Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] डिझाईन

लेखक पिलीयन रायडर यांनी सोमवार, 10/08/2015 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
आई ग्ग!! लाथा मारतो की गम्मत करतो हा? फुटबॉल खेळणार नक्की कार्टा.." ती पोटाकडे पहात कौतुकाने म्हणाली. तो मस्तपैकी हसला.. ~ "बाई, तुमच्या मुलाची ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल.." "....." "घाबरू नका. तो पुर्ण बरा होईल." "फुटबॉल खेळेल?" दाराआडुन त्याने चटकन डोळे पुसले.. ~ डोळे उघडत नाही, दुध पित नाही, टिचकी मारली तरी रडत नाही. ती तिचं पिल्लु कणाकणानी मरताना बघत होती.. तो... डॉक्टरांमागे पळत होता.. ~ "ऑपरेशन तर झालं, पण धोका टळलेला नाही." डॉक्टर म्हणाले.. नळ्यांमध्ये वेढलेल्या व्हेंटीलेटरवरच्या जीवाला पाहुन तिने आवंढा गिळला. तो गप्पच होता.. दोन दिवस.. ~ "आई... डिझाईsssssन!!!!!" छातीवरच्या टाक्यांच्या खुणाकंडे पहात पोरगं थुईथुई नाचत होतं. तो पुन्हा एकदा मस्तपैकी हसला!

वाचने 8725
प्रतिक्रिया 64

प्रतिक्रिया

+१ दोनदा नीट वाचल्यानंतर कळाली.

निशब्द...!!!

शब्द कमी आहेत..मी ९५ मोजले...परत प्रकाशीत करा ...

In reply to by यमन

कथेचा आशय व्यवस्थित पोहोचत आहे. आणि इथे कुणीच सिद्धहस्त लेखक नाही, त्यामुळे ४-५ शब्द इकडे-तिकडे, असल्याने खूप फरक करायला नको..

In reply to by यमन

बहूदा तसे होणार नाही... कारण, नियम शिथिल करता येतात. आणि ४-५ शब्दांसाठी नियम आडवा यायला नको, असे माझे मत आहे.

In reply to by यमन

कसे मोजताय? मी वर्ड मध्ये पेस्ट करुन पाहिलं तर १०० आहेत करेक्ट. संपादक, शब्द कमी जास्त असतील तर प्लिझ सांगा. परत प्रकाशित करेन.

+१, थोडा तो, ती, मध्ये फसलो, पण उमजली नंतर. ... मस्त.. आवडली..

+१ :)

+१

+१

+१

+१

+१. उत्कंठावर्धक आणि शेवट हसरे अश्रू आणणारा. कथेचे शीर्षक चपखल आहे. शुद्धलेखन थोडे सांभाळायला हवे होते.

मस्तच!!!

+१

+१

+१

फारच प्रभावी आणि टची टू!!

+१

+१

+१

+१ तुमचे पुर्वीचे काही प्रतिसाद वाचुन तुमच्या बाळाच्या वेळी अशीच काहीशी परिस्थिती होती असे आठवते. १०० शब्दात खुपच मस्त मांडली आहे. शेवट गोड तर सगळे गोड :)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

मस्त हा चुकीचा शब्द झाला. याबद्दल दिलगीर आहे. :( प्रभावीपणे मांडली आहे असे म्हणायला हवे होते.

+१

+1

+1

+१

+१ अश्या श श क मुळे [अजुनही] सुखद शेवट असलेल्या कथा दमदार असू शकतात हा विश्वास दृढ झाला.

+१ सुंदर !

+१

+१

..

:) खूप खूप मस्त आहे कथा . खूप आवडली :) +1

+१

+१

+१.. मस्त कथा.. मोजक्या शब्दांत भावनांच्या विभिन्न लहरी दाखवल्यात..

छान +१

+१.

+१ सही.. :)

प्रचंड आवडली! +१ लहानपणी अशीच डिजाईन पहायची वेळ टाळलेला Sandy

+१

+१

+१

+१

+१

सुबक! आईसारखाच बाप पण उलगडतो येथे.

+१

+१

आवडली कथा.

+१