Skip to main content

शतशब्दकथा स्पर्धेच्या निमित्ताने

लेखक आदिजोशी यांनी सोमवार, 03/08/2015 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
स्पर्धेसाठी लिहिलेल्या कथेचा सिक्वलही लिहायचा आहे हे वाचल्यावर एक गोष्ट लक्षात आली त्यासाठी धागा काढतोय. आदूबाळच्या धाग्यावरही ते सांगता आलं असतं. पण हा मुद्दा त्या धाग्यावरील इतर प्रतिसादांपुढे वाचला गेला नाही तर स्पर्धकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणून नवा धागा. पुरेशा लोकांनी वाचल्यावर हा धागा उडवला तरी चालेल. आत्ता उडवला तरी चालेल. तर... वाचकांना ही विनंती आहे की... कथेचा पुढचा भाग काय असेल ह्या संबंधीचे तुमचे अंदाज कॄपा करून धाग्यावर टाकू नका. धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3608
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

In reply to by टवाळ कार्टा

सन्यास तू भेटल्यामुळे(च) घेतला होता काय? यावरही प्रकाश पडलाच पाहीजे. मिपामाहीतीअधिकार्योजनाविचारणाप्डताळणीम्हासंघ तर्फे वाचक हितार्थ

स्पर्धकांना आवाहन आपल्या स्पर्धेसाठी लिहिलेल्या कथेच्या शिर्षकाच्या आधी
[शतशब्दकथा स्पर्धा]
असा फ्लॅग लिहा. म्हणजे पटकन लक्षात येइल.

स्पर्धकांना आवाहन स्पर्धेसाठी एकचं शतशब्दकथा ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे ज्यांनी एकापेक्षा जास्तं कथा टाकलेल्या आहेत त्यापैकी कुठली कथा स्पर्धेसाठी आहे हे साहित्य संपादकांना कळवावे. धन्यवाद. आणि बरेचं लोकं [शतशब्दकथा स्पर्धा] असा फ्लॅग लिहित नाहियेत. एवढ्या शतशब्दकथांच्या महापुरामधे तुमची कथा हरवु नये ह्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो एकचं शतशब्दकथा ग्राह्य धरली जाणार आहे कि फक्त पहिलीच कथा ग्राह्य धरली जाणार आहे ?कृपया स्पष्ट करावं

In reply to by तुडतुडी

प्रत्येकी एकच कथा स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाईल. एकापेक्षा अधिक कथा प्रकाशित केल्यास पहिली कथा स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाईल.
http://www.misalpav.com/node/32159

:-( ओके . कृपया पुढच्या वेळेस एकापेक्षा जास्त कथा प्रकाशित झाल्या तर कुठली कथा स्पर्धेसाठी द्यायची हे ठरवण्याचं स्वातंत्र्य लेखकाला द्यावं . म्हणजे चांगल्या चांगल्या कथा स्पर्धेत राहतील .माझ्या दुसर्या कथेला एवढे +१ मिळूनसुद्धा ती कथा स्पर्धेसाठी ग्राह्य धरता येत नाही म्हणून वाईट वाटतंय हो