Skip to main content

याकुब मेमनच्या फाशीच्या निमित्ताने

लेखक विद्यार्थी यांनी शनिवार, 25/07/2015 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
१९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकुब मेमनचे फाशी वाचवण्याचे सर्व पर्याय संपत आल्यामुळे त्याला लवकरच फाशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अतिरेक्यांना फाशी देण्याची वेळ आली की होणाऱ्या राजकारणाची भूतकाळातील अनेक उदाहरणे असूनसुद्धा महाराष्ट्र सरकारने किंवा सरकारमधील काही अतिउत्साही व्यक्तींनी फाशीची तारीख आणि वेळ देखील जाहीर करून टाकली. फाशी प्रकरणाचा गाजावाजा होणे ही आजकालचीच गोष्ट वाटते कारण भारतात स्वातंत्र्यापासून अनेक लोकांना फाशीची शिक्षा झाली आहे परंतु त्याची एवढ्या प्रमाणात चर्चा झाल्याचे आठवत नाही. समाजातील काही उदार मतवादी लोकांना अतिरेकी, नक्षलवादि, अट्टल गुन्हेगार यांच्या मानवाधिकाराच्या चर्चा करून आणि त्यांच्याबद्दल समाजात नाहक सहानुभूती निर्माण करण्याची घाणेरडी सवय लागली आहे. आणि असे करून ते स्वतःची दुकाने चालवत असतात. फाशी झालेल्या गुन्हेगाराची जात, धर्म याबद्दल वक्तव्ये करून राजकीय पोळ्या भाजण्याचे प्रकार तर फारच घृणास्पद आहेत. बॉम्बस्फोटामध्ये मारले गेलेले सर्व भारतीय नागरिक होते. त्यांची जात किंवा धर्म पाहून त्यांना मारले नव्हते तर मग फाशी झालेल्या या अतिरेक्याच्या धर्माची चर्चा का? भारतात फाशीची किंवा देहदंडाची शिक्षा असावी किंवा नाही यावर वेगळी चर्चा होऊ शकते पण याकुब मेमनने मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यासाठी केलेली मदत आणि या स्फोटांमध्ये २५७ निष्पाप लोकांचे गेलेले बळी, हे भारतीय कायद्यानुसार त्याला फाशीची शिक्षा देण्यासाठी पुरेसे आहेत. याशिवाय याकुब मेमनला कायद्यानुसार स्वतःला वाचवण्याचे मिळणारे सारे पर्याय मिळाले आणि त्याने ते वापरालेसुद्धा. गुन्हेगार आणि अतिरेकी यांना निष्कारण सहानुभूती देणाऱ्या किंवा देण्याचा प्रयत्न करण्याऱ्या या सर्व राजकारणी लोकांना आणि तथाकथिक उदारमतवाद्यांना समाजाने अंतर्मुख होण्यास भाग पाडण्याची वेळ आली आहे असे आपणास वाटते का?

वाचने 50333
प्रतिक्रिया 277

प्रतिक्रिया

याकुब मेमनला त्याच्या सर्व समर्थकांसोबत या पंजाबातल्या दिनानगर गावात नेऊन घटनास्थळाची "सफर" घडवावी आणि मग त्या समर्थकांना विचारावे, आता काय ? :| वेन्सडेचा नासिरुद्दीन शहा सही करताना "२६/११ फक्र है" हे किमान आठवत असेल का असा प्रश्न पडला..

याकुब च्या निमित्ताने काही गोष्टी मला अजून उमजल्या नाहीत तो भारतात काय म्हणून परत आला किंवा त्याला आय एस आय शी बार्गेनिंग करून रमण ह्यांनी आणले असे म्हणणे योग्य ठरणार नाही कारण रमण ह्यांना बार्गेन करायचे तर टायगर साठी करतील किंवा दाउद साठी गेला बाजारभाव दौउद चा भाऊ व छोटा शकील ह्यांच्यात विस्तव जात नाही तेव्हा त्यांच्या पैकी एकाला आणतील माझ्यामते याकुब ला पाकिस्तानात राहणे पसंद नव्हते भारतात येण्यासाठी दाउद ने जसा जेठमलानी ह्यांना संपर्क साधला तसा याकुब सुद्धा प्रयत्नात असावा तेव्हा रमण ह्यांनी धूर्तपणे त्यास भारतात बोलवून त्यांचा कडून माहिती काढण त्या बदल्यात तुरुंगवास व पुढे कदाचित जामिनावर सुटका असे वचन दिले असावे म्हणून त्यांनी न्यायालयात याचिका सादर केली असेल ह्यात त्यांच्या देश प्रेमावर मला अजिबात शंका येत नाही पण त्यांचे निधन झाले व आजच्या राजकारणात याकुब ची फाशी ह्या घटनेला अनेक अर्थानी महत्व प्राप्त झाले मुंबई हल्ल्यातील कसाब फासावर लटकला पण त्याहून आधी १९९२ च्य हल्यातील कोणालाही फासावर लटकता आले नाही नाही म्हणा त्यातील काही आरोपी जामिनावर सुटले तेव्हा देशभक्ती सिद्ध करण्यासाठी असे वृत्त पत्र म्हणतात छोटा राजन ने त्यांचा गेम केला , का आय बी ने करवला जे झाले उत्तम झाले , तात्पर्य असे की मुळात रमण ह्यांनी जर खरच याकुब ला असे काही वचन दिले असेल तर सर्वोच्च न्यायालयात त्याला शिक्षा होण्याच्या आधी काहीतरी जुगाड आपल्या सरकार तर्फे करायचा होता त्याला मासा करायचा होता म्हणजे फाशी जन्म ठेपेवर आली असती कदाचित पण एकदा न्यायालयाने शिक्षा दिल्यावर ती बदलावी असा दुराग्रह करणे हा न्यायालयाचा अवमान करणे आहे त्यामुळे फाशी ही अटल आहे उद्या पर्यत ती नक्की करावी असे मला वाटते अवांतर दाउद ने आपल्या मुंबई मधील कारभारावर लक्ष राहावे म्हणून आपल्या छोट्या भावाला भारतात पाठवला त्याला काहीकाळ तुरुंगवास होऊन आज तो जामिनावर मुंबईत मुक्तपणे फिरत आहे नाही म्हणायला त्याने नानाचा सिनेमातील नव्हे नव्हे गेम करायचा प्रयत्न केला म्हणून त्यांच्यावर खुनी हल्ला सुद्धा झाला पण असाच काहीच बेत टायगर ने याकुब विषयी योजला असेल अवांतर टायगर मेनन ची भूमिका पवन मल्होत्राने झोकात केली होती

In reply to by निनाद मुक्काम …

माझ्यामते याकुब ला पाकिस्तानात राहणे पसंद नव्हते
त्याने दिलेल्या मुलाखतीनुसार ही सर्व गुन्हेगार मेमन मंडळी कराचीत डिफेन्स कॉलनीत एका मोठ्या बंगल्यात राहत होती.जेव्हा त्याला नेपाळमध्ये पकडला तेव्हा त्याच्याकडे काही पासपोर्ट्स्,काही व्हिडियोज सापडले.कोणताही गुन्हेगार असला माल घेऊन दुसर्या देशात,तेही भारताच्या मित्र देशात असा जाणार नाही.आय.एस.आय. किंवा दाउदच्या परवानगीशिवाय तो असा बाहेर जाण्याची शक्यता खूप कमी आहे.कारण येथे पोचल्यावर तो सर्व माहिती सी.बी.आय.ला देणार हे उघड होते.अपेक्षेप्रमाणे त्याने बरीच माहिती दिली,ज्यावरून पोलिसांना अनेकांना पकडणे शक्य झाले.भारता पोचल्यावर त्याने पत्नीला व काही भावांनाही येथे बोलवून घेतले.

काय विरोधाभास आहे! भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी दिले तेव्हा काही तत्कालीन विचारवंतांनी व प्रभावी नेत्यांनी त्यांच्या फाशीला विरोध केला नाही व त्यांना फाशी देऊ नये अशी ब्रिटिशांना विनंती केली नाही. पण आता याकूब मेमनला फाशी देण्याच जाहीर झाल्यावर त्याला फाशी देऊ नये अशी विनंती करणार्‍यांची मोठी फौज उभी आहे. कालाय तस्मै नमः!

आजच्या टाईम्स ओफ इंडीया मधे आलेला याकुबच्या वकीलांचा युक्तीवाद असा की, याकूब १९९६ पासून स्किझोफ्रेनिया चा रूग्ण आहे. त्यात तो गेली २० वर्षे तुरुंगात आहे जी जन्मठेपेपेक्षा जास्त शिक्षा होते. आणि एका गुन्ह्यासाठी जन्मठेप आणि फाशी देउ नये.. (स्किझोफ्रेनिया झाल्यावर याकूबला कन्या रत्नाचा लाभदेखील झाला)

तो भारतात काय म्हणून परत आला>> तो भारतात परत आला नाही . नेपाळ मध्ये असताना त्याला काठमांडू पोलिसांनी सापळा रचून अटक केली होती . तिथून त्याला दिल्लीला आणण्यात आलं आणि नेपाळ आपला दोस्त असल्यामुळे त्यांनी त्याला आपल्या हवाली केलं. याकुब आधी दुबईला , मग पाकिस्तान , मग bankok आणि तिथून नेपाळ ला गेला . तेव्हा रमण ह्यांनी धूर्तपणे त्यास भारतात बोलवून त्यांचा कडून माहिती काढण त्या बदल्यात तुरुंगवास व पुढे कदाचित जामिनावर सुटका असे वचन दिले असावे >>> याकुब काय कुक्कुलं बाळ आहे का हो ? शेंबड्या पोराला सुधा हा धूर्तपणा लक्षात येवू शकेल याकुब च्या फाशीला मिडिया ने नको तेवढं महत्व दिलंय . आणि हा असा गोंधळ होणार असेल तर ह्यापुढे फाशी गुपचूप दिली जावी . त्या मानवाधिकारवाल्यांकडे एवढं लक्ष द्यायची गरज नाही

सगळे मेनन पाकिस्तानात लपले होते तेव्हा हा नेपाळ मध्ये पर्यटनाला गेला होता का . आय एस आय ने त्याला असे मुक्त बागडायला परवानगी दिली आणि रॉ च्या प्रमुख रामान हे देशद्रोही मानायचे का त्यांनी त्याच्या फाशिविरोधात याचिका केली लक्षात घ्या महेश भट्ट व रमण ह्यांनी फाशी न होण्या मागे घेतलेल्या घेतल्याला भूमिकेत जमीन अस्मानाचा फरक आहे. कुक्कल बाळ... दाउद चा भाऊ भारतात परत आला त्याला अटक केली , खटला भरला व मग रीतसर जमीन मिळवून सध्या मस्त जीवन जगत आहे , दाउद चा कारभार सांभाळत आहे , भारतात शिक्षा झालेले जयललिता लालू सलमान असा लांबलचक इतिहास पहिला तर याकुब चा त्यावेळचा निर्णय अगदीच बाळबोध नव्हता.

In reply to by निनाद मुक्काम …

२५७ माणसे ठार झाली आहेत अशा केसमध्ये 'आपण कधीतरी सुटू शकतो' अशी कल्पना कोणी करीत असेल तर तो मूर्ख म्हंटला पाहिजे.कदाचित फाशी नाही पण आपण आयुष्याच्या अखेरपर्यंत तुरुंगातच असणार आहोत ह्याची कल्पना याकुबला भारतात परतताना नसेल ?

सगळे मेनन पाकिस्तानात लपले होते तेव्हा हा नेपाळ मध्ये पर्यटनाला गेला होता का>> त्याचं त्यालाच माहित . याकुब भारतात परतला नवता हो . त्याला नेपाळमध्ये अटक करण्यात आली म्हणलं ना .

दाउद चा भाऊ भारतात परत आला त्याला अटक केली , खटला भरला व मग रीतसर जमीन मिळवून सध्या मस्त जीवन जगत आहे , दाउद चा कारभार सांभाळत आहे>>> कोणता भाऊ ? आणि असं असेल तर त्याचा त्या गुन्ह्यात तेवढा हात नसेल . न्यायालयाने काय त्याला असाच सोडून दिला असं म्हणायचय का तुम्हाला ? मेनन चा मात्र ह्या गुन्ह्यात सिंहाचा (असा शब्दप्रचार आहे ) वाटा होता. न्यायालयाचा अवमान करता ऑ … हे लोक जिहाद (धर्मयुद्ध ?) लढत असतात तर असे लपून छापून का हल्ले करतात ? हे आमचं धर्मयुद्ध आहे असं म्हणून शूरासारखं समोर येवून का लढत नाहीत ? आणि धर्मकार्य म्हणून फासावर का जात नाहीत ? आता का जीवाची भिक मागत दयेची याचना करतात ?

In reply to by तुडतुडी

धर्माच्या नावानं मरणं ही पुरातन धर्माची ओळख आहे. धर्माच्या नावानं मारून मरणं ही नूतन धर्माची ओळख आहे. .... नूतन आयडीवाला दादूमियाँ

In reply to by dadadarekar

कित्ती छान सगळं मरण, मरण, मरण. बरोबर आहे. जीवनावर प्रेम, मुल्य वगैरे फालतु भानगडीत पडायचच कशाला.

In reply to by अर्धवटराव

जे निमूटपणे मरतात ते इहलोकापेक्षा परलोकातील सुखावर प्रेम करतात . जर प्रेम , सुख वगैरे गोष्टींचं नव्या धर्माला वावडं आहे तर बिर्यानी , शेरोशायरी , ताजमहाल, अनारकली , तानसेन ...... हे सगळे काय ? .... मनसोक्त शहेनशाह दादूखान

In reply to by dadadarekar

आधि आपण सर्व उपभोग घ्यायचे. आणि इतरांना 'वरची' वाट दाखवुन आपली परलोकीच्या उपभोगांची बेगमी करायची. कित्ती उदात्त.

In reply to by अर्धवटराव

हे जग म्हणजे मोहमाया आहे... ते उरपाटे असे झाडाचे प्रतिबिंब आहे... खरे झाड ' वर ' आहे म्हणे ! असले तत्वद्नान असणार्‍यानी कशाला ' खाली ' रहायचे ?

In reply to by संदीप डांगे

आणि तिथे म्हणे बारबालक मदिरेचे चषक हातात घिऊन वाटतात म्हणे सगळ्या पुण्यवंतांना!!! आणि पृथ्वीवर कुठ्ठेच नसतील अशा सुंदरी म्हणे सेवेचे ठाई तत्पर असतात!!! कसली श्येवा तेवडं इचरू नका.

In reply to by जडभरत

त्या आता शेपाचशे वर्शात आल्या हो. पण सोमरस पाजणार्‍या अप्सरा त्याच्याही आधीपासुन आहेत ना ?

In reply to by dadadarekar

शी बाबा! मग काय '...' फायदा बदलून ????? शेवटी (अ‍ॅट द एन्ड ऑफ द डे) सगळंच पॅकेज शेम टु शेम आहे काय? बाकी या वयात 'कापाकापी' केलेली झेपणारे का दादा तुम्हाला? ;)

In reply to by प्यारे१

अहो इकडल्या पॅकेजमधे इंस्टंट फायदा आहे. तिकडे जमीनीत किती युगं पुरून राहायला लागेल ते त्या 'खोदा'ला माहित. त्यानंतर कधीतरी निवाडा होऊन 'ह्यांना' बहात्तर सुंदर्‍या मिळतात की बहात्तर शौकिन नवाबांना 'हे' मिळतील हे कळेल.

In reply to by dadadarekar

अप्सरा वाटताहेत ते एक ठीक हो. या पाकसाफ लोकांना जन्नत मध्ये मदिरा वाटायला पोरगे का पाहिजेत???

In reply to by dadadarekar

आणि कोणि खाली राहातो म्हटलं तरी आपण त्यांना बरं खाली राहु देऊ. पवित्र कार्य हाती घेतलय ना.

In reply to by dadadarekar

पण निरपराधांना मारून मारणाऱ्यांना परलोकात ७२ सुंदर्यांचा लाभ होतो म्हणतात ना? मग ते परलोकातल सुख नाही का? मला तर वाटत होतं कि याकूब पण ७२ सुंदर्यांसाठी आतुर असेल. कशाला उगाच माफीनामा वगैरे देत बसलाय? त्या सुंदर्या म्हाताऱ्या होत चालल्यात.

In reply to by ट्रेड मार्क

मला तर वाटत होतं कि याकूब पण ७२ सुंदर्यांसाठी आतुर असेल
ता काय मेल्यावर लगेच मिलात नाय.. आधी आंगठे धरून बाकीचे मरेपर्यंत वाट बघावी लागते म्हणतात. तो म्हणला असेल त्या हजारो वर्षांपैकी १५-२० इथेच काढू. बचेंगे तो और भी लढेंगे.

In reply to by आनन्दा

चांदणी काढून खाली बारीक अक्षरात लिहिलेले असते कि काय? या अटी व शर्ती या लोकांना सांगत नाहीत बहुतेक. उगाच आशेला लावून ठेवतात. तसं पण यांना प्रार्थनेच्या वेळेला बसून पायाचे अंगठे धरायची सवय असते की…पुढ्च्याचे ;)

आज व्टिटरवर पाहीलेले एक चित्र... ...

याकुबसाठी ज्या लोकांना मानवता आठवते त्या लोकांना बॉब्मस्फोटात ठार झालेल्यां बद्धल काहीच वाटत नाही हे विशेष ! सर्वोच्च न्यायलयाने जो निर्यण दिला तो विचार करुनच दिला ना ? मग ह्या मंडळींना याकुबच्या बाबतीत इतके प्रेमाचे उमाळे का ? याकूबच्या फाशीविरोधात मुस्लिम लोकप्रतिनिधी एकवटले, राष्ट्रपतींना पत्र LIVE: याकूब मेमनच्या याचिकेवर सुनावणी सुरु मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Infosys, Wipro & TCS lose over 1,00,000 people in last four quarters as automation kicks in

याकूबच्या फाशीविरोधात मुस्लिम लोकप्रतिनिधी एकवटले, राष्ट्रपतींना पत्र>> तुम्हाला कधीही कुठलाही मुसलमान दुसर्या मुसलमानाच्या विरोधात बोलताना आढळणार नाही .कधीही कुठलाही मुसलमान इतर धर्मियाची बाजू घेवून आपल्याच मुस्लिम बांधवाशी भांडताना आढळणार नहि. हा हरामिपणा फक्त हिन्दुन्मधेच आढळतो . म्हणून तर ते मुसलमान कुठल्याकुठून येवून भरत खंडावर ६०० वर्षे राज्य करू शकले .देशाचे तुकडे पाडू शकले . संपत्ती, अब्रू लुटून नेवून हिंदूंना भिकारी बनवू शकले . हिंदूंना मात्र कधीच अक्कल आली नाही . फाळणीच्या वेळी मुस्लिम लोकांची इथे घरं होती , बिसनेस होता , नोकर्या होत्या . पाकिस्तानमध्ये गेल्यावर ह्या सगळ्याला मुकावं लागेल . म्हणून काही मुस्लिम भारतातच राहिले . त्यांना ह्या देशाबद्दल प्रेम बीम आहे म्हणून नाही राहिले कै

In reply to by dadadarekar

आपण नक्की कोण आहात, दादा दरेकर? हर हर न हिंदुर्नयवनः!!! :) :) :) गंमतीत घ्या!!!

In reply to by तुडतुडी

स्वतःला सच्चे आणि चांगले म्हणवणारे मुसलमान पण आतंकवादी मुसलमानांचा विरोध करताना दिसत नाहीत. वरवर दाखवण्यापुरत म्हणायच आम्ही आतंकवादाचा निषेध करतो पण असं सगळे चांगले मुसलमान एकत्र येवून आतंकवाद्यांना सांगत नाहीत कि जे निरपराधांना मारतात ते धर्मभ्रष्ट आहेत आणि मुस्लिम धर्मात त्यांच्यासाठी जागा नाही.

In reply to by तुडतुडी

तुडतुडी ताई भांडणे आणि मारामारी करणे हा मुसलमानांचा स्वभाव आहे. जेंव्हा बाहेरचा कोणी मिळत नाही तेंव्हा ते आपापसातच भांडतात आणि एकमेकांचा जीव घेतात. इराण आणि इराक देश यांचे ८ वर्षे युद्ध चालले आणि त्यात १० लाख लोक मेले हे सर्व मुसलमानच होते ना?https://en.wikipedia.org/wiki/Iran%E2%80%93Iraq_War पाकिस्तानात दहशतवादाने दहा वर्षात ३५, ००० बळी घेतले( हा अधिकृत आकडा आहे, आणि बेपत्ता झालेले ( मारले गेले आणि सापडले नाहीत असे कितीतरी असतील. आणि हा आकडा वाढतच चालला आहे. जो धर्म हिंसाचारला प्रोत्साहन देतो त्याचे पहिले बळी स्वतःचेच अनुयायी असतात. https://en.wikipedia.org/wiki/Terrorism_in_Pakistan https://en.wikipedia.org/wiki/List_of_terrorist_incidents_in_Pakistan_s…

In reply to by dadadarekar

ते युद्ध होते आणि आता चालू आहे तो दशहतवाद. भ्याड हल्ले आणि निरपराधांना मारणे हेच सर्व मुसलमान पूर्वापार करत आलेले आहेत. धर्माच्या खोट्या कल्पना, कट्टरवाद आणि मनुष्य धर्माला काळिमा फासणारी कृत्ये करणे या पलीकडे या लोकांनी काहीही केलेले नाही. त्यामुळे महाभारताची तुलना इथे अस्थायी आहे.

In reply to by dadadarekar

राज्य/राजकारणासाठी होणारी साठमारी आणि आपली ( अत्यंत उदात्त, शुद्ध तार्कीक ) मतं न मानणार्‍याला जीवनातुन उठवायची धर्माज्ञा यात काहिच फरक नाहि.

In reply to by तुडतुडी

तुम्हाला कधीही कुठलाही मुसलमान दुसर्या मुसलमानाच्या विरोधात बोलताना आढळणार नाही .कधीही कुठलाही मुसलमान इतर धर्मियाची बाजू घेवून आपल्याच मुस्लिम बांधवाशी भांडताना आढळणार नहि. हा हरामिपणा फक्त हिन्दुन्मधेच आढळतो .
यातलेच काही महाभाग मिपावर पण आहेत .

In reply to by रॉजरमूर

>>> तुम्हाला कधीही कुठलाही मुसलमान दुसर्या मुसलमानाच्या विरोधात बोलताना आढळणार नाही .कधीही कुठलाही मुसलमान इतर धर्मियाची बाजू घेवून आपल्याच मुस्लिम बांधवाशी भांडताना आढळणार नहि. हा हरामिपणा फक्त हिन्दुन्मधेच आढळतो . वरील वाक्यांवरून खालील आठवले. गांधीजींना एक नामवंत मुस्लिम (त्याचे नाव लक्षात नाही) असे म्हणाला होता की, "चांगल्यातला चांगला हिंदू सुद्धा वाईटातल्या वाईट मुस्लिमापेक्षा वाईट असतो.". दुसर्‍या शब्दात ... "वाईटातला वाईट मुस्लिम सुद्धा चांगल्यातल्या चांगल्या हिंदूपेक्षा चांगला असतो."

In reply to by श्रीगुरुजी

गांधीजींना एक नामवंत मुस्लिम (त्याचे नाव लक्षात नाही) असे म्हणाला होता की, "चांगल्यातला चांगला हिंदू सुद्धा वाईटातल्या वाईट मुस्लिमापेक्षा वाईट असतो.". >>> संदर्भ???

In reply to by संदीप डांगे

असे विधान करणार्‍याचे नाव मौलाना मोहम्मद अलि जौहर असे आहे. https://books.google.co.in/books?id=Dz-5B8_jMpEC&pg=PA116&lpg=PA116&dq=… During the freedom struggle our leaders tried to win over Muslims even when Maulana Mohammed Ali said that the worst Muslim was better than the best Hindu, including Mahatma Gandhi. http://rethinkingislam-withnewageislam.blogspot.com/2014/09/faith-hered… Even a scholar of Maulana Mohammad Ali Jauhar's standing is credited with the celebrated remark that even the worst Muslim is better than a Mahatma Gandhi, for the former would eventually go to Heaven and the latter won't. http://www.faithfreedom.org/oped/HinduWoman40718.htm In 1924, Mohammed Ali to whom Gandhi showed such affection said, : "However pure Mr. Gandhi's character may be, he must appear to me, from the point of religion, inferior to any Mussalman even though he be without character." In 1925 he emphasized: "Yes, according to my religion and creed, I do hold an adulterous and a fallen Mussalman to be better than Mr. Gandhi".

रच्याकने, फाशी अटळ आहे. ताज्या वृत्तानुसार दया याचिका फेटाळलेली आहे.

सब सियापा है... बाकी सगळं ठिक आहे. पण याकूबला तो मुस्लिम आहे म्हणून फाशी नको म्हणणारे आणि फाशी द्याच म्हणणारे दिसत आहेत. मस्त आहे हे सगळं.

झाले १०० घडा भरला.

असुद्दिनी ओविसी यांचे विधान :- राजकिय पाठिंबा नसल्याने याकुबला फाशी ! हा न्यायालयाचा निकालाचा अपमान आहे ! तसेच हिंदूस्थानी न्याय व्यवस्थेवर एक प्रकारे अविश्वास आणि प्रश्न चिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न आहे ! आसुद्दिन विरुद्ध आता खटला दाखल होण्यास हरकत नसावी ! याकुबच्या निमित्त्याने इतके किळसवाणे राजकारण केले जाइल यावर विश्वास बसत नाही ! अबु आझमी काय, सलमान खान काय, कॉग्रेसचे आमदार काय आणि ओवेसी काय सगळेच एका देशद्रोही व्यक्तीच्या बाजुने उभे राहिलेले दिसले ! हे सर्व एका बॉम्बस्फोटातील अपराध्याच्या बाजुने उभे ठाकले हे या देशाचे मोठे दुर्दैवच ! २२ वर्ष लागली या खटल्याच्या एका आरोपीस फाशी देण्यास ! बॉम्बस्फोटात ठार झालेल्या लोकांबद्धल आणि त्याचे दुखः सहन करणार्‍या नातेवाईकांबाबत कोणतीही सहानभुती व्यक्त न-करता त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याच हा घॄणास्पद प्रकार झाला आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Infosys, Wipro & TCS lose over 1,00,000 people in last four quarters as automation kicks in

तेंडुलक्रांच्या 'हे सारे कुठुन येते' या पुस्तकातला 'मरेपर्यंत फाशी' हा लेख एबीपी माझाने आज प्रकाशित केला आहे. याकुबला फाशी देऊ नये असे मत अजिबात नाही, किंबहुना त्यावर मतप्रदर्शन करावयाची आवश्यकताही नाही, परंतु मृत्युदंडकी शिक्षा लवकरात लवकर जगातून हद्दपार होवो अशी प्रार्थना करतो.

In reply to by वॉल्टर व्हाईट

परंतु मृत्युदंडकी शिक्षा लवकरात लवकर जगातून हद्दपार होवो अशी प्रार्थना करतो.
आमेन

In reply to by वॉल्टर व्हाईट

तेंडुलकरांच्या लेखाचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद. लेख पूर्णपणे वाचला. मला वाटते ते स्वतः फाशीच्या शिक्षेच्या विरोधात होते. पण लेख हा केवळ निरीक्षक म्हणून लिहीलेला वाटला आणि वाचकाला विचार करायला लावणारा वाटला. लेख तेंडुलकरी अर्थात चांगलाचा आहे. पण विषय भिषण असल्याने "आवडला" असे म्हणवत नाही. फाशीची शिक्षा ही भारतीय घटनेप्रमाणे "रेअरेस्ट ऑफ दी रेअर" अशीच आहे. आणि एकंदरीत ती तशीच दिली जात असल्याने न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. फाशीची शिक्षा पूर्णपणे रद्द केल्यास स्वतःच्या मराणाची भिती खुन्यास आणि दहशतवाद्यास वाटणार नाही. त्यामुळे ती रद्द न करता दुर्मिळच ठेवावी असे वाटते. मुंबई स्फोटासंदर्भात देखील ती एकालाच झाली. इतरांची फाशी (जन्मठेप कायम करत) सुप्रिम कोर्टाने वेगवेगळ्या कारणाने रद्द केली. या संदर्भात याकूबला देखील भरपूर वेळ देण्यात आलेला आहे आणि त्याच्या साठी विचार केला गेला आहे. हे लिहीत असाताना देखील वाचले त्याप्रमाणे सुप्रिम कोर्ट न्यायाधिश शेवटचे निवेदन हे परत एकदा पहाटे २ वाजता ऐकणार आहेत. कदाचीत त्यात त्याला सात दिवस अधिक मिळतील. पण त्याहून वेगळा निर्णय मिळण्याची शक्यता नाही. जो न्याय दिला गेला आहे, अथवा दिला जातो, तो ज्यांच्यावर अन्याय केला आहे अशांना दिला जातो. या संदर्भात २५७ लोकं ज्यांचा हकनाक बळी गेला आणि ज्यांचे कुटूंबिय कायमचे त्यांच्या जवळच्यांना मुकले त्यांना हा न्याय आहे. तसेच कोणीही यावं आणि दहशत पसरवावी या दहशतवादी वॄत्तीस दिली गेलेली एक शिक्षा आहे. त्यामुळे दहशतवाद थांबेल का नाही हा मुद्दा नाही, पण या भुमीमधे न्याय दिला जातो हे दिसणे महत्वाचे आहे असे वाटते. असो.

In reply to by विकास

शिक्षेबद्दलचे तुमचे विचार वाचले. मी अजून शिक्षा आणि न्याय याविषयांवर स्वता:ची ठाम अशी मते बनवू शकलेलो नाही. त्यामुळे या प्रतिसादाला विचारमंथन म्हणुन विचारात घ्यावे. शिक्षा- मृत्युदंड दिल्याने 'शिक्षा' या व्यवस्थेचा उद्द्येश कसा सफल होईल? ज्याला शिक्षा दिली जाणार आहे तो व्यक्तीच हयात रहाणार नाही या अर्थाने. न्याय- २५७ लोक जे अस्तित्वातच नाहीत, त्यांना न्याय देऊन काय साध्य होणार. याही पुढे जाउन असेही म्हणता येईल की २५७ लोकांच्या नातेवाईकांना न्याय मिळाला, पण सपोज २५७ पैकी २०० जणांच्या नातेवाईकांना असा मध्ययुगीन न्याय नकोच असेल तर त्यांना आपण तो बळजबरी देणार का?

In reply to by वॉल्टर व्हाईट

चांगले मुद्दे... शिक्षा- मृत्युदंड दिल्याने 'शिक्षा' या व्यवस्थेचा उद्द्येश कसा सफल होईल? ज्याला शिक्षा दिली जाणार आहे तो व्यक्तीच हयात रहाणार नाही या अर्थाने. म्हणूनच तर ती अपवादात्मक परीस्थितीत आणि सर्व पुरावे/शक्यता पडताळून झाल्यावर द्यावी आणि त्यानंतर देखील कायद्याने सर्व मार्ग गुन्हेगारास वापरायची मुभा देऊन झाल्यावर आमलात आणावी अशी व्यवस्था घटनेने केली आहे. आणि हे सर्व अपवादात्मक परीस्थिती, "रेअरेस्ट ऑफ दी रेअर" मधे जर फाशीची शिक्षा दिल्यास... जेंव्हा अशी शिक्षा दिली जाते अथवा दिली जाऊ शकते तेंव्हा इतर होऊ पाहणार्‍या गुन्हेगारांना संदेश मिळतो. याकूबच्या संदर्भात देखील हे लक्षात घेयला हवे, की सुप्रिम कोर्टापर्यंत आजच्या पहाटे पाच पर्यंत वेळ दिला गेला. एरवी उठसूठ सुप्रिम कोर्टाने सरकारला चपराक मारली म्हणत कोर्टाची विधाने (निर्णय नाही) ओरडून सांगणारे या वेळेस मात्र सुप्रिम कोर्टाला चुकीचे समजताना पाहून आश्चर्ययुक्त खेद वाटतो. या शिक्षेच्या अंमलबजावणीमुळे किमान काही सामान्य माणसे जी अतिरेक्यांना मदत करू शकतात ते तसे करण्या आधी दहा वेळेस विचार करतील. हे ही नसे थोडके. हे त्याचे महत्व. बाकी याकूबला फाशी दिली म्हणून पेढे वाटणे अथवा फटाके उडवणे अथवा आनंद व्यक्त करणे हे "मरणांतानी वैराणी" म्हणणार्‍या संस्कृतीच्या विरोधात असल्याने, अर्थातच चुकीचे आहे.

In reply to by विकास

रेअरेस्ट ऑफ दी रेअर" या बद्दल तक्रार नाहीच उलटे आपल्या कायद्याबद्दल ती अत्यंअत कौतुकास्पद गोष्ट आहे. उर्वरीत प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद.

In reply to by वॉल्टर व्हाईट

२५७ लोक जे अस्तित्वातच नाहीत, त्यांना न्याय देऊन काय साध्य होणार.
??? म्हणजे? एखादा मनुष्य मेला की त्याला न्याय मिळण्याची आवश्यकता नसते की काय? न्याय मिळतो तेव्हा व्यक्ति जिवंत असते तेव्हाच काहीतरी साध्य होत असतं का? त्या न्यायाचे काही सामाजिक परिणाम असतात की नाही?
पण सपोज २५७ पैकी २०० जणांच्या नातेवाईकांना असा मध्ययुगीन न्याय नकोच असेल तर त्यांना आपण तो बळजबरी देणार का?
न्याय ह्या शब्दाची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते. आपल्याला हवा तो न्याय मिळण्याची सिस्टीम नाहीये भारतात. सुप्रीम कोर्ट देईल तो न्याय. त्यासाठी कायदे आहेत. तशीच शिक्षा का दिली गेली ह्याचे विवेचनही न्यायालय देते. आता त्या २५७ दुर्दैवी लोकांच्या नातेवाईकांचेच काय तर १२० करोड लोकांचे काहीही मत असो, सुप्रीम कोर्टाचा निर्णय अंतिम असतो. असा प्रत्येकाला काय वाटतं ह्याचा विचार कसा करता येईल? शिवाय ह्या घटनेत न्याय हा individual व्यक्तिला दिलेला नाहीये. बाकी याकुब मेमनला फाशी झाली ह्याचा अपार आनंद झाला.

In reply to by पिलीयन रायडर

प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद.
एखादा मनुष्य मेला की त्याला न्याय मिळण्याची आवश्यकता नसते की काय?
नसते.
न्याय मिळतो तेव्हा व्यक्ति जिवंत असते तेव्हाच काहीतरी साध्य होत असतं का?
होय जिवंत असतांना न्याय मिळाल तर ते न्यायव्यवस्थेचे यश म्हणुन गणले जाईल.
त्या न्यायाचे काही सामाजिक परिणाम असतात की नाही?
असतात, आणि त्यासाठीच न्यायव्यवस्था 'शिक्षा' ही संकल्पना वापरते. पण त्यासाठी मृत्युदंड देणे हाच फक्त ऑप्शन नाही, असा मुद्दा आहे.

In reply to by वॉल्टर व्हाईट

काय भंपक प्रतिसाद आहे. आपल्या म्हणण्याप्रमाणे जर एखाद्याचा खून झाला तर त्याच्या मारेकर्याला सोडूनच द्यायला पहिजे. कारण मेलेल्याला न्याय द्यायची गरजच उरलेली नाही. ती व्यक्ती मेली तरच तो गुन्हा ठरतो मग तिला जिवंतपणी कसा न्याय देणार ? न्यायचे सामाजिक परिणाम नसते तर लोकांनी दाबून खाल्ला असता भ्रष्टाचार केला असता आत्ता निदान न्यायाची तरी भीती आहे. जनाची आणि मनाची लाज त्यांनी कधीच सोडलेली आहे.

In reply to by सुबोध खरे

आपल्या म्हणण्याप्रमाणे जर एखाद्याचा खून झाला तर त्याच्या मारेकर्याला सोडूनच द्यायला पहिजे.
अर्थात तुम्ही माझे प्रतिसाद नीट वाचलेले नाहीत आणि तुम्हाला सोयीस्कर असा अर्थ तुम्ही अझ्युम करून तुम्ही तुमचा प्रतिसाद टंकलेला आहे, त्यामुळे प्रतिवाद करत नाही.

In reply to by वॉल्टर व्हाईट

न्यायव्यवस्था शिक्षा हा प्रकार कशासाठी वापरतात ते तरी सांगा ? गुन्हेगारांवर वचक बसला पाहिजे यासाठी तडफडून प्राण जातील अशीच शिक्षा दिली पाहिजे असे वाटते, भले ते क्रूर वाटत असेल, मानवतेला धरुन नसेल, पण गुन्हा करणा-यांना मनात शिक्षेची भीती निर्माण झालीच पाहिजे. फाशी, शिरच्छेद, विद्युत खुर्चीत हाय होल्टेज विद्युत पुरवठा करून झटके देणे, हाता पायांवर गोळीबार करणे, विषारी वायूत जीव गुदमरावा यासाठी जीव जाईपर्यन्त अनेकदा तसा प्रयोग करणे, अशा मृत्युदंडाचे विविध प्रकार कायद्यात अंतर्भुत करावे लागतील त्या शिवाय गुन्हेगारांवर वचक बसणार नाही. सिग्नल तोड़ल्यामुळे अपघात होतो पेक्षा पाचशे रूपयाच दंड भरावा लागतो ही लोकांना भीती वाटते, म्हणून शिक्षेची कायद्यात तरतूद आहे नाही का ? -दिलीप बिरुटे