Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] पदार्पण

लेखक पगला गजोधर यांनी शनिवार, 01/08/2015 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
संपलाचकी खेळ आता, शेवटचीच विकेट, शेवटचे दोन चेंडू, चारच धावा जिंकायला.... बॉलर शॉर्ट टाकणार अशी शंका येऊनच फलंदाजाने मारलेला हुक हुकलाच! चेंडू बॅटच्या टोकाला लागून उंच उडाला, पहिल्यापासून चेंडूवरचं नजर खोवलेला तो, डीप लाँग ऑनसर्कलवरून पुढे पळत येताना मैदानावरची सर्वात महत्त्वाची व्यक्ती झालेला, निदान त्या क्षणापुरती, श्वास रोखलेल्या स्टेडीअमच्या अपेक्षा शिगेला….पदार्पणाच्या सामन्यातील 'द कॅच' घ्यायचाच, फ्लडलाईटने डोळे खरवडले तरी…अफलातूनरीत्या शरीर झोकून देत घेतला.…एकदम हीरो झाल्याच्या उन्मादातून त्याने भानावर येवून कॅप्टनकडे पाहिलं, सकाळी त्याच्या खांद्याभोवती हात टाकून धीर देणारा कॅप्टन, भर मैदानात त्याला ओरडत होता "भोसxीके जल्दीसे थ्रो कर "…. स्टेडीअमच्या गोंगाटात तीनच शब्द त्याने ऐकले " *** ## ****वो नोबॉल था **** ## "

वाचने 6116
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

दिलेल्या शिव्या मोजायच्या की नाही ???

विनोद कांबळी आठवला.

कथा आवडली. शतशब्द कथा अपार अतिव वेदनेच्या मांडणीशिवाय लिहलीच जात नाही असा जो खुळचट भ्रम निर्माण झाला आहे त्याला सुरेख छेद दिला आहे... म्हटलं तर मिश्कील म्हटलं तर... करुण :)

In reply to by द-बाहुबली

हेच म्हणतो. चेतन शर्माला आम्ही त्या ऐतिहासिक सिक्सरनंतर घातलेल्या शिव्या आठवल्या.

+० कथा ठीक आहे , काही तरी खास होईल असे वाटले होते शेवटी पण तसे काही होत नाही , हे शतशब्द कथा मधे चालते का ? ह्या प्रश्नाचे उत्तर माहीत नाही , म्हणजे लघुकथा ही निर्णयाप्रत येणारी असली पाहिजे ना ? की अशी ही चालते ?

In reply to by गौरी लेले

शेवट अनपेक्षित आहे.

+१

+१

+१

+१११

+१

+१

मिपा कथा स्पर्धेतली ही पहिली कथा. शनिवारीच वाचली होती पण नेमके त्या वेळी मिपा गंडल्यामुळे प्रतिसाद देता आला नव्हता. नायतर मीच पायाला नंबर लावला असता. पैजारबुवा,

+१

आवडली

हा हा

+१

+१

+१

+१

+१

+१

+१

आवडली.