Skip to main content

[शतशब्द कथा] रुख - रुख

लेखक इडली डोसा यांनी मंगळवार, 11/08/2015 05:59 या दिवशी प्रकाशित केले.
गाडी सिग्नलला थांबली आणि काल डेब्राकडून आलेल्या ईमेलचा मथळा आठवला 'Thank you and good bye'. राहुनचं गेलं काल तिचं मेल वाचायचं. आता ती पुन्हा कधीच नाही भेटणार . तिच्या डेस्कजवळ थांबुन तिला शुभेच्छा तरी द्यायला हव्या होत्या. कितीवेळा म्हणाली होती कि तिला भारतीय जेवण आवडतं . राहिलचं तिच्यासाठी डबा आणायचं. एवढं वय झालं तरी बिचारी मुलीसाठी आणि नातवंडांसाठी अजून काम करत होती . चला बहुतेक मुलीला नोकरी लागलेली दिसते. आले एकदाचे सुखाचे दिवस आजीबाईंना . . . . . . . " डेब्रा???तू कशी काय इथे? काल शेवटचा दिवस होता ना तुझा? " " तुला पण मी सोडून चालले असं वाटलं का? अगं जॉन सोडून गेला आणि त्याचं ईमेल अकौंट बंद झालं म्हणुन त्याने मला मेल पाठवायला सांगितलं "

वाचने 4310
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

+१

+१

+१.

+१

+१

राजीनामा दिल्यावर ईमेल अकाउंट बंद होणार हे साहजीकच असतं आणि हे ध्यानात ठेउन कलीग 'गुड बाय' ईमेल १-२ दिवस आधीच पाठवून ठेवतात आणि डेब्राने जरी जॉनचं ईमेल पाठवलं तरी खाली "By John" हे लिहायला विसरली असेल हे पटत नाहि...

+१

In reply to by तुडतुडी

मी वर खुलासा केला आहे...तरीसुद्धा नसेल पटत तर ठीक आहे.

आवडाली

+१

+१ माणुस नसल्यावर / गेल्यावर मग हजर गोष्टींची रुखरुख वाटत रहाते.. मेल न वाचल्याच लिहीलय, त्यामुळे का गोंधळ झाला ते नीट समजतय.

+१

गोष्ट छान आहे. पटली. खरे तर आपण वाचताना शब्द न शब्द नीट वाचला पाहिजे. शब्दांची मर्यादा खूप असल्याने प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. आणि म्हणूनच काळजीपूर्वक वाचली पाहिजे कथा. प्रथम मला दिपक.कुवेत याने म्हणणे पटले पण नंतर ल्ख्काचे स्पष्टीकरण सुद्धा पटले.

+१

+१

+१