<विडंबनः मिसळपाव वाचा व्यवस्थापन नीती शिका>
प्रेरणा: बाहुबली बघा व्यवस्थापन नीती शिका
मिसळपाव हे संस्थळ, तिथले लेख, कविता, काथ्याकुट आपण सर्वानी वाचलेच असणारच, पण ते फक्त वाचन आणि मनोरंजन म्हणून न बघता एक बोधप्रद संस्थळ म्हणून बघितले तर कसे होईल ह्यासाठी हा खटाटोप.
मिसळपाव वर ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.
दूरदृष्टी / नियोजन :- मिसळपावचे काम नियोजनबद्ध होते हे सर्व मिपाकर जाणतातच. जसे अनेक चांगले लेखक इथे उत्तमोत्तम साहित्य लिहितात, त्याचबरोबर अनेक डूआयडी बरेचदा त्रास देण्याच्या उद्देशाने येतात, काही फक्त खोड्या काढायलाच येतात, मग जेव्हा संपादक मंडळ यात उडी मारते तेव्हा आधी पासून ठेवलेली कात्री कामी येते.
नात्यांची जपणूक :- जेव्हा तथाकथित कंपूगिरी करणाऱ्यांकडून एक प्रतिसाद येतो, तेव्हा बाकीचे सगळे लगेच आपले उप उप प्रतिसाद देत सर्व वाचकांचा कॅमेरा आपल्याकडे खेचून घेतात. मिपाच्या कुठल्याही महान रत्नांना, मग हेवनवासी आयडी असू देत, मोजी असू देत, नाहीतर मोकालायाचे कवी असू देत, कुणाला म्हणून कुणाला आम्ही मिपाकर विसरू शकत नाही. हे सदस्यांचे लेखकांशी असलेले नातेच इथे जपले जाते.
कमी मटेरिअल मध्ये काम चालवणे :- शशक म्हणजेच शतशब्दकथा हे याचे उत्तम उदाहरण. शिवाय मग रच्याकने, हहपुवा वगैरे सारखे अनेक शब्द वाचून याचीच प्रचीती येते.
संशोधन :- ड्वाळे पाणावले, चोप्य पस्ते, उप्डते, दुदुदु, चान चान, पुस्पगुच्छ.. किती किती लिहिणार इथे संशोधन झालेल्या शब्दांबद्दल. शिवाय वर दिलेली रत्ने, त्यांचे लेख हुडकून वर आणणे हे संशोधन मिपावर अविरत चालू असते. कोण कुणाचा डूआयडी आहे हे शोधून काढणे हेही एक आलेच.
कार्य तत्पर :- आपल्या वरील जबाबदारी नेहमी महत्वाची मानली, कुठलाही काथ्याकुट आला की त्यावर तत्परतेने प्रतिसाद देणारेही मिपाकर, आणि जिल्ब्या पाडणारेही मिपाकरच. शिवाय मग डुआयडी शोधून काढण्याचे काम असू देत, खरडवहीत उचकापाचक असू देत, मिपाकर आवडीने आणि तत्परतेने ही कामे करतात.
संरक्षण (सरंक्षण) :- दिव्य मराठीतून (ते वर्तमानपत्र नाही, दिव्य हे विशेषण) लिहिणारे लेखक, आपल्या लिखाणाचा फाजील आत्मविश्वास बाळगणारे लेखक, अशांना पळवून लावण्यात इथले सदस्य हिरीरीने सहभागी होतात आणि पर्यायाने त्या लेखकांचे पुढील लेख निदान मिपापुरते थांबवून इतरांना संरक्षण देतात. आणि तरीही, यातलेच काही लेख विशेष सुरक्षा घेऊन, वाखू साठवून कधीतरी वर काढतात.
प्रोत्साहन :- सुज्ञ मिपाकरास याबाबत काही सांगण्याची गरजच नाही. मिपा हा अखंड प्रेरणास्त्रोत आहे.
तुम्हाला मिसळपाववर अजूनही अनेक वैशिष्ट्ये दिसली असतील, म्हणून तर तुम्ही इथे येता. तुम्ही तुमचे मत इथे कुठेही नोंदवू शकता. मग लेख लिहा, प्रतिसाद लिहा, चर्चा करा, वाद घाला, दंगाही करा, फक्त त्या सगळ्यावर वाचक/प्रतिसादक वरची कुठली व्यवस्थापन वैशिष्ट्ये दाखवून देतात, त्याचा अनुभव घ्या आणि मिपानीती शिकत राहा. :)
याद्या
7437
प्रतिक्रिया
64
मिसळपाव
हाहाहा
मुल धागा
असंय व्हय.
In reply to मुल धागा by पाटीलअमित
हो. तुमचा मुल धागा आहे.
In reply to मुल धागा by पाटीलअमित
हहपुवा
In reply to हो. तुमचा मुल धागा आहे. by प्यारे१
हसावे का ?
In reply to हहपुवा by एस
हायला....आमचा प्रश्न.....
In reply to हसावे का ? by पाटीलअमित
तात्या .......
In reply to हायला....आमचा प्रश्न..... by माम्लेदारचा पन्खा
आणि तुम्ही नवीन????
In reply to तात्या ....... by पाटीलअमित
हो वाचक आधीपासून होतो
In reply to आणि तुम्ही नवीन???? by टवाळ कार्टा
मग मिपा आणि मिपाकर कसे आहेत
In reply to हो वाचक आधीपासून होतो by पाटीलअमित
नशीब वाहिका नाही सजवली
In reply to मग मिपा आणि मिपाकर कसे आहेत by टवाळ कार्टा
हो फार छान...चांगला मुहुर्त
In reply to नशीब वाहिका नाही सजवली by पाटीलअमित
अरे जुना है यह!
In reply to आणि तुम्ही नवीन???? by टवाळ कार्टा
इन्सानियत के दुश्मन
In reply to अरे जुना है यह! by आदूबाळ
महाराज....निजरूप दाखवा हो !
In reply to तात्या ....... by पाटीलअमित
हम गया नाही जिंदा हैन
In reply to महाराज....निजरूप दाखवा हो ! by माम्लेदारचा पन्खा
हम किदर बोला की आप गये है....
In reply to हम गया नाही जिंदा हैन by पाटीलअमित
हो पण धागा कुठे आहे हा ?
In reply to हायला....आमचा प्रश्न..... by माम्लेदारचा पन्खा
या नवीन नीती मुळे तू लवकर च
हायला! तुम भी? :D
भन्नाट
"- (मिपाबालक) दंगा" असं वाचलं
In reply to भन्नाट by श्रीरंग_जोशी
नशीब अजून यमक नाही जुळाले
In reply to "- (मिपाबालक) दंगा" असं वाचलं by डॉ सुहास म्हात्रे
हा हा
In reply to "- (मिपाबालक) दंगा" असं वाचलं by डॉ सुहास म्हात्रे
मी तर आधी तिकडेच जातो ,मग
In reply to हा हा by श्रीरंग_जोशी
तुम्ही आणि मिपाबालक???
In reply to भन्नाट by श्रीरंग_जोशी
जसं एखादं बालक उत्साही असते
In reply to तुम्ही आणि मिपाबालक??? by मधुरा देशपांडे
कमी मटिरियलमध्ये काम चालवणे
जमंलय!!
आपला कंपू! आपला कंपू!
मूळ धाग्याला पण प्रतिसाद देऊन
In reply to आपला कंपू! आपला कंपू! by एस
आम्ही 'संरक्षण'पण तितक्याच
In reply to मूळ धाग्याला पण प्रतिसाद देऊन by पाटीलअमित
हाहाहा...धन्यवाद. :)
In reply to आपला कंपू! आपला कंपू! by एस
अरे कोणीतरी मोकलाया दाही
संशोधन
In reply to अरे कोणीतरी मोकलाया दाही by जडभरत
हे का अच्चानक
In reply to संशोधन by मोहनराव
नाही जमलं.
आणि ब्लोग पण नाही
In reply to नाही जमलं. by आदूबाळ
नका बोलू असं !
In reply to नाही जमलं. by आदूबाळ
इथे प्रांतागणिक मराठी भाषा
In reply to नाही जमलं. by आदूबाळ
अहिरानीचा...
In reply to इथे प्रांतागणिक मराठी भाषा by स्रुजा
सरंडर
In reply to इथे प्रांतागणिक मराठी भाषा by स्रुजा
नो सरंडर वन्ली एन्काऊंटर ;)
In reply to सरंडर by आदूबाळ
जर माझ्या धाग्याचे सरंक्षण
In reply to सरंडर by आदूबाळ
खरंय तुमचं...याला म्हणतात
In reply to नाही जमलं. by आदूबाळ
खी खी खी
या ...
In reply to खी खी खी by टवाळ कार्टा
वा
विडंबन लै भारी !
;-)
मस्त विडंबन....
खंग्री विडंबन=))
मिपावरुन आदर्श घेऊन तुम्ही
"एक लंबरी" व्यक्तीमत्वाचे लिखाण !
हेहेहेहे ! जबरी विडंबन !
सगळ्यांना धन्यवाद!! :)
लोक मूळ लेख पेक्षा remake ला
गुरू
+१
मराठिी विडंबन करुन पैसे कसे
दात कोरुन =))
In reply to मराठिी विडंबन करुन पैसे कसे by अजया
>>>ठिी
In reply to मराठिी विडंबन करुन पैसे कसे by अजया
नव्या मोबाईलची करामत सुरु आहे