Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] बॉक्सर

लेखक यमन यांनी बुधवार, 05/08/2015 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
हरलो की बाप दात ओठ खाऊन हाणायचा. त्याच्या पुढे इतर स्पर्धकांचा मार काहीच वाटायचा नाही . बाप स्वतः नावाजलेला बॉक्सर ;त्याच्या मते तो पोराला घडवत होता . आजचा सामना महत्वाचा होता ;बापानी खूप पैसे लावले होते . हारून चालणार नव्हते . पहिल्या राउंडला लीड घेतलं ;पण समोरच्याला मारताना ताकतच येत नव्हती . समोरचा चेवून हाणत होता, बापासारखाच . मी गुमान मार खात होतो . बाप खूष .त्याचा रेट वाढत होता . मी जिंकणार हे त्याला नक्की माहित होते . आणि एकदाचा वार जिव्हारी लागला आणि मी कोसळलो . थडग्यात आई शेजारी शांत पहुडलोय .माझ्याकडे आई कौतुकानी बघतेय …. मी तीला लहान भावा वर शेवट पर्यंत हात न उचलण्याचे वचन पाळले म्हणून !!!!!

वाचने 6343
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

टच्ची ! +१

खूप छान

+१

+२

+१

.

जबरा !

+१ आरारा. (ह्याचा सीक्वल असेल? काय?)

+१ आरारा. (ह्याचा सीक्वल असेल? काय?)

+१ कलाटणी साठी विशेष अभिनंदन ! फक्त "आई शेजारी" आणि "भावा वर" हे या कथेच्या संदर्भात दोन-दोन वेगळे शब्द नाहीत, त्यामुळे वाचताना थोडे अडखळायला होते. ते "आईशेजारी" आणि "भावावर" असे करून इतर ठिकाणी दोन शब्द वाढवता आले अधिक चांगले होईल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चूक कशी दुरुस्त करता येईल ते बघतो

घरातच मारतात काय एकमेकाला??? हे वाचून एक पक्ष आठवला...

शेवटी ट्विस्ट हाय कि! बरं हाय!

+१

+१

+ १

+१

+१

+१

+१

+१

+१

+१

सत्य हे अद्भुत आणि विस्मयकारक !!!

माझ्या क्रीडाविषयक शशक नंतर, दुसरी क्रीडाविषयक शशक पाहून बरे वाटले.

भारी आवडली

+१

आवडली.. प्रेरणा 'ब्रदर्स' ह्या आगामी चित्रपटाची वाटतेय..

+१

+१

आवडली :)

मस्त कथा +१

वा भावाने भावाला मारले ते पण कधीच हात न उचलायचे स्वेछ्चा बंधन असताना.. ते सुधा माँ का वचन ही उसका शासन है हा नियम पाळण्यासाठी ? कथानक ऐकुन धन्य.. धन्य.. धन्य जाहलो... १९७० ते १९८० चे दशक फार जिवंतपणे उभे केलय... लेखनशैली दमदार (१०० शब्दाना ही पावती देताना बरेचदा लाज वाटतेच तरीही.. असो.) कथेच्याबाबत मात्र कपाळावर हात मारुन घेतल्याची स्मायली कल्पावी.

In reply to by द-बाहुबली

लेखनशैली चांगली आहे, पण कथानक फारच मेलोड्रॅमॅटिक वाटते. मनमोहन देसाई सिनेमासारखे. याला +१ द्यावे का याचा निर्णय करता येत नाहीये.

+१

+१

+१

+१