टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवा - अगदी सोप्या पद्तीने (फोटोसहीत)
लेखनविषय (Tags)
टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवा - अगदी सोप्या पद्तीने (फोटोसहीत)
- १) आपल्या घरातील रिकाम्या झालेल्या ५ किलोच्या तेलाच्या डब्या पासून "केरकचरा सुपली (dust Pan" बनवता येईल. ती कशी बनवायची ते तुम्हाला खालील फोटोवरून कळेल.
- २) आपल्या गच्ची मधील किवा जवळच्या बागेतील झाडाच्या कुंड्या फुटल्या असतील तर त्या फेकून न देता त्याचा कल्पना शक्ती चा वापर करून आपल्या बागेची किवा गच्ची ची शोभा वाढवू शकतो. अशीच एक कल्पना खालील चित्रात दाखवली आहे.
- ३) उन्हाळा आला कि आपलं शीतकपाट पूर्ण पणे शीतपेयाच्या आणि पाण्याच्या बाटल्याणी भरून जातो. पण उन्हाळा संपला कि रिकाम्या झालेल्या ह्या प्लास्टिक च्या बाटल्यानचे काय? त्याचा पण उपयोग घर-शेती करण्यासाठी होऊ शकतो. त्या फेकून न देता मधोमध कापून त्या मध्ये माती भरून कोथांबीर, मेथी च्या बिया टाकून त्या वाढवू शकता. ह्याला जागा पण कमी लागते. अधिक स्पष्टीकरणा साठी खालील चित्र पहा.
- ४) तुटलेल्या छत्री चा उपयोग पण खालील प्रमाणे वस्त्रे लटकवण्या साठी होऊ शकतो.
- ५) रिकाम्या झालेल्या शाम्पूच्या बाटल्याचा उपयोग भ्रमणध्वनी अडकवण्यासाठी होऊ शकतो. त्यासाठी फक्त थोडेसे कापून आकार द्यावा लागेल. त्याला तुम्ही मनाप्रमाणे सजवू पण शकता. खालील चित्र पहा.
- ६) तुमच्या कडे खाली झालेल्या शाम्पूच्या बाटल्या नसेल तर त्यासाठी फाटलेल्या जीन्सच्या खिशाचा उपयोग करू शकता. खालील चित्र पहा.
- ७) तुम्हाला जर ५ रुपयात बायकोला किवा प्रेयसीला उपहार देऊन खुष करायचे असेल. तर खालील प्रमाणे अंड्याचा बनवलेला बदाम देऊ शकता. एक गंमत म्हणून घरी बनवायला काय हरकत आहे.
- ८) गेलेल्या विजेच्या बल्ब चा असापण चांगला उपयोग होऊ शकतो.
- ९) घरी आम्लेट करून तुम्ही खाल्लेच असेल. मग ते फुल फ्राय किवा हाफ फ्राय असेल पण कधीतरी गोल फ्राय करून पण खात जावा. त्यासाठी फक्त एक अंडे आणि मोठा कांदा लागेल. पूर्ण कांदा पण नाही फक्त कांद्याची निघणारी गोल चकती लागेल. खालील चित्र पहा.
- वरील सर्व कल्पना किवा कला आंतरजालावरून गोळा केल्या आहेत. हा धागा काढण्यामागे कारण कि अश्याच अनेक कल्पना तुमच्या मनात किवा तुम्ही कुठे तरी पाहिलेल्या असतील तर त्या इतर जणांना पण कळल्या पाहिजेत. म्हणून तुमच्याकडे पण अश्या काही कल्पना असतील तर या धाग्याच्या प्रतिक्रियेच्या रुपाने येऊ द्या. मग त्या लेखणीच्या , फोटोच्या रूपाने असू द्या किवा चलचित्र च्या रूपाने असू द्या त्याचा सर्वाना त्याचा लाभ होऊ द्या. धन्यवाद !!
प्रतिक्रिया
+१ छत्री तर लै भारी!!!
अईला मी पईला?
धन्यवाद!!
छान माहितीपूर्ण धागा.
स्वॅप्स प्रतिसादा बद्दल धन्यवाद!!
मस्त!
मी सुद्धा आताच एक टाकाऊतून
कुंडी अतिशय सुंदर झाली आहे.
आजच पाच लिटर तेलाचा डबा, १
शाब्बास !!
+१.
हा प्रतिसाद राजकुमार
छान माहितीपूर्ण धागा.
क्लास ! जबरदस्त आवडलं !
सॉल्लीड आयडिया आहेत एक एक
मस्तच , इनोवेटीव्ज आयडीयाज
फोटो दिसत नायत. घरी गेल्यावर
करून बघितलं
झक्कास !!
+१.
धन्यवाद
लेख आवडला.
जीन्सचा खिसा आवडल्या गेल्या
असं का आहे व्याकरण? मला पण
कोणाला? कशाला? गरज असेल तर
फुटलेल्या टेनिस चेंडू चा असा ही उपयोग होऊ शकतो.
णविण!
णविण!
तुम्ही दोघेही अवलिया! नमस्कार
अर्रर्र !! कालच एक शांपूचा
आणखी काही
खुपच सुंदर
आंब्याचा गर वेगळा करण्याची
वाखुसा.
आयडीयेच्या कल्पना मस्त आहेत.
मस्त!
+1
राजकुमार यांचे फोटो दिसत
दिसले दिसले