Skip to main content

कांहीही ह श्री ! (गुळगुळीत वाक्प्रचार)

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 11/08/2015 05:41 या दिवशी प्रकाशित केले.
टीव्ही मालिकांमध्ये पात्रे खूपदा तीच ती वाक्ये म्हणत असतात . आधी मला वाटायचे, की पाणी टाकून वाढविण्याचाच तो एक प्रकार आहे. पण थोडे निरीक्षण केल्यावर लक्षात आले, की प्रत्यक्ष जीवनात देखील आपण तीच ती वाक्ये बोलत असतो. उदाहरण म्हणून कुठलेही कडाकडा वाजणारे भांडण ऐका. जिथे आपले म्हणणे दुसऱ्याला पटवून देण्याचा कोणी प्रयत्न करीत आहे. एक कारण जर पटले नाही, तर काही नवीन तर्क मांडावा की नाही? पण, बोलणारा तेच ते उगाळीत रहातो. ऑफिस मध्ये मिटिंग असो, मित्रांमधील गप्पा असो, गुळगुळीत वाक्प्रचार किंवा घिसीपिटी रेकॉर्ड सतत वाजवली जाते. कांही सहज आठवणारी गुळगुळीत वाक्ये- आमच्या वेळी असे नव्हते आजकाल महागाई काय वाढली आहे! (महागड्या रेस्टोरांत जेवताना) पोलिटिक्स मध्ये सगळे हरामखोर भरले आहेत मिपावर डू आयडी चा सुळसुळाट आहे वगैरे... आणखी कांही गुळगुळीत वाक्ये ......?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10743
प्रतिक्रिया 53

प्रतिक्रिया

:)

गै गै गै दु दु दु हुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र उठा कामाला सुटा ई.ई.

त्याच असं आहे ना ! यार बोर करू नको ! थांबवा रे याला कुणीतरी !

एका मिपाकर म्हणून वाचतांना लाज वाटली..

कैच्या कै! आमच्या कंपनीमध्ये सगळी बोंब आहे

आवरा

मला छळणारा येथील एक इसम :-/ ..सदैव निरर्थक प्रश्न विचारुन पुढे तेच ते सारखं , म्हणत असतो ते वाक्य

सांगा ना????


अरे कुठे नेऊन ठेवलाय..... आगाउपणा नको करू. चालायचंच

१) तरी मी तुला सांगत होतो...... २) त्या वेळी माझे कोणी ऐकले नाही... आता भोगा आपल्या..... ३) अहो , मी आहे म्हणुन एव्हढे निभावले तरी.....

नया है वह कला गप्प बस (फार पूर्वी ऐकलेले-) पाहीन पाहीन आणि संस्थळ बंद करून टाकीन

१.मी आहे म्हणुन निभावलं, दुसरी कोणी असती तर कधीची पळून गेली असती. २. कसं कळत नाही हो तुंम्हाला ? अजुनही बरीच असतील.

ईसमे बिपक्स का कौनो चाल है| आता त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अजिबात नैतिक अधिकार नाही. त्यांनी राजिनामा द्यावा. आम्ही विकासाचं राजकारण करतो. ...तर राजकारणातून संन्यास घेईन.

सगळे जण करतात /जातात / खातात / फिरतात फक्त आपणच नाही करत / जात / खात / फिरत

आई ***

आमच्या वेळचं मिपा आता राहिलं नाही... कंपूबाजांपुळेच मिपावर चांगले लेखक येत नाहीत.. पुणेकर अतीशहाणे आहेत...

In reply to by मी-सौरभ

पहिले दोन लिहायचे माझ्याही मनात आले होते :-) .

१) अय्याऽऽऽ!! कित्ती संतुलित लिहीता बै तुम्ही!! २) आमच्या शब्दाचा मान ठेवून अमुक तमुक हटवल्याबद्दल्/पाठवल्याबद्दल आभार!! ३) आपले लिखाण नेहमीच प्रेरणादायी असते.

छान पाकृ. वीकांताला करुन पाहिली जाईल. अंडे घालून करता येईल का? ते तुम्ही अंडे घालून किती वेळ झालाय ह्यावर अवलंबून आहे.

In reply to by एस

ते तुम्ही अंडे घालून किती वेळ झालाय ह्यावर अवलंबून आहे.
हा गुळगुळीत झालेला नाही वाटत.. आणि भारी आहे !!

टेंपोंत. आणी +१ राहिलेच

In reply to by अभ्या..

काश्मीर कोणाला? दूध मांगोगे तो खीर देंगे काश्मीर मांगोगे तो.... (सनीभाईचा कोणता चित्रपट, इंडीयन का?)

+१!

अजून काही मुपी स्पेशल गुळमुळीत वाप्र. १. माझ्या तर छातीत धस्सच् झालं. २. माझ्या अंगावर तर काटाच आला. ३. आजही तो प्रसंग आठवून अंगावर शहारे येतात. ४. देवाच्या कृपेनेच त्या संकटातून बाहेर आलो.