मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

[शतशब्दकथा स्पर्धा] नाईटमेअर

प्रचेतस · · स्पर्धा
अंधार..गडद, काळाकुट्ट अंधार...डोळ्यात बोट गेलं तरी दिसणार नाही इतका. त्याला जाग येते. खिडकीतला दिवा विझलाय. पेटवायला हवा. तो बिछान्यातून उठतो. काडेपेटी नेहमीच उशाशीच असते, पडली असेल कुठेतरी. अंधारातच तो इकडेतिकडे चाचपून बघतो. बहुधा खिडकीतच ठेवलीय मगाशीच. अंदाजानेच ठेचकाळत तो तिथे पोचतो. मंद झुळूक येतेय. वाऱ्यामुळेच विझलाय वाटतं. तो कवाडं ओढून घेतोय. पण..पण.. कुणीतरी आहे तिथे. अगम्य, निराकार... लालभडक डोळे... विचकलेले दात...शोषून घेतंय जणू आपल्याला. ऑ माय गॉड..... खडबडून तो जागा होतो, पूर्णपणे घामाघूम.....छ्या...! नाईटमेअर...परत तेच. दिवा फडफडतोय. खिडक्या लावल्यात. मरू दे च्यायला. विझला तर विझला. मी झोपतोय परत. खिडकीतला दिवा मात्र पूर्णपणे विझलाय.

वाचने 8520 वाचनखूण प्रतिक्रिया 39

जडभरत Tue, 08/04/2015 - 21:35
+१ नाईटमेअर्स अनुभवलेला मी. :(

+१ अनपेक्षित सार्थक! ;-) समांतर:- आय डी ह्याक झालेला दिसतोय.. :P

नाखु Wed, 08/05/2015 - 08:55
खलबली खलीबल्ली खलीवल्ली !!!!! कथेला +१ स्वगतः दया कुछ तो गडबड है !!! निरागस नाखुस

+१ खतरनाकच ! हेही आपल्या नोलान भाऊंच्या स्टाईल ने आहे काय ? खिडकीतला दिवा मात्र पूर्णपणे विझलाय. >>> मग दिवा फडफडतोय. हे काय ? नक्की नाईटमेयर काय ? भारीच ! पुभाप्र !!

द-बाहुबली Wed, 08/05/2015 - 12:07
एक डॉक्टर जो चमडीकी बिमारीयोंका इलाज करनेमे माहीर है वोह एक सपना देखता है की वो टीवी देख रहा है, लेकीन जब टीवी के सामने वो जाग जाता है तो उसे वोह सपना बिलकुल याद नही रहता क्या तुम मानते हो.. ?