Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] गोची

लेखक किसन शिंदे यांनी मंगळवार, 11/08/2015 00:49 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी मी, बापलेकर, पालेकर थोडं लवकरंच शाळेत पोचलो. सकाळची शाळा सुटायला अजून अवकाश होता, म्हणून गेटवरच टिवल्या बावल्या करायला सुरूवात केली. नेहमीप्रमाणे चावताना च्युईंगम दोन बोटांनी बाहेर खेचणे, समोरच्या थियेटरवरचे 'तसल्या' सिनेमाचे पोस्टर न्याहाळणे इत्यादी टुकार उद्योग बापलेकरने सुरू केले होते. तेवढ्यात गेटमधून ज्युनिअर काॅलेजच्या गणवेषातली एक सुंदर मुलगी येताना दिसली. गोरीपान,काळेभोर डोळे!! "आयला! काय कडक माल आहे राव!." बापलेकर चवताळला. "बैला, तुझ्यापेक्षा मोठी दिसतेय ती." मी. "असूदे ना! मं काय झाला? आपल्याला थोडी लग्न करायचे." दात विचकत बापल्या हसला. अचानक दोघांच्याही पाठीत जोरदार गुद्दे बसले. "साल्यांनो चड्डीत रहा! माझी चुलत बहीण आहे ती!" पालेकर मागे उभा होता.

वाचने 8545
प्रतिक्रिया 50

प्रतिक्रिया

+१

भारी रे किसना ती कुलकर्णी कुठाय? +१

+१

सेम अस्साच प्रसंग माझ्यावर आला होता! बापलेकरच्या जागी मी होतो . (त्यानंतर त्या मित्राला कुठलाच माल दाखवला नाही) रच्याकने +१

+१

+१

+१

+१ हाहाहा! लै भारी!

+१

+१

+१

+१.. 'शाळा' आठवली..

+१

+१

+१-१=०

+१

+१!!

+१ खिक्क...बर्याच दिवसांनी कोणीतरी "चड्डीत रहा" हा वाक्प्रचार मिपावर वापरला ;)

+१

+१

+१

+१

+१ :)

+१

+१

+१

क्या ये लिखनेवाला सच मे किस्ना है?

छान किसन देवा लेखन उपास सुटला एकदाचा !!!!

In reply to by तुडतुडी

तुडतुडी ताई तुमचं शल्य समजू हो, पण काय करू आमचा बापलेकर एक नंबरचा डँबिस आणि बदमाश! खूप प्रयत्नानेही त्याला "व्वा!! काय अनूपम सौंदर्य आहे या बालिकेचे" असे म्हणताच येईना. :) तुमच्या माहीतीसाठी इथेही तुम्हाला तो डॅम्बिसपणा करताना आढळेल.

In reply to by किसन शिंदे

डॅम्बिसपणा अर्धवट सोडला आहे ईतकेच नमुद करु इच्छितो ! अवांतर : शतशब्दकथा स्पर्धेनंतर अर्धवट सोडलेल्या लेखमालिका संपुर्ण करायची स्पर्धा ठेवुयात का ? ;)

In reply to by किसन शिंदे

---"व्वा!! काय अनूपम सौंदर्य आहे या बालिकेचे" :)) :)) :)) देवा तुमाला बी यायच् नाय आस बोल्ता.. त्या बापल्या कडन कवा व्हायच.. अवांतर: कुलकर्णीच काय झाल रे पुढं???

+१

+१

+१

+१

आवडली

शालेय जगातपण गोची ? +))

:D

हा हा .. कित्येक सत्यकथा घडल्या असतीलच अश्या :)