मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

[शतशब्दकथा स्पर्धा] लोकमान्य

मृत्युन्जय · · स्पर्धा
आम्च्या बाई मस्स कड्डक मारत्यात, अंगठे बी धराया लावत्यात अतल्याने बोरं खाल्ली आनि बिया टाकल्या बाकाखाली. मी बी खाल्ली पन बिया घातल्या खिशात. झाड लावनार. मंग बाई आल्त्या वर्गात इंस्पेक्टर सोबत. कचरा बघुन भडकल्याच. पन बोलाल्या नाहित साहेबासमोर. साहेबाने म्हया इचारले "आज २३ जुलाई म्हंजे काय माहितीये का?" म्या म्हनलो "माहित नसायला काय झालं? आज लोकमान्यांचा वाढदिवस." टिळकांची गोष्ट बी सांगितली. मास्तर खुष. चॉकोलेट देउन गेले निघुन. चॉकोलेट पडले म्हनुन उचलाया गेलो तर बियाच पडल्या खाली. बाई म्हनल्या "तुच केला कचरा उचल समदा आता." म्या म्हनलो "आज टिळकांचा बड्डे. मी कचरा केला नाय मी उचलनार नाय." बाईनी काहून वर्गाबाह्यर काढला?

वाचने 17720 वाचनखूण प्रतिक्रिया 89

एस Tue, 08/04/2015 - 16:49
मस्स्स्स्स्त्त!

चिगो Tue, 08/04/2015 - 16:54
एकच नंबर.. जाम आवडली. आद्य शतशब्दकथा-कन्या 'आन्जी'चा खरा मैतर परत आला, असं वाटलं.. अवांतर : भाषेचा बाज वर्‍हाडी आहे असं सम्जून चालल्यास 'साहेबाने म्हया इचारले' हे 'साहेबानं मले इचारलं' असं हवं.. म्हया/म्या = मी, मले = मला..

कपिलमुनी Tue, 08/04/2015 - 17:14
एक नंबर ! शाताशब्द कथांचा भावबंबाळपणा कमी होऊन खुसखुशीतपणा वाढला आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

नाखु Tue, 08/04/2015 - 18:21
उत्कंठा वाढलीय हे पण खरे !!! ठळक पणे टिळकलेला नाखु

जेपी Tue, 08/04/2015 - 18:05
+1 कथानायकाला नाव द्यायला पाहिजे होत.

dadadarekar Tue, 08/04/2015 - 18:14
ही खरं तर आंजीचीच कथा.

सदस्यनाम Tue, 08/04/2015 - 18:21
+१ अतिवास यांच्या कथेचे वातावरण आठवले.