Skip to main content

एक जुनी कविता: सहज आठवली म्हणून

लेखक अविनाश ओगले यांनी रविवार, 30/11/2008 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा जेव्हा वारे युद्धाचे वाहती जवान नाहती कौतुकात शत्रूच्या भयाने होतो थरकाप मुखी आपोआप राष्ट्रगीत थंडी नि वार्‍यात झुंजती जवान शब्दांचेच दान त्यांना द्यावे आणि कोणी वेडे हुतात्मेही होती त्यांची देशभक्ती गौरवावी संपताची युद्ध त्यांना विस्मरावे आपण रमावे आपल्यात रात्रंदिन त्यांना युद्धाचा प्रसंग नेते सारे दंग स्वार्थामाजी
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2668
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

रात्रंदिन त्यांना युद्धाचा प्रसंग नेते सारे दंग स्वार्थामाजी १००% सत्य.. मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर

कविता छान आहे. देशभक्तीवरची कविता.

रात्रंदिन त्यांना युद्धाचा प्रसंग नेते सारे दंग स्वार्थामाजी अगदी खरं! तात्या.