आहे. त्याचा मिष्कील स्वभाव्,एक जवाबदार बाप. तसेच संकट आल्यावर न डगमगता शांतपणे विचार करणारा, पुढे काय घड्णार याचा अन्दाज असणारा व आपल्या कुटुंबाला सहीसलामत बाहेर काढ्णारा जॉर्ज त्याने अफलातुन उभा केलाय. मीना ने त्याला समर्थपणे साथ दिलीय.
सिनेमात जास्त बडेजावपणा नाहीये. तसेच जे लहान गाव आहे ते सुद्धा अगदि सुन्दर आहे.जेणेकरुन कथेचा एक हिस्साच.
सह्कलाकारानिही चांगला अभिनय केलाय.दक्षिणेत चित्रपटाला व कलाकारांना बरेच पुरस्कार मिळाले आहेत.
तर असा हा नितांत सुंदर चित्रपट एकदा जरुर पाहिलाच पाहीजे.
वाचने
11052
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपल्या 'उच्च ' भारतीय
ही जी जपानी कादंबरी तुम्ही
In reply to आपल्या 'उच्च ' भारतीय by पिंपातला उंदीर
अगदी अगदी...
In reply to ही जी जपानी कादंबरी तुम्ही by बोका-ए-आझम
एकता कपूर त्याचं अगदीच वाटोळं
In reply to अगदी अगदी... by यश राज
बघनार...
मी ही पाहीला आहे हा चित्रपट
हं अक्षय कुमार नक्कीच सूट होत
In reply to मी ही पाहीला आहे हा चित्रपट by कानडाऊ योगेशु
??
In reply to हं अक्षय कुमार नक्कीच सूट होत by जडभरत
नेटके सुबक परीक्षण
.
यु ट्युबावर आहे का?
In reply to . by hitesh
तामिळ रीमेक
मला वाटते ...
पहावयास हवा ! त्याचे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- एक आँख मारु तो... ;) { Tohfa 1984 }कमल हासन - प्रगती का अधोगती
आवडला मला ... मी ह्याच
प्रकाशित करा
In reply to आवडला मला ... मी ह्याच by सुहास झेले
येउ द्या लवकर
In reply to आवडला मला ... मी ह्याच by सुहास झेले
हिन्दी दृश्यम....
In reply to येउ द्या लवकर by सुधीर
हिंदी दृश्यम बघितला इतका
In reply to हिन्दी दृश्यम.... by प्रभाकर पेठकर
हाच
In reply to हिंदी दृश्यम बघितला इतका by सुहास झेले
हो
In reply to हाच by नाखु
हो बरोबर... तोच !!
In reply to हो by कपिलमुनी
IG, संपूर्ण प्रकरणाची चौकशी
In reply to हिन्दी दृश्यम.... by प्रभाकर पेठकर
डाउनलोड
चित्रपट परिक्षण आहे काय?
याची एचक्यु प्रींट अव्हेलेबल
सावधान ईंडीया मधे ही अशी
हिंदी सिनेमा काल पाहिला.
वय पंध्राच्या आतील मुलांना
हो
In reply to वय पंध्राच्या आतील मुलांना by रेवती
होय. अगदी हरकत नाही.
In reply to वय पंध्राच्या आतील मुलांना by रेवती
सिंघम (अजय देवगण)
In reply to होय. अगदी हरकत नाही. by प्रभाकर पेठकर
हिंदी दृश्यम पहिला आणि आवडला.
हिंदी दृश्यम पहिला आणि आवडला.
पिक्चर आवडला. देवगण अन कमलेश
ओक्के, कपिलमुनी व पेठकरकाका.
...
हिंदी दृश्यम
मल्याळम बघा
In reply to हिंदी दृश्यम by चित्रगुप्त