Skip to main content

<विडंबनः मिसळपाव वाचा व्यवस्थापन नीती शिका>

<विडंबनः मिसळपाव वाचा व्यवस्थापन नीती शिका>

Published on 31/07/2015 - 17:59 प्रकाशित मुखपृष्ठ
प्रेरणा: बाहुबली बघा व्यवस्थापन नीती शिका मिसळपाव हे संस्थळ, तिथले लेख, कविता, काथ्याकुट आपण सर्वानी वाचलेच असणारच, पण ते फक्त वाचन आणि मनोरंजन म्हणून न बघता एक बोधप्रद संस्थळ म्हणून बघितले तर कसे होईल ह्यासाठी हा खटाटोप. मिसळपाव वर ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. दूरदृष्टी / नियोजन :- मिसळपावचे काम नियोजनबद्ध होते हे सर्व मिपाकर जाणतातच. जसे अनेक चांगले लेखक इथे उत्तमोत्तम साहित्य लिहितात, त्याचबरोबर अनेक डूआयडी बरेचदा त्रास देण्याच्या उद्देशाने येतात, काही फक्त खोड्या काढायलाच येतात, मग जेव्हा संपादक मंडळ यात उडी मारते तेव्हा आधी पासून ठेवलेली कात्री कामी येते. नात्यांची जपणूक :- जेव्हा तथाकथित कंपूगिरी करणाऱ्यांकडून एक प्रतिसाद येतो, तेव्हा बाकीचे सगळे लगेच आपले उप उप प्रतिसाद देत सर्व वाचकांचा कॅमेरा आपल्याकडे खेचून घेतात. मिपाच्या कुठल्याही महान रत्नांना, मग हेवनवासी आयडी असू देत, मोजी असू देत, नाहीतर मोकालायाचे कवी असू देत, कुणाला म्हणून कुणाला आम्ही मिपाकर विसरू शकत नाही. हे सदस्यांचे लेखकांशी असलेले नातेच इथे जपले जाते. कमी मटेरिअल मध्ये काम चालवणे :- शशक म्हणजेच शतशब्दकथा हे याचे उत्तम उदाहरण. शिवाय मग रच्याकने, हहपुवा वगैरे सारखे अनेक शब्द वाचून याचीच प्रचीती येते. संशोधन :- ड्वाळे पाणावले, चोप्य पस्ते, उप्डते, दुदुदु, चान चान, पुस्पगुच्छ.. किती किती लिहिणार इथे संशोधन झालेल्या शब्दांबद्दल. शिवाय वर दिलेली रत्ने, त्यांचे लेख हुडकून वर आणणे हे संशोधन मिपावर अविरत चालू असते. कोण कुणाचा डूआयडी आहे हे शोधून काढणे हेही एक आलेच. कार्य तत्पर :- आपल्या वरील जबाबदारी नेहमी महत्वाची मानली, कुठलाही काथ्याकुट आला की त्यावर तत्परतेने प्रतिसाद देणारेही मिपाकर, आणि जिल्ब्या पाडणारेही मिपाकरच. शिवाय मग डुआयडी शोधून काढण्याचे काम असू देत, खरडवहीत उचकापाचक असू देत, मिपाकर आवडीने आणि तत्परतेने ही कामे करतात. संरक्षण (सरंक्षण) :- दिव्य मराठीतून (ते वर्तमानपत्र नाही, दिव्य हे विशेषण) लिहिणारे लेखक, आपल्या लिखाणाचा फाजील आत्मविश्वास बाळगणारे लेखक, अशांना पळवून लावण्यात इथले सदस्य हिरीरीने सहभागी होतात आणि पर्यायाने त्या लेखकांचे पुढील लेख निदान मिपापुरते थांबवून इतरांना संरक्षण देतात. आणि तरीही, यातलेच काही लेख विशेष सुरक्षा घेऊन, वाखू साठवून कधीतरी वर काढतात. प्रोत्साहन :- सुज्ञ मिपाकरास याबाबत काही सांगण्याची गरजच नाही. मिपा हा अखंड प्रेरणास्त्रोत आहे. तुम्हाला मिसळपाववर अजूनही अनेक वैशिष्ट्ये दिसली असतील, म्हणून तर तुम्ही इथे येता. तुम्ही तुमचे मत इथे कुठेही नोंदवू शकता. मग लेख लिहा, प्रतिसाद लिहा, चर्चा करा, वाद घाला, दंगाही करा, फक्त त्या सगळ्यावर वाचक/प्रतिसादक वरची कुठली व्यवस्थापन वैशिष्ट्ये दाखवून देतात, त्याचा अनुभव घ्या आणि मिपानीती शिकत राहा. :)
लेखनप्रकार

याद्या 7437
प्रतिक्रिया 64

भारी हं...! लंबर एक विडंबन जमलंय. :) -दिलीप बिरुटे

In reply to by पाटीलअमित

मला वाटलं अगोदर विडंबन आलं आणि नंतर मुल धागा. थ्यांक्स हं... ;) -दिलीप बिरुटे

In reply to by पाटीलअमित

मग मिपा आणि मिपाकर कसे आहेत हे माहित असेलच....मग असे का करताय...तुम्च्यासाठी टेंप्यु सजवायला घेतलाय सगळ्यांनी

In reply to by पाटीलअमित

आज गुरूपौर्णिमा .....मंगल दिवस.... म्या पामरानं, चांडाळानं तुमास्नी वळिकलं न्हाय वो.......कुटं फेडू ही पापं ? थॉर प्रंप्रेतले दिसताय तुमी...... प्रकट व्हा ........!!!

क विडंबन क विडंबन. आपल्या मिपाभ्यासाला सादर प्रणाम. - (मिपाबालक) रंगा

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नशीब अजून यमक नाही जुळाले ==================\ आजची स्वाक्षरी बाहुबली बघा व्यवस्थापन नीती शिका

In reply to by मधुरा देशपांडे

जसं एखादं बालक उत्साही असतं तसाच मिपावर दुवे शोधण्यात मी उत्साही असतो ;-) . एकदा मिपावय झालं की माझाही उत्साह मावळेल कदाचित :-) .

नाही जमलं. एकतर फारच शुद्ध लेखन आहे, आणि कोणत्याच बोलीचा प्रभाव नाही. आणि तुम्हाला करोडपती व्हायची साधी महत्त्वाकांक्षासुद्धा नाही.

In reply to by आदूबाळ

जर माझ्या धाग्याचे सरंक्षण त्वरित काढेल नाही गेले आणि रेप्लाय नाही आले तर ह्यापुढील लेख साठी कालालाकेया वाली भाषा वापरली जाइल ह्याची नोंद घ्यावी

In reply to by आदूबाळ

खरंय तुमचं...याला म्हणतात मिपाकरांचे प्रोत्साहन...अजुन ३ नवीन धागे काढायला वाव आहे असे सुचवत आहात. मिपावरील लेखांमुळे माझ्या महत्वाकांक्षा वाढल्या आहेत, काढते नवीन धागे. ;)

खी खी खी उद्याचा दिवस सत्कारणी लाग्णार ;)

ऐन गुरुपोर्निमे च्या दिवशीच शिकवनी सुरु झाली. बेस झाल.

पौर्णीमेला "गुरु दक्षिणा" पोचली आणी अभ्यास-व्यासंगाबद्द्ल _/\_ गपचिप बालक नाखु

मस्त जमलंय विडंबनात्मक … +१