Skip to main content

पुन्हा पाऊस

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 24/07/2015 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
दाट दाट झाकोळली, आज आभाळाची काया गूज धरितीशी करण्या, होई अनावर तो राया भारावला आसमंत सारा, स्पर्श होताच मखमली स्तब्ध होऊनी ऐकते, ती आर्जव अंतरातली का उठते वादळ? तिच्या आसपास उडे पाचोळा कुणी सांगा त्यांना, हा त्रुप्तिचा अबोल सोहळा किती काळाचा विरह बाई, कसा सोसते शांत तोही विसरून भान, मग जाई तिच्या कुशीत बोले काही क्षणांचा सहवास ठेव माझी आठवण कसा सोडवते ग हात, डोळ्यात पाऊस साठवून?
लेखनविषय:

वाचने 2349
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

छान!

सुरेख..
बोले काही क्षणांचा सहवास ठेव माझी आठवण कसा सोडवते ग हात, डोळ्यात पाऊस साठवून?
वा, वा..