Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] "पोय्ये पोय्ये"

लेखक पियुशा यांनी शुक्रवार, 07/08/2015 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
"पोय्ये ... पोय्ये..., १० - १२ वर्षाचा गोडुला जीव ! त्याला मोबाईल नकोय, का वरणभात. "काकु.. काय ओरडतोय हा" "पोय्ये म्हणजे पोहे, मिळाले नाहीत. म्हणुन दन्गा! "काय रे नाव तुझ?" ढ्म्पुडी लाजून आईच्या कुशीत शिरतोय. "त्याला नाही कळत, स्पेशल चाइल्ड," "....." "मी पोहे आणते उद्या." . ढ्म्पुडीला पोय्ये आणलेत. रुममध्ये कुणीच दिसेना, डिस्चार्ज? समोरुन स्ट्रेचर, ढ्म्पुडीची आई रड्तेय, माझ्या छातीत धस्स .... खुप वेळाने ढ्म्पुडीची आई मला शोधत आलिये "अग पोहे आणलेस का ? ढ्म्पुडी सुकलाय पण हसुन दुखर्‍या पायाला बोट लावतोय, बाबा खिन्न भकास. " हेवी डायबेटीक, पायाला जखम....गुड्घ्यापासुन खाली पाय ... !!!! ..... मी बधीर,सुन्न ! आता मला फक्त ढ्म्पुडी दिसतोय, गालात हसणारा, अजाणतेपणी आभाळाएव्हढ दु:ख "पोय्यात" रिचवु पाहणारा !

वाचने 7999
प्रतिक्रिया 46

प्रतिक्रिया

+१ सुन्न करणार

+१ मस्त!

+१ उगाच वाचली विकेंड जवळ आल्यावर. कसेतरीच वाटतय

+1

+१

+१

आता रडवणारच का ? सत्यकथा नसावी अशी आशा आहे.....

Q_Q!!!! +1 अत्यंत त्रासदायक गोष्ट आहे. अशी वेळ शत्रुवरही यायला नको.

+1

+१ :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एवढ्या लहान वयात शुगर होईल असं वाटत नाही. पण डॉक्टर देतायत म्हटल्यावर मग मी पण जास्त विचार करत नाही. असेल पण खरं. +१

+१

पण खरी असू नये अशीच तीव्र आशा !!!

जुव्हेनाईल डायबेटिस माहित नसावा कोणाला? आश्चर्यच आहे.

+१

+१ ओळखीत आहे अशी डायबेटीक केस.

+ १ :(

+१

+१

+1

+1

अई ग्ग .. १०० शब्दही नाही वाचवले

In reply to by तुमचा अभिषेक

अजाणतेपणी आभाळाएव्हढ दु:ख "पोय्यात" रिचवु पाहणारा ! या वाक्याने कालवले .. आताच मी आईला आज जेवणात पोहेच कर म्हणून सांगितलेय .. ताटावर बसायच्या आधी ही कथा विसरणे गरजेचे .. कारण ही कथा असली तरी कुठचे तरी वास्तव आहेच

आई ग... डोळ्यात पाणी आणलस

+१

+१

+१

आधीच स्पेशल चाइल्ड आणी त्यात मधुमेह ! किती त्रास होतोय !

+१

रोज मला का सुइ? धनगर बापाच पोर विचारत होतं, मग त्याच्या समाधानासाठी रोज कधी आई कधी बाप, आज्जा, आज्जी सगळ्यांना रिकाम्या सुया मारायच्या. अर्थात ते धोकादायक खर पण...राहूच दे, पिवशे !

करणार कथानक , लिहिलियेस छान

:(

+१

+१

फार संवेदनशील मन कमावलय तुम्ही...

खरच वाचवत नाही.