पुन्हा पाऊस
दाट दाट झाकोळली, आज आभाळाची काया
गूज धरितीशी करण्या, होई अनावर तो राया
भारावला आसमंत सारा, स्पर्श होताच मखमली
स्तब्ध होऊनी ऐकते, ती आर्जव अंतरातली
का उठते वादळ? तिच्या आसपास उडे पाचोळा
कुणी सांगा त्यांना, हा त्रुप्तिचा अबोल सोहळा
किती काळाचा विरह बाई, कसा सोसते शांत
तोही विसरून भान, मग जाई तिच्या कुशीत
बोले काही क्षणांचा सहवास ठेव माझी आठवण
कसा सोडवते ग हात, डोळ्यात पाऊस साठवून?
मस्त मस्त मस्त!!!!!!!!
सुंदर!
सुंदर!!! रोमँटीक!!!
छान!
सुंदर!
सुरेख..
सुंदर कवीता.
मस्त आहे कविता!
छान कल्पना. पु.ले.शु.