✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कळी

आ — आनंदमयी, Tue, 08/04/2015 - 13:51
वसंत आला, नटली धरती, सुखे बहरल्या तरु-वेली पानांआडून अवघडलेली एक कळी का रुसलेली ? हर्ष बहरतो फुलांफुलांवर सुगंध उधळीत बेभान सतरंगी ही फूलपाखरे गाती गंधित मधुगान सोन सकाळी ह्या वेलींवर भृंग गुंफती सूर किती.. पानांवरती होवुन मोती दवबिंदू हे लखलखती देव उभ्या ह्या दिव्यत्वाला तेज अर्पितो सोनसळी, आणिक येथे बावरलेली झुरते का ही एक कळी? "गंध फुलांना,भृंग सूरमय, फूलपाखरे रंगित ही पक्ष्यांची अनमोल सुरावट, सृष्टी रचते संगित ही दिव्य सृष्टीच्या निर्मात्याने मला रंग ना रूप दिले कुरूप वेडी दुर्लक्षित मी, जगणे हे जगणे कसले कधी वाटते देठ सोडुनी चुंबावी ओली माती मान टाकुनी धरणीवरती विरून जावे निर्वाती" कळी भाबडी एकलकोंडी होती कधिची बसलेली अबोध वेडी नितांत सुंदर जगण्यावरती रुसलेली.... निळसर वारा तोच कुठुनसा माळुनी आला गंध नवा सूर्यकिरण हे नभाआडुनी आले घेऊन तेज दिवा चुंबुनी वारा म्हणतो कळिला, "ऊठ खुळे हे तेज पहा.. कोमल तुझिया देहावरती जणू तळपले सूर्य दहा कोष मिटुन का बसलिस वेडे,पसर पाकळ्या उमलून ये गूज आतल्या सौंदर्याचे सखे एकदा जाणून घे..!" वात स्पर्शता कळी उमलली, बहर पसरला चोहिकडे भाळून अवघे रान तिच्यावर शिंपडते कौतूक सडे स्वत्वाचे हे गूज जाणुनी उमलुन आले फूल नवे आतिव सुंदर आयुष्यावर,जगण्याचे अर्पून दिवे ©अदिती जोशी

प्रतिक्रिया द्या
2655 वाचन

💬 प्रतिसाद (7)

सुरेख!

रातराणी
Tue, 08/04/2015 - 13:54 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

शब्दकळा सुंदर आहे.

एस
Tue, 08/04/2015 - 14:08 नवीन
शब्दकळा सुंदर आहे.
  • Log in or register to post comments

+१

चाणक्य
Tue, 08/04/2015 - 18:11 नवीन
असेच म्हणतो. रचना छान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

छानंच!!! मस्त!!!

जडभरत
Tue, 08/04/2015 - 14:24 नवीन
छानंच!!! मस्त!!!
  • Log in or register to post comments

अनेक दिवसांनी एक सुंदर

वेल्लाभट
Tue, 08/04/2015 - 14:42 नवीन
अनेक दिवसांनी एक सुंदर लयबद्द्ध आणि भावपूर्ण कविता वाचली. प्रचंड आवडली. क्या बात है ! सुरेख ! अतिशय सुरेख !
  • Log in or register to post comments

व्वाह

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 08/04/2015 - 14:57 नवीन
व्वाह!
  • Log in or register to post comments

पोटापुरता पसा पाहिजे.......

अत्रुप्त आत्मा
Tue, 08/04/2015 - 15:11 नवीन
पोटापुरता पसा पाहिजे....... हीच चाल आली मनात एकदम वाचता वाचता.. बाकि गीतकाव्य तर काय? Image removed. आणि Image removed. .
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा