Skip to main content

कांहीही ह श्री ! (गुळगुळीत वाक्प्रचार)

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 11/08/2015 05:41 या दिवशी प्रकाशित केले.
टीव्ही मालिकांमध्ये पात्रे खूपदा तीच ती वाक्ये म्हणत असतात . आधी मला वाटायचे, की पाणी टाकून वाढविण्याचाच तो एक प्रकार आहे. पण थोडे निरीक्षण केल्यावर लक्षात आले, की प्रत्यक्ष जीवनात देखील आपण तीच ती वाक्ये बोलत असतो. उदाहरण म्हणून कुठलेही कडाकडा वाजणारे भांडण ऐका. जिथे आपले म्हणणे दुसऱ्याला पटवून देण्याचा कोणी प्रयत्न करीत आहे. एक कारण जर पटले नाही, तर काही नवीन तर्क मांडावा की नाही? पण, बोलणारा तेच ते उगाळीत रहातो. ऑफिस मध्ये मिटिंग असो, मित्रांमधील गप्पा असो, गुळगुळीत वाक्प्रचार किंवा घिसीपिटी रेकॉर्ड सतत वाजवली जाते. कांही सहज आठवणारी गुळगुळीत वाक्ये- आमच्या वेळी असे नव्हते आजकाल महागाई काय वाढली आहे! (महागड्या रेस्टोरांत जेवताना) पोलिटिक्स मध्ये सगळे हरामखोर भरले आहेत मिपावर डू आयडी चा सुळसुळाट आहे वगैरे... आणखी कांही गुळगुळीत वाक्ये ......?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10767
प्रतिक्रिया 53

प्रतिक्रिया

गै गै गै दु दु दु हुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र उठा कामाला सुटा ई.ई.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सुप्परभात - र्‍हायला ना! :-/ ल्लुल्लुल्लुल्लुल्लुल्लु :-/

" कांहीही ह माई !" या त्यांच्या वाक्यावरूनच सीरियलीवाल्यांना सुचलं आहे हो असं ...

In reply to by श्रीगुरुजी

"नही" शब्द काढून सुध्धा ते वाक्य तितकंच गुळगुळीत आहे :)

मला छळणारा येथील एक इसम :-/ ..सदैव निरर्थक प्रश्न विचारुन पुढे तेच ते सारखं , म्हणत असतो ते वाक्य

सांगा ना????


अरे कुठे नेऊन ठेवलाय..... आगाउपणा नको करू. चालायचंच

१) तरी मी तुला सांगत होतो...... २) त्या वेळी माझे कोणी ऐकले नाही... आता भोगा आपल्या..... ३) अहो , मी आहे म्हणुन एव्हढे निभावले तरी.....

नया है वह कला गप्प बस (फार पूर्वी ऐकलेले-) पाहीन पाहीन आणि संस्थळ बंद करून टाकीन

In reply to by संदीप डांगे

पडोसी मुल्क म्हणजे नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश हे पन हायेत नारे दादा !!

१.मी आहे म्हणुन निभावलं, दुसरी कोणी असती तर कधीची पळून गेली असती. २. कसं कळत नाही हो तुंम्हाला ? अजुनही बरीच असतील.

In reply to by द-बाहुबली

आत्ताच पेटंट घे. नैतर त्रिफळा चूर्णवाले हमखास चोरणार हा ड्वैलाक!!!

ईसमे बिपक्स का कौनो चाल है| आता त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अजिबात नैतिक अधिकार नाही. त्यांनी राजिनामा द्यावा. आम्ही विकासाचं राजकारण करतो. ...तर राजकारणातून संन्यास घेईन.

आमच्या वेळचं मिपा आता राहिलं नाही... कंपूबाजांपुळेच मिपावर चांगले लेखक येत नाहीत.. पुणेकर अतीशहाणे आहेत...

१) अय्याऽऽऽ!! कित्ती संतुलित लिहीता बै तुम्ही!! २) आमच्या शब्दाचा मान ठेवून अमुक तमुक हटवल्याबद्दल्/पाठवल्याबद्दल आभार!! ३) आपले लिखाण नेहमीच प्रेरणादायी असते.

In reply to by टवाळ कार्टा

ते गविंकडनं उसनं आणलं होतं. मग दिवाळीत आणलेला शेजार्‍याचा झारा जसा घरजावई होतो तसं तेही झालं!!

छान पाकृ. वीकांताला करुन पाहिली जाईल. अंडे घालून करता येईल का? ते तुम्ही अंडे घालून किती वेळ झालाय ह्यावर अवलंबून आहे.

In reply to by एस

ते तुम्ही अंडे घालून किती वेळ झालाय ह्यावर अवलंबून आहे.
हा गुळगुळीत झालेला नाही वाटत.. आणि भारी आहे !!

In reply to by अभ्या..

काश्मीर कोणाला? दूध मांगोगे तो खीर देंगे काश्मीर मांगोगे तो.... (सनीभाईचा कोणता चित्रपट, इंडीयन का?)

अजून काही मुपी स्पेशल गुळमुळीत वाप्र. १. माझ्या तर छातीत धस्सच् झालं. २. माझ्या अंगावर तर काटाच आला. ३. आजही तो प्रसंग आठवून अंगावर शहारे येतात. ४. देवाच्या कृपेनेच त्या संकटातून बाहेर आलो.